बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटर

त्वरित बाईक इन्शुरन्सची किंमत मिळवा.
search

I agree to the  Terms & Conditions

It's a brand new bike

बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटर म्हणजे काय?

बाईक इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर कसा वापरायचा?

आमचा प्रीमियम कॅल्क्युलेटर कसा वापरावा आणि तुमच्या बाईकसाठी योग्य टू व्हीलर इन्शुरन्स कसा मिळवावा याबद्दल टप्प्याटप्प्याने स्पष्टीकरण इथे देण्यात आले आहे!

टप्पा १

तुमच्या बाईकची उत्पादक कंपनी, मॉडेल, व्हेरिएंट, नोंदणी तारीख आणि तुम्ही बाईक चालवत असलेल्या शहराचे नाव अशी सगळी माहिती भरा..

टप्पा २

'गेट कोट' वर क्लिक करा आणि तुमच्या आवडीचा प्लॅन निवडा.

टप्पा ३

तुम्ही थर्ड पार्टी टू व्हीलर पॉलिसी किंवा स्टँडर्ड/ कॉम्प्रिहेन्सिव्ह टू व्हीलर पॉलिसी यापैकी एक निवडू शकता.

टप्पा ४

तुमच्या आधीच्या बाईक इन्शुरन्स पॉलिसीबद्दल सांगा- मुदत संपण्याची तारीख, क्लेम हिस्ट्री, नो क्लेम बोनस इत्यादी.

टप्पा ५

तुम्ही आता पानाच्या तळाच्या उजव्या बाजूला तुमचा पॉलिसी प्रीमियम पाहू शकता.

टप्पा ६

जर तुम्ही स्टँडर्ड प्लॅन निवडला असेल, तर तुम्ही तुमचा आयडीव्ही सेट करू शकता आणि शून्य डिप्रीसिएशन, रिटर्न टू इनव्हॉइस, इंजिन आणि गिअर प्रोटेक्शन इत्यादी ॲड-ऑन निवडून आपली योजना अधिक कस्टमाइझ करू शकता.

टप्पा ७

तुम्ही आता पानाच्या उजव्या बाजूला तुमचा अंतिम कॅल्क्युलेटेड प्रीमियम पाहू शकता.

बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटरचे फायदे

  • योग्य आयडीव्ही (IDV) निश्चित करण्यास मदत करते- योग्य आयडीव्ही (IDV) असल्यास तुमची बाईक पूर्णपणे हरवल्यास किंवा चोरी झाल्यास, तुम्हाला तुमच्या बाईकच्या बाजारमूल्याची योग्य भरपाई मिळेल हे सुनिश्चित होते. बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटरचा वापर केल्याने तुम्ही तुमच्या बाईकच्या स्पेसिफिकेशन्सच्या आधारे योग्य आयडीव्ही सेट करू शकता
  • योग्य ॲड-ऑन्सची निवड करा- आपल्या बाईक इन्शुरन्स पॉलिसीसाठी योग्य ॲड-ऑन निवडणे त्याला सर्व संभाव्य परिस्थितीपासून अतिरिक्त संरक्षण आणि कव्हरेज देते. बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटर आपल्या प्रीमियमवर वेगवेगळ्या ॲड-ऑनचा कसा परिणाम होतो हे ठरविण्यात मदत करतो, जे त्यानुसार आपल्याला आपल्या बाइकसाठी ॲड-ऑन्सचे योग्य मिश्रण निवडण्यास मदत करेल.
  • योग्य प्रीमियम निवडा- बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरून तुम्ही वेगवेगळ्या बाईक इन्शुरन्स प्रीमियमच्या किमतीची तुलना करू शकता. या तुलनेमुळे तुम्हाला सर्वोत्तम किमतीचा प्लॅन निवडण्यास मदत होईल. तो प्लॅन तुमच्या गरजेनुसार तयार करता येईल.

बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरणे का महत्वाचे आहे?

जेव्हा बाईक इन्शुरन्स खरेदी करण्याची वेळ येते, तेव्हा तुमच्यापैकी बहुतेकांना ते शक्य तितक्या लवकर पूर्ण करायचे असते. तुम्ही त्वरित सर्वात स्वस्त बाईक इन्शुरन्स निवडावा की थोडा वेळ घ्यावा आणि तुमच्या बाईकसाठी योग्य गोष्ट निवडावी ? नंतरचा पर्याय एक चांगला विचार असेल आणि तेच करायला आपल्याला बाईक इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर मदत करेल:

कॉस्ट इफेक्टीव्ह, आपले पैसे वाचवतो

टू-व्हीलर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरचे काम तुम्हाला सर्वात स्वस्त पॅकेज देण्यास मदत करणे नाही तर सर्वात जास्त कॉस्ट इफेक्टीव्ह निर्णय घेण्यास मदत करणे आहे. याचे कारण हे फक्त तुमच्या बाईक इन्शुरन्स प्रीमियमवर वेगवेगळ्या घटकांचा कसा परिणाम होऊ शकतो हे समजण्यास मदत करत नाही तर सगळ्या घटकांचे योग्य कॉम्बिनेशन तुम्हाला तुमच्या बाईकचे चांगल्या प्रकारे संरक्षण करणारा प्लॅन निवडण्यास कशी मदत करू शकेल हे देखील दाखवते.

बाईक इन्शुरन्स प्रीमियम कमी करण्यास उपयुक्त

टू व्हीलर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरताना, घटकांमधील काही बदल तुमचा बाईक इन्शुरन्स प्रीमियम कसा वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात हे तुमच्या लक्षात येईल. त्यानुसार तुम्ही वेगवेगळे पर्याय वापरून पाहू शकता आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या बाईकसाठी काय चांगले असेल ते पाहू शकता!

आपल्याला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते

शेवटी महत्त्वाचं काय तर ती तुमची लाडकी बाईक आहे आणि त्या बाईकचं सर्व जोखमींपासून संरक्षण करण्यासाठी सगळी माहिती गोळा करून निर्णय घेणे कमीत कमी इतकं तर तुम्ही करु शकता. बाईक इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर त्याच्या गणनेत पारदर्शक आहे आणि तुमचा बाईक इन्शुरन्स प्रीमियम कसा निश्चित केला जातो हे तुम्ही स्वत: पाहू शकता.

नवीन आणि जुन्या बाईक्ससाठी बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरा

भारतातील बाईक इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार

थर्ड पार्टी

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स  हा बाईक इन्शुरन्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे; ज्यात केवळ थर्ड पार्टी व्यक्ती(तिसरी किंवा अन्य व्यक्ती), वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान कव्हर होते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स  हा बाईक इन्शुरन्सचा सर्वात मौल्यवान प्रकार आहे जो थर्ड पार्टी लायॅबिलिटी आणि तुमच्या स्वत:च्या  दुचाकीचे नुकसान या दोन्हींना कव्हर करतो.

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर

कॉम्प्रिहेन्सिव्ह  बाईक इन्शुरन्स प्रीमियमच्या महत्त्वाच्या घटकांबद्दल अधिक वाचा.

स्वत:चे नुकसान

हे कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि ओन डॅमेजेस बाईक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट आहे. आपल्या स्वत:च्या बाईकच्या नुकसानीमुळे झालेले नुकसान कव्हर करण्यात येते. उदाहरणार्थ; जर तुमचा अपघात झाला असेल किंवा पुरामुळे तुमची बाईक खराब झाली असेल तर ते या कव्हर होते. तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स प्रीमियमचे हे कव्हरेज तुम्ही कोणत्या प्रकारची बाईक चालवता (उत्पादक कंपनी, मॉडेल, वय, सी.सी) आणि आपण ज्या शहरात चालवता त्याद्वारे निर्धारित केले जाते.

इन्शुअर्ड डिक्लेर्ड व्हॅल्यू आयडीव्ही (IDV)

आपल्या बाइकचा आयडीव्ही (IDV) आपल्या बाईकचे बाजारमूल्य आहे. हे मूलत: आपली बाईक चोरीला गेली किंवा दुरुस्तीच्या पलीकडे खराब झाल्यास आपल्याला किती भरपाई दिली जाऊ शकते हे देखील निश्चित करते. डिजिटच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही तुमच्या बाईकच्या स्पेसिफिकेशननुसार स्वत: तुमचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करू शकता.

ॲड-ऑन कव्हर्स

यात कस्टमायझेशन्स अप्रतिम असते. हेच कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक पॉलिसीला खास बनवते. तुम्ही तुमच्या बाईकच्या कोणत्या प्रकारच्या संरक्षणाच्या शोधात आहात यावर आधारित आहे. तुम्ही झीरो-डिप्रीसिएशन कव्हर,  रिटर्न टू इनव्हॉइस, ब्रेकडाउन असिस्टन्स इत्यादी ॲड-ऑन कव्हर्स तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक पॉलिसीमध्ये कस्टमाइझ करू शकता.

डीडक्टिबल्स

क्लेम्सदरम्यान तुम्ही तुमच्या खिशातून टाकलेली रक्कम म्हणजे डीडक्टिबल्स. कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुमच्या शेअरची रक्कम पर्यायी असते. तुम्ही जितकी उच्च टक्केवारी निवडाल तितका तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्सचा प्रीमियम कमी असेल आणि त्याउलट स्थिती पण असू शकतो.

नो क्लेम बोनस

प्रत्येक क्लेम-फ्री वर्षासाठी, तुमची बाईक इन्शुरन्स कंपनी तुम्हाला सवलतीचे बक्षीस देईल. तुम्हाला पहिल्या क्लेम-फ्री वर्षासाठी २०% सूट पासून सवलत सुरू होईल. तुमच्याकडे जेवढे जास्त एनसीबी (NCB) असेल, त्यानुसार कमी तुमचा कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स प्रीमियम असेल.

थर्ड पार्टीचे नुकसान

थर्ड पार्टीला नुकसान आणि नुकसानीपासून संरक्षण देण्याची जबाबदारी कायद्याद्वारे अनिवार्य आहे. त्यामुळेच तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्सचा हा पैलू स्टँडर्ड आहे आणि आयआरडीएआयद्वारे पूर्वनिर्धारित आहे.

तुमच्या बाईकची उत्पादक कंपनी आणि मॉडेल

थर्ड पार्टीला नुकसान आणि नुकसानीपासून संरक्षण देण्याची जबाबदारी कायद्याद्वारे अनिवार्य आहे. त्यामुळेच तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्सचा हा पैलू स्टँडर्ड आहे आणि आयआरडीएआयद्वारे पूर्वनिर्धारित आहे.

मालक- चालकासाठी वैयक्तिक अपघात कव्हर

थर्ड पार्टीला नुकसान आणि नुकसानीपासून संरक्षण देण्याची जबाबदारी कायद्याद्वारे अनिवार्य आहे. त्यामुळेच तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्सचा हा पैलू स्टँडर्ड आहे आणि आयआरडीएआयद्वारे पूर्वनिर्धारित आहे.

तुमच्या बाईकचे वय

तुमची बाईक जितकी नवीन असेल, तितका तिला अधिक जोखमींचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुमच्या बाईकचं वयही तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स प्रीमियमची गणना करण्यात मदत करते.

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स हा मोटार वाहन कायद्यानुसार तुम्हाला किमान आवश्यक असलेला बाईक इन्शुरन्सचा प्रकार आहे. हे केवळ थर्ड पार्टीचे नुकसान आणि नुकसानीसाठी समाविष्ट आहे, जसे की आपली बाईक एखाद्या व्यक्तीला धडकली तर मालमत्ता किंवा दुसऱ्या वाहनाचे नुकसान होते.

थर्ड पार्टी नुकसान

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्समध्ये फक्त थर्ड-पार्टीशी संबंधित नुकसान आणि नुकसानीचा समावेश आहे.त्यामुळेच, तुमचा थर्ड-पार्टी इन्शुरन्स प्रीमियम केवळ थर्ड-पार्टी लायबिलिटीवर अवलंबून असेल, ज्याची मर्यादा आयआरडीएआयने पूर्वनिर्धारित केली आहे.

मालक-चालकासाठी वैयक्तिक अपघात कव्हर

जसे चालवताना हेल्मेटने स्वतःचे संरक्षण करणे अनिवार्य आहे, त्याचप्रमाणे आपल्या बाईक इन्शुरन्समध्ये वैयक्तिक अपघात कव्हर समाविष्ट करणेदेखील अनिवार्य आहे.

आपल्या बाईकची सीसी

आपल्या बाईक इन्शुरन्स प्रीमियमचा अंदाज वर्तवताना आपल्या बाईकची सीसी एक मोठा घटक असतो. कारण तुमच्या बाईकमध्ये जितका जास्त सीसी असेल, तितक्या वेगाने ती जाऊ शकते आणि त्यामुळे धोका जास्त असतो. थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्समध्ये, प्रीमियम वेगवेगळ्या सीसी रेंजवर आधारित आयआरडीएआयद्वारे पूर्वनिर्धारित केला जातो.

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स प्रीमियम दर

टू व्हीलरची इंजिन क्षमता

प्रीमियम दर

७५ सी.सी पेक्षा जास्त नाही

₹538

७५ सी.सीपेक्षा जास्त परंतु १५० सीसीपेक्षा जास्त नाही

₹714

१५० सीसीपेक्षा जास्त परंतु ३५० सीसीपेक्षा जास्त नाही

₹1,366

३५० सीसीपेक्षा जास्त

₹2,804

तुमच्या बाईकचा इन्शुरन्स प्रीमियम कमी करण्यासाठी टिप्स

तुमच्या बाईक इन्शुरन्सचा प्रीमियम कमी करण्यास मदत करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा काही टिप्स आणि युक्त्या पुढे देत आहोत.

तुमची ऐच्छिक डीडक्टिबल्स वाढवा

जर तुम्ही सुरक्षित रायडर असाल आणि तुमचा शून्य क्लेम्सचा इतिहास असेल, तर तुम्ही तुमची ऐच्छिक डीडक्टिबल्स वाढवण्याचा विचार करू शकता ज्यामुळे तुमचा बाईक इन्शुरन्स प्रीमियम कमी होण्यास मदत होईल.

एक चांगला रायडिंग रेकॉर्ड राखा

हे अगदी स्पष्ट आहे. सुरक्षितपणे प्रवास करा आणि अडचणीपासून दूर राहा जेणेकरून तुम्ही क्लेम करणे टाळू शकता आणि त्यामुळेच प्रत्येक बाईक इन्शुरन्स नुतनीकरणावर नो क्लेम बोनसचे बक्षीस दिले जाऊ शकते.

तुमच्या इन्शुरन्स कंपनीशी बोला

हे बोलणे नेहमीच मदत करते. तुमच्या चिंता काहीही असोत, तुमच्या इन्शुरन्स कंपनीशी बोला आणि कदाचित ते तुम्हाला सर्वात योग्य उपाय आणि कॉस्ट इफेक्टीव्ह प्रीमियमदेखील देऊ शकतात!

वेळेवर आपल्या पॉलिसीचे नुतनीकरण(रिन्यूअल) करा

आपण सगळे बऱ्याच वेळ दिरंगाई करतो, परंतु या प्रकरणात ते करू नका. तुमच्या बाईक इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपण्याच्या तारखेपूर्वी नुतनीकरण करा. हे केवळ बाईक तपासणी प्रक्रिया रद्द करणार नाही तर तुम्ही तुमचा नो क्लेम बोनस समाविष्ट करू शकता आणि सूट मिळवू शकता याची खात्री करेल.

संबंधित ॲड-ऑन निवडा

तुमच्या बाईकच्या संरक्षणासाठी अतिरिक्त थर जोडण्याचा ॲड-ऑन आणि कव्हर्स हा एक अप्रतिम मार्ग आहे. मात्र यामुळे तुमचा बाइक इन्शुरन्स प्रीमियमदेखील वाढतो.त्यामुळे आम्ही शिफारस करतो की आपण फक्त संबंधित ॲड-ऑन निवडा.

डिजिटचा बाईक इन्शुरन्स का निवडावा?

तुमचा बाईक इन्शुरन्स फक्त सुपर इझी क्लेम प्रोसेससह येतो असे नाही, तर कॅशलेस सेटलमेंट निवडण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे

कॅशलेस दुरुस्ती

कॅशलेस दुरुस्ती

भारतातील 4400+ कॅशलेस नेटवर्क गॅरेजेसपैकी गॅरेज निवडण्याचा पर्याय

स्मार्टफोन-इनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन

स्मार्टफोन-इनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन

स्मार्टफोन- इनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन प्रक्रियेद्वारे त्वरित आणि पेपरलेस क्लेम प्रक्रिया

सुपर-फास्ट क्लेम्स

सुपर-फास्ट क्लेम्स

टू व्हीलरच्या क्लेम्ससाठी सरासरी टर्न अराउंड टाइम ११ दिवस आहे

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

आमच्याबरोबर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचे वाहन आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करू शकता!

24*7 सपोर्ट

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

डिजिटद्वारे टू व्हीलर इन्शुरन्सची मुख्य वैशिष्ट्ये

मुख्य वैशिष्ट्ये

डिजिट बेनिफिट

प्रीमियम

₹714 पासून सुरू

नो क्लेम बोनस

५०% पर्यंत सूट

कस्टमायझेबल ॲड-ऑन्स

५ ॲड-ऑन उपलब्ध

कॅशलेस दुरुस्ती

4400+ गॅरेजेसमध्ये उपलब्ध

क्लेम प्रक्रिया

स्मार्टफोन-इनेबल्ड क्लेम प्रक्रिया ७ मिनिटांत ऑनलाइन करता येईल!

स्वत:चे नुकसान कव्हर

उपलब्ध

थर्ड पार्टीचे नुकसान

वैयक्तिक नुकसानीसाठी अमर्याद लायबिलिटी, मालमत्ता/ वाहन नुकसानीसाठी ७.५ लाखांपर्यंत

आमच्याबरोबर, व्हीआयपी क्लेम्ससाठी प्रवेश मिळवा

तुम्ही तुमचा टू व्हीलर इन्शुरन्स प्लॅन विकत घेतल्यानंतर किंवा नुतनीकरण केल्यानंतर आमच्याकडे 3-स्टेप(३ टप्प्यांमध्ये), पूर्णपणे डिजिटल क्लेम्सची प्रक्रिया असल्याने तुम्ही तणावमुक्त राहता!

टप्पा १

फक्त १८००-२५८-५९५६ वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत.

टप्पा २

तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर सेल्फ-इन्स्पेक्शनसाठी लिंक मिळवा. तुमच्या स्मार्टफोनमधून तुमच्या वाहनाच्या नुकसानाबाबत मार्गदर्शनाद्वारे टप्प्याटप्प्याने माहिती भरा.

टप्पा ३

आमच्या गॅरेजेसच्या नेटवर्कद्वारे तुम्ही निवडू इच्छित असलेला दुरुस्तीचा मार्ग निवडा.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात?

तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात आला पाहिजे. तुम्ही तसा विचार करता आहात ही चांगली गोष्ट आहे !

डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटरशी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न