ओपीडी (OPD) कव्हरसहित हेल्थ इन्श्युरन्स

Digit

No Capping

on Room Rent

24/7

Customer Support

Zero

Co-payment

Zero Paperwork. Quick Process.
Your Name
Mobile Number

No Capping

on Room Rent

24/7

Customer Support

Zero

Co-payment

ओपीडी लाभ म्हणजे काय?

प्रत्येक आजार किंवा जखमेसाठी काही दवाखान्यात दाखल व्हायची गरज नसते. कन्सल्टेशन, निदान आणि उपचार दवाखान्यात दाखल न होताही वेगाने आणि सोयीस्कररित्या होऊ शकतात. हेल्थकेअरच्या विश्वात यालाच ओपीडी-‘आऊट पेशंट डिपार्टमेंट’ म्हणतात.

ओपीडी कव्हरमुळे होते असे की तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी काही कारणाने कधी ओपीडी उपचार घ्यावे लागले तर त्यातून उद्भवणाऱ्या खर्चाची भरपाई मिळते.

तब्येतीची एखादी समस्या किंवा कधी झालेली इजा, तुमच्या दातांच्या डॉक्टरने करावेच लागेल असे सांगितलेले रूट कॅनाल! तुमच्या आरोग्याच्या महामार्गावरचे हे सगळे थांबे येतात ते ओपीडी (OPD) मध्येच.

Read More

माझ्यासाठी ओपीडी (OPD) कव्हर असलेला हेल्थ इन्श्युरन्स घेणे का आवश्यक आहे?

जर का त्याबद्दल अजूनही मनात शंका असेल तर पुढे वाचा..

OPD Expenses
भारतामध्ये आरोग्य सेवेवरील खर्चापैकी 62% इतका खर्च ओपीडी (OPD) वर होतो.  (1)
Treatment
डॉक्टरांच्या क्लिनिकमधे जाण्याचे प्रमाण 2017 मध्ये 2.7 वेळा होते त्यामानाने  2018 मध्ये 3.2 वेळा इतके वाढले आहे. (2)
Health Guard
एका स्थानिक अभ्यासानुसार जिम आणि वर्कआऊटमुळे होणाऱ्या दुखापतींमधे गुढघ्याची दुखापत सर्वात जास्त आढळते. (3)

डिजिट हेल्थ इन्श्युरन्सच्या ओपीडी (OPD) कव्हरसहित हेल्थ इन्श्युरन्समध्ये एवढे खास काय आहे?

  • सोपे ऑनलाइन प्रोसेसिंग – ओपीडी (OPD) कव्हरसहित हेल्थ इन्श्युरन्स घेण्यापासून ते क्लेम करण्यापर्यन्त पूर्ण प्रक्रिया पेपरलेस, सोपी, झटपट आणि विना कटकट होते. अगदी क्लेमसाठीही कोणत्याही हार्ड कॉपीज देण्याची जरूर नाही!
  • महामारीचा समावेश – 2020 ने आपल्याला दिलेला सर्वात मोठा धडा हा आहे की सगळंच अनिश्चित आहे! मग कोव्हिड-19 असो किंवा इतर कोणताही व्हायरस, यात महामारीचादेखील समावेश होतो!
  • वयाशी संबंधित कोणतेही कोपेमेंट नाही _ आमच्या हेल्थ इन्श्युरन्समध्ये कोणतेही वयाशी संबंधित को पेमेंट अंतर्भूत नाही. म्हणजेच तुमच्या क्लेमच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या खिशातून एकही पैसा काढण्याची गरज नाही.
  • रूमच्या भाड्यावर कोणतेही बंधन नाही – प्रत्येकाची निवड वेगळी असते याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच आमच्याकडे रूमच्या भाड्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला आवडेल ती रूम तुम्ही घेऊ शकता.
  • क्युम्युलेटीव्ह बोनस – निरोगी राहण्याबद्दल तुम्हाला मिळेल वार्षिक क्युम्युलेटीव्ह बोनसचे बक्षीस
  • कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या – कॅशलेस क्लेमसाठी आमच्या नेटवर्कमधील 10500 हॉस्पिटल्समधून निवडा किंवा परतावा मिळवा.

डिजिट हेल्थच्या ओपीडी (OPD) कव्हरसह इन्श्युरन्समध्ये कशा-कशाचा समावेश आहे?

स्मार्ट + ओपीडी (OPD)

10% CB for each claim free year (Up to 50%)

यात कशाचा समावेश नाही?

क्लेम कसा फाइल करावा?

  • परतव्याचे क्लेम्स – हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास दाखल झाल्याच्या तारखेच्या दोन दिवसांत आम्हाला 1800-258-4242 या  नंबरवर किंवा healthclaims@godigit.com वर मेल करून कळवा. आम्ही तुम्हाला लिंक पाठवू त्यावर तुमची हॉस्पिटलची बिले आणि परतव्याच्या प्रक्रियेसाठीची इतर कागदपत्रे आपलोड करा.
  • कॅशलेस क्लेम्स – नेटवर्कमधील हॉस्पिटल निवडा. इथे तुम्हाला नेटवर्कमधल्या सर्व हॉस्पिटल्सची पूर्ण लिस्ट मिळेल. हॉस्पिटलच्या हेल्पडेस्कला ई-हेल्थ कार्ड दाखवा आणि कॅशलेस रिक्वेस्ट फॉर्म मागा.  सर्व काही ठीक-ठाक असेल तुमचा क्लेम तिथल्या तिथेच प्रोसेस केला जाईल.
  • जर तुम्ही कोरोना व्हायरससाठी क्लेम करत असाल तर तुमच्याकडे आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिरॉलॉजी (ICMR – National Institute of Virology), पुणे यांची मान्यता प्राप्त असलेल्या टेस्ट सेंटरचा पॉझिटिव्ह टेस्ट रिपोर्ट असल्याची खात्री करून घ्या.

ओपीडी कव्हरसहित हेल्थ इन्श्युरन्स कोणी घ्यावा?

फिटनेसबद्दल सजग असलेल्यांनी

फिटनेसबद्दल सजग असलेल्यांनी

फिटनेसबद्दल सजग असलेल्यांसाठी आम्ही फिट ऑप्शन नावाचा खास ओपीडी कव्हरसहित हेल्थ इन्श्युरन्स बनवला आहे. तुमच्यासारखी लोकं अतिशय फिट असल्याने आजारी पडण्याची शक्यता खूप कमी असते पण तरीही तुम्हाला जिम आणि वर्कआऊटसंबंधित इजा होण्याची शक्यता असते. अश्या वेळी ओपीडी कव्हर फार उपयोगी ठरू शकते. शिवाय हेल्थ इन्श्युरन्सचा फायदा तुम्हाला तुमच्या वार्षिक टॅक्समध्ये बचत करण्यासाठीही होतो.

25-40 वर्षांमधील लोकं

25-40 वर्षांमधील लोकं

अलीकडे अनेकानेक तरुण लोकं प्रीमियम कमी असल्याने वेटिंग पिरीअड लवकर पूर्ण करण्यासाठी आणि अर्थातच टॅक्स वाचवण्यासाठी हेल्थ इन्श्युरन्स घेत आहेत. तुम्हीदेखील त्यांपैकीच एक असाल तर तर तुम्हीही ओपीडी (OPD) कव्हरसह हेल्थ इन्श्युरन्स घेऊ शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्सचे बरेचसे फायदे वापरू शकणार नाही असे तुम्हाला वाटले तरी तुमचा ओपीडी (OPD) चा लाभ मात्र तुम्ही कशा ना कशासाठीतरी वापरू शकाल.

ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठांना हेल्थ इन्श्युरन्सची गरज सर्वात जास्त असते असे म्हणायला हरकत नाही. परंतु ज्येष्ठ लोकांना नेहमीच्या हेल्थ इन्श्युरन्समध्ये अंतर्भूत असते त्याशिवाय वेळोवेळी दातांच्या ट्रीटमेंट्स, किरकोळ सर्जरीज वगैरें लागू शकतात; आणि म्हणूनच ओपीडी (OPD) कव्हर असलेला इन्श्युरन्स घेणे महत्त्वाचे असते. म्हणूनच ओपीडी (OPD) कव्हरसह हेल्थ इन्श्युरन्स नेहमीच्या हेल्थ इन्श्युरन्सचे लाभ आणि त्याशिवाय ओपीडी (OPD) उपचारसुद्धा कव्हर करेल.

मर्यादित ग्रूप मेडिकल इन्श्युरन्स असणारे वर्किंग प्रोफेशनल्स

मर्यादित ग्रूप मेडिकल इन्श्युरन्स असणारे वर्किंग प्रोफेशनल्स

तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयरकडून ग्रूप मेडिकल इन्श्युरन्स मिळत असेल पण अधिक संरक्षणासाठी तुम्हाला अतिरिक्त हेल्थ इन्श्युरन्स हवा असेल तर तुम्ही टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन किंवा ओपीडी (OPD) सहित हेल्थ इन्श्युरन्स घेऊ शकता कारण बहुतेक ग्रुप इन्श्युरन्स प्लॅन्समध्ये ओपीडीचा लाभ मिळत नाही. म्हणूनच अतिरिक्त हेल्थ इन्श्युरन्समुळे तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयर प्लॅनव्यतिरिक्त लाभ तर मिळेलच शिवाय तुमच्या वार्षिक टॅक्समध्येही बचत होईल.

ओपीडी सहितच्या इन्श्युरन्स कव्हरबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न