बंपर टू बंपर कव्हर सामान्यत: थोड्या अतिरिक्त प्रीमियमसह सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीसह 'अॅड-ऑन' म्हणून येते. बंपर टू बंपर कव्हर म्हणजे काय ते आधी समजून घेऊ.
बरं, सामान्य शब्दात हे कार इन्शुरन्स ॲड-ऑन आहे जे तुमच्या कारच्या विशिष्ट इंजिनचे नुकसान, टायर, बॅटरी आणि काच यांचे नुकसान झाल्यास कव्हर करते. हा तुमचा सुपरहिरो आहे जो तुमच्या कारच्या नियमित कार इन्शुरन्स पॉलिसीच्या व्यतिरिक्त, कारच्या नुकसानीच्या दुर्दैवी घटनेत १०० % कव्हरेज देत तुमच्या कारची काळजी घेतो.
याला झिरो डिप्रीसिएशन कार इन्शुरन्स असेही म्हणतात. याचे कारण असे की ते विमा संरक्षणातून घसारा (डिप्रीसिएशन) सोडून संपूर्ण कव्हरेज सुनिश्चित करते.
हे कव्हर भारतात २००९ मध्ये सादर करण्यात आले होते. तेव्हापासून ही योजना बर्याच कार मालकांसाठी वरदान सिद्ध झाली आहे. याचा फायदा पुढील लोकांना होऊ शकतो :
- नवीन कार मालक किंवा ज्यांना कार घेऊन ५ वर्षांपेक्षा कमी वर्ष झाली आहेत
- नवीन किंवा अननुभवी ड्रायव्हर्स
- महागड्या सुट्या भागांसह उच्च श्रेणीतील लक्झरी सुपरकारचे मालक
- ज्या भागात अनेकदा अपघात होतात त्या भागात/जवळ राहणारे मालक
- जर तुम्ही अगदी लहान डेंट्स आणि अडथळ्यांबद्दल चिंतित असाल
हे विशेषत: नवीन कार मालकांमध्ये लोकप्रिय आहे. ज्यांना त्यांच्या नव्या कारवर अगदी लहानसा स्क्रॅच आला असला तरी चिंता वाटते आणि ज्यांना दुर्मिळ, महाग स्पेअर पार्ट्ससह उच्च श्रेणीतील महागड्या कार घेणे आवडते. या मालकांना जेव्हा १००% कव्हरेजसाठी अतिरिक्त प्रीमियम भरण्यास सांगितले जाते तेव्हा त्यांना कारच्या संरक्षणासाठी ही ॲड - ऑनची किंमत अगदी किरकोळ वाटते.
वापरा: बंपर टू बंपर कव्हरसह कार इन्शुरन्सच्या प्रीमियमची गणना करण्यासाठी कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर
तुलना करा: बंपर टू बंपर कव्हरसह आणि कव्हरशिवाय सर्वसमावेशक धोरण