8 Crore+ Customers
Affordable Premium
8 Crore+ Customers
Affordable Premium
रोडसाइड असिस्टन्स किंवा ब्रेकडाउन कव्हर हे एक ॲड-ऑन आहे जे तुम्ही तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स किंवा टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी मध्ये निवडू शकता, ज्यावेळी तुम्हाला रस्त्याच्या कडेला मदतीची आवश्यकता आहे अशा वेळी तुम्हाला मदत करण्यासाठी, म्हणजेच तुम्ही रस्त्यावर अडकल्यावर काही मदतीची आवश्यकता असल्यावर हे उपयुक्त ठरते.
एक छोटीशी दुर्घटना असो किंवा टायर पंक्चर, रस्त्याच्या कडेला 24x7 चे सहाय्य कव्हर तुम्हाला अशा अडचणींच्या वेळी मदत करू शकते, आणि हे क्लेम म्हणून पकडले जात नाही.
तुम्ही तुमच्या प्रीमियममध्ये स्टँडर्ड मिनिमम ॲडीशनसाठी आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह कार किंवा बाईक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये रोडसाइड किंवा ब्रेकडाउन असिस्टन्स कव्हर निवडू शकता. यासाठी डिजिटमध्ये, कारसाठी तुम्हाला अतिरिक्त 102 रुपये खर्च येऊ शकतो, तर बाईकसाठी तुम्हाला 40 रुपये खर्च येऊ शकतो.
एकदा का तुम्ही तुमच्या डिजिट कार किंवा बाईक इन्शुरन्स प्लॅनमध्ये रोडसाइड/ब्रेकडाउन असिस्टन्स कव्हरचा पर्याय निवडला असेल, तर गरजेच्या वेळी रोडसाइड असिस्टन्स कव्हर वापरणे सोपे आहे !
अडचणींच्या वेळी (जेव्हा तुम्हाला सेवेची गरज असते) तुम्हाला फक्त 1800-103-4448 वर कॉल करणे आणि तुमच्या पॉलिसीविषयीची माहिती जवळ ठेवणे आवश्यक आहे आणि आम्ही काही वेळातच आपल्यासाठी तेथे असू.
डिजिटसह, रोडसाइड असिस्टन्स कव्हर 24 x 7 सपोर्टसह येते आणि सुविधा आणि कामगार खर्चाची देखील यात काळजी घेतली घेते. आम्ही तुम्हाला तुमच्या शहरापासून 500 किलोमीटरपर्यंतची सेवा देतो (इतर लोक फक्त 100 किलोमीटरपर्यंतची सेवा देतात
तुमच्या कार इन्शुरन्समध्ये किंवा टू-व्हिलर इन्शुरन्समध्ये आरएसए अंतर्गत जे काही कव्हर्ड आहे त्याचा सारांश तुम्हाला आधीच देण्यात आला आहे. तथापि, तुम्ही तुमच्या कव्हरेजमधील तपशील समजून घेणे देखील महत्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला रोड साइड असिस्टन्स किंवा ब्रेकडाउन असिस्टन्स कव्हरचे फायदे पूर्णपणे समजतील.
आम्ही आमच्या अटी आणि शर्तींबद्दल अगदी स्पष्ट आहोत जेणेकरून जेव्हा क्लेम्सचा प्रश्न येतो तेव्हा आपण आश्चर्यचकित होणार नाही. डिजिटच्या रोडसाइड असिस्टन्स कव्हरच्या संदर्भात, तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा काही गोष्टी येथे दिल्या आहेत: