(Incl 18% GST)
मोटर
हेल्थ
मोटर
हेल्थ
आमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
(Incl 18% GST)
Please wait a moment....
Terms and conditions
Terms and conditions
मेडिकल विज्ञान अशा टप्प्यावर प्रगत झाले आहे जिथे खराब झालेले अंतर्गत अवयव पूर्णपणे कार्यक्षम असलेल्या अवयवांसह बदलले जाऊ शकतात. तथापि, त्याची किंमत खरोखरच जास्त आहे. अलीकडेपर्यंत बहुतेक इन्शुरन्स कंपन्या प्रत्यारोपण, तपासणी इत्यादीसाठीचा खर्च देऊ करत नव्हत्या कारण बहुतेक वेळा डोनर हे हेल्थ पॉलिसीचा भाग नसतात. हृदय, यकृत, कॉर्निया किंवा किडनी अशा अवयव दानाच्या प्रकरणांमध्ये भारतात झपाट्याने वाढ झाली आहे.
कॉर्निया प्रत्यारोपणाची किंमत सुमारे रु. 1,00,000 आहे, हृदय प्रत्यारोपण रु. 10,00,000 आणि यकृत प्रत्यारोपणाची किंमत रु. 25,00,000 इतकी आहे.
आता हेल्थ इन्शुरन्स हळूहळू बदलला आहे आणि महत्त्वाच्या असलेल्या कव्हरशी जुळवून घेत आहे ज्यांच्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले गेले आहे. भारतातील अनेक हेल्थ इन्शुरन्स प्रदाते पुढे येत आहेत आणि इन्शुरन्स उत्पादने ऑफर करत आहेत ज्यात अंगभूत अवयव दान फायदे आहेत किंवा ज्यांना अतिरिक्त प्रीमियमसाठी अॅड-ऑन आहेत.
अवयव दान आणि प्रत्यारोपणात 2 पक्षांचा समावेश होतो हे लक्षात घेता: डोनर आणि रिसिव्हर, यातील पॉलिसीच्या कक्षेत काय येते?
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही सर्व निदान स्थिती, प्रक्रिया, शस्त्रक्रिया, हॉस्पिटलायझेशन आवश्यक असलेल्या उपचारांसाठी वैध आहे, अर्थातच अटी व शर्तींच्या अधीन आहे. त्यामुळे, रिसिव्हरला अवयवाची गरज असल्यास, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये हे अगदी स्पष्ट आहे की ते शस्त्रक्रियेचा खर्च तसेच सम इनशूअर्ड पर्यंत अवयव प्रत्यारोपण करून घेण्याच्या चाचण्या आणि प्रोसेसेसचा खर्च कव्हर करतील
परंतु डोनरचे एक्सपेनसेस (प्रत्यारोपण, साठवण, तपासणी इ.) अवयव रिसिव्ह करणाऱ्या व्यक्तीला करावा लागेल. तथापि, काही इन्शुरन्स कंपन्या आहेत ज्या डोनरचा खर्च देखील कव्हर करतात.
ऑर्गन डोनरच्या बाबतीत प्रामुख्याने 6 प्रकारचे मेडिकल खर्च केले जातात:
वरील खर्चांपैकी, डोनरचे हॉस्पिटलायझेशनपूर्वीचे आणि नंतरचे खर्च आणि शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंतीमुळे होणारे खर्च हे भारतातील बहुतेक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आजच्या तारखेपर्यंत कव्हर केलेले नाहीत. काही कंपन्या हॉस्पिटलायझेशन पूर्वीच्या/नंतरच्या खर्चावर मर्यादा घालण्यासाठी प्रोसीजर प्रतिबंधित करतात.
दुर्दैवाने केवळ काही कंपन्यांच्या सर्व पॉलिसींद्वारे सर्वाधिक असा वास्तविक शस्त्रक्रियेचा खर्च समावेश केला जातो.
ऑर्गन ट्रान्सप्लांटनंतर ऑर्गन डोनरवरील कोणतेही मेडिकल उपचार कवर्ड नाहीत
ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या बाबतीत कठोर मार्गदर्शक तत्त्वे आहेत, म्हणून ज्या ऑर्गन डोनरचे अवयव उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यांनी मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 (सुधारणा केल्याप्रमाणे) नुसार नियमांचे पालन केले पाहिजे आणि अवयव केवळ तुमच्या वैयक्तिक वापरासाठी दान केले गेले आहेत हे लक्षात ठेवायला हवे
या कव्हरचा वेटिंग प्पिरीयड 2 ते 4 वर्षांचा आहे किंवा हा फायदा घेण्यासाठी तुम्हाला पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून किमान 2 वर्षे प्रतीक्षा करावी लागेल.
आता ऑर्गन ट्रान्सप्लांट इन्शुरन्समुळे, निरोगी आयुष्य जगणे काही कठीण नाही
वाचा: अधिक जाणून घ्या कोरोनाव्हायरस हेल्थ इन्शुरन्स
Please try one more time!
अस्वीकरण #1: *ग्राहक विम्याचा लाभ घेताना पर्याय निवडू शकतात. प्रीमियमची रक्कम त्यानुसार बदलू शकते. विमाधारकाने प्रस्ताव फॉर्ममध्ये पॉलिसी जारी करण्यापूर्वी कोणतीही पूर्व-अस्तित्वातील स्थिती किंवा उपचार सुरू आहे हे उघड करणे आवश्यक आहे.
अस्वीकरण #2: ही माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने जोडली गेली आहे आणि इंटरनेटवरील विविध स्त्रोतांकडून गोळा केली गेली आहे. डिजिट इन्शुरन्स येथे कशाचीही जाहिरात करत नाही किंवा शिफारस करत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया माहितीची पडताळणी करा.
Last updated: 2024-03-24
CIN: U66010PN2016PLC167410, IRDAI Reg. No. 158.
गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेड (याआधी ओबेन जनरल इन्श्युरन्स लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) – रजिस्टर्ड ऑफीसचा पत्ता – 1 ते 6 फ्लोर्स, अनंत वन (एआर वन), प्राईड हॉटेल लेन, नरवीर तानाजी वाडी, सीटी सर्व्हे नं. 1579, शिवाजी नगर, पुणे – 411005, महाराष्ट्र | कॉरपोरेट ऑफीसचा पत्ता – अटलांटिस, 95, 4th बी क्रॉस रोड, कोरमंगला इंडस्ट्रीयल लेआऊट, 5th ब्लॉक, बैंगलोर – 560095, कर्नाटक | गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडचा वरील ट्रेड लोगो डिजिट इन्फोवर्क्स सर्व्हिसेस प्राईव्हेट लिमिटेड चा आहे आणि लायसन्स अंतर्गत गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडद्वारा वापरण्यात आला आहे.