हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की कॅशलेस क्लेम्स प्रत्यक्षात १००% कॅशलेस नसतात. तुम्हाला क्लेमच्या रकमेचा एक छोटासा भाग वजावट (डिडक्टिबल्स) आणि घसारा (डिप्रिसिएशन) या स्वरूपात भरावा लागेल जो विमाकर्त्याद्वारे कव्हर केला जाणार नाही.
घसारा
घसारा म्हणजे कालांतराने कारची किंवा कारच्या काही भागांची झीज झाल्यामुळे जेव्हा तुमच्या कारचे मूल्य कमी होते. खरंतर ज्या क्षणी एखादी नवीन कार शोरूममधून बाहेर काढली जाते, त्या क्षणी तिचे मूल्य ५% ने कमी झाल्याचे मानले जाते!
जेव्हा तुम्ही क्लेम दाखल करता, तेव्हा इन्शुरन्स कंपनी पेमेंट करण्यापूर्वी हा घसारा खर्च (डिप्रिसिएशन व्हॅल्यू) वजा करतो.
कार इन्शुरन्समध्ये, घसाऱ्याचे दोन प्रकार आहेत - कारचा घसारा आणि कारचे विविध भाग आणि कारच्या सामानाचा घसारा. मोजण्यासाठी आयआरडीएआयने घसारा कसा मोजावा यासाठी काही नियम तयार केले आहेत.
जेव्हा वाहनाचे किरकोळ नुकसान होते, तेव्हा क्लेमच्या वेळी कारच्या भागावरील घसारा विचारात घेतला जाईल. कारच्या पार्टचे घसाऱ्याचे प्रमाण खालीलप्रमाणे वेगवेगळ्या दराने ठरवले जाते:
- जास्त झीज झालेले भाग - रबरचे भाग, प्लास्टिकचे घटक, बॅटरी, ट्यूब आणि टायर इ. - ५०%
- फायबर ग्लासचे भाग - ३०%
- धातूचे भाग - वाहनाच्या वयानुसार ०% ते ५०%
जेव्हा कारचोरी सारख्या संपूर्ण नुकसानीच्या क्लेमची घटना घडते तेव्हा वाहनाचा घसारा लागू होते. हे तुमच्या वाहनाच्या वयावर आधारित आहे.
वजावट
डिडक्टिबल हा इन्शुरन्स उतरवलेल्या खर्चाचा भाग आहे जो इन्शुरन्स कंपनीने उर्वरित रक्कम देण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खिशातून भरावा लागतो. कार इन्शुरन्समध्ये, वजावट सामान्यतः प्रति दावा आधारावर लागू केल्या जातात. त्यामुळे, जर तुम्ही ₹ १५,००० किमतीच्या नुकसानीसाठी क्लेम दाखल केला आणि वजावट ₹ १००० असेल तर - विमा कंपनी तुमच्या कारच्या दुरुस्तीसाठी ₹१४,००० पैसे देईल.
वजावटीचे दोन प्रकार आहेत - डिडक्टिबल्स आणि व्हॉलंटरी.
तुम्ही तुमची कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करत असताना तुम्ही किती पैसे द्यायला तयार आहात हे तुम्हाला ठरवावे लागेल आणि हे नंतर प्रत्येक क्लेमवर लागू केले जाईल.तुमची इन्शुरन्स कंपनी केवळ क्लेमच्या रकमेचा काही भाग भरेल जो एकूण ऐच्छिक आणि अनिवार्य वजावटीपेक्षा जास्त असेल.
अनिवार्य वजावट (कम्पल्सरी डिडक्टिबल) - या प्रकारच्या वजावटीत, पॉलिसीधारकाला मोटर इन्शुरन्स क्लेमचा काही भाग भरण्याशिवाय पर्याय नसतो.
आयआरडीएआय नियमांनुसार, कार इन्शुरन्समध्ये या अनिवार्य वजावटीचे निश्चित मूल्य कार इंजिनच्या क्यूबिक क्षमतेवर आधारित आहे. सध्या, ते खालीलप्रमाणे सेट केले आहे.
- १५०० सीसी पर्यंत - रु. १०००
- १५०० सीसी पेक्षा जास्त - रु.२०००
ऐच्छिक वजावट (व्हॉलंटरी डिडक्टिबल) - ऐच्छिक वजावट ही एक रक्कम आहे जी सामान्यतः इन्शुरन्स कंपनीद्वारे भरली जाऊ शकते, परंतु तुम्ही ती तुमच्या खिशातून भरण्याची निवड केली आहे.जेव्हा तुम्ही तुमच्या विमा संरक्षणामध्ये ही ऐच्छिक वजावटीचा पर्याय निवडता, तेव्हा ते तुमच्या कारचा इन्शुरन्स प्रीमियम कमी करते कारण विमाकर्त्याच्या बाजूने धोका कमी होतो.
परंतु, याचा अर्थ असा आहे की तुमच्या कारचे कोणतेही नुकसान झाल्यास तुम्हाला स्वतःला जास्त पैसे द्यावे लागतील (ज्याचा तुमच्या इतर खर्चावर परिणाम होऊ शकतो) त्यामुळे याचा विचार करण्याचे लक्षात ठेवा.