hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance
डिजिट इन्शुरन्सकडे स्विच करा

7 Crore+ Customers

Affordable Premium

ओन डॅमेज इन्शुरन्स बद्दल सविस्तर माहिती

स्वतंत्र ओन डॅमेज (OD) इन्शुरन्स कोणाला मिळावा?

Own damage insurance
  • जर तुम्ही अलीकडेच डिजिटमधून फक्त थर्ड पार्टी  इन्शुरन्स विकत घेतला असेल तर तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या वाहनाचे नुकसान आणि तोट्यापासून संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र ओन डॅमेज कव्हर देखील मिळवू शकता.
  • तुम्ही नुकतेच वाहन खरेदी केले असल्यास परिणामी दुसर्‍या इन्शुरन्स कंपनीकडून थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतला असेल, तर तुम्ही डिजिटमधून तुमचे स्वतंत्र ओन डॅमेज कव्हर खरेदी करु शकता. यामध्ये अपघात, नैसर्गिक आपत्ती, चोरी इत्यादींपासून तुमच्या वाहनाच्या संरक्षणाचा समावेश असेल. तसेच तुम्ही तुमच्या कव्हरेजच्या व्याप्तीसाठी अ‍ॅड-ऑन कव्हर्सची निवड देखील करू शकता.

ओन डॅमेज (OD) इन्शुरन्समध्ये काय समाविष्ट आहे?

Damages to your vehicle in an accident

अपघात

अपघात झाल्यास तुमच्या कार किंवा टू व्हीलरला झालेल्या नुकसानाची भरपाई

Theft of your vehicle

वाहनाची चोरी

तुमची कार किंवा बाइक दुर्दैवाने चोरीला गेल्यास झालेल्या नुकसानाची भरपाई

Losses caused to your vehicle in a fire

आगीत वाहनाचे झालेले नुकसान

आगीच्या दुर्घटनेत तुमच्या कार किंवा बाइकचे नुकसान झाल्यास भरपाई. तुमचे स्वतःचे डॅमेज कव्हर ते कव्हर करेल.

Damages to your vehicle due to a natural calamity

नैसर्गिक आपत्ती

निसर्गाच्या अनेक प्रकोपांना कोणीही रोखू शकत नाही परंतु जर तुमची कार किंवा बाइक यामुळे खराब झाली तर, नुकसान नियंत्रणासाठी हा इन्शुरन्स तुमच्या नक्कीच कामी येईल.

ओन डॅमेज (OD) इन्शुरन्समध्ये काय समाविष्ट नाही?

तुमच्या वाहनाच्या संरक्षणासाठी ओन डॅमेज इन्शुरन्स उत्तम असले तरी यात काही अपवाद आहेत-

थर्ड पार्टी लायबिलिटीज

स्वतःच्या वाहनांचे नुकसान होण्यापासून संरक्षण देणारी ओन डॅमेज ही एक स्वतंत्र पॉलिसी आहे. त्यामुळे, तुमच्या थर्ड पार्टी लायबिलिटीजचा यामध्ये समावेश केला जाणार नाही. तुमचा थर्ड पार्टी  वाहन इन्शुरन्स त्याची काळजी घेईल.

मद्यपान करून वाहन चालवणे

हे कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असल्यास कोणत्याही नुकसानाची भरपाई केली जाणार नाही.

विना लायसन्स वाहन चालवणे

प्रमाणित नियमानुसार, जर ती व्यक्ती बेकायदेशीरपणे वाहन चालवत असेल तर कोणताही इन्शुरन्स क्लेम कंपनी स्वीकारू शकत नाही. त्यामुळे, जर तुम्ही वैध चालक लायसन्स घेऊन गाडी चालवत असाल तरच दावे केले जाऊ शकतात.

अ‍ॅड-ऑन फायदे

हे अगदी स्पष्ट आहे, नाही का? तुम्ही विशिष्ट अ‍ॅड-ऑन खरेदी केले नसल्यास, तुम्ही त्यांचा फायदा घेऊ शकणार नाही. उदाहरणार्थ, टायर संरक्षण कव्हर न निवडता- तुमचा टायर फक्त अपघातादरम्यान संरक्षित केला जाईल आणि त्यापलीकडे नाही.

परिणामी नुकसान

परिणामी नुकसान म्हणजे अपघातानंतर होणारे नुकसान. दुर्दैवाने, अपघातादरम्यान नुकसान झाल्याशिवाय ते कव्हर केले जाणार नाहीत.

निष्काळजीपणा

सोप्या भाषेत, याचा अर्थ असा आहे की तुम्ही वाहन चालवताना निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास आपला नुकसान भरपाईचा क्लेम भरून दिला जाणार नाही. उदाहरणार्थ; जर तुमच्या शहरात आधीच पूर आला असेल आणि तरीही तुम्ही तुमची कार किंवा बाइक पुरात बाहेर काढली असेल.

विना परवानाधारक वाहन चालवणे

कायद्यानुसार, जर तुमच्याकडे फक्त लर्निंग लायसन्स असेल, तर तुमच्यासोबत कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स असणारे कोणीतरी असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास, तुमचा नुकसान भरपाई क्लेम स्वीकारला जाणार नाही.

ओन डॅमेज (OD) इन्शुरन्ससह खालील अ‍ॅड-ऑन उपलब्ध आहेत:

ओन डॅमेज (OD) इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे काय?

थर्ड पार्टी प्रीमियम आणि ओन डॅमेज (OD) प्रीमियम मधील फरक

भारतीय मोटार वाहन कायदा, 1988 नुसार आपल्याकडे दोन प्रकारची धोरणे असू शकतात. एक स्वत:चे नुकसान आणि दायित्व कव्हर असलेली सर्वसमावेशक पॉलिसी असू शकते आणि दुसरी स्वतंत्र थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी असू शकते. गेल्या काही वर्षांत, (उत्तरदायित्व) लायबिलिटी दावे वाढले आहेत परिणामी थर्ड पार्टी प्रीमियममध्ये सुद्धा वाढ झाली आहे.

थर्ड पार्टी प्रीमियम

ओन डॅमेज प्रीमियम

आकडेमोडीचे घटक

वाहनाच्या घन क्षमतेवर अवलंबून इन्शुरन्स नियामकाद्वारे निश्चित केले जाते.

ओन डॅमेज प्रीमियमची गणना IDV, खरेदीचे वर्ष, स्थान आणि वाहनाचा प्रकार यावर आधारित केली जाते.

स्थिरता

नियामक IRDAI द्वारे थर्ड पार्टी प्रीमियम वाढविला आणि कमी केला जाऊ शकतो.

वाहनाचे मूल्य वर्षानुवर्षे कमी होत असल्याने ओन डॅमेज हप्ता कमी होईल.

मोटर प्रीमियमचा भाग

मोटर पॉलिसीमध्ये निश्चित केल्याप्रमाणे नेहमीच एक हिस्सा असेल, मग तो सर्वसमावेशक किंवा स्वतंत्र असो.

मोटार पॉलिसी प्रीमियममध्ये त्याचा हिस्सा असू शकतो किंवा नाही.

आपली चेतनाच आपल्याला नेहमी सावधगिरीचे उपाय करण्यास सतर्क करते. रस्त्यावर वाहन चालवताना सर्व काही आपल्या नियंत्रणात असतेच असे नाही. म्हणूनच, महत्त्वाच्या संकटाच्या वेळी आर्थिक भार टाळण्यासाठी आधीच सुजाणपणे सर्वसमावेशक मोटर संरक्षण धोरण निवडणे कधीही फायद्याचे ठरेल.

ओन डॅमेज (OD) इन्शुरन्स, थर्ड पार्टी इन्शुरन्स किंवा सर्वसमावेशक इन्शुरन्स यातील मी कशाची निवड करावी?

भारतातील ओन डॅमेज इन्शुरन्स संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न

इन्शुरन्समध्ये ओन डॅमेज (OD) चा अर्थ काय आहे?

up-arrow

इन्शुरन्समध्ये ओन डॅमेज म्हणजे 'ओन डॅमेज', हा इन्शुरन्स तुमच्या स्वत:च्या वाहनाचे नुकसान भरून काढण्यासाठी कामी येतो. 

इन्शुरन्समध्ये ओन डॅमेज म्हणजे 'ओन डॅमेज', हा इन्शुरन्स तुमच्या स्वत:च्या वाहनाचे नुकसान भरून काढण्यासाठी कामी येतो. 

इन्शुरन्स खरेदी करण्यास कोण पात्र आहे?

up-arrow

ज्यांच्याकडे आधीपासून वैध थर्ड पार्टी  मोटर इन्शुरन्स आहे त्यांना स्वत:च्या नुकसानी आणि तोट्यासाठी एक स्वतंत्र इन्शुरन्स खरेदी करायचा असल्यास ओन डॅमेज चा पर्याय उपलब्ध असतो.

ज्यांच्याकडे आधीपासून वैध थर्ड पार्टी  मोटर इन्शुरन्स आहे त्यांना स्वत:च्या नुकसानी आणि तोट्यासाठी एक स्वतंत्र इन्शुरन्स खरेदी करायचा असल्यास ओन डॅमेज चा पर्याय उपलब्ध असतो.

मोटार इन्शुरन्स पॉलिसींचे विविध प्रकार कोणते उपलब्ध आहेत?

up-arrow

तुम्ही खरेदी करू शकता अशा तीन प्रकारच्या मोटार इन्शुरन्स योजना आहेत; थर्ड पार्टी  मोटर इन्शुरन्स पॉलिसी, सर्वसमावेशक किंवा स्टॅंडर्ड मोटर इन्शुरन्स पॉलिसी आणि ओन डॅमेज मोटार इन्शुरन्स पॉलिसी.

तुम्ही खरेदी करू शकता अशा तीन प्रकारच्या मोटार इन्शुरन्स योजना आहेत; थर्ड पार्टी  मोटर इन्शुरन्स पॉलिसी, सर्वसमावेशक किंवा स्टॅंडर्ड मोटर इन्शुरन्स पॉलिसी आणि ओन डॅमेज मोटार इन्शुरन्स पॉलिसी.

ओन डॅमेज इन्शुरन्स कायद्याने अनिवार्य आहे का?

up-arrow

नाही, तुमच्या कार किंवा बाइकसाठी ओन डॅमेज  इन्शुरन्स अनिवार्य नाही परंतु तुमच्या स्वतःच्या वाहनाच्या संरक्षणासाठी याची शिफारस केली जाते. मोटार वाहन कायद्यानुसार, सर्व वाहनांसाठी मूळ थर्ड पार्टी इन्शुरन्स अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही एका पॉलिसीमध्ये थर्ड पार्टी लायबिलिटी आणि ओन डॅमेज  फायदे समाविष्ट असणारा सर्वसमावेशक इन्शुरन्स निवडू शकता.

ओन डॅमेज इन्शुरन्स केव्हा लागू झाला?

up-arrow

मार्च 2019 मध्ये (कायद्यानुसार) दीर्घकालीन थर्ड पार्टी पॉलिसी खरेदी केलेल्या कार आणि बाइक मालकांना विशेषत: मदत करण्यासाठी IRDAI द्वारे सप्टेंबर 2019 मध्ये स्वतंत्र ओन डॅमेजइन्शुरन्स सुरू करण्यात आला होता जेणेकरून त्यांना स्वतःचे नुकसान भरून काढण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. याशिवाय, हे कव्हर ज्यांच्याकडे फक्त सक्रिय थर्ड पार्टी  मोटर इन्शुरन्स पॉलिसी आहे अशा वाहनधारकांसाठी उपलब्ध आहे.

माझी थर्ड पार्टी पॉलिसी जूनमध्ये समाप्त होत असल्यास मी अजूनही ओन डॅमेज पॉलिसी खरेदी करू शकतो का?

up-arrow

होय, जोपर्यंत तुमची थर्ड पार्टी पॉलिसी पुढील चार महिन्यांत कालबाह्य होत नाही तोपर्यंत तुम्ही ओन डॅमेज पॉलिसी ची निवड करू शकता.

होय, जोपर्यंत तुमची थर्ड पार्टी पॉलिसी पुढील चार महिन्यांत कालबाह्य होत नाही तोपर्यंत तुम्ही ओन डॅमेज पॉलिसी ची निवड करू शकता.