डेंटल कव्हरसहित हेल्थ इन्शुरन्स

Happy Couple Standing Beside Car
{{healthCtrl.residentPincodeError}}
Send OTP OTP Sent {{healthCtrl.mobileNumberError}}
Chat with an expert

I agree to the  Terms & Conditions

Port my existing Policy
{{healthCtrl.residentPincodeError}}
Send OTP OTP Sent {{healthCtrl.mobileNumberError}}
{{healthCtrl.otpError}}
Didn't receive SMS? Resend OTP
Chat with an expert

I agree to the  Terms & Conditions

Port my existing Policy

YOU CAN SELECT MORE THAN ONE MEMBER

{{healthCtrl.patentSelectErrorStatus}}

 • -{{familyMember.multipleCount}}+ Max {{healthCtrl.maxChildCount}} kids
  (s)

DONE
Renew your Digit policy instantly right

डेंटल हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय?

अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, डेंटल हेल्थ इन्शुरन्स हा एक असा हेल्थ इन्शुरन्स आहे जो तुम्हाला दातांवरील आवश्यक उपचारांवरील खर्चासाठीदेखील कव्हर देतो. साधारणपणे बहुतेक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज दातांचे उपचार आणि काळजी यासाठी इन्शुरन्स देत नाहीत. पण डिजिट मात्र ओपीडी लाभांतर्गत त्यासाठी कव्हर देते. हे आमच्या डिजिट हेल्थ केअर प्लस प्लॅनमध्ये समाविष्ट आहे.

Read More

तुम्हाला डेंटल इन्शुरन्सची गरज का आहे?

1
नवनवीन शोध , महागाई, महागडे सेटअप आणि साहित्य, लॅब वर्क यामुळे दातांचे उपचार हे सहसा बरेच महाग असतात. (1)
2
भारतातील ओपीडीचा खर्च एकूण आरोग्य सेवांवरील  खर्चाच्या ६२% इतका आहे! (2)
3
वर्ल्ड डेंटल फेडरेशनचेच्या मते, जगभरात तोंडाच्या आरोग्यासंबंधीच्या आजारांनी ३.९ दशलक्षाहून अधिक लोक त्रस्त आहेत.  (3)

दातांच्या उपचारासाठी कव्हर देणाऱ्या डिजिट हेल्थ इन्शुरन्समध्ये विशेष काय आहे ?

 • सोपी ऑनलाइन प्रक्रिया : डेंटल ट्रीटमेंटसह हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यापासून ते क्लेम करण्यापर्यंत सर्व काही अगदी सोपे, डिजिटल, जलद आणि बिनत्रासाचे आहे! तुम्ही क्लेम कराल तेव्हाही हार्ड कॉपीजची आवश्यकता लागत नाही!
 • महामारी को भी कवर करता है: अगर साल 2020 ने हमें कुछ भी सिखाया है, तो वह यह कि सब कुछ अनिश्चित है। चाहे वह कोविड-19 हो या कोई और वायरस, हर तरह की महामारी इसमें कवर होती है!
 • वय - आधारित कोपेमेंट नाही :  डेंटल ट्रीटमेंटचा समावेश असलेल्या ओपीडी  कव्हरसहितच्या आमच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी  वय-आधारित कोपेमेंट नाही; म्हणजे क्लेमच्या वेळी, तुम्हाला तुमच्या  खिशातून काहीही द्यावे लागत ​​नाही!
 • संचयी बोनस : तुम्ही वर्षभरात एकही क्लेम केला नाही तरी काही फरक पडत नाही - तुम्हाला त्याचाही फायदा मिळू शकतो! प्रत्येक दावा-मुक्त वर्षासाठी तुम्ही वार्षिक संचयी बोनस मिळवू शकता!
 • मोफत वार्षिक हेल्थ चेक अप्स :  अनेक आरोग्यविषयक समस्या नियमित तपासणीने टाळल्या जाऊ शकतात, हे तुम्हाला माहिती आहे का ?  दातही त्याला अपवाद नाहीत. या हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्हाला रिन्यूअलच्या वेळी मोफत वार्षिक आरोग्य तपासणीचा लाभ मिळतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या एकूण आरोग्याविषयी नेहमी सजग राहता!
 • तुमच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या : कॅशलेस क्लेमसाठी भारतातील आमच्या नेटवर्कमधील 10500+ हॉस्पिटलमधून तुम्हाला हवे ते निवडा किंवा (रिएम्बर्समेंट) परतावा घ्या.

डिजिटच्या ओ.पी.डी कव्हर हेल्थ इन्शुरन्समध्ये डेंटल ट्रीटमेंटशिवाय कशाचा समावेश आहे ?

स्मार्ट + ओ.पी.डी

प्रत्येक क्लेम फ्री वर्षासाठी 10% क्युम्युलेटीव्ह बोनस (50%पर्यंत)

यात कोणत्या गोष्टी कव्हर होत नाहीत ?

क्लेम कसा दाखल करायचा?

 • रिएम्बर्समेंट क्लेम्स  -आम्हाला रुग्णालयात दाखल झाल्याच्या दोन दिवसांच्या आत 1800-258-4242 वर कळवा किंवा आम्हाला healthclaims@godigit.com वर ईमेल करा आणि आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवू जिथे तुम्ही तुमची रुग्णालयाची बिले आणि सर्व रिएम्बर्समेंट प्रक्रिया करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करू शकता.
 • कॅशलेस क्लेम्स - नेटवर्क हॉस्पिटल निवडा. तुम्हाला नेटवर्क रुग्णालयांची संपूर्ण यादी येथे मिळेल. हॉस्पिटलच्या हेल्पडेस्कवर ई-हेल्थ कार्ड दाखवा आणि कॅशलेस रिक्वेस्ट फॉर्म मागवा. सर्व काही व्यवस्थित असल्यास, तुमच्या क्लेमवर तेथे आणि तेथे प्रक्रिया केली जाईल.

   

 • जर तुम्ही कोरोनाव्हायरससाठी क्लेम केला असेल, तर आयसीएमआरच्या अधिकृत केंद्राकडून – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांच्याकडून तुमचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची खात्री करा

दातांच्या उपचारांसाठी कव्हर देणाऱ्या हेल्थ इन्शुरन्सचे महत्त्व

दातांवरील तुमच्या खर्चाची चिंता दूर करते

मुख्यतः या क्षेत्रात सतत होत असणाऱ्या नवनवीन शोधांमुळे, महागडा सेटअप आणि लॅबॉरेटरी वर्कचे प्रमाण यामुळे दातांचे उपचार महाग असू शकतात. डेंटल कव्हरेजसह हेल्थ इन्शुरन्स घेतल्याने तुमचा दातांवरील उपचाराचा खर्च कमी होईल याची निश्चिती होते आणि तुम्ही तुमच्या तोंडाच्या आरोग्याची काळजी घेऊनदेखील अधिक बचत करता!

तुम्हाला तुमच्या दातांचे आरोग्य सांभाळण्यासाठी मदत मिळते आणि ते खूप महत्त्वाचे आहे !

लोक अनेकदा दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे नंतर तोंडाच्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. खरं तर, आरोग्य तज्ञ वर्षातून किमान एकदा दंतचिकित्सकाला भेट देण्याची शिफारस करतात. मात्र असे आढळून आले आहे की भारतात ६७% लोक डेंटिस्टकडे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही अशा टप्प्याला परिस्थिती पोहोचल्याशिवाय हे करत नाहीत. डेंटल हेल्थ इन्शुरन्समुळे याची निश्चिती होते की तुम्ही तुमच्या दातांच्या समस्यांकडे शेवटच्या क्षणापर्यंत दुर्लक्ष करणार नाही आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीची चिंता न करता योग्य वेळी आवश्यक उपचार मिळवाल!

जास्त कव्हरेजचे फायदे

बहुतेक स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज दातांचे उपचार कव्हर करत नाहीत. पण दातांचे उपचार समाविष्ट असलेल्या या ओपीडी कव्हरसह असलेल्या या हेल्थ इन्शुरन्सचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्हाला कव्हरेजचे जास्त फायदे मिळतात. तुम्हाला स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्सचे सर्व फायदे तर मिळतातच शिवाय ओपीडी आणि दातांच्या उपचाराचा खर्चही कव्हर होतो!

डेंटल हेल्थ इन्शुरन्सशिवाय अन्य लाभ

वर नमूद केल्याप्रमाणे इथे दातांच्या उपचारांचा इन्शुरन्स तुम्हाला फक्त आवश्यक डेंटल ट्रीटमेंटसाठी कव्हरेजचा लाभ देत नाही तर, डेकेअर प्रक्रियेसाठी कव्हरेज, कोव्हिड-१९ सह इतर सर्व आजारांसाठी हॉस्पिटलायझेशन, मोफत हेल्थ चेक अप्स आणि रूम रेंटवर कमाल भाड्याची मर्यादा नसणे असे इतर फायदेदेखील मिळतात.

सर्व हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीजप्रमाणे टॅक्समधून सवलती मिळवा!

कोणत्याही हेल्थ इन्शुरन्सची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या आरोग्याशी संबंधित आर्थिक लाभ मिळण्याव्यतिरिक्त तुम्हाला इतर आर्थिक लाभदेखील मिळतात. तुम्ही भरलेल्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमवर आधारित वार्षिक रु. २५,००० पर्यंत कर वाचवू शकता!

दातांचे आरोग्य सांभाळण्यासाठी आणि निगा ठेवण्यासाठी काय कराल?

 • तुम्ही हे लहानपणापासून ऐकत आला असाल, पण गंमत अशी आहे की तेच अजूनही अगदी खरे आहे! तरीही लोकांना आजही त्याची आठवण करून देण्याची गरज आहे! तोंडाच्या चांगल्या स्वच्छतेची गुरुकिल्ली म्हणजे दिवसातून दोनदा दात घासणे आणि दातांमध्ये प्लॅक होऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार फ्लॉस करणे.
 • आरोग्य तज्ञांच्या नेहमीच्या शिफारशींपैकी एक ही आहे की जरी तुम्हाला दातांच्या समस्या नाहीत असे वाटत असले तरीही तुम्ही तुमच्या दंतचिकित्सकाला वर्षातून दोनदा नाही तर किमान एकदा तरी भेट द्यावी. बर्‍याच वेळा आत काय चालले आहे हे तुम्हाला कळत नाही आणि मग खूप उशीर झालेला असतो! हे तर तुम्हाला माहितीच आहे की दातदुखीची वेदना ही सर्वात वाईट वेदनांपैकी एक आहे. नियमित दात तपासून घेतल्याने तुमचे मौखिक आरोग्य नियंत्रणात राहते!
 • भरपूर पाणी प्या. हा जुना मंत्र फक्त एकूण शारीरिक आरोग्यासाठी नाही तर दातांच्या आरोग्यासाठीही लागू पडतो!
 • तुम्हाला मधुमेह(डायबिटीस) असेल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या एकूण शारीरिक आणि मौखिक आरोग्यासाठीही हे आवश्यक आहे. त्यामुळे हिरड्यांचे रोग होण्यास प्रतिबंध होईल आणि जर तुम्हाला हिरड्यांचे रोग होण्याची सवय असेल तर त्यावर ताबडतोब उपचार करा!
 • तंबाखूजन्य पदार्थ आणि धूम्रपान टाळा. ते फक्त तुमच्या फुफ्फुसांसाठी वाईट आहेत असे नाही तर मौखिक आरोग्यासाठीही घातक आहेत!

   

दातांचे उपचार कव्हर करणाऱ्या हेल्थ इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न