कॉम्प्रिहेन्सिव्ह मोटार इन्शुरन्स

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी

वाहन चालवणे म्हणजे सोय आणि आराम. पण काही वेळा टू-व्हिलर किंवा फोर व्हिलर रस्त्यावरून चालवल्याने अनपेक्षित अपघात होऊ शकतात. अशा घटनांसाठी, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स खरेदी करणे  त्या व्यक्तीच्या मालकीच्या वाहतुकीची साधने ठप्प होऊ नये यासाठी गरजेचे आहे.

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स म्हणजे काय?

वाहन आणि थर्ड पार्टीला (शारीरिक इजा किंवा मालमत्तेचे नुकसान) अपघाती नुकसानीच्या वेळी मालकाच्या आर्थिक हितासाठी देय असलेली इन्शुरन्स पॉलिसी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स म्हणून संबोधली जाते.

बाजारातील इन्शुरन्सची मागणी तर्कसंगत करण्यासाठी, नियामक आयआरडीएने मोटार इन्शुरन्स पॉलिसी आणली. हे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज पॉलिसी आणि थर्ड पार्टी  लायॅबलिटी पॉलिसी म्हणून उपलब्ध आहे.

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स हे पुढील संरक्षणाचे आश्वासन आहे:

a) स्वतःच्या वाहनाचे नुकसान

b) अपघातात सहभागी असलेल्या कोणत्याही थर्ड पार्टीची लायॅबलिटी.

मृत्यू वगळता कोणत्याही इतर कोणत्याही दुर्घटनेमध्ये नुकसान झाल्यास त्याची भरपाई करण्यासाठी इन्शुरन्स कंपनी जबाबदार आहे. रस्ता अपघातामुळे मृत्यू झाल्यास, एखाद्या व्यक्तीच्या नॉमिनीला एमएसीटी( MACT)द्वारे नुकसानभरपाई दिली जाईल. कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर हे त्यांच्या वाहनासाठी खरेदी करू शकणारे जास्तीत जास्त कव्हर आहे.

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले आहे?

थर्ड पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्सच्या विपरीत, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स खरेदी करणे अनिवार्य नाही. मालकाला त्याच्या/तिच्या स्वत:च्या नुकसानीचे रक्षण करायचे असल्यास कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स संरक्षण खरेदी करणे ही त्याची निवड आहे.

आघाताची व्याप्ती आणि नुकसानीचे प्रमाण मोठे असू शकते. दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली रक्कम खूप जास्त असू शकते. कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स खालील गोष्टींना कव्हरेज देते:

  • वाहन : कारचे नुकसान ज्यासाठी दुरुस्तीचा खर्च केला जाईल तो कॉम्प्रिहेन्सिव्ह मोटार पॉलिसीअंतर्गत समाविष्ट आहे. अपघातामुळे नुकसान होऊ शकते. इतर काही प्रकारचे नुकसान जसे की काचेचे नुकसान आणि कोणत्याही बाह्य शक्तीने विंडशील्डचे नुकसान, एखाद्या प्राण्याचे आदळणे, इत्यादीने कारवर बेढब दिसणारे डेंट्स पडू शकतात. पण काळजी करू नका, या योजनेअंतर्गत- तेही कव्हर केले जाईल!

  • थर्ड पार्टी लायॅबलिटी कव्हर : हा कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरचा अनिवार्य भाग आहे. टीपी (TP) लायॅबलिटी थर्ड पार्टीला किंवा इन्शुरन्स उतरवलेल्या कारमुळे झालेल्या मालमत्तेला झालेल्या इजा कव्हर करते.

  • वैयक्तिक अपघात कव्हर : एक अनिवार्य कव्हर जे मालक-ड्रायव्हरला संरक्षित करते. याची मर्यादा आता रू 2 लाखवरून रू15 लाख करण्यात आली आहे.

  • कार चोरी : तुमची कार हरवली म्हणजेच चोरीला जाऊ शकते किंवा दुरुस्तीच्या पलीकडे खराब होऊ शकते. तुमची कार आणि पॉलिसीच्या इन्शुरन्सच्या रकमेवर आधारित कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स त्याची भरपाई करेल.

  • नैसर्गिक आपत्ती : आग, दंगल आणि स्फोट, झाडे आणि इतर वस्तू पडणे, खडक/वस्तू गाड्यांवरून पडणे, वादळ, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वारा आणि भूकंप यासारख्या काही आपत्ती कारला हानी पोहोचवू शकतात ज्यामुळे कार निकामी होऊ शकते. इन्शुरन्स पॉलिसी अशा प्रकरणांमध्ये दुरुस्ती आणि नुकसानीचा खर्च प्रदान करेल.

  • अ‍ॅड-ऑन कव्हर्स : काही अ‍ॅड ऑन कव्हर्स, अतिरिक्त प्रीमियम भरल्यानंतर मूळ कव्हरमध्ये जोडले जाऊ शकतात. झिरो डिप्रिसिएशन कव्हर, रोडसाइड असिस्टन्स, इंजिन प्रोटेक्शन, पॅसेंजर कव्हर आणि इतर ही अशा कव्हरची उदाहरणे आहेत.

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी लायॅबलिटी पॉलिसीमधील फरक

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स थर्ड पार्टी लायॅबलिटी इन्शुरन्स
कव्हरेज हे वाहनाला कव्हरेज, शारीरिक इजा किंवा मालमत्तेच्या नुकसानीसाठी थर्ड पार्टीला लायॅबलिटी प्रदान करते. थर्ड पार्टीला झालेल्या शारीरिक इजा किंवा मालमत्तेचे नुकसान यामुळे कव्हर देय असलेल्या कोणत्याही लायॅबलिटीपासून संरक्षण प्रदान करते.
वाहने नवीन किंवा काही वर्षे जुने वाहन ज्यासाठी दुरुस्तीचा खर्च आटोक्यात येऊ शकत नाही त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर आवश्यक आहे. अपघात किंवा रस्ता अपघातानंतर या दुरुस्तीची आवश्यकता असेल. 10 वर्षांहून अधिक जुनी वाहने ज्यांच्या दुरुस्तीचा खर्च असू शकतो त्या मालकांसाठी थर्ड पार्टी लायॅबलिटी इन्शुरन्सची आवश्यकता असेल. या वाहनांसाठी, दुरुस्तीचा खर्च जास्त होणार नाही.
इन्शुरन्सची किंमत कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर तुलनेत महाग आहे कारण ते दुखापत, नुकसान आणि चोरीपासून व्यापक संरक्षण देते. कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरच्या तुलनेत थर्ड पार्टी लायॅबलिटी इन्शुरन्स स्वस्त आहे.
किंमत कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरची किंमत वेगवेगळी असते कारण ती वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांनी देऊ केलेल्या दर आणि सवलतींवर अवलंबून असते. थर्ड पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्सची किंमत नियंत्रकाद्वारे निश्चित केली जाते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी खरेदी करण्याचे फायदे

आर्थिक लायॅबलिटी दूर ठेवण्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी, तुमच्या वाहनासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे चांगले मानले जाते. त्याचे अधिक फायदे आहेत कारण:

  • स्वतःच्या वाहनाचे नुकसान कव्हर करते : कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर अंतर्गत, आपत्तीजनक घटनांमुळे उद्भवलेल्या स्वत:च्या वाहनाच्या नुकसानासाठी कव्हर केले जाते. समजा तुम्ही तुमची गाडी रस्त्याच्या मधोमध एका झाडाला धडकली; कार खराब झाली आहे आणि दुरुस्तीची गरज आहे. तुमची इन्शुरन्स पॉलिसी तुमच्यासाठी ते निश्चित करेल!

  • शारीरिक दुखापत आणि मालमत्तेचे नुकसान दोन्ही थर्ड पार्टी लायॅबलिटी कव्हर करते : जेव्हा इन्शुरन्सधारकाला शारीरिक इजा आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे असे मानले जाते तेव्हा तो दायित्व खर्च देखील कव्हर करेल. कल्पना करा हायवेवर गाडी चालवताना तुमचा तोल गेला आणि रस्ता ओलांडणाऱ्या माणसाला धडकला; त्या माणसाला दुखापत झाली आणि ती तुमची चूक होती. तुम्ही असा खर्च कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीअंतर्गत मिळवू शकता.

  • अ‍ॅड-ऑन कव्हर्सची तरतूद : थर्ड पार्टी लायॅबलिटी पॉलिसीअंतर्गत झिरो डेप, इंजिन संरक्षण इ. ज्यांना परवानगी नाही अशांसाठी काही अतिरिक्त कव्हर्स खरेदी करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीचा विचार करा जिथे तुम्हाला पावसाच्या पाण्याने भरलेल्या रस्त्यावर गाडी चालवायची आहे; गाडीचे इंजिन जाम झाल्याने अचानक ते काम करणे बंद झाले. तुम्ही अ‍ॅड-ऑन म्हणून इंजिन संरक्षण योजना खरेदी केली असती, तर तुम्ही दुरुस्तीचा खर्च नक्कीच वसूल करू शकला असता.

अलिकडेच मालक-ड्रायव्हरसाठी वैयक्तिक अपघात पॉलिसी अनिवार्य करून नियंत्रकानी मोटार पॉलिसी अंतर्गतचे कव्हरेज वाढवले ​​आहे. या पीए ( PA) कव्हरची किमान मर्यादा रु. 15 लाख आहे.