गुड्स कॅरींग व्हेईकलसाठी इन्शुरन्स

गुड्स कॅरींग व्हेईकलसाठी कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स

Third-party premium has changed from 1st June. Renew now

नावाप्रमाणेच, गुड्स कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स हा एक प्रकारचा कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स आहे, जो माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याच्या उद्देशाने वापरल्या जाणाऱ्या कमर्शिअल (व्यावसायिक) वाहनांच्या संरक्षणासाठी डिझाइन केला जातो. या वाहनांना तुलनेने अधिक जोखीम असते हे लक्षात घेऊन, गुड्स कॅरींग व्हेईकल इन्शुरन्स अपघात, टक्कर, चोरी, नैसर्गिक आपत्ती आणि आग यांसारख्या अनिश्चित परिस्थितीत नुकसान आणि हानी भरून काढू शकतात.

गुड्स कॅरींग व्हेईकल्सचे प्रकार

गुड्स कॅरींग व्हेईकल्स (माल वाहून नेणारी वाहने) विविध प्रकारची आहेत. भारतातील वेगवेगळ्या व्यवसायांच्या स्वरूपानुसार याचा प्रकार ठरतो. माल वाहून नेणाऱ्या काही गुड्स कॅरींग व्हेईकलची सर्वसाधारणपणे आढळणारी उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत :

  • ट्रक - ट्रक वेगवेगळ्या आकारात आणि साईझमध्ये येतात. दररोज लागणाऱ्या वस्तू वितरित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या छोट्या ट्रक्सपासून फर्निचर आणि उपकरणांसारख्या वस्तूंची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या ट्रक्सपर्यंत सर्व प्रकारचे माल वाहून नेणारे ट्रक्स कमर्शिअल इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जाऊ शकतात.
  • टेम्पो - टेम्पो ट्रकपेक्षा तुलनेने लहान असतात आणि अनेकदा शहरामध्ये मालाची वाहतूक आणि वितरण यासाठी ते वापरले जातात. गुड्स कॅरींग व्हेईकल इन्शुरन्समध्ये टेम्पोसुद्धा कव्हर केले जाऊ शकतात.
  • थ्री-व्हील व्हेईकल्स - कार्गो ऑटो किंवा तीन चाकी वाहने ही लहान वस्तू घेऊन जाणारी वाहने आहेत ज्याचा वापर अनेकदा शहरामध्ये माल वितरणासाठी केला जातो. त्यांचा आकार कमी असल्याने ट्रक आणि ट्रेलरच्या तुलनेत त्यांना कमी धोका असतो. तथापि, ते अजूनही जास्तीत जास्त संरक्षण आणि कमीत कमी व्यावसायिक तोट्यासाठी गुड्स कॅरींग व्हेईकल इन्शुरन्समध्ये कव्हर केले जाऊ शकतात.
  • ट्रेलर्स – ट्रेलर्स हे मोठे गुड्स कॅरींग व्हेईकल्स आहेत; अनेकदा अवजड वस्तूंच्या वाहतुकीसाठी देशभरात ट्रेलर्सचा वापर होतो. त्यांच्याशी संबंधित जोखीम पाहता, त्यांना गुड्स कॅरींग व्हेईकल इन्शुरन्समध्ये कव्हर करणे जवळजवळ अनिवार्य आहे. 
  • टिप्पर्स - टिप्पर्स हे जड वाहन आणि गुड्स कॅरींग व्हेईकलचा एक प्रकार आहे; बऱ्याचदा बांधकाम मालाची वाहतूक करण्यासाठी याचा वापर होतो. संभाव्य धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी डिजिटच्या कमर्शिअल इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत टिप्पर्स कव्हर केले जाऊ शकतात.

डिजिटच्या गुड्स कॅरींग व्हेईकल इन्शुरन्सची निवड का करावी ?

गुड्स कॅरींग व्हेईकल इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले आहे?

काय कव्हर्ड नाही ?

गुड्स कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही(कव्हर केलेले नाही) हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे जेणेकरून तुम्ही क्लेम करताना तुम्हाला अचानक धक्का बसणार नाही. अशा काही परिस्थितींविषयाची माहिती पुढे दिली आहे:

थर्ड पार्टी पॉलिसी धारकाचे स्वतःचे नुकसान

जर तुम्ही फक्त तुमच्या व्यावसायिक वाहनासाठी थर्ड पार्टी कमर्शिअल इन्शुरन्स घेणार असाल, तर स्वत:चे नुकसान आणि हानी भरून निघणार नाही.

मद्यधुंद स्थितीत वाहन चालवणे किंवा वैध लायसन्सशिवाय वाहन चालवणे

जर क्लेम दरम्यान, ड्रायव्हर(चालक)-मालक वैध ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय किंवा दारुच्या प्रभावाखाली इन्शुरन्स काढण्यात आलेले वाहन चालवत असल्याचे आढळले तर क्लेम मंजूर केला जाऊ शकत नाही.

निष्काळजीपणा कारणीभूत

निष्काळजीपणा दाखवल्यामुळे गुड्स कॅरिंग व्हेईकलचे कोणतेही नुकसान किंवा हानी  कव्हर केले जाणार नाही. उदाहरणार्थ, शहरात पूर आला असताना व्हेईकल जर बाहेर रस्त्यावर आणले तर.

परिणामी नुकसान

अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा आग यांचा थेट परिणाम नसलेले कोणतेही नुकसान किंवा हानी कव्हर केले जाऊ शकत नाही.

डिजिटच्या गुड्स कॅरींग व्हेईकल इन्शुरन्सची मुख्य वैशिष्ट्ये

मुख्य वैशिष्ट्ये डिजिट बेनीफिट
क्लेम प्रक्रिया पेपरलेस क्लेम्स
कस्टमर सपोर्ट 24x7 सपोर्ट
अतिरिक्त कव्हरेज पीए कव्हर्स, लिगल लायॅबिलिटी कव्हर, स्पेशल एक्स्क्लूजन्स आणि अनिवार्य डीडक्टिबल्स इ.
थर्ड पार्टीचे नुकसान वैयक्तिक नुकसानीसाठी अमर्याद लायॅबलिटी, मालमत्ता/ वाहन नुकसानीसाठी ७.५ लाखांपर्यंत

गुड्स कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार

तुमच्या हेवी-ड्युटी वाहनाच्या प्रकाराच्या आधारे आणि तुम्ही इन्शुरन्स उतरवू इच्छित असलेल्या वाहनांच्या संख्येच्या आधारे, आम्ही तुम्ही निवडू शकता अशा दोन प्राथमिक पॉलिसी ऑफर करतो.

लायॅबिलिटी ओन्ली स्टँडर्ड पॅकेज

कोणत्याही थर्ड पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेचे तुमच्या गुड्स कॅरिंग व्हेईकलमुळे होणारे नुकसान.

×

तुमच्या इन्शुअर्ड गुड्स कॅरिंग व्हेईकलला टो करताना कोणत्याही थर्ड पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेचे होणारे नुकसान.

×

नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघातांमुळे तुमच्या स्वत:च्या गुड्स कॅरिंग व्हेईकलचे नुकसान किंवा हानी.

×

गुड्स कॅरिंग व्हेईकलच्या मालक-चालक यांना दुखापत/मृत्यू

If the owner-driver doesn’t already have a Personal Accident Cover from before

×
Get Quote Get Quote

क्लेम कसा दाखल करावा

आम्हाला 1800-258-5956 वर फोन करा किंवा hello@godigit.com वर ईमेल करा.

 आमची प्रक्रिया सोपी करण्यासाठी तुमचा पॉलिसी नंबर, अपघाताचे ठिकाण, अपघाताची तारीख आणि वेळ, पॉलिसीधारकाचा/ फोन करणाऱ्याचा संपर्क क्रमांक ही माहिती जवळ ठेवा.

डिजिट इन्शुरन्सचे क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात ? इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात सगळ्यात आधी हा प्रश्न आला पाहिजे. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे ! डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

मी गुड्स कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स का विकत घ्यावा?

  •  गुड्स कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स काढल्यामुळे अपघात, नैसर्गिक आपत्ती, टक्कर, आग आणि चोरी यांसारख्या अनपेक्षित परिस्थितीमुळे उद्भवू शकणारा आपला व्यवसायाचा धोका आणि संभाव्य नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते.
  • मोटार वाहन कायद्यानुसार, गुड्स कॅरिंग व्हेईकलसह सर्व वाहनांना किमान थर्ड-पार्टी कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स असणे अनिवार्य आहे. हे कोणतेही संभाव्य थर्ड-पार्टीचे नुकसान आणि हानी कव्हर करण्यास मदत करते.
  • अवजड वाहने, जसे की जड माल नेणारी गुड्स कॅरिंग व्हेईकल्स यांना बरेच धोके असतात; वाहनाचा आकार आणि त्याचा व्यावसायिक हेतू या दोन्हीमुळे. व्हेईकल इन्शुरन्स गुड्स कॅरिंग व्हेईकलला आग, अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि चोरी सारख्या संभाव्य धोक्यांपासून संरक्षण देण्यास मदत करतो.

भारतात ऑनलाइन गुड्स कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

गुड्स कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स ड्रायव्हरला कव्हर करतो का?

होय, गुड्स कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स हा कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स मालक-चालकालादेखील कव्हर करतो.

हेवी-ड्युटी वाहनाचा इन्शुरन्स काढणे अनिवार्य आहे का ?

होय, मोटार वाहन कायद्यानुसार, भारतीय रस्त्यांवर कायदेशीररित्या गुड्स कॅरिंग व्हेईकल्सना किमान थर्ड-पार्टी इन्शुरन्स पॉलिसी असणे अनिवार्य आहे.

गुड्स कॅरिंग व्हेईकल्स इन्शुरन्समध्ये मालाचे नुकसानदेखील कव्हर केले जाईल का?

नाही, तसं होणार नाही. गुड्स कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स वाहून नेणाऱ्या वस्तू केवळ नुकसान/हानीपासून वाहनाचे आणि चालक - मालकाचे कोणत्याही शारीरिक जखमांपासून संरक्षण करतात.

गुड्स कॅरिंग व्हेईकलसाठी कमर्शिअल इन्शुरन्सची किंमत किती आहे ?

तुम्ही इन्शुरन्स घेत असलेल्या गुड्स कॅरिंग व्हेईकलच्या प्रकारावर हे अवलंबून आहे. तसेच वाहन जिथे चालवले जात आहे त्या मूळ शहरावर ते अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या गुड्स व्हेईकल्स इन्शुरन्सचा संभाव्य प्रीमियम येथे तपासू शकता.