केस 1: जर तुम्ही एक नवीन लक्झरी कार घेतलीत - बऱ्याच कारमालकांसाठी लक्झरी कार विकत घेणे ही एक वन टाईम डील असते, त्यामुळे, तुम्ही तिला थर्ड पार्टी लायबिलिटी आणि स्वतःहून होणाऱ्या नुकसानांपासून कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स द्वारा सुरक्षित केले पाहिजे. लक्झरीयस कार साठी योग्य ते अॅड ऑन्स देखील आवश्यक आहेत.
तुमच्या गाडीचे महाग पार्ट्स दुरुस्त किंवा बदलण्याचा पूर्ण खर्च क्लेम करण्यासाठी तुम्ही झीरो डेप्रीसीएशन कव्हर घेऊ शकता. लक्झरीयस कार्स साठी रिटर्न टू इंव्हॉईस कव्हर खूप फायद्याचे ठरू शकते कारण यामुळे कार चोरीला गेल्यास किंवा टोटल लॉस झाला असता ओरिजनल इंव्हॉईस एवढीच रक्कम तुम्हाला परत मिळेल.
लक्झरीयस कार्स साठी इंजिन प्रोटेक्शन कव्हर देखील गरजेचे आहे कारण इंजिन म्हणजे तुमच्या कारचा एक महाग घटक आहे आणि या कव्हर अंतर्गत तुम्हाला सर्व प्रकारच्या इंजिन आणि गिअरबॉक्स दुरुस्तींपासून तुम्हाला संरक्षण देईल. ल्युब्रीकंट, ऑईल्स, नट्स, बोल्ट्स, स्क्र्यूज, वॉशर्स, गिअर्स ई. च्या रीप्लेसमेंट कॉस्टचे कव्हर मिळवण्यासाठी कंझ्युमेबल कव्हर घेणे कधीही चांगले.
केस 2: जर तुमच्याकडे 7 वर्ष जुनी गाडी असेल जी तुम्ही रोज वापरता. - बरेचजण ज्यांच्याकडे 7 वर्ष जुनी गाडी आहे ते कार इन्श्युरन्सचे महत्त्व टाळतात; तरी कायदेशीररीत्या कमीतकमी थर्ड पार्टी इन्श्युरन्सअसणे बंधनकारक आहे. तुमची कार 7 वर्ष जुनी असेल तर अपघात, चोरी, आग लागणे, नैसर्गिक आपत्ति यासगळ्यामुळे होणाऱ्या कारच्या दुरुस्ती किंवा रीप्लेसमेंट साठीचे कव्हरेज मिळवण्यासाठी ओन-डॅमेज कव्हर घेणे योग्य ठरेल.
कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर काही अॅड ऑन्स सह जसे रोड साईड असिस्टन्स अॅड ऑन तुम्हाला लांबच्या प्रवासात कार ब्रेक डाऊन, टायर पंक्चर होणे किंवा गाडी टो करणे या सर्व समस्यांदरम्यान सुरक्षित ठेवेल.
केस 3: जर तुम्ही तुमच्या आजोबांची गाडी जतन करून ठेवली असेल जी तुम्ही क्वचितच बाहेर काढता - काही वस्तूंशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले असल्यामुळे काही लोक या वस्तू जतन करून ठेवतात जसे की ती कार जी पिढ्यानपिढ्या तुमच्या कुटुंबात जतन करून ठेवली आहे आणि जी तुम्ही क्वचितच चालवता, अशी गाडी देखील कायदेशीररीत्या कमीतकमी थर्ड पार्टी कव्हरेज पॉलिसी द्वारे इन्श्युर केलेली असावी. तसही तुम्ही ती कार वरचेवर चालवत नाही त्यामुळे तुम्ही इतर अॅड ऑन्स विकार घेणे टाळू शकता.