भारतातील ऑनलाइन कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स

कॅशलेस उपचारांसाठी डिजिटच्या 6400+ नेटवर्क हॉस्पिटल्समधून निवडा
Happy Couple Standing Beside Car
{{healthCtrl.residentPincodeError}}
Send OTP OTP Sent {{healthCtrl.mobileNumberError}}

I agree to the  Terms & Conditions

Port my existing Policy
{{healthCtrl.residentPincodeError}}
Send OTP OTP Sent {{healthCtrl.mobileNumberError}}
{{healthCtrl.otpError}}
Didn't receive SMS? Resend OTP

I agree to the  Terms & Conditions

Port my existing Policy

YOU CAN SELECT MORE THAN ONE MEMBER

{{healthCtrl.patentSelectErrorStatus}}

  • -{{familyMember.multipleCount}}+ Max {{healthCtrl.maxChildCount}} kids
    (s)

DONE
Renew your Digit policy instantly right
Loader

Analysing your health details

Please wait moment....

कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय?

कॅशलेस इन्शुरन्सची कार्यपद्धती काय आहे?

Cashless Hospitals by Digit

डिजिटचे कॅशलेस हॉस्पिटल्सचे नेटवर्क

डिजिटच्या कॅशलेस हेल्थ इन्शुरन्समध्ये खास काय आहे?

  • सोपी ऑनलाइन प्रक्रिया – कॅशलेस इन्शुरन्स घेण्यापासून ते क्लेम दाखल करण्यापर्यंत सारे काही सोपे, जलद आणि बिन-त्रासाचे!

  • आतिरिक्त सम इन्शुअर्डची उपलब्धता – विशेषतः अपघातामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यास किंवा गंभीर आजार असल्यास, तेही काहीही खर्च न करता!

  • साथीच्या आजारांसाठीही सुरक्षा – भारतात कोव्हिड-19 झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला असलेला धोका आम्ही समजून आहोत. साथीचा आजार असला तरीही आमच्या कॅशलेस हेल्थ इन्शुरन्सची सुरक्षा त्यासाठी उपलब्ध आहे.

  • कोणतेही वय आधारित कोपेमेंट नाही – आमच्या कॅशलेस मेडिकल इन्शुरन्समध्ये कोणतेही वय आधारित कोपेमेंट नाही. त्यामुळे तुमच्या कॅशलेस क्लेमसाठी तुम्हाला तुमच्या खिशातून कोणतीही रक्कम काढण्याची गरज नाही.

  • खोलीच्या भाड्यावर कोणतेही नियंत्रण नाही – प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते हे आम्हाला चांगले माहिती आहे. म्हणूनच आम्ही खोलीच्या भाड्यावर कोणतीही कमाल मर्यादा ठेवलेली नाही. हॉस्पिटलमध्ये तुम्ही तुम्हाला हवी ती खोली निवडू शकता.
  • 2x सम इन्शुअर्ड – वर्षभरात तुमची सम इन्शुअर्ड  संपली आणि दुर्दैवाने त्याच वर्षी पुन्हा तुम्हाला त्याची गरज लागली तर तुमच्या वतीने ती आम्ही भरतो.

  • क्युम्युलेटीव्ह बोनस – हे निरोगी असण्यासाठी तुम्हाला मिळणारे बक्षीस आहे! क्लेम-विरहित वर्षांसाठी वार्षिक क्युम्युलेटीव्ह बोनस मिळवा!

डिजिटच्या कॅशलेस बोनसमध्ये कशाचा समावेश आहे?

कॅशलेस मेडिकल इन्शुरन्सचे फायदे कोणते?

No upfront cash payments!

आगाऊ कोणतीही रोख रक्कम भरण्याची आवश्यकता नाही

कॅशलेस इन्शुरन्सचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फायदा हा आहे की हेल्थ इन्शुरन्सच्या क्लेमदरम्यान तुम्हाला तुमच्या खिशातून कोणतीही रोख रक्कम द्यावी लागत नाही. नाहीतर तुम्ही भरलेल्या पैशांच्या परताव्यासाठी तुम्हाला प्रक्रिया पूर्ण व्हायची कित्येक आठवडे वाट बघावी लागेल. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातले कुणीही आजार आणि वैद्यकीय आणीबाणीमध्ये अडकलेले असता तेव्हा पैशांचीही चिंता करावी लागणे हे फारच वाईट. कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स तुमची त्यातून सुटका करतो.

No uncertainty

कोणतीही अनिश्चितता नाही

कॅशलेस हेल्थ इन्शुरन्सच्या क्लेमसाठी तुम्हाला पूर्व-परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे तुमचा क्लेम इन्शुरन्स देणाऱ्या कंपनीकडून मंजूर होण्याची खात्री असते. परंतु रिएम्बर्समेंटच्या प्रक्रियेत कागदपत्रे उपचारानंतरच दिली जातात आणि मग बिलांची प्रक्रिया होते. क्लेम पूर्णत्वाने मंजूर न होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पूर्ण परतावा मिळेल की नाही याबद्दल नेहमी अनिश्चितता असते. कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स क्लेममध्ये अशी कोणतीही अनिश्चितता नसते.

Quick and hassle-free process!

जलद आणि बिनत्रासाची प्रक्रिया!

कॅशलेस किंवा रिएम्बर्समेंट या दोन्ही प्रकारचे क्लेम्स बिन-त्रासाचे असणे इन्शुरन्सदाता कोण आहे आणि त्याची प्रक्रिया कशी आहे यावर अवलंबून असते. तरीही सर्वसाधारणपणे परताव्याच्या क्लेम्सची प्रक्रिया थोडी जास्त वेळखाऊ असते. कारण कॅशलेस क्लेम्स दाखल होण्याच्या वेळीच मंजूर करून त्यांची प्रक्रिया सुरू केली जाते तर रिएम्बर्समेंट क्लेम्स नंतर केले जातात.

कॅशलेस क्लेम आणि रिएम्बर्समेंट क्लेममधील फरक?

वर स्पष्ट केल्याप्रमाणे हेल्थ इन्शुरन्सच्या क्लेमसाठी तुम्ही दोन प्रकारच्या प्रक्रियांमधून निवड करू शकता – कॅशलेस क्लेम किंवा रिएम्बर्समेंट क्लेम. खालचा तक्ता तुम्हाला एका दृष्टीक्षेपात या दोन्हींमधला फरक समजून घेण्यास मदत करेल!

कॅशलेस क्लेम

रिएम्बर्समेंट क्लेम

त्याचा अर्थ काय आहे?

कॅशलेस इन्शुरन्स अंतर्गत तुमचा हेल्थ इन्शुरन्सदाता सुरुवातीपासूनच नेटवर्क हॉस्पिटलमधील बिल भरेल. तुम्हाला तातडीने रोख रक्कम भरण्याची गरज नाही.

रिएम्बर्समेंट क्लेममध्ये तुम्हाला आधी तुमच्या हॉस्पिटलमधील वास्तव्याचे आणि त्यानंतरचे सर्व पैसे भरावे लागतील. त्यानंतर तुमची वैद्यकीय कागदपत्रे देऊन तुमच्या क्लेम मंजूरी प्रक्रिया आणि रिएम्बर्समेंट केली जाईल.

क्लेमसाठी तुम्हाला पूर्व-परवानगीची गरज लागेल का?

तुम्हाला तुमचा क्लेम आधीच मंजूर करून घ्यावा लागेल. पूर्वनियोजित हॉस्पिटलायझेशनसाठी किमान 72 तास आधी तर वैद्यकीय आणीबाणीच्या स्थितीत 24 तासांच्या आत.

तुम्हाला तुमचा क्लेम आधीच मंजूर करून घ्यावा लागेल असे काही नाही. पण तुमच्या इन्शुरन्सदात्याकडून तुमचा क्लेम कव्हर होईल की नाही याची आधीच खातरजमा करून घेणे केव्हाही चांगले. रिएम्बर्समेंट प्रक्रिया उपचारांनंतर सुरू होते. साधारणपणे सर्व उपचार पूर्ण करण्यासाठी 2 ते 4 आठवड्यांचा वेळ लागतो.

हा सर्व हॉस्पिटल्समध्ये लागू असतो का?

कॅशलेस क्लेम्स फक्त तुमच्या इन्शुरन्सदात्याच्या नेटवर्क हॉस्पिटल्समध्येच शक्य असतात.

रिएम्बर्समेंट क्लेम्स कोणत्याही हॉस्पिटलसाठी करता येतात. हॉस्पिटल नेटवर्क हॉस्पिटल्समधील एक आहे की नाही याने काही फरक पडत नाही.

भारतात कॅशलेस हेल्थ इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न