मेडिकल इमर्जन्सीमुळे एखाद्या व्यक्तीचा हॉस्पिटलमध्ये राहण्याचा वाढू शकतो आणि अशा परिस्थितीत जास्तीचा खर्च देखील उद्भवू शकतो. ही परिस्थिती सर्वसाधारणपणे अशा व्यक्तींच्या बाबतीत घडू शकते ज्यांना गंभीर आजार झाला आहे आणि हल्लीच तो वाढत चालला आहे.
वर्षानुवर्षे भारतामध्ये अशा गंभीर आजाराच्या अनेक केसेस झालेल्या आहेत. तशातच, 2022 मध्ये इंडिअन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) द्वारा दिलेल्या एका रिपोर्टनुसार असे आढळून आले आहे की अशा गंभीर आजारांमुळे मृत्यूचा दर वाढतच जाणार आहे. त्यामुळे, अशा आजारांपासून तुमच्या जवळच्या व्यक्तींना सुरक्षित करण्यासाठी पाऊले उचलण्याची आता वेळ आली आहे.
तसेच, फिक्स्ड बेनिफिट हेल्थ प्लॅन्स अशाच वेळेस मदतीसाठी सज्ज असतात.
गंभीर आजारांच्या पॉलीसिच्या बाबतीत, जर इन्शुअर्ड व्यक्ती नमूद केलेल्या गंभीर आजारांची नोंद केली तर, हा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन पॉलिसीहोल्डरला इन्शुअर केलेली रक्कम देतो. आता आम्ही हेच तुम्हाला एका उदाहरणाद्वारे अजून स्पष्ट करून सांगतो:
समजा श्रीमती. वर्मांनी एक गंभीर आजारांसाठीचा Rs. 10 लाखांचा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेतला. पॉलिसी नियमांनुसार, प्लॅन अंतर्गत नमूद केलेल्या आजारांपैकी एका आजाराचे त्यांना निदान झाले. त्यामुळे, त्यांना त्या आजाराच्या उपचारासाठी कितीही खर्च करावा लागलागला तरी क्लेम स्वरूपात पूर्ण Rs. 10 लाख रुपये मिळतील. त्यांना जेव्हां प्लॅन अंतर्गत इन्शुअर केलेली सर्व रक्कम मिळेल तेव्हा पॉलिसी टर्मिनेट होईल.
तसेच, फिक्स्ड बेनिफिट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन निवडताना, सर्व असे आजार तुमच्या प्लॅन मध्ये कव्हर होत आहेत ना याची खात्री तुम्ही करून घेणे योग्य ठरेल. त्यामुळे, आम्ही तुम्हाला सुचवू की तुम्ही असा प्लॅन निवडा, ज्यामध्ये सर्वसाधारणपणे गंभीर समजले जाणारे सर्व आजार कव्हर केले जात असतील.
त्याचबरोबर, मेडिकल केअर संदर्भातील वाढत्या किमती लोकांना एका चांगल्या आर्थिक योजनेचा आधार घेण्यास भाग पाडत आहेत. इथे तुम्ही तुमच्या आत्ताच्या हेल्थ कव्हर मध्ये एका फिक्स्ड बेनिफिट प्लॅनला जोडण्याचा विचार करू शकता.
यामध्ये नॉन-मेडिकल खर्च, जसे की हॉस्पिटलमध्ये राहिल्यामुळे उपजीविकेचे किंवा अर्थार्जनाचे नुकसान झाल्यामुळे ती नुकसानभरपाई देखील कव्हर होते. तसेच, जर तुम्ही अनुवांशिक किंवा राहणीमान ई. यामुळे उद्भवणाऱ्या ठराविक मेडिकल परिस्थितींना सहज बळी पडत असाल तर हा प्लॅन तुमच्या साठी योग्य आहे.