6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
मोटर
हेल्थ
मोटर
हेल्थ
More Products
मोटर
हेल्थ
सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
Add Mobile Number
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
Terms and conditions
कार इन्श्युरन्सच्या प्रगत विश्वात तुमचे स्वागत आहे - जिथे तुमचे कव्हरेज आणि खर्च तुमच्या हातात असतील. घेऊन येत आहोत डिजिट कार इन्श्युरन्स पे अॅज यू ड्राईव्ह अॅड ऑन सह जर तुम्ही गाडी कमी वापरता तर कमीच पे करा!
जर गाडी कमी चालवली जात असेल तर खर्च पण कमी असायला हवा, आणि आमच्या या नवीन अप्रोचअंतर्गत जर तुम्ही तुमची गाडी 10,000 किमी पेक्षा कमी चालवली असेल तर तुम्ही तुमच्या कार इन्श्युरन्सवर 85% पर्यंतची बचत करू शकता आता वन साईज फिट्स ऑल सारख्या पॉलिसींना करा बाय बाय आणि तुमच्या लाइफस्टाइलशी जुळवून घेणाऱ्या इन्श्युरन्सचे स्वागत करा. 😎
डिजिट कार इन्श्युरन्स पे अॅज यू ड्राईव्ह अॅड ऑन सह, हा तुमच्यासाठी अगदीच योग्य पर्याय ठरेल जर तुम्ही खालील कोणत्याही कॅटेगरी मध्ये येत:
जर तुम्ही एका भारतीय शहरामध्ये रहात असाल, छोट्या शहरांपासून ते मोठ्या मेट्रो शहरापर्यंत, आणि जर रोज प्रवास करावा लागत असेल, तर शक्यता आहे की तुमच्या गाडीचे रनिंग 10,000 किमीपेक्षा कमीच होत असेल. असा विचार करून बघा की जरी तुम्ही 10-12 किमी अंतरावर रहात असाल तरी वर्षात तुमची गाडी फक्त 7हजार किमीच चालते. 🤔
डब्ल्यूएफएच /हायब्रीड वर्क = एक पार्क करून ठेवलेली कार. कदाचित तुमची कार तुमच्यासाठी फक्त वीकेंड वाईब असेल कारण संपूर्ण आठवडा तुम्ही घरातूनच काम करण्यात जातो. असे असेल तर तुमची गाडी कमी नाही तर खूपच कमी चालवली जाते.
आजकाल प्रवासकरताना होणारा त्रास बघता पब्लिक ट्रान्सपोर्ट हेच सर्वात लोकप्रिय होत आहेत. जर तुम्ही कार पार्किंग मध्ये पार्क करून मेट्रो, ट्रेन, कॅब किंवा रिक्षाने प्रवास करत असाल तर हा इन्श्युरन्स तुमच्यासाठी अगदीच योग्य ठरेल.
काही जणांकडे कधी तरी वापरण्यासाठी एक गाडी आणि शाळेत ने-आण करण्यासाठी वेगळी गाडी, अशा दोन गाड्या पण असतात. दोन गाड्या असून सुद्धा जास्त अंतर कव्हर न करणाऱ्या लोकांसाठी (किबहुना दोन गाड्यांमध्ये विभागून अंतर कव्हर होते) पे अॅज यू ड्राईव्ह अॅड ऑन हा एक अतिशय योग्य पर्याय ठरू शकतो.
तुमच्याकडे कार आणि बाईक दोन्ही आहे तरी बाईक जास्त वापरता? म्हणजेच 'सीटीलाईफ.' जर तुमची कार प्रामुख्याने फक्त खास प्रसंगांसाठीच वापरली जात असेल तर या किफायतशीर कार इन्श्युरन्स घ्या आणि निश्चिंत व्हा.
रिटायरीज ज्यांचे डेली कम्यूट्स आता आरामदायक प्रवासात बदलले आहेत, आता त्यांच्या कमी झालेल्या माईलेज बद्दल रिवार्ड्स मिळवू शकतात. 😊
मेट्रो सीटी मध्ये राहणे म्हणजे जरी पण खूप वेळ आपण रस्त्यात असलो तरी खूप अंतर गाडी चालवल्यासाखे वाटत नाही. म्हणजे तुमचा प्रवास लांबचा वाटेल (ट्रॅफिकच्या कृपेने!) पण जर तुम्ही गणित मांडलेत तर तुम्ही फार अंतर कव्हर केलेले नसते. तुमचे किलोमीटर रीडिंग चेक करून बघा. 😊
जसे की नावावरून समजते, पे अॅज यू ड्राईव्ह अॅड ऑन हा असा कव्हर आहे जो, जर तुमची गाडी वर्षात 10,000किमी पेक्षा कमी चालत असेल तर तुम्ही तुमचे कार इन्श्युरन्स (कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा ओन डॅमेज इन्श्युरन्स विकत घेताना) विकत घेताना निवडू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या ओन डॅमेज प्रीमियमवर 85% पर्यंतची सूट मिळते जी तुमची कार किती किमी चालली यावर अवलंबून असते.
मूळतः (ओरिजनली) 2022 मध्ये लॉंच केलेला डिजिट इन्श्युरन्स अशा प्रकारचा फीचर ऑफर करणारा सर्वात पहिला इंश्युरर ठरला सुरुवातीला हा फीचर वर्षात 15,000 किमीपेक्षा कमी गाडी चालवणाऱ्या लोकांसाठी होता, पण आता आम्ही आणखीन पुढे जाऊन 10,000 किमीपेक्षा कमी गाडी चालवणाऱ्या लोकांना जास्तं डिस्काऊंट देऊ इच्छितो. 😎
जर तुम्हाला असे वाटत असेल की यासाठी तुम्हला खूप काही फॅन्सी डिक्लेरेशन द्यावे लागेल किंवा तुमचे रीडिंग चेक करण्यासाठी एखादे न्यू-जेन टेक डिवाईस विकत घ्यावे लागेल तर तुम्ही चुकताय! (तुम्हाला तर माहितच आहे की आयुष्य सोप्पं करणं हेच आमचे काम आहे, बरोबर ना?😉).
आम्ही हे डिस्काऊंट मिळवणे सोप्पे करणे हाच दृष्टीकोण ठेवला. हे तुमच्या भविष्यातील ड्राईव्हिंग बिहेविअर वरती, टेलीमॅटिक्स किंवा तुमच्या ड्राईव्हिंग स्किल्स ट्रॅक करणाऱ्या कुठल्याही अॅपवरती आधारित नसून यासाठी आम्ही एका वर्षात तुम्ही चालवलेल्या गाडीच्या अॅव्ह्रेज किलोमीटर्सचा आधार घेतो.
तुमचे ओडोमीटर रीडिंग आणि ड्राईव्हिंग बघून लगेचच ओळखता येतं की गाडी किती वर्ष जुनी आहे!
आमच्याकडून तुमची कार इन्श्युरन्स पॉलिसी विकत घेताना आम्ही तुम्हाला तुमच्या कारचा आणि ओडोमीटर रीडिंगचा एक व्हिडीओ घ्यायला सांगू (काळजी करू नका, हे अगदी सोप्पे आहे आणि अॅपमधूनच होतं)
बस इतकंच!
तुम्ही जर कमी प्रमाणात गाडी चालवत असाल तर ते आम्ही असे चेक करू 😊
स्टेप 1: सगळ्यात पहिले तुम्हाला ड्राईव्हिंग सीटवर बसावे लागेल!
स्टेप 2: एका छोट्या आयताकडे पहा ज्यामध्ये सर्वसाधारणपणे पाच ते सहा आकडे असतात. बहुतेक वेळा हे स्पीडोमीटरजवळ असते. तुमची कार जर नवीन काळातली असेल तर हे डिजिटल असेल. तुमची गाडी जर जुनी किंवा कमी आधुनिक असेल, तर हे आकड्यांचा फिजिकल किंवा मेकॅनिकल सेट असेल.
आता फक्त तुम्ही या आकडेवारीची नोंद करून घ्या. हा आकडा, तुमची गाडी तिच्या संपूर्ण काळात एवढे किलोमीटर चालली, हे दर्शवतो.
स्टेप 3: आता या आकड्याला तुमची कार जितके वर्ष जुनी आहे त्या आकड्याने भाग द्या. उदाहरार्थ, तुमच्या कारचे रीडिंग साधारण 45,000 किमी झाले आणि तुमची कार 6 वर्ष जुनी आहे, तर 45,000/6 वर्ष म्हणजे 7500 किमी. याचा अर्थ, तुमची कार वर्षाला अॅव्हरेज 7500किमी चालली.
बघा, हे इतकं सोप्पं आहे! अशाप्रकारे तुम्हला कळू शकते की तुमची गाडी किती प्रमाणात चलते आणि हे पे अॅज यू ड्राईव्ह अॅड-ऑन कार इन्श्युरन्स तुमच्यासाठी देखील योग्य आहे का! 😊
आजच तुमचे किलोमीटर रीडिंग चेक करा आणि तुम्ही पण कमी प्रमाणात गाडी चालवता का हे तपासा! 😊
Please try one more time!
इतर महत्त्वाचे लेख
मोटर इन्शुरन्स बद्दल सर्व काही
Get 10+ Exclusive Features only on Digit App
closeAuthor: Team Digit
Last updated: 28-08-2024
CIN: U66010PN2016PLC167410, IRDAI Reg. No. 158.
गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेड (याआधी ओबेन जनरल इन्श्युरन्स लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) – रजिस्टर्ड ऑफीसचा पत्ता – 1 ते 6 फ्लोर्स, अनंत वन (एआर वन), प्राईड हॉटेल लेन, नरवीर तानाजी वाडी, सीटी सर्व्हे नं. 1579, शिवाजी नगर, पुणे – 411005, महाराष्ट्र | कॉरपोरेट ऑफीसचा पत्ता – अटलांटिस, 95, 4th बी क्रॉस रोड, कोरमंगला इंडस्ट्रीयल लेआऊट, 5th ब्लॉक, बैंगलोर – 560095, कर्नाटक | गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडचा वरील ट्रेड लोगो डिजिट इन्फोवर्क्स सर्व्हिसेस प्राईव्हेट लिमिटेड चा आहे आणि लायसन्स अंतर्गत गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडद्वारा वापरण्यात आला आहे.