कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर

कार इन्शुरन्स प्रीमियम २ मिनिटांमध्ये मिळवा.
Happy Couple Standing Beside Car
Chat with an expert

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

Continue with

-

(Incl 18% GST)

कार इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर

कार इन्शुरन्स प्रिमियम कॅल्क्युलेटर कसा वापरायचा?

डिजिट(Digit)चा कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर कसा वापरायचा आणि आपल्या कारसाठी योग्य इन्शुरन्स कसा मिळवावा याबद्दल टप्प्याटप्प्याने सगळी माहिती इथे स्पष्ट करण्यात आली आहे.

स्टेप 1

तुमच्या कारचं उत्पादन करणारी कंपनी, मॉडेल, व्हेरिएंट, नोंदणी तारीख आणि आपले शहर ही माहिती भरा.

स्टेप 2

'गेट कोट' वर क्लिक करा आणि आपला प्लॅन निवडा.

पायरी 3

केवळ थर्ड-पार्टी लायबलिटी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज यापैकी एक निवडा.

स्टेप 4

आपल्या शेवटच्या इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपण्याची तारीख, केलेले क्लेम आणि मिळालेले नो क्लेम बोनस याविषयी सगळी माहिती द्या.

स्टेप 5

आता आपण लोड केलेल्या नवीन पानाच्या शेवटी उजव्या बाजूला आपला कार इन्शुरन्स प्रीमियम पाहू शकाल.

स्टेप 6

जर आपण स्टँडर्ड/कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन निवडला असेल, तर आपण आपला आय.डी.व्ही(इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू) सेट करू शकता आणि झिरो डिप्रीसिएशन, रिटर्न टू इनव्हॉइस, गिअर आणि इंजिन प्रोटेक्शन आणि इतर ॲड-ऑन निवडून आपली योजना अधिक कस्टमाइझ करू शकता.

स्टेप 7

तुम्ही आता पानाच्या उजव्या बाजूला कॅल्क्युलेट केलेला तुमचा एकूण कार इन्शुरन्स प्रीमियम किती आहे ते पाहू शकाल.

कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटरचे फायदे

  • राइट आय.डी.व्ही (इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू) - तुम्ही तुमच्या कारची उत्पादक कंपनी, मॉडेल आणि कारच्या वयासाठी योग्य असलेल्या आय.डी.व्ही (IDV)नुसार जुळवून घेऊ शकता. योग्य आय.डी.व्ही असल्यास हे सुनिश्चित होते की तुम्ही कार गमावल्यास किंवा ती चोरी झाल्यास, तुम्हाला तुमच्या कारचे योग्य बाजार मूल्य मिळेल आणि तुमचा खूप तोटा होणार नाही.
  • राईट ॲड-ऑन्स - योग्य ॲड-ऑनसह कार इन्शुरन्स पॉलिसी असणे म्हणजे पावसाळ्याच्या दिवशी आपलं पूर्ण संरक्षण करणारी छत्री सोबत असण्यासारखे आहे. मात्र प्रीमियममध्ये अतिरिक्त वाढ झाल्यामुळे बरेच लोक कोणतेही ॲड-ऑन कव्हर घेत नाहीत. कार इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरसह, आपण विविध  कार इन्शुरन्स ॲड-ऑन जोडू शकता आणि प्रीमियममधील वाढ तपासू शकता आणि नंतर ॲड-ऑनचे योग्य मिश्रण निवडू शकता.
  • योग्य प्रीमियम - अर्थातच हे प्राथमिक कारण आहे की तुम्ही आधी कॅल्क्युलेटर वापरत आहात ! होय, कॅल्क्युलेटरसह, आपण  वेगवेगळ्या कार इन्शुरन्स प्रीमियमच्या रकमेची तुलना करू शकता, जे आपल्याला सर्वोत्तम किंमतीचा प्लॅन घेण्यास मदत करेल.

कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरणे का महत्वाचे आहे?

आपण आंधळेपणाने कोणत्याही कार इन्शुरन्स प्रीमियमसाठी जावे की स्वत: कार इन्शुरन्स प्रीमियमची तुलना करून माहितीच्या आधारे निर्णय घ्यावा याबाबतीत संभ्रम आहे का ? आपण नंतरचा पर्याय का निवडावा आणि त्यासाठी भारतात कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर का वापरावे ते पुढे सांगितले आहे.

खर्च केलेल्या रकमेच्या तुलनेत पुरेसा नफा मिळतो, आपले पैसे वाचतात

कार इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर आपल्याला वेगवेगळ्या कार इन्शुरन्स प्रीमियमची प्रत्यक्ष तुलना करण्यास मदत करते आणि त्याद्वारे तुमच्यासाठी आणि तुमच्या कारसाठी योग्य इन्शुरन्स पॉलिसीची निवड करणे सोपे होते.

कार इन्शुरन्सचा हप्ता कमी करा

कार इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरताना, तुमच्या कार इन्शुरन्स प्रीमियममध्ये काही घटक प्रीमियम कसे वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात हे आपल्या लक्षात येईल. त्यानुसार आपण वेगवेगळे पर्याय वापरून पाहू शकता आणि आपल्यासाठी काय चांगले वाटते त्याची निवड करू शकता!

आपल्याला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते

यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली कार आहे आणि तिच्या संरक्षणासाठी किमान आपण सर्व बाजूंनी विचार करून तसेच सगळी माहिती गोळा करुन निर्णय घेऊ शकता. कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर तुम्हाला तुमचा कार इन्शुरन्सचा हप्ता कसा निश्चित केला जातो हे स्वत: पाहण्यास मदत करतो.

नवीन आणि जुन्या गाड्यांसाठी इन्शुरन्स प्रीमियमचा हिशेब करा

भारतातील कार इन्शुरन्स पॉलिसीचे प्रकार

car-quarter-circle-chart

थर्ड पार्टी

थर्ड पार्टी कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे; ज्यात केवळ तृतीय-पक्षातील व्यक्तीचे नुकसान, गाडीची किंवा गाडीच्या मालमत्तेची हानी किंवा नुकसान कव्हर केले जाते.

car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा अत्यंत बहुमोल आणि उपयुक्त प्रकार आहे जो थर्ड पार्टी लायबलिटी आणि आपल्या स्वत: च्या कारचे नुकसान दोन्ही कव्हर समाविष्ट करतो.

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा एक प्रकारचा इन्शुरन्स प्लॅन आहे जो आपल्या कारला संपूर्ण कव्हरेज देतो. थर्ड पार्टीला झालेल्या नुकसानीपासून आपले संरक्षण करण्यापासून ते स्वत:चे नुकसान कव्हर करण्यापर्यंत आणि अनेक ॲड-ऑन कव्हर्सची सवलत या इन्शुरन्समध्ये आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा एकमेव प्रकारचा कार इन्शुरन्स प्लॅन आहे जो इतक्या कस्टमायझेशनची तरतूद करायला मदत करतो. येथेच आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरात येतो. कारण आपण स्वतः बघू शकता की वेगवेगळ्या ॲड-ऑनचा आपल्या कार इन्शुरन्स प्रीमियमवर कसा परिणाम होतो - आपला निर्णय खूप सोप्या आणि सहज पद्धतीने घेता यावा, यासाठी कॅल्क्युलेटरची मदत होते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्रीमियमच्या महत्त्वाच्या घटकांबद्दल अधिक माहिती वाचा.

स्वत:चे नुकसान

हे कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसींमध्ये समाविष्ट कव्हर आहे जे आपल्या स्वत: च्या कारच्या नुकसानीमुळे झालेल्या नुकसानीसाठी आपल्याला कव्हर करते. जसे की अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्रीमियममध्ये याची किंमत आपल्या कारची उत्पादक कंपनी, मॉडेल आणि वयानुसार आणि अर्थातच आपण चालवत असलेल्या शहराप्रमाणे निर्धारित केली जाते.

थर्ड पार्टीचे नुकसान

 कायद्यानुसार हे गरजेचे आहेच आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी आणि थर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसी या दोन्हींमध्ये समाविष्ट आहे. तुमच्या कारमुळे इतर कोणती  व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेला होणारी हानी आणि नुकसान कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स कव्हर करते. त्यासाठीची भरपाई आयआरडीएआय(IRDAI)ने ठरवल्याप्रमाणे पूर्वनिर्धारित करण्यात आली आहे आणि सर्व पॉलिसींमध्ये ती भरपाईची रक्कम समान आहे.

इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (आय.डी.व्ही)

आय.डी.व्ही हे आपल्या कारचे बाजारमूल्य आहे,ज्यात त्याच्या डिप्रीसिएशनचाही समावेश आहे. आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्रीमियम निश्चित करण्यात आपल्या आय.डी.व्ही(IDV) ची मोठी भूमिका आहे.डिजिटसह, आपण आपले आय.डी.व्ही(IDV) कस्टमाइझ करू शकता आणि तुमच्या प्रीमियम आणि इन्शुरन्सच्या किमतीवर त्याचा कसा परिणाम करतो हे पाहू शकता.

ॲड-ऑन कव्हर्स

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसीचा सर्वात चांगला भाग म्हणजे आपण चांगल्या संरक्षणासाठी आपल्या पॉलिसीमध्ये अतिरिक्त कव्हर जोडू शकता. ॲड-ऑनचा प्रकार आणि संख्या परिणामी आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्रीमियमवरही परिणाम करणारी असेल.

डीडक्टिबल्स

क्लेम्सच्या दरम्यान आपण जे पैसे भरतो त्याला डीडक्टिबल्स म्हणतात. कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये, आपण आपल्यासाठी जे योग्य आहे त्यानुसार हे निवडू शकता. आपण समजा उच्च टक्केवारी निवडली, तर आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्रीमियम कमी असेल आणि कमी टक्केवारी निवडली तर जास्त असेल.

नो क्लेम बोनस

आपला नो क्लेम बोनस  आपल्या पहिल्या क्लेम नसलेल्या वर्षापासून २०% ने सुरू झालेल्या क्लेमच्या विनामूल्य वर्षांच्या संख्येवर आधारित आहे. तर, आपल्याकडे जितका जास्त  नो क्लेम बोनस असेल, तेवढा कमी आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्सचा प्रीमियम कमी असेल. आणि जितका नो क्लेम बोनस कमी असेल तितका प्रीमियम जास्त असेल.

आपल्या कारचे उत्पादन करणारी कंपनी आणि मॉडेल

आपली कार ज्या प्रकारची आहे त्याप्रमाणे आपल्या प्रीमियमवर खूप प्रभाव पडतो. कारण प्रत्येक कार त्याच्या इंजिन, सी.सी, फीचर्स, इत्यादीच्या बाबतीत वेगळी असते. महणजेच प्रत्येक कार स्वत:च्या जोखमीसह येते आणि त्यामुळेच त्यानुसार प्रीमियम वेगळा असेल.

मालक-चालकासाठी वैयक्तिक अपघात कव्हर

कायद्यानुसार अनिवार्य, वैयक्तिक अपघात कव्हर  (पी.ए कव्हर) आपल्या सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट केले जाईल (जर आधीच समाविष्ट केले नसेल तर)

आपल्या गाडीचे वय

सोप्या भाषेत सांगायचे तर तुमची गाडी जितकी वयाने मोठी असेल, तितका कमी तुमचा कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्सचा प्रीमियम असेल.

थर्ड पार्टी कार इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर

कायद्यानुसार थर्ड पार्टी कार इन्शुरन्स हा सर्वात मूलभूत प्रकारचा इन्शुरन्स आहे. हे केवळ तृतीय पक्षांविरूद्ध नुकसान आणि तोट्यासाठी आहे, जसे की जर आपली कार एखाद्या व्यक्तीला धडकली तर मालमत्ता किंवा वाहनाचे नुकसान होते.

थर्ड पार्टी कार इन्शुरन्स प्रीमियमच्या महत्त्वाच्या घटकांबद्दल अधिक वाचा.

आपल्या गाडीचे सीसी(CC)

सीसी म्हणजे तुमच्या गाडीच्या इंजिनची क्षमता असते. सीसीमुळे आपल्या गाडीचा वेग आणि जोखीम निश्चित होते. थर्ड पार्टी कार इन्शुरन्समध्ये आपल्या कार इन्शुरन्सच्या प्रीमियमवर आपल्या कारचा सीसी किती जास्त किंवा कमी आहे याचा थेट परिणाम होतो.

मालक-चालकासाठी वैयक्तिक अपघात कव्हर

जर आपण आधीच वैयक्तिक अपघात कव्हर केले नसेल तर आपल्या थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसीमध्ये हे जोडणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत आपला थर्ड पार्टी कार इन्शुरन्स प्रीमियम थोड्या फरकाने वाढेल.

थर्ड पार्टी नुकसान

थर्ड पार्टी कार इन्शुरन्समध्ये फक्त थर्ड-पार्टीच्या डॅमेजचा समावेश आहे. त्यामुळे आपल्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियमची रक्कम ठरताना हा घटक खूप परिणामकारक आणि निर्णायक ठरतो.

भारतातील थर्ड पार्टी कार इन्शुरन्स प्रीमियमचे दर

खासगी कार्स इंजिन क्षमतेसह

प्रीमियम दर

1000 सीसीपेक्षा जास्त नाही

₹2,094

1000 सीसी पेक्षा जास्त मात्र 1500 सीसीपेक्षा जास्त नाही

₹3,416

1500 सीसीपेक्षा जास्त

₹7,897

तुमचा कार इन्शुरन्स प्रीमियम कमी करण्यासाठीच्या टिप्स

तुम्ही खाली दिलेल्या टिप्स वापरून तुमचा कार इन्शुरन्सचा हप्ता कमी करू शकता:

आपली ऐच्छिक डीडक्टिबल वाढवा

जर आपल्याकडे ४-५ वर्षांहून अधिक काळ कोणतेही क्लेम नसतील  तर आपण आपली ऐच्छिक डीडक्टिबल वाढविण्याचा आणि आपला कार इन्शुरन्स हप्ता कमी करण्याचा विचार करू शकता.

संबंधित ॲड-ऑन निवडा

आपल्या कारमध्ये अतिरिक्त संरक्षण जोडण्यासाठी  ॲड-ऑन हा एक चांगला मार्ग आहे. मात्र यामुळे आपला प्रीमियमदेखील वाढतो. त्यामुळे अशी शिफारस केली जाते की आपण फक्त आपल्या आणि आपल्या कारशी संबंधित ॲड-ऑन निवडा.

तुमच्या इन्शुरन्स कंपनीशी बोला

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला स्वस्त कार इन्शुरन्सच्या रकमेविषयी माहिती मिळत नाही, तर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला ज्या इन्शुरन्स कंपनीत रस आहे त्या कंपनीशी एकदा फोन करून याबाबत आपण बोलू शकता.

वेळेवर आपल्या पॉलिसीचे नुतनीकरण करा

तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीचे मुदत संपण्याच्या तारखेपूर्वी नेहमीच रिन्युअल(नुतनीकरण) करा. यामुळे फक्त आपल्या कारच्या पूर्व-तपासणी प्रक्रियेचा वेळच वाचणार नाही तर तुम्हाला नो क्लेम बोनसही समाविष्ट करून घेता येईल. तसेच सूटही मिळवू शकता.

चांगला ड्रायव्हिंग रेकॉर्ड राखा

रस्त्यावर सुरक्षित असण्याबरोबरच वेग मर्यादेचे भान ठेऊन सावध वाहन चालवणे खूप महत्त्वाचे आहे. असे केल्याने अपघात टाळता येतील आणि दरवर्षी आपल्याला नो क्लेम बोनस मिळेल याची खात्री बाळगा.

तुम्ही डिजिट कार इन्शुरन्स का विकत घ्यायला हवा ?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्ही.आय.पींसारखे वागवतो, कसे माहित आहे ?

कॅशलेस दुरुस्ती

संपूर्ण भारतातून 6000+ कॅशलेस नेटवर्क गॅरेज तुम्ही निवडू शकता.

डोअरस्टेप पिकअप आणि दुरुस्ती

आमच्या नेटवर्क गॅरेजमधील दुरुस्तीसाठी - ६ महिन्यांच्या दुरुस्ती वॉरंटीसह डोअरस्टेप पिकअप, दुरुस्ती आणि ड्रॉप

स्मार्टफोन-एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन

फक्त आपल्या फोनवर नुकसानीबद्दलची माहिती भरा आणि आपण आपले काम झालेच म्हणून समजा.

सुपर-फास्ट क्लेम्स

आम्ही खासगी कारसाठीच्या सर्व क्लेम्सपैकी ९६% क्लेम्स निकाली काढले आहेत.

Customize your Vehicle IDV

आपले वाहन आय.डी.व्ही(IDV) कस्टमाइझ करा

आमच्याबरोबर, आपण आपल्या निवडीनुसार आपले वाहन आय.डी.व्ही कस्टमाइझ करू शकता.

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

डिजिटद्वारे कार इन्शुरन्सची मुख्य वैशिष्ट्ये

मुख्य वैशिष्ट्ये

डिजिट बेनिफिट

प्रीमियम

₹2,094 पासून सुरू

नो क्लेम बोनस

50% पर्यंत सूट

कस्टमायझेबल ॲड-ऑन

10 ॲड-ऑन उपलब्ध

कॅशलेस दुरुस्ती

6000+ गॅरेजमध्ये उपलब्ध

क्लेम प्रक्रिया

स्मार्टफोन-एनेबल्ड क्लेम. 7 मिनिटांत ऑनलाइन करता येईल!

स्वत: चे नुकसान कव्हर

उपलब्ध

थर्ड पार्टीचे नुकसान

वैयक्तिक नुकसानीसाठी अमर्याद दायित्व, मालमत्ता/ वाहन नुकसानीसाठी 7.5 लाखांपर्यंत

कार इन्शुरन्स क्लेम कसा करावा?

आपण आमचा कार इन्शुरन्स प्लॅन विकत घेतल्यानंतर किंवा नुतनीकरण केल्यानंतर, आमच्याकडे ३-स्टेप्समध्ये होणारी पूर्णपणे डिजिटल क्लेमची प्रक्रिया असल्याने आपण तणावमुक्त राहता!

स्टेप १

फक्त १८००-२५८-५९५६ वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरायची गरज नाही

स्टेप २

आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर सेल्फ-इन्स्पेक्शनसाठी लिंक मिळवा.आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती टप्प्याटप्प्याने मार्गदर्शनाद्वारे भरा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे दुरुस्तीचा मार्ग निवडा. तुम्हाला कॅशलेस व्यवहार करायचा आहे की नंतर रिएम्बर्समेंट हवी आहे हे ठरवा.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स सेटल व्हायला किती वेळ लागतो?

आपली इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात आला पाहिजे. आपण तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे.

डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटरशी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न