1. खोली भाडे माफी
                                        
    
                                        
                                            
स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये, रुग्णालय कक्षाचे भाडे विशिष्ट मर्यादेपर्यंत मर्यादित आहे. जेव्हा आपण अशा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींमध्ये खोली भाडे माफी ॲड-ऑन समाविष्ट करता, तेव्हा एकतर ती मर्यादा वाढते, किंवा कोणतीही मर्यादा लागू केली जात नाही.
कोणतीही मर्यादा नसताना, इन्शुरन्स धारकाच्या रकमेपर्यंत खोलीभाडे देण्याची परवानगी आहे. जर आपल्याला एखाद्या महानगरातल्या रुग्णालयात दाखल केले गेले तर हे एक महत्त्वपूर्ण हेल्थ इन्शुरन्स रायडर  आहे, जिथे रुग्णालयाच्या खोलीचे भाडे बरेच जास्त असते.
उदाहरणार्थ, तुमची स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्सपॉलिसी खोलीच्या भाड्याची मर्यादा रु.1500 प्रति रात्र. आपण ज्या इस्पितळात दाखल होण्यास प्राधान्य दिले आहे त्यामध्ये खोलीच्या भाड्याचा खर्च भागवणे तुम्हाला अपुरे वाटते. म्हणून, आपण खोली  भाडे माफी ॲड-ऑन घ्या आणि अशी उप-मर्यादा रु 4000 प्रति रात्र पर्यंत वाढवा.
                                        
                                        
                                     
                                
                                    
                                        2. प्रसूती कव्हर
                                        
    
                                        
                                            प्रसूती कव्हरसह,आपल्याला गर्भधारणा आणि बाळंतपणाशी संबंधित सर्व खर्चासाठीचे  कव्हरेज मिळते. काही इन्शुरन्स कंपन्या मुलाच्या खर्चासाठी एकतर पॉलिसीच्या मॅच्युरिटी कालावधीपर्यंत किंवा प्रसूती संरक्षणांतर्गत मुलाच्या जन्मापासून 3 महिन्यांपर्यंत संरक्षण प्रदान करतात.
                                        
                                        
                                     
                                
                                    
                                        3. हॉस्पिटल कॅश कव्हर
                                        
    
                                        
                                            
या हेल्थ इन्शुरन्स रायडर्स अंतर्गत, आपल्याला रुग्णालयात दाखल केलेल्या कालावधीच्या साठी इन्शुरन्स कंपनीद्वारे दररोज रोख भत्ता प्रदान केला जातो. इन्शुरन्स धारक व्यक्तीला भत्ता मिळविण्यासाठी 24 तास किंवा 1 दिवसांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.
हॉस्पिटलायझेशन दरम्यान पगारात होणाऱ्या कपातीच्या भरपाई करण्यासाठी हे प्रदान केले जाते आणि आवश्यक खर्च जसे की वाहतूक, अन्न इत्यादी पूर्ण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
                                        
                                        
                                     
                                
                                    
                                        4. क्रिटिकल आजाराचे कव्हर
                                        
    
                                        
                                            
या ॲड-ऑनअंतर्गत इन्शुरन्स कंपन्या इन्शुरन्सधारकाला कोणत्याही गंभीर आजाराचे निदान झाल्यावर एकरकमी रक्कम पुरवतात, मग ते एकत्रित उपचार खर्चाचे का असेनात.
समजा, आपण 5 लाख रुपयांच्या इन्शुरन्ससह हेल्थ इन्शुरन्सपॉलिसी चा लाभ घेतला आहे. आपण क्रिटिकल आजार कव्हर ॲड-ऑनचा लाभ घेण्याचा निर्णय घ्या ज्यात 15  लाख रुपयांपर्यंत ची रक्कम दिली जाते.
जर आपल्याला कर्करोगाचे निदान झाले आणि आपण इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम केलात, तर  आपल्या एकूण उपचारांचा खर्च 9.5 लाख रुपये असला तरी तो त्वरित 15 लाख रुपयांचा एकरकमी खर्च देईल.
                                        
                                        
                                     
                                
                                    
                                        5. वैयक्तिक अपघात कव्हर
                                        
    
                                        
                                            
हे ॲड-ऑन इन्शुरन्सधारक व्यक्तीला झालेल्या अपघाती नुकसानीमुळे आर्थिक संरक्षण प्रदान करते. त्यात अर्धवट अपंगत्व, कायमस्वरूपी अपंगत्व, मृत्यू इत्यादींचा समावेश होतो.
अपघातामुळे मृत्यू झाल्यास, इन्शुरन्सधारक व्यक्तीच्या कुटुंबाला या ॲड-ऑनअंतर्गत एकरकमी रक्कम मिळते.
                                        
                                        
                                     
                                
                                    
                                        6. झोन अपग्रेड
                                        
    
                                        
                                            
झोन अपग्रेडसह, आपण वेगवेगळ्या सिटी झोनमधील उपचारांसाठी उच्च आर्थिक कव्हरेज घेऊ शकता. शहराच्या वैद्यकीय खर्चानुसार झोनचे वर्गीकरण केले जाते. एखाद्या विशिष्ट प्रदेशात वैद्यकीय खर्च जितका जास्त असेल, तितका जास्त तो अशा वर्गीकरणात ठेवला जातो.
हे ॲड-ऑन आपल्याला थोड्या जास्त प्रीमियमसह विविध प्रदेश किंवा झोनमधील उपचार खर्चातील विषमतेमुळे वाडणारा खर्च उचलण्यास मदत करते. परंतु त्यानंतर आपल्याला आपल्या एकूण प्रीमियमवर 10%-20% बचत करण्याची परवानगी देते.
भारतातील वेगवेगळे क्षेत्र:
·        झोन ए - दिल्ली/एन.सी.आर, मुंबईसह (नवी मुंबई, ठाणे आणि कल्याणसह)
·        झोन बी - हैदराबाद, सिकंदराबाद, बंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद, वडोदरा, चेन्नई, पुणे आणि सुरत.
·        झोन सी – झोन ए आणि बी यांच्यात उल्लेख केल्या व्यतिरिक्त सर्व शहरे झोन सी म्हणून गणले जाते
सध्या डिजिट येथे आमच्याकडे झोन ए (ग्रेटर हैदराबाद, दिल्ली एन.सी.आर, ग्रेटर मुंबई) आणि झोन बी (इतर सर्व ठिकाणे) असे दोन झोन आहेत. आपण झोन बी मध्ये आधारित असल्यास आपल्याला प्रीमियमवर अतिरिक्त सवलत मिळते. इतकेच नव्हे तर, आमच्याकडे झोन-आधारित को-पेमेंट नाही.