#1 आरोग्यसेवा क्षेत्रातील महागाई
इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, आरोग्य सेवेतील महागाई 12 ते 18% च्या दराने वाढत आहे, यामध्ये औषधांचा खर्च, हॉस्पिटलमध्ये प्रवेश शुल्क, विविध उपचारांचा खर्च, वैद्यकीय प्रगती इत्यादी एकूण खर्चाचा समावेश होतो. या खर्चात वाढ झाल्यामुळे, तुम्ही दावा करता तेव्हा या खर्चांसाठी कव्हरेज सक्षम होण्यासाठी तुमच्या विमा कंपनीला दरवर्षी तुमची विम्याची रक्कम वाढवणे आवश्यक आहे. म्हणूनच, जेव्हा तुम्ही नवीन पॉलिसी वर्षासाठी नूतनीकरण करता प्रामुख्याने तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ होते
आपण याबद्दल काय करू शकता?
वाईट बातमी ही आहे की वैद्यकीय खर्चाशी थेट संबंध असल्याने आणि तुमच्या इन्शुरन्सच्या रकमेत बदल करणे आवश्यक असल्याने तुम्ही करु शकता असे यात काही नाही.
मात्र, चांगली बातमी ही आहे की काही इन्शुरन्स कंपन्या तुमच्या क्लेमच्या इतिहासावर अवलंबून नूतनीकरण सवलत आणि बोनस ऑफर करतात.
त्यामुळे, तुमच्या प्लॅनमध्ये तुम्हाला यापैकी कोणतेही फायदे आहेत का हे पाहण्यासाठी तुमच्या इन्शुरन्स कंपनीशी (किंवा फक्त तुमचे पॉलिसी दस्तऐवज तपासा) संपर्क साधा. तुमच्याकडे डिजिटचा हेल्थ इन्शुरन्स असल्यास – तुम्ही तुमच्या पॉलिसीचा सारांश तपासू शकता.
ज्यांनी मागील वर्षी कोणतेही क्लेम केले नाहीत त्यांच्यासाठी आम्ही क्युम्युलेटिव्ह बोनस बेनिफिट देतो. याचा अर्थ, आम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये कोणतीही वाढ न करता तुमच्या इन्शुरन्सची रक्कम वाढवतो! 😊 आपल्या आरोग्याची इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल हे बक्षीस तर तुम्हाला मिळायलाच हवं.
याव्यतिरिक्त, आम्ही एक ॲड-ऑन कव्हर देखील देऊ करतो जिथे तुम्ही तुमची इन्शुरन्सची रक्कम दरवर्षी 25,000 किंवा रु. 50,000 ने वाढवून महागाई-प्रूफ होण्यासाठी तुमची योजना कस्टमाइझ करू शकता!
तुम्ही क्लेम केले आहेत की नाही याची पर्वा न करता, आणि या फायद्यासाठी प्रीमियममधील वाढ केवळ नूतनीकरणाच्या वेळीच लागू होईल.
#2 तुमचा क्लेमचा इतिहास
काही इन्शुरन्स कंपन्या तुम्ही वर्षभरात केलेल्या क्लेमची संख्या आणि प्रमाणानुसार तुमचा हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम वाढवतात. तथापि, सर्व हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांच्या बाबतीत असे आवश्यक नाही.
तुमचा हेल्थ इन्शुरन्स तुमच्या क्लेमच्या इतिहासाच्या आधारे तुमचा प्रीमियम वाढवतो की नाही हे तपासण्यासाठी, तुमचे पॉलिसी दस्तऐवज आणि तुमचे क्लेम किंवा तुमच्या अटी व शर्ती दाखवला जाणारा विभाग तपासा.
तुमच्याकडे डिजिटची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असल्यास, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही केलेल्या क्लेमच्या संख्येवर किंवा रकमेच्या आधारावर आम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम वाढवत नाही.
आपण याबद्दल काय करू शकता?
तुमच्या क्लेमवर आधारित तुमच्या इन्शुरन्स कंपनीने तुमच्या प्रीमियममध्ये वाढ केली असल्यास, तुमच्या सध्याच्या इन्शुरन्सच्या अटी व शर्तींचा भाग असल्याने तुम्ही त्याबाबत फारसे काही करू शकत नाही.
तथापि, तुम्ही वेगळ्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडे पोर्ट करण्याचा विचार करू शकता. पोर्ट (हस्तांतरण) ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही नूतनीकरणादरम्यानच करू शकता, त्यामुळे इतर पर्यायांचे मूल्यमापन करा आणि त्यानुसार तुमचा निर्णय घ्या.
#3 तुमचे वय
तुम्हाला हे आधीच माहीत असेल, की तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता साधारणपणे तुमच्या वयासह विविध घटकांवर अवलंबून असतो. काही प्रकरणांमध्ये, वय वाढल्याने तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमवरही परिणाम होऊ शकतो. हे विशेषत: नूतनीकरणादरम्यान किंवा त्यापूर्वी वयाची साठी गाठणाऱ्यांसाठी लागू होते.
आपण याबद्दल काय करू शकता?
तुम्ही वेळ मागे घेऊ शकत नाही आणि तरुण होऊ शकत नाही, परंतु तुम्ही काय करू शकता ते म्हणजे तुम्ही ज्या इन्शुरन्सच्या रकमेची निवड करत आहात त्याबद्दल विचार करा. तुम्ही तुलनेने तरुण असल्यास, तुम्हाला कदाचित जास्त कव्हरेजची गरज नाही, परंतु तुमच्या ज्येष्ठ पालकांसाठी तुमच्याकडे योजना असल्यास, त्यांना अधिक कव्हरेजची आवश्यकता असू शकते. त्यामुळे, तुमची आणि तुमच्या कुटुंबाची इन्शुरन्सची रक्कम त्यांच्या वयाच्या आणि आरोग्यसेवा गरजांवर आधारित नेहमी कस्टमाइझ करा.
#4 कव्हरेज फायद्यांमध्ये बदल
तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या नूतनीकरणादरम्यान, तुम्ही तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या अटी व शर्तींवर अवलंबून, तुमच्या कव्हरेज आणि फायद्यांमध्ये बदल करणे निवडू शकता.
तुम्हाला अधिक कव्हरेजची आवश्यकता आहे हे लक्षात आल्याने किंवा वैयक्तिक कारणांनी तुम्ही हे निवडू शकता (कदाचित तुम्ही प्रसूती ॲड-ऑनची निवड करण्याची योजना आखली असेल किंवा अलीकडे तुम्हाला आरोग्य स्थितीचे निदान झाले असेल ज्यासाठी अधिक कव्हरेजची आवश्यकता असेल.) त्यामुळे, जर तुम्ही ॲड ऑन निवडणे किंवा तुमची इन्शुरन्सची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला; मग तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता देखील त्याच आधारावर वाढेल.
आपण याबद्दल काय करू शकता?
या प्रकरणात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचे तपशीलवार पुनरावलोकन करणे, अशा प्रकारे तुम्ही तुमचे कव्हरेज आणि फायदे काय आहेत आणि ते तुमच्या आरोग्याच्या वाढत्या गरजा पूर्ण करतात की नाही हे पाहू शकता.
तुम्ही तुमच्या सध्याच्या इन्शुरन्स कंपनीसह इतर प्लॅनचे पर्याय तपासून अपग्रेड करू शकता. तुमच्या गरजांनुसार तुम्ही इतर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सची सुद्धा ऑनलाइन तुलना करा
#5 तुमचे आरोग्य
महागाईमुळे तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता थोड्याफार प्रमाणात वाढणार आहेच . तथापि, बहुतेक हेल्थ इन्शुरन्स कंपन्या मागील वर्षात तुम्ही किती निरोगी होता याचा विचार करतात आणि त्यानुसार तुम्हाला बक्षीस देतात.
उदाहरणार्थ: डिजिटमध्ये, तुम्ही वर्षभरात कोणतेही क्लेम केले नसतील तर - आम्ही तुम्हाला एक क्युम्युलेटिव्ह बोनस बेनिफिट देतो म्हणजेच आम्ही नूतनीकरणादरम्यान तुमच्या प्रीमियममध्ये कोणतीही वाढ न करता तुमचे कव्हरेज वाढवतो!
त्याचप्रमाणे, काही हेल्थ इन्शुरन्स कंपन्या नूतनीकरणावर तुमचा हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम देखील वाढवू शकतात जर तुम्हाला नुकतेच एखाद्या आजाराचे किंवा रोगाचे निदान झाले असेल ज्यासाठी अधिक कव्हरेज आवश्यक असेल.
आपण याबद्दल काय करू शकता?
याचे स्पष्ट उत्तर, तुम्ही तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घेत आहात याची खात्री करणे हे आहे! तथापि, आम्ही समजतो की हे अनिश्चित आहे आणि काहीवेळा तुम्ही कितीही सावध असलात तरीही, गोष्टी घडतात! क्युम्युलेटिव्ह बोनससारख्या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी एक शिफारस म्हणजे तुम्ही वर्षभरात लहान क्लेम करणे टाळू शकता.
उदाहरणार्थ; तुम्हाला वर्षभरात फ्रॅक्चर झाले आहे – तुम्ही त्यासाठी क्लेम न करणे निवडू शकता (कारण खर्चही तितका जास्त नसेल).
अशा प्रकारे, वर्षभरात तुमचा कोणताही क्लेमचा इतिहास नसेल तर तुमच्या इन्शुरन्सच्या रकमेत वाढ करून, तुमच्या प्रीमियममध्ये कोणतीही वाढ न करता तुम्हाला बक्षीस मिळू शकते.