हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी

Digit

No Capping

on Room Rent

24/7

Customer Support

Zero

Co-payment

Zero Paperwork. Quick Process.
Your Name
Mobile Number

No Capping

on Room Rent

24/7

Customer Support

Zero

Co-payment

हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी म्हणजे काय?

आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी डिजिटवर का पोर्ट करा?

  • सोपी ऑनलाइन प्रक्रिया – हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याच्या प्रक्रियेपासून ते क्लेम करण्यापर्यंत सगळे पेपरलेस, सोपे, झटपट आणि त्रासमुक्त! हार्ड कॉपी नाही, अगदी क्लेम्ससाठीही!
  • वय-आधारित किंवा झोन-आधारित को-पेमेंट नाही - आमचा हेल्थ इन्शुरन्स वय-आधारित किंवा झोन-आधारित कोपेमेंटसह येत नाही. याचा अर्थ असा की, हेल्थ इन्शुरन्सच्या क्लेम्सदरम्यान, आपल्याला आपल्या खिशातून काहीही देण्याची आवश्यकता नाही.
  • खोलीच्या भाड्यावर बंधन नाही – आम्ही मानतो की प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यामुळेच आम्ही खोलीभाड्यावर बंधन ठेवले नाही. आपल्याला आवडेल अशी कोणतीही हॉस्पिटल रूम निवडा. 

  • एस.आय वॉलेट बेनिफिट - जर आपण पॉलिसीच्या कालावधीत आपली  सम इन्शुअर्ड संपवलीत, तर आम्ही ती तुमच्यासाठी पुन्हा भरतो.
  • कोणत्याही रुग्णालयात उपचार घ्या - कॅशलेस उपचारांसाठी भारतातील आमच्या 10500+ नेटवर्क रुग्णालयांपैकी एकाची निवड करा किंवा रीएम्बर्समेंटचा पर्याय निवडा.
  • वेलनेस बेनिफिट्स-  टॉप-रेटेड हेल्थ आणि वेलनेस पार्टनर्सच्या सहकार्याने डिजिट ॲपवर अनन्य वेलनेस बेनिफिट्स मिळवा.

माझी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी डिजिटवर पोर्ट करण्याची प्रक्रिया काय आहे?

तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुम्ही काय काय पोर्ट करू शकता?

  • इन्शुरन्सचा लाभ घेणारे सगळे सदस्य
  • सध्याच्या इन्शुरन्सची रक्कम
  • तुमचा जमा झालेला संचयी बोनस
  • तुम्ही इन्शुरन्स काढताना सांगितलेल्या आजारासाठीचा प्रतीक्षा कालावधी
  • तुमचा विशिष्ट रोग प्रतीक्षा कालावधी

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करण्यासाठी पॉलिसीधारकाचे अधिकार (म्हणजेच तुमचे!)

  • आयआरडीएआयनुसार, प्रत्येक पॉलिसीधारकाला त्याची पॉलिसी (वैयक्तिक आणि कौटुंबिक दोन्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींना लागू) एका सामान्य किंवा विशेष हेल्थ इन्शुरन्स देणाऱ्या कंपनीकडून दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीकडे पोर्ट करण्याचा अधिकार आहे.
  • आयआरडीएआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन हेल्थ इन्शुरन्स देणारी कंपनी पॉलिसीधारकाला आधीच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये उल्लेख करण्यात आलेली किमान विमा रक्कम देण्यास बांधील आहे.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पॉलिसीधारकांच्या आधीच्या इन्शुरन्सचा प्रतीक्षा कालावधी होऊन गेला असेल तर इन्शुरन्सचे त्यानुसार मिळणारे लाभ प्रदान करण्यास जिथे पोर्ट करण्यात आलंय ती नवीन हेल्थ इन्शुरन्स कंपनी बांधील आहे. याचाच अर्थ हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटीमध्ये- एखाद्याला त्यांचा जमा केलेला नो क्लेम बोनस आणि प्रतीक्षा कालावधीदेखील हस्तांतरित करता येतो.
  • आयआरडीएआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संबंधित हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी यशस्वीरित्या हस्तांतरित केली गेली आहे का याची खात्री करणे ही नवीन आणि जुन्या इन्शुरन्स कंपनीचीही जबाबदारी आहे.

आयआरडीएआयद्वारे सेट केलेले हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटीचे नियम - तुमच्यासाठी सोप्या भाषेत

पॉलिसीच्या प्रकारानुसार

तुम्ही तुमची इन्शुरन्स पॉलिसी फक्त तशाच प्रकारच्या दुसऱ्या पॉलिसीमध्ये पोर्ट करू शकता. याचा अर्थ तुम्ही स्विच करताना कव्हरेज, योजना किंवा पॉलिसीचा प्रकार पूर्णपणे बदलू शकत नाही.

इन्शुरन्स कंपनीनुसार

इन्शुरन्स कंपन्यांचं वर्गीकरण सामान्यतः लाईफ इन्शुरन्स कंपन्या किंवा सामान्य इन्शुरन्स कंपन्या असं केलं जातं.. जेव्हा तुम्ही पोर्ट करता, तेव्हा तुम्ही समान प्रकारच्या कंपनीकडे पोर्ट करत आहात की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे, डीजीट ही एक सामान्य विमा कंपनी आहे.

फरकांसंदर्भात

जर तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करू इच्छित असाल, तर तुम्हाला नुतनीकरणादरम्यान पोर्ट करावे लागेल आणि तुम्ही या दरम्यान पॉलिसीचा कालावधी लॅप्स करू शकत नाही. कारण यामुळे तुमचा पोर्टचा प्रस्ताव नाकारला जाऊ शकतो.

तुमच्या विमा कंपनीला कळवल्यावर

कोणतीही गोष्ट योग्य रित्या बंद करणं आवश्यक आहे. त्यामुळेच तुम्ही तुमची पॉलिसी पोर्ट करण्याची योजना करत आहात हे तुमच्या सध्याच्या इन्शुरन्स कंपनीला कळवणे आवश्यक आहे. ही माहिती लेखी स्वरूपात सांगण्याची गरज आहे.तुमच्या पॉलिसीचे नुतनीकरण होण्याच्या किमान ४५ दिवस आधी आपण आपल्या सध्याच्या इन्शुरन्स कंपनीला याबाबत कळवावे.

तुमच्या वर्तमान विमा कंपनीच्या प्रतिसादावर

एकदा तुम्ही तुमचे काम पूर्ण केल्यावर आणि तुमच्या सध्याच्या विमा कंपनीला कळवले की, तुमचा आरोग्य विमा पोर्ट करण्याची तुमची विनंती मान्य करण्यासाठी त्यांच्याकडे तीन दिवसाचा कालावधी असतो.

पोर्टिंग शुल्काबाबत

आयआरडीएआयच्या नियमांनुसार, कोणतीही इन्शुरन्स कंपनी (तुमची सध्याची किंवा इन्शुरन्स पोर्ट करत असलेली नवी कंपनीसुद्धा) तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करण्याच्या प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारू शकत नाही.

प्रीमियममधील बदलांबाबत

कोणत्याही लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम हा इन्शुरन्स कंपनी वेगवेगळ्या घटकांच्या आधारे ठरवते. कारण प्रत्येक इन्शुरन्स कंपनीच्या वेगवेगळ्या सेवा आणि लाभ असतात. तुमच्या सध्याच्या इन्शुरन्स कंपनीकडून तुमच्या पुढच्या इन्शुरन्स हप्त्यात बदल केले जाऊ शकतात.

वाढीव कालावधीबाबत

तुमची हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी प्रक्रिया सुरू असताना तुम्हाला अतिरिक्त वाढीव कालावधी मिळण्याची परवानगी आहे. याचाच अर्थ तुमची जुनी पॉलिसी किती दिवस सक्रिय होती त्यानुसार तुमचा हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम आकारला जाईल.

तुमच्या इन्शुरन्स रक्कम आणि कव्हरेजच्या मर्यादेबाबत

तुमची पॉलिसी पोर्ट करताना तुम्ही तुमच्या इन्शुरन्स रक्कम वाढवण्याचा पर्याय निवडू शकता. तथापि, ते तुमच्या नवीन हेल्थ इन्शुरन्स कंपनीने मंजूर करायला हवे.

प्रतीक्षा कालावधीबाबत

तुम्ही तुमच्या पूर्वीच्या इन्शुरन्स कंपनीपेक्षा वेगळ्या प्रतीक्षा कालावधीसह येणारे नवीन कव्हरेज निवडले नसल्यास सामान्यतः, तुमची पॉलिसी पोर्ट करताना प्रतीक्षा कालावधी प्रभावित होत नाही. उदाहरणार्थ- विशिष्ट आजारांसाठी किंवा आधीपासून असलेल्या रोगांच्या खर्चासाठी तुमचा प्रतीक्षा कालावधी प्रभावित होणार नाही. कारण तो हेल्थ इन्शुरन्सच्या योजनांचा भाग आहे. तथापि, जर तुम्ही आत्ताच पोर्टिंग दरम्यान मॅटर्निटी कव्हर ​​निवडले असेल तर तुम्हाला तुमच्या नवीन इन्शुरन्स कंपनीकडे त्यासाठी प्रतीक्षा कालावधी पूर्ण करावा लागेल.

तुम्ही तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कधी पोर्ट करायला हवी?

तुमचा हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करण्यापूर्वी ३ गोष्टी जाणून घ्या

तुमचा हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?

फायदे

तोटे

सातत्य - तुमची हेल्थ इन्शुरन्स योजना पोर्ट करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कोणतेही फायदे सोडण्याची गरज नाही. उदाहरणार्थ: जर तुमच्या नवीन हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा विशिष्ट रोगांसाठी ३-वर्षांचा प्रतीक्षा कालावधी असेल आणि तुमची आधीची योजना २ वर्षांसाठी असेल - तर तुम्हाला त्या विशिष्ट रोगांसाठी दावा करण्यासाठी आणखी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागेल, उलट नवीन योजना घेत असल्यास तुम्हाला पुन्हा प्रतीक्षा कालावधी सुरू करावा लागेल!

तुम्ही केवळ नुतनीकरणादरम्यानच पोर्ट करू शकता - तुमच्या आरोग्य विमा पॉलिसीचे नूतनीकरण करण्याची वेळ आल्यावरच तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करू शकता. सूचना:जर तुम्हाला तुमचा हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करायचा असेल, तर तुमच्या नुतनीकरणाच्या २-महिने आधी पर्याय शोधा. मूल्यमापन सुरू करा जेणेकरून तुमच्या हातात निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ असेल आणि नंतर हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करण्यासाठी अर्ज करा.

तुमचा नो क्लेम बोनस ठेवा - तुमचा हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करण्याचा एक फायदा असा आहे की तुम्हाला तुमचा नो क्लेम बोनस सोडण्याची गरज नाही. तो तुमच्या नवीन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जोडला जाईल.

तुमच्या प्लॅनमध्ये मर्यादित बदल - तुम्ही तुमची आरोग्य विमा योजना समान फायद्यांसह एका चांगल्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडे पोर्ट करू शकता. प्लॅन आणि कव्हरेजमध्ये अधिक बदल किंवा सानुकूलित करण्यासाठी - तुमचा हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम आणि त्याच्याशी संलग्न अटी आणि नियमानुसार तपासून पाहा.

इन्शुरन्स कंपनीत बदल करूनही तुमचा प्रतीक्षा कालावधी प्रभावित होत नाही - वर नमूद केल्याप्रमाणे, पोर्टिंग करताना तुम्हाला सतत लाभ मिळत असल्याने, तुम्ही तुमचा आरोग्य विमा पोर्ट करता तेव्हा तुमच्या प्रतीक्षा कालावधीवर परिणाम होत नाही. तुम्ही तुमच्या मागील आरोग्य विमा प्रदात्यासोबत किती वेळ पूर्ण केला आहे यावर आधारित तुमचा कालावधी ठरतो.

तुमच्या आधीच्या प्लॅनच्या तुलनेत तुम्हाला विस्तृत कव्हरेज हवे असल्यास जास्त प्रीमियम भरण्याची तयारी ठेवा, जर तुम्ही ठरवले असेल की तुम्हाला तुमच्या आधीच्या इन्शुरन्स कंपनीच्या योजनेपेक्षा खूप वेगळी योजना आणि जास्त कव्हरेजची योजना हवी आहे, तर तुमचा प्रीमियम देखील त्यानुसार भिन्न असू शकतो.

भारतातील आरोग्य विमा पोर्टेबिलिटीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न