देशाच्या बाहेर फिरायला जायचे म्हंटले की, सर्वात प्रथम 'व्हिसा'साठी अर्ज करण्याचा विचार मनात येतो. तुम्ही ज्या देशाला भेट देऊ इच्छिता, त्या देशाचा व्हिसा मिळावा यासाठी क्लिष्ट अर्ज प्रक्रियेला सामोरे जावे लागेल का? वेळ वाया जाईल का? असे प्रश्न तुह्माला पडले असतील. एखाद्या देशाचा व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करतानाच क्लिष्ट पद्धतीमुळे तुमचे तासंतास वाया जातात.
पण तुम्हाला माहीत आहे का, अनेक देशांमध्ये राहण्यासाठी भारतीयांना व्हिसा आवश्यक नसतो. तर काही देशामध्ये भारतीयांसाठी 'व्हिसा-ऑन-अरायव्हल' ची सुविधा असते.
हो! अगदी बरोबर!
'हेनले आणि पार्टनर्स 'च्या पासपोर्ट निर्देशांकानुसार, मार्च 2023 पर्यंत, भारतीय पासपोर्ट धारक अनेक देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हलचा लाभ घेऊ शकतात. भारतीय नागरिक 'ई-व्हिसा/एंट्री परमिट' द्वारे खालील यादीत नाव असलेल्या देशांमध्ये प्रवास करू शकतात. सद्य स्थितीत, देशाच्या बाहेर प्रवास करण्याचं स्वातंत्र्य देण्याच्या बाबतीत 'भारतीय पासपोर्ट' 84 व्या क्रमांकावर आहे.
पण पासपोर्ट असणारे भारतीय नागरिक कोणत्या देशात व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात? हे पाहण्यासाठी खालील यादी तपासा!
1. अल्बेनिया | 15. मायक्रोनेशिया |
2. बार्बाडोस | 16. मोन्सेरात |
3. भूतान | 17. नेपाळ |
4. ब्रिटिश व्हर्जिन इसलँड | 18. नियू |
5. कुक इसलँड | 19. ओमान |
6. डोमिनिका | 20. कतार |
7. एल साल्वाडोर | 21. सेनेगल |
8. फिजी | 22. सेंट किट्स आणि नेव्हिस |
9. ग्रेनेडा | 23. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स |
10. हैती | 24. श्रीलंका |
11. जमैका | 25. त्रिनिदाद आणि टोबॅगो |
12. कझाकस्तान | 26. ट्युनिशिया |
13. मकाओ (SAR चीन) | 27. थायलंड |
14. मॉरिशस | 28. वानू |
सहसा, इमिग्रेशन अधिकारी नागरिकाला 'व्हिसा-ऑन-अरायव्हल' देण्याआधी अर्जदाराचे पासपोर्ट, बायोमेट्रिक्स तपासतात, त्याच बरोबर निर्धारित पेमेंट गोळा करतात, आणि त्यानंतर 'व्हिसा परमिट' इश्यू करतात. 'ऑन-अरायव्हल व्हिसा' देशातील प्रवेशाच्या प्रमुख ठिकाणी 'इश्यू' केला जातो. त्यामुळे लक्षात ठेवा की, तुम्ही तेथे पोहोचल्यावर व्हिसा 'इश्यू' होत असलेल्या ठिकाणी जाणे आणि तुमचा व्हिसा इश्यू करून घेणे गरजेचे आहे.
'इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन' (ETA) ही सुविधा भारतीयांसाठी 2014 मध्ये, 2015 मधील पात्र देशांच्या सुधारित यादीसह कार्यान्वित झाली. खाली दिलेल्या यादीमध्ये, भारतीय नागरिकांना 2023 मध्ये 'व्हिसा-ऑन-अरायव्हल' आणि 'ई-व्हिसा' प्रदान करणारे देश नमूद केले आहेत :
29. बोलिव्हिया | 45. मॉरिटानिया |
30. बोत्सवाना | 46. मोझांबिक |
31. बुरुंडी | 47. म्यानमार |
32. कंबोडिया | 48. पलाऊ बेटे |
33. केप वर्दे बेटे | 49. रवांडा |
34. कोमोरो बेटे | 50. सामोआ |
35. इथिओपिया | 51. सेशेल्स |
36. गॅबॉन | 52. सिएरा लिओन |
37. गिनी-बिसाऊ | 53. सोमालिया |
38. इंडोनेशिया | 54. सेंट लुसिया |
39. इराण | 55. टांझानिया |
40. जॉर्डन | 56. तिमोर-लेस्टे |
41. लाओस | 57. टोगो |
42. मादागास्कर | 58. तुवालू |
43. मालदीव | 59. युगांडा |
44. मार्शल बेटे | 60. झिम्बाब्वे |
61. अंगोला | 74. मलेशिया |
62. अँटिग्वा आणि बारबुडा | 75. मोल्दोव्हा |
63. ऑस्ट्रेलिया | 76. मोरोक्को |
64. अझरबैजान | 77. रशिया |
65. बहारीन | 78. साओ टोमे आणि प्रिंसिपे |
66. बेनिन | 79. सिंगापूर |
67. कोलंबिया | 80. सुरीनाम |
68. जिबूती | 81. तैवान |
69. जॉर्जिया | 82. ताजिकिस्तान |
70. केनिया | 83. तुर्की |
71. कुवेत | 84. उझबेकिस्तान |
72. किर्गिझस्तान | 85. व्हिएतनाम |
73. लेसोथो | 86. झांबिया |
'व्हिसा' म्हणजे नेमकं काय?
एखाद्या नागरिकाला परदेशात जायचे असेल, तर त्या नागरिकाला संबंधित देशाला भेट देण्यासाठी सरकारद्वारे परवानगी देणारी कागदपत्रे म्हणजे 'व्हिसा' होय. जसे तुम्ही कोणत्या देशातून आले आहात, याची ओळख पासपोर्ट असते, तसेच 'व्हिसा' हे तुम्हाला परदेशात किती वेळ राहण्यास परवानगी आहे, हे दर्शवते.
आता विविध देशांनी त्यांच्या 'व्हिसा' प्रक्रियेबाबत विविध प्रकारचे नियम मांडले आहेत. ते पुढीलप्रमाणे
‘व्हिसा’चे प्रकार |
नेमका अर्थ काय? |
फ्रि-व्हिसा |
व्हिसा-मुक्त प्रवास हा एक फायदा आहे, जिथे तुम्ही व्हिसा न काढता एखाद्या देशाला भेट देऊ शकता. यासाठी दोन देशांमध्ये त्या पद्धतीचा करार झालेला असावा लागतो किंवा तुम्ही ज्या देशाला भेट देताय, त्या देशाने परदेशी नागरिकांसाठी देशाच्या सीमा मुक्त ठेवलेल्या असतील, तरच तुम्हाला हा लाभ घेता येतो. |
व्हिसा-ऑन-अरायव्हल |
या प्रकारचा व्हिसा 'ऑन-अरायव्हल व्हिसा' म्हणूनही ओळखला जातो, हा व्हिसा प्रवेश द्वारावर पर्यटक म्हणून आलेल्या नागरिकाला दिला जातो .व्हिसा मंजूर करण्याची संपूर्ण प्रक्रिया सरकारी अधिकार्यांद्वारे प्रवेश द्वारावर होते. |
ई- व्हिसा |
ई-व्हिसा हे, देशाच्या इमिग्रेशन ऑफिशिअल चे ऑनलाईन अधिकृत डॉक्युमेंट्स आहेत, जे व्हिजिटर्स म्हणून प्रवेश करण्यास परवानगी देतात. देशाच्या दूतावासाने मंजुरी दिलेल्या कागदी व्यवहारांना हा चांगला पर्याय आहे. |
एन्ट्री परमिट |
देश त्यांच्या पर्यटकांना व्हिसाच्या ऐवजी एन्ट्री परमिट देतात. हे एन्ट्री परमिट अशी कागदपत्रे आहेत, जी परदेशी लोकांना विशिष्ट कालावधीसाठी कायदेशीररित्या देशात प्रवेश करण्याची आणि राहण्याची परवानगी देते. |
होय ! जगभरातील या 34 देशांमध्ये पर्यटकांना पर्यटनासाठी एन्ट्री परमिट अनिवार्य आहे. मुख्य कारण म्हणजे परदेशात आरोग्यसेवांवर बराच खर्च होतो. त्याचबरोबर, तुमच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या अनपेक्षित परिस्थितींपासून स्वतःचे आर्थिक संरक्षण होणार, याची तुम्हाला खात्री होणे महत्वाचे आहे, नाही का?
ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीचे अनेक फायदे आहेत , ज्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे :
त्यामुळे, तुम्हाला तुमचा प्रवास अधिक सुरक्षित करायचा असेल, आणि पैशाची सुद्धा बचत करायची असेल, तर अगदी सुरुवातीपासूनच प्रवास विमा योजना खरेदी करणे उत्तम ठरेल! बाजारात अनेक योजना उपलब्ध आहेत, त्यामुळे तुमचे पेमेंट करण्यापूर्वी, तुम्ही परवडणाऱ्या किमतीत सर्वोत्तम फायदे मिळवण्यासाठी प्रवास विमा योजनांची तुलना केली पाहिजे.