को पे, कोइन्शुरन्स आणि डिडक्टिबल म्हणजे काय?
हेल्थ इन्शुरन्स घेताना तुम्ही काही गोष्टी समजून घायला हव्या ज्या बऱ्याच वेळा कन्फ्युजिंग असतात.
विशेषतः को पे, कोइन्शुरन्स आणि डिडक्टिबल या शब्दांच्या बबतीत कोणीही लगेच गडबडून जाऊ शकतं.
काळजी नका करू, आम्ही आहोत ना!
या सदरात आम्ही को पे, कोइन्शुरन्स आणि डिडक्टिबल याबद्दल सविस्तर माहिती देऊ आणि हेल्थ इन्शुरन्स त्यांचा काय परिणाम होतो हे ही सांगू..
चला तर पाहूया!
हेल्थ इन्शुरन्स मध्ये को पे म्हणजे काय?
को पे या प्रकारामध्ये पॉलिसीहोल्डर्सना त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंटच्या खर्चामधला काही ठराविक भाग पे करावा लागतो आणि उरलेला भाग इन्शुरर पे करतो. हा भाग ट्रीटमेंटच्य खर्चातील काही ठराविक रक्कम असू शकते किंवा त्यातील काही टक्के असू शकतात.
उदाहरणार्थ, जर तुमची पॉलिसी तुमच्या ट्रीटमेंटच्या खर्चाच्या Rs. 2000च्या को पे क्लॉजची असेल आणि तुमच्या ट्रीटमेंटचा खर्च Rs. 10,000 असेल तर तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंटसाठी Rs. 2000 भरायचे आहेत आणि उरलेले Rs. 8000 इन्शुरर द्वारा भरले जातील.
तसेच, जर तुमच्या पॉलिसीच्या को पे क्लॉज प्रमाणे तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंटच्या खर्चातील 10% भरायचे असतील तर तुम्हाला Rs. 1000 भरावे लागतील आणि उरलेले 90% इन्शुरर भरेल.
इन्शुरन्स पॉलिसी मध्ये को पेमेंटचे फीचर्स खालील प्रमाणे आहेत:
- को पे क्लॉजमध्ये इन्शुरन्स पॉलिसी होल्डर्सना क्लेमचा सर्वाधिक भाग पे करावा लागतो त्याउलट पॉलिसी होल्डर्सना क्लेमचा ठराविक भागच भरावा लागतो.
- तुम्ही घेलेल्या मेडिकल सर्व्हिसवर को पेची रक्कम ठरते.
- जितकी जास्त तुमची को पेमेंटची रक्कम असेल तितके तुमचे प्रीमियम जास्त असेल.
- असे क्लॉजेस बहुतांशवेळा सिनिअर सिटीझन्सच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मध्येच लागू होतात.
- हे क्लॉजेस मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये जास्त लोकप्रिय आहेत कारण तिथे ट्रीटमेंटचा खर्च महाग असतो.
पॉलिसी मध्ये को पे क्लेम नसेल तर त्याचा अर्थ होतो की ट्रीटमेंट साठी लागणारा सर्व खर्च इन्शुरन्स प्रोव्हायडरच करेल.
डिजिट इन्शुरन्स 0% को पेमेंट वर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज देतो आणि तुमच्या ट्रीटमेंटचा सगळं खर्च कव्हर करतो.
आणखीन जाणून घ्या:
डिडक्टिबल्स म्हणजे काय?
डिडक्टिबल्स म्हणजे एक ठराविक रक्कम जी पॉलिसीहोल्डरला त्यांच्या ट्रीटमेंटच्या खर्चासाठी त्यांची इन्शुरन्स पॉलिसी योगदान देणे सुरु करण्याआधी पे करावी लागते. डिडक्टिबल्स पे करण्यासाठीची अट इन्शुरन्स प्रोव्हायडर द्वारा ठरवली जाते की ती वार्षिक असेल की प्रत्येक ट्रीटमेंट प्रमाणे असेल.
उदाहरणार्थ, जर तुमच्या पॉलिसीमध्ये Rs. 5000चे डिडक्टिबल्स अनिवार्य असतील तर तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंटच्या खर्चासाठी Rs. 5000 भरावे लागतील आणि त्यानंतर इन्शुरन्स पॉलिसी आपले योगदान सुरु करू शकेल.
डिडक्टिबल्सचे फीचर्स खालील प्रमाणे आहेत:
- यामुळे इन्शुरन्स कंपन्यांना सततचे आणि अनावश्यक क्लेम्स पासून सुरक्षा मिळते.
- यामुळे इन्शुरन्स पॉलिसीसाठीचे प्रीमियम पेमेंट देखील कमी होते.
- तुमच्या मेडिकल ट्रीटमेंट साठीचा खर्च यामुळे कदाचित वाढू शकतो.
हेल्थ इन्शुरन्स डिडक्टिबल्स बद्दल आणखीन जाणून घ्या.
कोइन्शुरन्स म्हणजे काय?
कोइन्शुरन्स म्हणजे डिडक्टिबल्स पे केल्यानंतरची उरेला भाग होय. ही रक्कम सामान्यतः % मध्ये ठरवली जाते. ही सुविधा हेल्थ इन्शुरन्स मधील को पेमेंट सुविधेसारखीच आहे.
उदाहरणार्थ, जर तुमचा कोइन्शुरन्स 20% असेल तर तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंटच्या खर्चाच्या 20% रक्कम भरावी लागेल उरलेले 80% इन्शुरन्स प्रोव्हायडर भरतो.
म्हणजेच, एखादा आजार बरा करण्यासाठीचा खर्च Rs. 10,000असेल, तर तुम्हाला Rs. 2000 भरावे लागतील आणि उरलेले Rs. 8000 इन्शुरन्स पॉलिसी कव्हर करेल.ही रक्कम सामान्यतः तुम्ही डिडक्टिबल्स पे केल्यानंतर काढली जाते.
कोइन्शुरन्स प्लॅनचे काही फीचर्स खालीलप्रमाणे आहेत:
- मोठ्या क्लेम्सच्या बाबतीत यामुळे इन्शुरर्सना सुरक्षा मिळते.
- पॉलिसी होल्डर्सने त्यांची डिडक्टिबल्सची रक्कम त्यांचा कोइन्शुरन्स प्लॅन सुरु होण्यापूर्वी भरावी लागते.
- कोइन्शुरन्सचे % ठराविकच असतात.
- हे % तुमची इन्शुरन्स पॉलिसी उरलेली रक्कम पे करणे सुरु करायच्या आत तुम्ही तुमच्या खिशातून जास्तीत जास्त किती रक्कम भरू शकता यावर अवलंबून असते.
आता जसे की तुम्हाला माहित झाले आहे की तुमच्या हेल्थ इन्शुरन्स साठीच्या या तीनही टर्म्सचा अर्थ काय आहे, तर चला आता आपण या तीनही टर्म्स मधील फरक समजून घेऊ.