सेकंड हँड बाईकचे तुम्ही तेव्हाच मालक असाल जेव्हा वाहनाच्या आरसी (RC) वर तुमचे नाव असेल. त्यामुळे, तुम्ही शहराभोवती तुमच्या पहिल्या राइडसाठी निघण्यापूर्वी, सर्व संबंधित कागदपत्रे तुमच्या नावावर असल्याची खात्री करा.
तुम्ही हस्तांतरणाची विनंती सुरू करण्यापूर्वी, तुम्हाला आरटीओकडून जेथे वाहनाची नोंदणी केली गेली होती तिथून ना हरकत पत्र (NOC) घेणे आवश्यक आहे. जर वाहन कर्जावर खरेदी केले असेल तर, आरटीओसह, बँकरकडून ना हरकत पत्र ((NOC) देखील आवश्यक असेल.
तुमच्या सेकंड-हँड बाईकच्या मालकीचे हस्तांतरण पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:
# मालकासह स्थानिक आरटीओला भेट द्या. त्याला बाईकची मालकी हस्तांतरित करण्याचे कारण नमूद करणारा विनंती अर्ज दाखल करावा लागेल आणि फॉर्म 29 भरावा लागेल. तो मालकाने भरावा जो तेथे मूळ आरसी(RC) तयार करेल.
# स्वयं-साक्षांकित (सेल्फ अटेस्टेड) मोटर इन्शुरन्सची कॉपी सबमिट करा.
# त्यानंतर तुम्हाला फॉर्म 30 भरावा लागेल आणि तो आरटीओमध्ये सबमिट करावा लागेल.
# तुमच्या (नवीन मालकाच्या) पत्त्याच्या पुराव्याची (ॲड्रेस प्रूफ) अटेस्टेड फोटोकॉपी सबमिट करा.
# प्रदूषण नियंत्रणाचे प्रमाणपत्र (PUC) सादर करा.
# इतर कागदपत्रांसह, तुम्हाला पॅन किंवा फॉर्म 60 किंवा फॉर्म 61 ची अटेस्टेड कॉपी द्यावी लागेल.
# हस्तांतरण शुल्क लागू असेल त्याप्रमाणे जमा करा.
प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणि मालकी हस्तांतरित होण्यासाठी साधारण 10-15 दिवस लागतील. दरम्यान, बाईकची इन्शुरन्स पॉलिसी आहे की नाही ते तपासा. जर होय, तर तुम्ही इन्शुरन्सचे हस्तांतरण अंमलात आणू इच्छिता की नाही हे ठरवा किंवा त्याऐवजी तुम्ही तुमच्या इच्छित इन्शुरन्स कंपनीकडून नवीन इन्शुरन्स पॉलिसी घ्याल.
समजा इन्शुरन्स पॉलिसी अस्तित्वात आहे आणि तुम्हाला ती तुमच्या नावावर हस्तांतरित करायची आहे. या प्रकरणात, बाईकच्या पूर्वीच्या मालकाने इन्शुरन्स पॉलिसी, ओळखीचा पुरावा, वाहन नोंदणीची प्रत आणि फॉर्म 20 आणि फॉर्म 30 च्या फोटोकॉपीसोबत इन्शुरन्स कंपनीला भेट दिली पाहिजे. इन्शुरन्स कंपनीला विनंती पूर्ण करण्यासाठी व नाव बदलण्यासाठी सुमारे 15 दिवस लागू शकतात.