हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन
9000+
Cashless Hospitals
2.5 Crore+
Lives Insured
4.5 Lacs+
Claims Settled
I agree to the Terms & Conditions
Get Exclusive Porting Benefits
Buy Health Insurance, Up to 20% Discount
Port Existing Policy
9000+
Cashless Hospitals
2.5 Crore+
Lives Insured
4.5 Lacs+
Claims Settled
सिनिअर सिटीझन्स साठी हेल्थ इन्शुरन्स बेनिफिट्स
9000+
Cashless Hospitals
2.5 Crore+
Lives Insured
4.5 Lacs+
Claims Settled
I agree to the Terms & Conditions
Get Exclusive Porting Benefits
Buy Health Insurance, Up to 20% Discount
Port Existing Policy
सेक्शन 80डी अंतर्गत सिनिअर सिटीझन्स साठी हेल्थ इन्शुरन्स टॅक्स बेनिफिट्स
वाढत्या मेडिकल खर्चाच्या काळात हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे तुमच्या सेव्हिंग्स वर विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि ते एकमेव कारण नक्कीच नाही कि ज्यामुळे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घ्यावा. मेडिकल इमर्जन्सी मध्ये तुमचे सेव्हिंग्स सुरक्षित ठेवणे याव्यतिरिक्त हेल्थ इन्शुरन्समुळे तुम्हाला इन्कम टॅक्स एक्ट 1961 च्या सेक्शन 80डी अंतर्गत टॅक्स बेनिफिट्स देखील मिळतात.
एक सिनिअर सिटीझन हेल्थ इन्शुरन्स प्लॅन त्याहीपुढे जाऊन तुम्हाला अनेक फायदे देतो. सिनिअर सिटीझन हेल्थ इन्शुरन्स प्लॅन मुळे तुम्हाला कोणकोणते विविध फायदे मिळू शकतात यासाठी पुढे वाचा.
सिनिअर सिटीझन म्हणजे कोण?
एक अशी व्यक्ती जिचे वय त्या आर्थिक वर्षामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त पण 80 वर्षांपेक्षा कमी असेल, त्यावर्षाच्या टॅक्स पर्पज साठी सिनिअर सिटीझन समजली जाते. तसेच, एखादी व्यक्ती जिचे वय एका आर्थिक वर्षामध्ये 80 वर्षांपेक्षा जास्त असेल तर टी व्यक्ती त्या वर्षासाठी सुपर सिनिअर सिटीझन समजली जाते.
सेक्शन 80डी अंतर्गत सिनिअर सिटीझन्स साठी कोणकोणते हेल्थ इन्शुरन्स टॅक्स बेनिफिट्स आहेत?
सेक्शन 80डी अंतर्गत सिनिअर सिटीझन्स साठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी साठी टॅक्स बेनिफिट्स खालील प्रमाणे आहेत:
- इन्कमटॅक्सच्या सेक्शन 80डी अंतर्गत हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम डिडक्टीबल आहे. या डिडक्शनची मर्यादा ₹25000/- आहे, जर प्रीमियम भरणारी व्यक्ती सिनिअर सिटीझन असेल तर हे डिडक्शन ₹50000/- पर्यंत वाढवून घेऊ’ शकता.
- या लाभांतर्गत एक व्यक्ती जर तिचे आई-वडील सिनिअर सिटीझन्स असतील तर ₹75000 पर्यंतचे डिडक्शन मिळवू शकतो.
- क्वचित केसेस मध्ये जर पॉलिसी होल्डर 60 वर्षापेक्षा जात वयाचा असेल आणि त्याने त्याच्या आई-वडिलांचा देखील हेल्थ इन्शुरन्स काढला असेल तर डिडक्टेबल रक्कम ₹1,00,000 (₹50000 पॉलिसी होल्डर साठी + ₹50000 त्याच्या आई-वडिलांसाठी, दोघेही सिनिअर सिटीझन्स असताना) इतकी होईल.
अनेक परिस्थितींमध्ये सेक्शन 80डी अंतर्गत टॅक्स डिडक्शन मिळू शकणाऱ्या वेगवेगळ्या केसेस आता आपण बघूया. सिनिअर सिटीझन्सना मिळणारे अतिरिक्त बेनिफिट्स खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत.
|
परिस्थिती |
सेक्शन 80डी मध्ये मिळणारे डिडक्शन |
|
स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी (60 वर्षांखालील सर्व सदस्य) |
₹25,000 |
|
स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी + पालक (60 वर्षांखालील सर्व सदस्य) |
₹25,000 + ₹25,000) = ₹50,000 |
|
स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी (60 वर्षांखालील सर्व सदस्य) + सिनिअर सिटीझन पालक |
₹25,000 + ₹50,000 = ₹75,000 |
|
स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी (60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले सर्व वयस्कर सदस्य) + सिनिअर सिटीझन पालक |
₹50,000 + ₹50,000) = ₹1,00,000 |
सेक्शन 80डी अंतर्गत टॅक्स डिडक्शन क्लेम करण्यासाठी लागणारे कागदपत्र
सेक्शन 80डी अंतर्गत टॅक्स डिडक्शन क्लेम करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे जमा करावी लागतील:
- हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमच्या रिसीट्स
- हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे कागदपत्र ज्यामध्ये इन्शुअर्ड मेम्बर्सची नावं त्यांचं वय आणि क्लेम करणाऱ्याशी त्याचं नातं नमूद केलेलं असेल.
- पालकांचे इन्शुरन्स काढलेले असेल तर इन्शुरन्स प्रोव्हायडरकडे 80डीच्या सर्टिफिकेटची विचारणा करा.
सेक्शन 80डी अंतर्गत मेडिकल बिल्स द्वारे सिनिअर सिटीझन्स टॅक्स वाचवू शकतात का?
एका व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्ष कोणत्याही मेडिकल इमर्जन्सीमुळे त्याने आर्थिक ओझ्याखाली न घालवता सुखाने व्यतीत करावीत असे प्रत्येकालाच वाटत असते.
त्यामुळेच सिनिअर सिटीझन्सच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी भरलेले प्रीमियम किंवा मेडिकल बिल्स सेक्शन 80डी अंतर्गत असलेल्या डिडक्शन्स साठी पात्र ठेवण्यात आली आहेत.
वर नमूद केलेल्या हेल्थ इन्शुरन्स वरील टॅक्स बेनिफिट्स व्यतिरिक्त खाली इतर अनेक केसेस आहेत जिथे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊन टॅक्सची बचत देखील करु शकता.
- एन्युअल प्रिव्हेंटिव्ह चेक-अप्स वर तुम्ही ₹5000/- पर्यंत टॅक्स बेनिफिट्स क्लेम करू शकता.
- गंभीर आजारांसाठी घेतलेल्या ट्रीटमेंटच्या खर्चातील ₹1,00,000 पर्यंतच्या रकमेचे टॅक्स डिडक्शन मिळू शकते.
- जर तुम्ही गंभीर आजार किंवा इतर कोणत्याही हेल्थ रायडर सह लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल तर तुम्हाला डुअल टॅक्स बेनिफिट्स मिळतात - सेक्शन 80सी अंतर्गत लाईफ इन्शुरन्ससाठी भरलेले प्रीमियम डिडक्टीबल आहे आणि रायडर साठी भरलेले प्रीमियम सेक्शन 80डी अंतर्गत एक्झ्म्प्टेड आहे.
- दिव्यांग व्यक्ती जर त्यांचे अपंगत्व 40% पेक्षा जास्त असेल तर ₹75000 प्रति वर्षचे रिबेट क्लेम करू शकतात. त्यांच्या परिस्थितीच्या गांभीर्यावर क्लेमची टक्केवारी अवलंबून असते. 80% अपंगत्व असेलेले दिव्यांग व्यक्ती, हे रिबेट ₹1,25,000 इतके क्लेम करू शकतात. हे डिडक्शन्स दिव्यांग व्यक्तींना सांभाळणारी व्यक्ती देखील मिळवू शकतात अर्थात जर दिव्यांग व्यक्तीने या डिडक्शन्सचा, या टॅक्स बेनिफिट्सचा या आधी लाभ घेतलेला नसेल तर.
- इंडीव्हिजुअल्स किंवा एचयूएफ्स (हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली) ना त्यांनी स्वतःसाठी किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांसाठी कोणतीही मेडिकल ट्रीटमेंट घेतली असेल तर त्याच्या खर्चातून इन्कमटॅक्सच्या सेक्शन 80डीडीबी अंतर्गत एक्झ्म्प्शन मिळते.
अशा केसेस मध्ये, क्लेम केली जाणारी रक्कम खालील प्रमाणे असेल:
| मेडिकल ट्रीटमेंट घेणाऱ्या व्यक्तीचे वय | टॅक्स डिडक्शनची रक्कम |
| 60 वर्षापेक्षा कमी | ₹40000/- किंवा वास्तविक खर्च, जे कमी असेल |
| सिनिअर सिटीझन्स - 60वर्ष आणि त्यापेक्षा जास्त | ₹100000/- किंवा वास्तविक खर्च, जे कमी असेल |
| सुपर सिनिअर सिटीझन्स - 80वर्ष आणि त्यापेक्षा जास्त | ₹100000/- किंवा वास्तविक खर्च, जे कमी असेल |
सिनिअर सिटीझन हेल्थ इन्शुरन्स प्लॅन न केवळ टॅक्स बेनिफिट्स ऑफर करते तर इतर अनेक बेनिफिट्स जसे संपूर्ण कव्हरेज देणे, डे-केअर एक्स्पेन्सेस, डोमीसीलरी ट्रीटमेंट एक्स्पेन्सेस कव्हर करणे, एड-ऑन्सची एक विस्तृत रेंज देखील देते ज्यामुळे न केवळ तुमच्या कष्टाच्या कमाईची बचत होते तर तुम्हाला सर्वोत्तम हेल्थकेअर पर्यंत पोहचविण्याचे काम देखील सहज करते.