इन्डिव्ह्युजअल (वैयक्तिक) हेल्थ इन्शुरन्स

डिजिट हेल्थ इन्शुरन्समध्ये अपघात, आजारपण आणि कोव्हिड-19 हॉस्पिटलायझेशन कव्हर होते
Happy Couple Standing Beside Car
{{healthCtrl.residentPincodeError}}
Send OTP OTP Sent {{healthCtrl.mobileNumberError}}

I agree to the  Terms & Conditions

Port my existing Policy
{{healthCtrl.residentPincodeError}}
Send OTP OTP Sent {{healthCtrl.mobileNumberError}}
{{healthCtrl.otpError}}
Didn't receive SMS? Resend OTP

I agree to the  Terms & Conditions

Port my existing Policy

YOU CAN SELECT MORE THAN ONE MEMBER

{{healthCtrl.patentSelectErrorStatus}}

 • -{{familyMember.multipleCount}}+ Max {{healthCtrl.maxChildCount}} kids
  (s)

DONE
Renew your Digit policy instantly right
Loader

Analysing your health details

Please wait moment....

इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय?

इन्डिव्हुजअल (वैयक्तिक) हेल्थ इन्शुरन्स ही एक प्रकारची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे जी तरुण व्यक्तीला विविध आजारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कस्टमाइझ केली जाते. हॉस्पिटलायझेशन, चाइल्ड डिलिव्हरी खर्च आणि इतर मोठ्या आणि आयुष्यात उद्भवणाऱ्या किरकोळ आरोग्याच्या समस्या यापासून ही पॉलिसी संरक्षण देते.

इन्डिव्हुजअल (वैयक्तिक) हेल्थ इन्शुरन्स मूलत: कुटुंब नसलेल्या तरुणांसाठी डिझाइन केलेला असला, तरी तुम्ही तुमचे ज्येष्ठ पालक, जोडीदार आणि मुलांसारख्या तुमच्यावर अवलंबून असलेल्यांना कव्हर करण्यासाठी तुमचा प्लॅन तुम्ही कस्टमाइझ करू शकता.

आज, अधिकाधिक लोक हेल्थ इन्शुरन्स प्लॅन खरेदी करण्याचा पर्याय निवडत आहेत कारण त्याचे असणारे वैद्यकीय फायदे आणि कर लाभ दोन्ही!

कारण कितीही रोल केलेले ओट्स आणि ब्राऊन ब्रेड आपल्या आरोग्याचे किंवा संपत्तीचे पूर्णपणे रक्षण करणार नाहीत.

आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाकांक्षी, तरीही सर्वात तणावग्रस्त पिढीसाठी. ज्यांना जग पादाक्रांत करायचे आहे, ते पण कोणतीही तडजोड न करता. जे लोक आरोग्याबद्दल जागरूक होत आहेत आणि त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला महत्त्व देत आहेत. ज्यांना सुविधा आणि पैसे आवडतात आणि त्यांना सर्व काही फक्त एका बटणाच्या क्लिकवर असण्याची सवय आहे.

Read More

आज आपले आरोग्य सुरक्षित करणे पूर्वीपेक्षा जास्त महत्वाचे का आहे?

Mental health issues
राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, भारतातील प्रत्येक सहाव्या व्यक्तीला मानसिक आरोग्यासाठी आधाराची गरज आहे
Breast cancer
तरुण महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (वय<40) भारतात वाढत आहे, जो जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.
Chronic Obstructive Pulmonary disease
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी आजार हे भारतातील हृदयरोगानंतर मृत्यूचे प्रमुख कारण होते.

डिजिटच्या इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्समध्ये काय चांगले आहे?

 • डिजिटल फ्रेंडली प्रक्रिया– हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्याच्या प्रक्रियेपासून ते क्लेम करण्याच्या प्रक्रियेपर्यंत सगळे पेपरलेस, सोपे, जलद आणि त्रासरहित! हार्ड कॉपी नाही, क्लेमसाठीही!
 • अतिरिक्त सम इन्शुअर्ड- विशेषत: अपघाती रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणि गंभीर आजारांसाठी, शून्य किंमतीत!
 • महामारी कव्हर करते- आम्हाला माहित आहे की लोक कोरोनाव्हायरसला घाबरतात म्हणूनच आम्ही ते कव्हर करतो!
 •  नो एज बेस्ड कोपेमेंट- आमच्या योजना नो एज बेस्ड कोपेमेंटसह येतात. याचा अर्थ, आपल्या क्लेम्स दरम्यान - आपल्याला आपल्या खिशातून काहीही देण्याची गरज नाही.
 • खोली भाड्यावर बंधन नाही - प्रत्येकाला वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात आणि आम्हाला ते समजते. त्यामुळेच आमच्याकडे खोलीच्या भाड्यावर निर्बंध नाहीत. आपल्याला आवडेल अशी कोणतीही हॉस्पिटलची रूम निवडा.
 • 2X सम इन्शुअर्ड - जर तुमचा सम इन्शुअर्ड संपला आहे आणि दुर्दैवाने वर्षभरात पुन्हा त्याची आवश्यकता लागली, तर आम्ही ते आपल्यासाठी पुन्हा रिफील करतो.
 • संचयी बोनस- निरोगी राहण्याचे बक्षीस! वार्षिक क्युम्युलेटिव्ह बोनस मिळवा.
 • कोणत्याही रुग्णालयात उपचार घ्या- कॅशलेस क्लेम्ससाठी भारतातील आमच्या नेटवर्क रुग्णालयांपैकी 6400+ मधून निवडा किंवा रिएम्बर्समेंटचा पर्याय निवडा.

डिजिटद्वारे इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्समध्ये काय कव्हर करण्यात आले आहे?

Accidental Hospitalization

अपघाती हॉस्पिटलायझेशन

अपघात झाल्यास तुमचा सर्व प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनशी संबंधित खर्चपण कव्हर करते.

Illness Related Hospitalization

आजाराशी संबंधित हॉस्पिटलायझेशन

काहीवेळा, काही आजारांसाठी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. हे बेनिफिट तुमच्या अशा आजारांसाठीचा सर्व उपचार खर्च कव्हर करते.

Maternity Benefit with Newborn Baby Cover

प्रसूती आणि वंध्यत्व संबंधित खर्च

प्रसूती आणि वंध्यत्वाशी संबंधित सर्व खर्चाची काळजी घ्या; चाइल्ड डिलिव्हरी, सी-सेक्शन, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक गर्भपात, नवजात बाळाचे लसीकरण इत्यादींचा समावेश आहे.

Pre & Post Hospitalization Expenses

प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च

जर तुम्हाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज असेल, तर हे बेनिफिट आपल्या रुग्णालयात दाखल होण्याचा आणि उपचारांचा सर्व खर्च कव्हर करेल.

Critical Illness Benefit

गंभीर आजारासाठी बेनिफिट

इतर गंभीर आजारांसह कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताशी संबंधित वैद्यकीय खर्च पण कव्हर होतो.

Daily Hospital Cash Cover

डेली हॉस्पिटल कॅश कव्हर

देव ना करो, पण जेव्हा तुम्हाला रुग्णालयात दाखल केले जाते, तेव्हा खर्च केवळ रुग्णालयाच्या बिलापुरताच मर्यादित राहात नाही आणि हे बेनिफिट तुम्हाला त्यासाठी कव्हर करण्यास उपयुक्त ठरते

Annual Health Checkup

वार्षिक आरोग्य तपासणी

चांगल्या आरोग्याची पहिली पायरी जागरूकता आहे. तुमच्या दुसऱ्या वर्षापासून वार्षिक वैद्यकीय चाचण्यांसाठी रिएम्बर्समेंट मिळवा!

Psychiatric Benefit

सायकिॲट्रिक बेनिफिट

मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. म्हणूनच, या बेनिफिटमध्ये आघात किंवा इतर कोणत्याही सायकिॲट्रिक(मानसिक) रोगामुळे उद्भवणाऱ्या सर्व हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाचा समावेश आहे.

Other Benefits

इतर फायदे

काळ बदलला आहे आणि आम्हीसुद्धा त्याच्याबरोबर बदललो आहोत. आमच्या इतर हेल्थ इन्शुरन्समध्ये बॅरिॲट्रिक सर्जरी, अवयवदान, आपल्या वयस्कर पालकांसाठी आयुष उपचार आणि आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमुळे आपल्याला पौष्टिक वैद्यकीय लाभ मिळतील याची खात्री करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचे उपचार यासारख्या बेनिफिट्सचाही समावेश आहे.

इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्समधील अतिरिक्त कव्हर्स

वंध्यत्व बेनिफिटसह प्रसूती बेनीफिट

दोन मुलांपर्यंत प्रसूती आणि बाळंतपणाचा खर्च कव्हर केला जातो; वंध्यत्व उपचार, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक गर्भपात आणि नवजात अर्भकाच्या जन्माच्या 90 दिवसांपर्यंत संरक्षण यांचा समावेश आहे.

झोन अपग्रेड

आम्ही आमचे प्लॅन्सची विभागणी वेगवेगळ्या शहर क्षेत्रांनुसार केली आहे. याचे कारण प्रत्येक शहराचा वैद्यकीय खर्च वेगळा असतो. जर तुम्हाला तुमच्या शहरापेक्षा जास्त वैद्यकीय खर्च असलेल्या शहरात उपचार घेण्याची किंवा रुग्णालयात दाखल करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही अपग्रेडचा पर्याय निवडू शकता.

आयुष (आयुर्वेद, युनानी, सिद्ध किंवा होमिओपॅथी)

आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीसारख्या उपचारांच्या पर्यायामुळे उद्भवणाऱ्या  खर्चासाठी आपल्या ज्येष्ठ पालकांना कव्हर करा.

काय कव्हर्ड नाही?

प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरचा खर्च

प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरचा वैद्यकीय खर्च, जर रुग्णालयात दाखल केले नसेल तर.

आधीपासून अस्तित्वात असलेले आजार

आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजाराच्या बाबतीत, जोपर्यंत प्रतीक्षा कालावधी संपत नाही, तोपर्यंत त्या आजाराचा किंवा आजाराचा क्लेम करता येत नाही.

डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय हॉस्पिटलायझेशन

तुम्हाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, पण ते कारण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशी जुळत नसल्यास ते कव्हर होत नाही.

क्लेम कसा दाखल करावा ?

 • रिएमबर्समेंट क्लेम्स- हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या दोन दिवसांच्या आत 1800-258-4242 वर कळवा किंवा आम्हाला healthclaims@godigit.com  वर ईमेल करा आम्ही एक लिंक पाठवू जिथे आपण रिएम्बर्समेंटवर प्रक्रिया करण्यासाठी आपली रुग्णालयाची बिले आणि सर्व संबंधित कागदपत्रे अपलोड करू शकता.
 • कॅशलेस क्लेम्स- नेटवर्कमधील हॉस्पिटल निवडा. तुम्ही   नेटवर्कमधील रुग्णालयांची संपूर्ण यादी इथे शोधू शकता. हॉस्पिटलच्या हेल्पडेस्कवर ई-हेल्थ कार्ड प्रदर्शित करा आणि कॅशलेस रिक्वेस्ट फॉर्म मागा. जर सर्व काही व्यवस्थित असेल, तर आपल्या क्लेमवर लगेच प्रक्रिया केली जाईल.
 • जर आपण कोरोनाव्हायरससाठी क्लेम केला असेल, तर आय.सी.एम.आर- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणेच्या अधिकृत केंद्राकडून तुमचा कोरोना चाचणीअहवाल पॉझिटीव्ह आला आहे याची खात्री करा.

डिजिटच्या वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्सचे मुख्य फायदे

कोपेमेंट

नो एज बेस्ड कोपेमेंट

कॅशलेस रुग्णालये

संपूर्ण भारतात 6400+ कॅशलेस रुग्णालये

क्युम्युलेटिव्ह बोनस

आपल्या पहिल्या क्लेम फ्री वर्षासाठी 20% अतिरिक्त एस.आय(SI)

रूम रेंट कॅपिंग

रूम रेंट कॅपिंग नाही. आपल्याला पाहिजे ती खोली निवडा.

तरुण व्यक्तींसाठी हेल्थ इन्शुरन्स इतका महत्त्वाचा का आहे?

Increase in Lifestyle Diseases Amongst Youngsters

तरुणांमध्ये जीवनशैलीच्या आजारांमध्ये वाढ

पी.सी.ओ.एस (PCOS), लठ्ठपणा, टाईप 2 मधुमेह इत्यादींसारखे जीवनशैलीशी निगडीत आजार वाढत आहेत, विशेषत: तरुणांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला त्या सर्वांपासून संरक्षित करण्याची खात्री देतो; अगदी निदानापासून उपचारापर्यंत.

Rise in Mental Health Issues

मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ

भारतात मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, विशेषत: 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये. अशा व्यक्तींसाठी आमच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यावरील उपचाराचे कव्हर सुनिश्चित करण्यासाठी सायकिॲट्रिक बेनिफिट्सचा समावेश होतो.

Maximize Savings

जास्तीत जास्त बचत करा

हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे म्हणजे तुम्हाला वैद्यकीय खर्च वाढण्याची काळजी करण्याची गरज नाही कारण तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला कव्हर करेल; जेव्हा तुम्ही त्याऐवजी तुमच्या बचतीचे संरक्षण करू शकता आणि वाढवू शकता.

Improve Overall Well-Being

सर्वांगिण आरोग्य सुधारा

हेल्थ इन्शुरन्स वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी नेहमी तुमच्या पाठीशी राहून आणि वार्षिक आरोग्य तपासणी आणि यासारख्या गोष्टींसाठी कव्हर करून तुमच्या आरोग्याच्या संभाव्य परिस्थिती टाळून तुमच्या सर्वांगीण आरोग्याला फायदा होतो.

Save Tax

कर वाचवा

हेल्थ इन्शुरन्स असण्याबाबतची एक उत्तम गोष्ट म्हणजे,तुम्ही भरलेल्या प्रीमियमवर तुमच्या आयकर कपातीचा क्लेम करू शकता.

Affordable Premiums

परवडणारे प्रीमियम

तरुणांना नेहमी हेल्थ इन्शुरन्स लवकर घेण्याचा सल्ला दिला जातो. हे सुनिश्चित करते की आपल्याला स्वस्त प्रीमियम मिळेल आणि मोठ्या आजारांसाठी आपला प्रतीक्षा कालावधी लवकरच संपेल!

इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्सबद्दल अधिक जाणून घ्या

इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न