मच्याकडे दुचाकी (टू-व्हिलर) असल्यास, तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की मोटार वाहन कायदा, 1988 नुसार, तुमच्या वाहनाला थर्ड पार्टी लायॅबलिटी इन्शुरन्सचे कव्हर असणे अनिवार्य आहे.
भारतात, रस्त्यावरील एकूण दुचाकींपैकी सुमारे 75% वाहनांना कोणतेही वैध इन्शुरन्स कव्हर नाही. धक्का बसला, बरोबर ना ? बरं, शोरूममधून वाहन बाहेर काढताना बहुतेक रायडर्स त्यांच्या बाईकचा इन्शुरन्स काढण्याच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात ही वस्तुस्थिती लक्षात घेता, ही आकडेवारी आश्चर्यकारक नाही.
तथापि, पॉलिसींचे रिन्यूअल न करण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, देशभरातील इन्शुरन्स कंपन्यांनी मल्टी इयर किंवा लाँग टर्म टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसी सुरू केल्या आहेत. सुरुवातीला, या मल्टी इयर इन्शुरन्स पॉलिसीज 3 वर्षांच्या कालावधीसाठी सुरू केल्या गेल्या. आता,त्यांची मुदत 5 वर्षांपर्यंतदेखील वाढवली जाऊ शकते.
3 वर्षांसाठी बाईक इन्शुरन्स खरेदी केल्याचे फायदे आणि हा इन्शुरन्स काढण्याचा तुम्हाला सल्ला का दिला जातो, याविषयी खाली सविस्तर माहिती दिली आहे.