hamburger
×
Digit General Insurance Logo
Powered By Digit
general-insurance
डिजिट इन्शुरन्सकडे स्विच करा

7 Crore+ Customers

Affordable Premium

मोटार इन्शुरन्सचे प्रकार

भारतातील मोटार इन्शुरन्सचे प्रका

Private Car Insurance Policy

खाजगी कार इन्शुरन्स पॉलिसी

हा असा मोटार इन्शुरन्स आहे जो एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या कोणत्याही खासगी कारसाठी घेणे आवश्यक आहे आणि भारत सरकारने असा इन्शुरन्स घेणे बंधनकारक केले आहे. यात अपघात, आग, नैसर्गिक आपत्ती, चोरी आणि मालकाला कोणत्याही प्रकारची इजा झाली तर  कव्हर देण्यात येते. यात थर्ड पार्टीला झालेल्या कोणत्याही नुकसानीचा आणि जखमांचाही समावेश होतो. 
Two-Wheeler Insurance Policy

टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी

या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये स्कूटर किंवा बाईकसारख्या टू-व्हीलरचा समावेश आहे आणि भारत सरकारने हा इन्शुरन्स बंधनकारक केला आहे. टू-व्हीलर इन्शुरन्समध्ये अपघात, आपत्ती, आग, चोरी इत्यादींमुळे होणारे नुकसान तसेच थर्ड-पार्टीला होणारे कोणतेही नुकसान आणि जखम यासाठी कव्हर दिले जाते. हे मालक आणि गाडी चालवत असणाऱ्यासाठी अनिवार्य आहे.  पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर देखील प्रदान करते आणि प्रवाश्यांसाठीदेखील कव्हर देता येते.
Commercial Vehicle Insurance

कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स

या इन्शुरन्समध्ये वैयक्तिक वापरासाठी न वापरल्या जाणाऱ्या सर्व वाहनांचा समावेश आहे.  या प्रकारच्या इन्शुरन्समध्ये त्या सर्व वाहनांचा समावेश आहे जे वैयक्तिक हेतूसाठी वापरले जात नाहीत. ट्रक, बस, हेवी कमर्शिअल व्हेईकल्स, हलकी कमर्शिअल वाहने, बहुपयोगी वाहने, कृषी वाहने,  टॅक्सी/कॅब, रुग्णवाहिका, ऑटो-रिक्षा इत्यादी काही वाहने या इन्शुरन्स अंतर्गत समाविष्ट आहेत.

भारतातील मोटार इन्शुरन्स पॉलिसींचे प्रकार

car-quarter-circle-chart

थर्ड-पार्टी

थर्ड पार्टी इन्शुरन्स हा व्हेईकल इन्शुरन्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे; ज्यामध्ये केवळ थर्ड-पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान कव्हर होते.
car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स हा व्हेईकल इन्शुरन्सचा सर्वात मौल्यवान प्रकार आहे जो थर्ड-पार्टी लायॅबिलिटी आणि तुमच्या स्वत:च्या वाहनाचे नुकसान या दोन्हीला कव्हर करतो.

थर्ड पार्टी

सर्वसमावेशक

×
×
×
×
×
×

कॉम्प्रिहेन्सिव्ह मोटार इन्शुरन्स पॉलिसीसह ॲड-ऑन्स

खालील यादीत 'ॲड ऑन' कव्हर्सपैकी काही गोष्टी आहेत ज्या मूलभूत मोटार इन्शुरन्स पॉलिसी खर्चापेक्षा कमी प्रीमियमवर मिळू शकतात.

झिरो डिप्रिसिएशन

वाढत्या वयासोबत काही दोषही वाढत जातात. हीच गोष्ट तुमच्या वाहनालाही लागू होते. ते जितके जुने होईल तितके तुमच्या कार किंवा बाईकचे मूल्य कमी होते किंवा 'डिप्रिशिएट' होते. परंतु, चिंता करु नका, झिरो डेप्रीसिएशन ड-ऑन हे सुनिश्चित करते की तुम्ही खरेदी केले त्या दिवसाइतकेच तुमच्या वाहनाचे मूल्य राहील. शेवटी, इन्शुरन्स कंपनी अंतिम सेटलमेंट दरम्यान डिप्रिसिएशनचा विचार करणार नाही!

इंजिन संरक्षण कव्हर

इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हर हे एक 'ॲड ऑन' आहे जे वाहनाच्या इंजिनला झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक संरक्षण प्रदान करते. इंजिनमध्ये पाणी शिरण्यापासून ते ल्युब्रिकेटिंग तेलाच्या गळतीपर्यंत कोणतेही नुकसान या पॉलिसीमध्ये कव्हर केले जाते.

रोडसाइड असिस्टन्स

मध्यरात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी चोरीमारीच्या वाटेवर तुमच्या गाडीची चाकं तुटण्याची कल्पना कशी वाटते? घाबरू नका, रोडसाइड असिस्टन्स आहे. तुम्हाला फक्त त्यांना कॉल करणे आवश्यक आहे आणि ते घटनास्थळी येतील आणि तुमचे वाहन दुरुस्त करतील. शक्य नसल्यास ते जवळच्या सर्व्हिस स्टेशनकडे टो करतील. निदान तुम्ही सुखरूप राहाल!

कंझ्युमेबल कव्हर

आजकाल, मोटार इन्शुरन्स कंपन्या तुमच्या वाहनाच्या सर्व्हिस कॉस्टसाठी (देखभालीचा खर्च) एक कंझ्युमेबल कव्हर ॲड-ऑन  प्रदान करतात,  तुमच्या वाहनात टाकलेल्या नवीन इंजिन तेलापासून ते तुमच्या इंजिन कव्हरवरील हरवलेल्या नटपर्यंत सगळे कव्हर केले जाते.

रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर

दुरुस्तीच्या पलीकडे गेलेली स्थिती, चोरी किंवा नुकसान झाल्यास, रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर तुम्हाला तुमच्या कारच्या/बाईकच्या इनव्हॉईस मूल्याची संपूर्ण रक्कम परत मिळविण्याचा फायदा देते, ज्यात अनुक्रमे नवीन वाहन आणि त्याचा रोड टॅक्स ( रस्ते कर) नोंदविण्याचा खर्च कव्हर होतो.

टायर प्रोटेक्ट कव्हर

सामान्यत: टायरचे नुकसान इन्शुरन्समध्ये कव्हर केले जात नाही, पण ते जर अपघातात खराब झाले असतील तर कव्हर होते. त्यामुळेच हा टायर प्रोटेक्ट ड-ऑन  तुम्हाला तुमच्या कारच्या टायरच्या नुकसानीपासून जसे की फुटणे, फुगणे किंवा कापले जाणे अशा तत्सम गोष्टींपासून संरक्षण देऊन या गोष्टी कव्हर करते.