कमर्शिअल वेहिकल थर्ड पार्टी इन्शुरन्स
Third-party premium has changed from 1st June. Renew now
Our WhatsApp number cannot be used for calls. This is a chat only number.
Third-party premium has changed from 1st June. Renew now
आमचा पारदर्शकतेवर विश्वास आहे. म्हणून तुम्हाला काय कव्हर्ड आहे यासोबतच तुमच्या थर्ड पार्टी कमर्शिअल वेहिकल इन्शुरन्समध्ये काय कव्हर्ड नाही हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे भविष्यात क्लेम करताना कुठलाही आश्चर्याचा धक्का बसणार नाही. कव्हर नसलेल्या काही परिस्थिती पुढीलप्रमाणे आहेत:
मुख्य वैशिष्ट्ये |
डिजिटचे फायदे |
थर्ड पार्टीचे वैयक्तिक नुकसान |
अमर्यादित लायबिलिटी |
थर्ड पार्टीचे मालमत्तेचे नुकसान |
7.5 लाख पर्यंत |
वैयक्तिक अपघात कव्हर |
₹330 |
फायर कव्हर |
थर्ड पार्टी पॉलिसीसह एंडोर्समेंट म्हणून उपलब्ध (फक्त 20 टनांपेक्षा जास्त टन क्षमता असलेल्या वाहनांसाठी) |
अतिरिक्त कव्हरेज |
पी.ए.कव्हर्स, कायदेशीर लायबिलिटी कव्हर आणि विशेष एक्सक्लूजन्स इ. |
इंजिन क्षमता |
प्रीमियम दर (1 जून 2022 पासून लागू) |
7500 किलोपेक्षा जास्त नाही |
₹16,049 |
7500 किलोपेक्षा जास्त पण 12,000 किलोपेक्षा जास्त नाही |
₹27,186 |
12,000 किलोपेक्षा जास्त पण 20,000 किलोपेक्षा जास्त नाही |
₹35,313 |
20,000 किलोपेक्षा जास्त पण 40,000 किलोपेक्षा जास्त नाही |
₹43,950 |
40,000 किलोपेक्षा जास्त |
₹44,242 |
इंजिन क्षमता |
प्रीमियम दर (1 जून 2022 पासून लागू) |
6HP पर्यंत |
₹910 |
सेगमेंट |
प्रीमियम दर (1 जून 2022 पासून लागू) |
ऑटोरिक्षा |
₹2,539 |
इ-रिक्षा |
₹1,648 |
सेगमेंट |
प्रीमियम दर (1 जून 2022 पासून लागू) |
शैक्षणिक संस्था बस |
₹12,192 |
शैक्षणिक संस्था बस व्यतिरिक्त इतर |
₹14,343 |
● जर तुमच्या कमर्शिअल वेहिकलचा अपघात झाला असेल तर संबंधित थर्ड पार्टीने एफ.आय.आर दाखल करून आरोपपत्र मिळवणे आवश्यक आहे.
● जर काही नुकसान भरपाईची गरज असेल तर आम्ही तुमच्या वतीने त्याची काळजी घेऊ. फक्त आम्हाला 1800-103-4448 या क्रमांकावर फोन करा.
● जोपर्यंत अटींचे उल्लंघन होत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या वतीने बिगर-आर्थिक तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. आणि, जर परिस्थिती उद्भवली तर आम्ही न्यायालयात आपली बाजू मांडू.
● जर कमर्शिअल वेहिकलचा चालक एक चांगला नागरिक असेल आणि त्याने कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणासाठी चूक कबूल केली असेल तर, आम्ही डिजिट थर्ड पार्टी कव्हर सुरु ठेऊ.
● जर वैयक्तिक अपघाताशी संबंधित क्लेम केला असेल तर तुम्हाला फक्त 1800-258-5956 वर आम्हाला कॉल करावा लागेल आणि आम्ही इतर सर्व गोष्टींची काळजी घेऊ!
●अपघात झाल्यास संबंधित थर्ड पार्टीला नुकसानीच्या वेळी एफ.आय.आर दाखल करावा लागतो - आणि यानंतर इन्शुरन्स कंपनीलाही सूचित करणे आवश्यक आहे. जर हे वगळले गेले असेल तर, आवश्यक नुकसान भरपाई दिली जाऊ शकत नाही.
●एखाद्या अपघातात विरोधी पक्षाची चूक आहे हे सिद्ध करण्यासाठी थर्ड पार्टीकडे वैध पुरावे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
●किरकोळ नुकसान आणि तोट्याच्या बाबतीत, असा सल्ला दिला जातो की तुम्ही प्रयत्न करा आणि त्यांना कोर्टाबाहेर सेटल करा. याचे कारण असे की एफ.आय.आर दाखल करण्याची आणि मोटार वाहन न्यायाधिकरणाशी व्यवहार करण्याची प्रक्रिया खूप वेळखाऊ असू शकते.
●आय.आर.डी.ए.आयच्या नियम व नियमावलीनुसार क्लेम रकमेवर निर्णय घेणे हे पूर्णपणे मोटार अपघात क्लेम न्यायाधिकरणावर अवलंबून आहे. थर्ड पार्टीला वैयक्तिक नुकसानीबाबत कोणतीही वरची मर्यादा नसली, तरी थर्ड पार्टी वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान आणि हानी झाल्यास 7.5 लाख रुपयांपर्यंत मर्यादित लायबिलिटी असते.
आपली इन्शुरन्स कंपनी स्विच करताना हा पहिला प्रश्न तुमच्या मनात आला पाहिजे. तुम्ही असा विचार करत असल्यास शाब्बास!
डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा
तुमच्या कमर्शिअल वेहिकलमुळे थर्ड पार्टी वेहिकलला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
तुमच्या कमर्शिअल वेहिकलमुळे थर्ड पार्टी मालमत्तेला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
तुमच्या टोविंग करून नेणाऱ्या कमर्शिअल वेहिकलमुळे थर्ड पार्टी व्यक्ती किंवा वाहनाला होणारे नुकसान |
✔
|
✔
|
आगीमुळे स्वतःच्या कमर्शिअल वेहिकलला होणारे नुकसान किंवा तोटा |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तिमुळे स्वतःच्या कमर्शिअल वेहिकलला होणारे नुकसान किंवा तोटा |
×
|
✔
|
अपघातामुळे स्वतःच्या कमर्शिअल वेहिकलला होणारे नुकसान किंवा तोटा |
×
|
✔
|
चोरीमुळे स्वतःच्या कमर्शिअल वेहिकलला होणारा तोटा |
×
|
✔
|
कस्टमाइज्ड अॅड-ऑन्समुळे होणारे अतिरिक्त संरक्षण |
×
|
✔
|
थर्ड पार्टी व्यक्तीचा जखम/मृत्यू |
✔
|
✔
|
चालक/मालक यांचा जखम/मृत्यू |
✔
|
✔
|
●वैयक्तिक नुकसानीच्या बाबतीत थर्ड-पार्टीला कव्हर करते: जर तुम्ही एखाद्या अपघातात अडकला असाल आणि एखाद्याला शारीरिकरित्या दुखापत केली (किंवा सर्वात वाईट परिस्थितीत मृत्यूस कारणीभूत ठरला), तर तुमचा थर्ड-पार्टी कमर्शिअल इन्शुरन्स नुकसानीची भरपाई करेल, अमर्यादित लायबिलिटीपर्यंत.
●थर्ड पार्टी प्रॉपर्टी आणि वेहिकल डॅमेजसाठी कव्हर: जर तुमच्या कमर्शिअल वेहिकलने गाडी चालवताना चुकून दुसऱ्याच्या मालमत्तेचे किंवा वाहनाचे नुकसान केले असेल, तर तुमचा थर्ड पार्टी कमर्शिअल वेहिकल इन्शुरन्स त्याच्या तोट्याची भरपाई करेल.
●कोणत्याही अनपेक्षित तोट्यापासून स्वत:चे संरक्षण करा: रस्त्यावर इतकी रहदारी झाली आहे व त्यामुळे चुका घडू शकतात! म्हणून, जर तुमच्या कमर्शिअल वेहिकलमुळे एखाद्यास किंवा त्याच्या वाहनाला / मालमत्तेला दुखापत/नुकसान झाले असेल तर पॉलिसी या नुकसानीचा खर्च भागवेल. अशाप्रकारे तुम्हाला कोणतेही अनपेक्षित नुकसान सहन करावे लागणार नाही.
●तुम्ही कायदेशीररित्या वाहन चालवत आहात याची खात्री करा: भारतीय मोटार वाहन कायद्याप्रमाणे, सर्व वाहनांचा किमान थर्ड-पार्टी कमर्शिअल वेहिकल इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या वाहनाचे संरक्षण करू इच्छित असल्यास, कॉम्प्रिहेन्सिव्ह कामर्शियल वेहिकल इन्शुरन्स पॉलिसी देखील निवडू शकता. यामध्ये थर्ड-पार्टी नुकसान आणि तुमच्या स्वत:च्या वाहनासाठी संरक्षण या दोन्ही कव्हरेजचा समावेश आहे.
●वाहतूक पेनल्टीज आणि दंडापासून संरक्षण: तुमचे वाहन थर्ड पार्टी वेहिकल इन्शुरन्स शिवाय रस्त्यावर आढळल्यास तुम्हाला रू. 2,000 दंड आणि/किंवा तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते!
●स्वतःचे नुकसान कव्हर करत नाही: कमर्शिअल थर्ड-पार्टी वेहिकल इन्शुरन्स दुर्दैवाने तुमच्या स्वत:च्या कमर्शिअल वेहिकलला होणारे नुकसान आणि तोट्यासाठी संरक्षण देत नाही (कारण ही थर्ड-पार्टीसाठी विशिष्ट पॉलिसी आहे). स्वत:चे वाहन ही कव्हर व्हावे असे तुम्हाला वाटत असल्यास कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी घ्यावी.
●नैसर्गिक आपत्तींचा कव्हर करत नाही: भूकंप किंवा पूर यासारख्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीतून तुमच्या वाहनाचे नुकसान झाल्यास, तुमचा कमर्शिअल वेहिकल थर्ड पार्टी इन्शुरन्स तुमच्या स्वतःच्या वाहनास संरक्षण देणार नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला या कव्हरेजची आवश्यकता आहे, तर त्याऐवजी तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह कमर्शिअल वेहिकल पॉलिसी निवडू शकता.
● कस्टमाइज्ड प्लान्स नाहीत: कमर्शिअल थर्ड-पार्टी इन्शुरन्स हा तुमच्या कमर्शिअल वेहिकलसाठी तुमच्याकडे हवा असलेला सर्वात मूलभूत प्लान आहे. त्याला अतिरिक्त फायद्यांसह चोरी किंवा आग सारख्या बाबींसाठी कस्टमाइज केले जाऊ शकत नाही. मात्र तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह कमर्शिअल वेहिकल इन्शुरन्समध्ये यासाठी अर्ज करू शकता.
● प्रवासी वाहून नेणारी वाहने : टॅक्सी, कॅब, ऑटो रिक्षा, स्कूल बस, खासगी बसेस इत्यादी एक किंवा अधिक प्रवाशांची वाहतूक नेणाऱ्या वाहनांसाठीचा विशेष इन्शुरन्स.
● अवजड वाहने : बुलडोझर, क्रेन, लॉरी, ट्रेलर्स इत्यादी हेव्ही ड्युटी वाहनांसाठी कोणत्याही प्रकारचे नुकसान आणि तोट्यासाठी कव्हर.
● माल वाहून नेणारी वाहने : जी वाहने सहसा मालाची ने-आण करतात, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जातात. यामध्ये प्रामुख्याने ट्रक, टेम्पो आणि लॉरी यांचा समावेश आहे.
● पॅसेंजर बस/स्कूल बस : स्कूल बस, सार्वजनिक बस, खासगी बस किंवा इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांना थर्ड पार्टीच्या नुकसानीपासून संरक्षण देते.
● ट्रॅक्टर/ कृषी वाहने : तुमचा ट्रॅक्टर किंवा इतर कृषी वाहने कोणत्याही थर्ड पार्टीला होणाऱ्या अपघाताच्या नुकसानापासून आणि तोट्यापासून सुरक्षित ठेवते.
● कमर्शिअल व्हॅन: व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॅन्ससाठी कव्हर, जसे की स्कूल व्हॅन, खाजगी व्हॅन किंवा मालाची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर व्हॅन.
● इतर आणि विशेष वाहने: कॅब, टॅक्सी, ट्रक आणि बस यांखेरीज इतरही अनेक वाहने अनेकदा व्यवसायासाठी वापरली जातात. यापैकी काहींमध्ये शेती, खाणकाम आणि बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष वाहनांचा समावेश असू शकतो.