कार इन्शुरन्सचे ऑनलाइन रिन्यूअल
Third-party premium has changed from 1st June. Renew now
I agree to the Terms & Conditions
Our WhatsApp number cannot be used for calls. This is a chat only number.
Third-party premium has changed from 1st June. Renew now
I agree to the Terms & Conditions
दरवर्षी तुमचा कार इन्शुरन्स रिन्यू करायची वेळ येते तेव्हा तोच इन्शुरन्स परत घ्यावा की नवा घ्यावा याविषयी तुम्ही संभ्रमात असता. हे ठरवणं खरंच कठीण आहे, पण ही निवड प्रक्रिया आम्ही तुमच्यासाठी अगदी सोपी करुन टाकतो.
चला तर आधी कार इन्शुरन्स रिन्यूअल म्हणजे काय ते समजून घेऊ.
कार इन्शुरन्स रिन्यूअल म्हणजे ज्या कालावधीत इन्शुरन्स कंपनीचा रेट न बदलता तुमची इन्शुरन्स पॉलिसी चालू किंवा अंमलात असते तो काळ. पण एकदा का पॉलिसीचा पहिला कालावधी संपला की तुम्ही काही बदल केला नाही तर तुमचा इन्शुरन्स रेट प्रत्येक पॉलिसी रिन्यूअलच्या वेळी समानच राहिला पाहिजे. आता इथेच तुम्हाला विचार करायला थोडासा वाव आहे. काही वेळा जेव्हा तुम्हाला माहिती असतं की रिन्यूअलच्या वेळी इन्शुरन्स कंपनी तुमच्या पॉलिसीच्या रेटमध्ये तडजोड करणार नाहीये तेव्हा तुम्ही नवे पर्याय शोधणं चालू करू शकता.
तुम्ही या दोन्हीतलं तुम्हाला हवं ते करू शकता. तुमच्या सध्याच्या इन्शुअररची क्लेम प्रक्रिया, पारदर्शकता, ग्राहक सेवा या बाबतीत तुमचा अनुभव समाधानकारक असेल तर तीच पॉलिसी चालू ठेवा, नाहीतर बदला. यातलं काय करायचं हे पूर्णपणे तुमचा पूर्वानुभव आणि तुमची इन्शुरन्सची गरज काय आहे त्यावर अवलंबून आहे.
कार इन्शुरन्स रिन्यू करताना अनेक गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. त्यांचा नीट विचार केलात तर दरवर्षीच्या रिन्यूअलनंतर तुम्हाला योग्य तेवढे कव्हर मिळेल. त्यातल्या काही गोष्टी इथे खाली दिल्या आहेत:
पहिला टप्पा – तुमच्या वाहनाची उत्पादक कंपनी, मॉडेल, व्हेरिएंट, रजिस्ट्रेशनची तारीख आणि तुम्ही कोणत्या शहरात गाडी चालवता हे तपशील भरा. ‘गेट कोट’ वर क्लिक करा आणि तुम्हाला हवा तो प्लॅन निवडा.
दुसरा टप्पा – थर्ड पार्टी लायॅबिलिटी ओन्ली किंवा स्टँडर्ड पॅकेज (कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स) यातून निवड करा.
तिसरा टप्पा – आम्हाला तुमची आधीची इन्शुरन्स पॉलिसी संपण्याची तारीख, मागच्या वर्षी केलेले क्लेम, मिळालेला नो क्लेम बोनस इत्यादी माहिती द्या.
चौथी पायरी – तुम्हाला तुमच्या प्रीमियमच्या रकमेची माहिती मिळेल. जर तुम्ही स्टँडर्ड प्लॅन निवडला असेल तर अतिरिक्त ॲड-ऑन्स आणि आयडीव्ही निवडून आणि तुमची कार सीएनजी असल्यास ते नमूद करून तुम्ही तुमची पॉलिसी अधिक कस्टमाइझ करू शकता. पुढच्या पानावर तुम्हाला तुमचा फायनल प्रीमियम दिसेल.
तुमच्या नवीन कार इन्शुरन्स पॉलिसीसाठी यावेळी डिजिटचा विचार करत आहात? तर आमची ही वैशिष्ट्य एकदा जाणून घ्या...