हेल्थ इन्शुरन्सची ऑनलाइन तुलना करा

डिजिटकडून हेल्थ इन्शुरन्सच्या किमतीची माहिती मिळवा आणि इतरांशी तुलना करा.
Happy Couple Standing Beside Car
Chat with an expert

I agree to the  Terms & Conditions

Port my existing Policy
Renew your Digit policy

(Incl 18% GST)

भारतातील हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सची तुलना

आपण हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सची तुलना का करावी?

आपण आपल्यासाठी एक पॉलिसी निवडण्यापूर्वी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सची तुलना करणे हा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपण प्लॅन्सची अशी तुलना केली पाहिजे:

एक चांगला आणि परवडणारा प्रीमियम मिळविण्यासाठी

जेव्हा आपण हेल्थ इन्शुरन्स प्लॅन खरेदी करता तेव्हा त्याच्या खर्चाबद्दल एक चिंता असते. इन्शुरन्स कंपनी वेगवेगळ्या प्रीमियम श्रेणींसह विविध प्लॅन प्रदान करतात. आपल्यासाठी परवडणारा प्लॅन कोणता आहे हे शोधण्यासाठी आपण प्लॅन आणि प्रीमियमची तुलना केली पाहिजे.

आवश्यकतेनुसार इन्शुरन्स प्लॅन मिळविण्यासाठी

बाजारात एकापेक्षा जास्त इन्शुरन्स कंपन्या आहेत. ते भिन्न वैशिष्ट्यांवर आधारित भिन्न प्रोडक्ट्स ऑफर करू शकतात. हेल्थ प्लॅन्सची आधीच तुलना केल्याने आपल्या गरजेनुसार प्रस्ताव क्रमवारीला लावण्यास मदत होईल.

अतिरिक्त लाभ मिळवा

हेल्थ इन्शुरन्स प्लॅनची तुलना केल्यास आपल्याला अतिरिक्त फायद्यांबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, रुग्णवाहिका सेवा शुल्क भिन्न असू शकते. काही इन्शुरन्स कंपन्या आयुष, अल्टरनेटिव्ह थेरापेटिक ट्रीटमेंट्स इत्यादींचा लाभ देऊ शकतात.

माहितीपूर्ण निर्णय घ्या

हेल्थ पॉलिसिस आणि निकषांची तुलना करताना त्यांची बरीच माहिती मिळेल. वेटिंग पिरियड्स, क्लेम प्रोसेस, कव्हर न होणारे आजार इत्यादी महत्त्वाच्या बाबी जाणून घेतल्यास हुशारीने निर्णय घेण्यास मदत होईल.

हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सची तुलना करताना तपासण्यासारख्या गोष्टी

आरोग्य विम्याची तुलना कशी करावी - ऑनलाइन किंवा ऑफलाइन

ऑनलाइन तुलना करा

ऑफलाइन तुलना करा

स्टेप 1: वेब ॲग्रीगेटर्स किंवा ज्या तुलना प्रदान करू शकतात अशा कंपन्या शोधा. किंवा आपण विविध इन्शुरन्स कंपन्यांचे ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरू शकता आणि स्वत: चा तुलनात्मक चार्ट तयार करू शकता.

स्टेप 1: आपल्याला हेल्थ इन्शुरन्स देऊ शकेल असा एजंट शोधा. त्या व्यक्तीला भेटा आणि आपल्या आवश्यकतांबद्दल त्याला तपशीलवार समजावून सांगा.

स्टेप 2: पोर्टल आपले शहर (झोन), जन्मतारीख, आपण कव्हर करू इच्छित असलेल्या लोकांची संख्या, संपर्क तपशील आणि इन्शुरन्स रक्कम यासारख्या आवश्यक माहिती विचारेल. पोर्टल माहितीवर प्रक्रिया करेल आणि त्यानंतर आपल्याला किमतीविषयीची माहिती दिली जाईल. त्यानंतर आपण इन्शुरन्स कंपनी निवडू शकता आणि त्यानुसार योजना आखू शकता.

स्टेप 2: आपले वय, पूर्व-विद्यमान, गंभीर आजार, वैद्यकीय इतिहास, कौटुंबिक इतिहास, विम्याची रक्कम आणि इतर सर्व माहिती एजंटला द्या. आपण दिलेली माहिती योग्य आहे याची खात्री करा.

स्टेप 3: नंतर इन्शुरन्स कंपनी पूर्व-विद्यमान आजार, सामान्य लक्षणे, औषधे किंवा सप्लीमेंट्स मागणी करेल. जर काही अस्तित्वात असेल तर प्रीमियमवर परिणाम होईल.

स्टेप 3: एजंट वेगवेगळ्या विमा कंपन्यांकडून किमतीविषयीची माहिती मागेल आणि ते आपल्याला सबमिट करेल. नीट वाचा आणि त्यानुसार इन्शुरन्स कंपनीची निवड करा.

स्टेप 4: पुढे आपल्याला आपले वैयक्तिक तपशील जसे की नाव, वय, लिंग आणि वजन प्रदान करावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही वैयक्तिक तपशील देखील विचारेल.

-

हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सची तुलना ऑनलाइन किंवा ऑफलाइन - कोणते चांगले आहे?

ऑनलाईन

ऑफलाईन/एजंट

वेळेची बचत

हेल्थ इन्शुरन्सची ऑनलाइन तुलना केल्यास बराच वेळ वाचतो.

तुलना करण्यासाठी आपल्या एजंटला विचारण्यास बराच वेळ लागेल.

किफायतशीर

ऑनलाइन तुलना स्वस्त आहे कारण त्यात कोणतेही मध्यस्थ गुंतलेले नाहीत. तसेच, प्रशासकीय खर्चही कमी होतो.

एजंटकडून, तुलना कदाचित कमिशनसह येऊ शकते. इन्शुरन्स कंपनीच्या किमतीच्या रकमेमध्ये प्रशासकीय खर्चाचाही समावेश असेल.

निःपक्षपाती निर्णय

ऑनलाइन तुलना केल्याने पक्षपाती किंवा प्रभावित निर्णयाची शक्यता शून्य असते कारण तेथे मध्यस्थ नसतो.

ऑफलाइन तुलना करताना, पूर्वग्रह मनात ठेऊन निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते. एजंट हेल्थ प्लॅनची शिफारस करण्याचा प्रयत्न करू शकतो जिथे उच्च कमिशनचा समावेश आहे.

कव्हरबाबत जागरूकता

ऑनलाइन तुलना करताना वेबसाइटवरील योजनेविषयीची सर्व माहिती आपल्याला पाहता येईल आणि शंका आल्यास कस्टमर केअरशीही बोलता येईल.

आरोग्य योजनेची तुलना ऑफलाइन किंवा एजंटद्वारे करताना, एजंट काही संबंधित माहिती शेयर करण्यास चुकण्याची शक्यता असते.

सोय

ऑनलाइन आरोग्य योजनांच्या किमतीची तुलना करणे खूप सोयीस्कर आहे.

एजंटला किमतीची तुलना करण्यास सांगणे त्रासदायक असू शकते.

ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्सची तुलना का करावी?

अन्नापासून कॅब आणि किराणा सामानापासून पॉलिसिसपर्यंत सर्व काही ऑनलाइन उपलब्ध आहे. ऑनलाइन शॉपिंगमुळे तुलना करणे सोयीचे झाले आहे. आपल्या सोयीनुसार, एका प्लॅटफॉर्मवर एक्सप्लोर करण्यासाठी बरेच पर्याय आहेत. आणि जेव्हा हेल्थ इन्शुरन्सचा विचार केला जातो तेव्हा आपण त्याची ऑनलाइन तुलना केली पाहिजे:

शून्य गुंतवणूक

हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सची ऑनलाइन तुलना करण्यासाठी आपल्याकडून शून्य गुंतवणूक आवश्यक आहे. आपल्याला फक्त इन्शुरन्स कंपनी किंवा ॲग्रीगेटर वेबसाइट ब्राउझ कराव्या लागतील ज्या आपल्याला भरपूर माहिती देतात. असे वेब ॲग्रीगेटर्स संकलित माहिती प्रदान करतात. यामुळे तुलना आणि विश्लेषण सोपे होते.

विमा/एजंट ऑफिसमध्ये थांबण्याची गरज नाही

इन्शुरन्स पॉलिसी हवी, उत्तम! परंतु आपण दोन प्रॉडक्ट्सची तुलना कशी कराल? एकतर इन्शुरन्स कंपनी/एजंट ऑफिसला भेट देऊन किंवा ऑनलाइन. जेव्हा आपण आधीच कार्यालय आणि घर दरम्यान खूप वेळ घालवत असता तेव्हा ऑनलाइन तुलना करण्याची सुविधा आपल्याला लांब रांगांमध्ये प्रतीक्षा करण्याची वेळ वाचवते.

लपवलेली माहिती नाही

हेल्थ इन्शुरन्सची ऑनलाइन तुलना करणे ही सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पारदर्शकता. कोणतीही छुपी माहिती नाही. एजंट्स किंवा विमा कंपन्या मौल्यवान माहिती देण्यास  करण्यास चुकवू शकतात. ऑनलाइन तुलना करताना असे होऊ शकत नाही.

वेळेची बचत करतो

वेब ॲग्रीगेटर्सद्वारे हेल्थ इन्शुरन्सची ऑनलाइन तुलना केल्यास आपला वेळ वाचेल. आपल्याला भेटण्यासाठी कोणत्याही कंपनीच्या प्रतिनिधी किंवा एजंटची वाट पाहण्याची गरज नाही. फक्त आपले इनपुट्स फीड करा आणि नंतर तुलना करा. ॲग्रीगेटर्स व्यतिरिक्त, आपण विमा कंपन्यांनी दिलेला ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरू शकता आणि स्वत: एक तुलनात्मक तक्ता तयार करू शकता.

आपण हेल्थ इन्शुरन्सची तुलना न केल्यास काय होते?