Corona Rakshak Policy by Digit Insurance

काय आहे कोरोना रक्षक पॉलिसी?

कोरोना रक्षक पॉलिसीची वैशिष्ट्ये

सिंगल प्रीमियम पेमेंट
सिंगल प्रीमियम पेमेंट - हे शॉर्ट टर्म कव्हर असल्याने एकदाच पेमेंट करा.
लंपसम फायदा
लंपसम फायदा – हॉस्पिटलच्या बिलांची रीएमबर्स करण्याऐवजी एकूण सम इनशूअर्ड लंपसम मिळवा. 
3.5 महिने किंवा 9 महिन्यांची मुदत निवडा
3.5 महिने किंवा 9 महिन्यांची मुदत निवडा - कोरोना रक्षक पॉलिसी किती काळासाठी हवी आहे हे निवडा. 
इंडिविजुअल सम इनशूअर्ड फक्त
इंडिविजुअल सम इनशूअर्ड फक्त - कोरोना रक्षक केवळ व्यक्तींसाठी विशिष्ट आहे, कोणतीही फॅमिली फ्लोटर प्लॅन उपलब्ध नाही. 
50,000 ते 2.5 लाखांदरम्यान सम इनशूअर्ड निवडा
50,000 ते 2.5 लाखांदरम्यान सम इनशूअर्ड निवडा- 50,000 च्या पटीत आपणास सोयीस्कर असलेली सम इनशूअर्ड निवडा.
18 ते 65 वयोगटासाठी उपलब्ध
18 ते 65 वयोगटासाठी उपलब्ध - 18 ते 65 वयोगटातील कोणीही कोरोना रक्षक पॉलिसी खरेदी करण्यास पात्र आहे.

कोरोना रक्षकात काय कवर्ड आहे?

72 तासांपेक्षा जास्त हॉस्पिटलायझेशन

72 तासांपेक्षा जास्त काळ हॉस्पिटल मध्ये भरती होण्याची आवश्यकता असेल तरच आपल्याला लंपसम रक्कम दिली जाते.

आयसीयू चा खर्च

लंपसम रक्कम आयसीयू खर्चासाठी कव्हर करण्यासह संपूर्ण उपचारांसाठी वापरली जाऊ शकते.

रोड अॅम्ब्युलन्सचे शुल्क

लंपसम रकमेत रोड अॅम्ब्युलन्सच्या शुल्काचाही समावेश आहे.

घरगुती उपचार कव्हर

आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्याला 14 दिवसांपर्यंत घरी निर्धारित उपचारांची आवश्यकता असल्यास. त्यासाठी लंपसम रक्कम वापरता येते.

आयुष

जर आपण कोविड -19 साठी आयुष उपचार वापरू इच्छित असाल तर यासाठी या पॉलिसीचा वापर केला जाऊ शकतो.

हॉस्पिटलायझेशन पूर्वी आणि नंतरचा खर्च

हॉस्पिटलायझेशनच्या पूर्वी 15 दिवसांपर्यंतचा खर्च आणि हॉस्पिटलायझेशन नंतरचा 30 दिवसांचा खर्च कोरोना प्रतिबंधक पॉलिसीअंतर्गत समाविष्ट केला जातो.

कोरोना रक्षकात कोणत्या गोष्टी कवर्ड नाहीत?

भारताबाहेर उपचार किंवा निदान.

72 तासांपेक्षा कमी हॉस्पिटलायझेशन.

कोविड -19 शी संबंधित नसलेले कोणतेही निदान किंवा उपचार कव्हर केले जात नाहीत.

15 दिवसांच्या सुरुवातीच्या वेटिंग पिरीयड पूर्वी केलेले क्लेम्स कव्हर केले जात नाहीत. 

कोरोना रक्षकावरील रिनिवल किंवा पोर्टेबिलिटी लागू नाही.

कोरोना रक्षक पॉलिसी प्रीमियम कॅल्क्युलेटर

आपण ज्या प्रकारची प्लॅन निवडता त्यानुसार, कोरोना रक्षक प्लॅनसाठी आपला प्रीमियम कसा दिसू शकतो याचा सारांश येथे आहे:

सम इनशूअर्ड प्रीमियम (टर्म- 3.5 महीने) प्रीमियम (टर्म- 6.5 महीने) प्रीमियम (टर्म- 9.5 महीने)
₹50,000 ₹700 च्या पुढे ₹900 च्या पुढे ₹1,000 च्या पुढे
₹1 लाख ₹1500 च्या पुढे ₹1800 च्या पुढे ₹2,000 च्या पुढे
₹1.5 लाख ₹2300 च्या पुढे ₹2700 च्या पुढे ₹3,100 च्या पुढे
₹2 लाख ₹3000 च्या पुढे ₹3600 च्या पुढे ₹4,100 च्या पुढे
₹2.5 लाख ₹3800 च्या पुढे ₹4600 च्या पुढे ₹5,100 च्या पुढे
अस्वीकरण: हे फक्त अंदाजित प्रीमियम आहेत. आपण निवडलेल्या इन्शुरन्स प्रदाता आणि इन्शुररच्या वयानुसार हे बदलू शकते.

कोरोना रक्षक हेल्थ इन्शुरन्सचे फायदे आणि तोटे

फायदे

तोटे

एका वेळेस प्रीमियम भरणे: कोरोना रक्षक हे शॉर्ट टर्म कव्हर असल्याने खरेदीच्या वेळी आपल्याला एकदाच प्रीमियम भरावा लागतो.

केवळ शॉर्ट टर्म कव्हर: कोरोना व्हायरसचा एक मुख्य तोटा म्हणजे, ती कमी कालावधीसाठीची पॉलिसी आहे जी 3.5 महिन्यांपासून ते 9.5 महिन्यांपर्यंत असते ज्यानंतर पॉलिसीची मुदत संपते.

लंपसम रक्कम: बिलांचे रीएमबर्स करण्याऐवजी कोरोना रक्षकाची चांगली गोष्ट म्हणजे क्लेम्सच्या वेळी संपूर्ण सम इनशूअर्ड आपल्याला लंपसम मिळते.

मर्यादित सम इनशूअर्ड: हा केवळ कोरोनाशी संबंधित उपचारांसाठी विशिष्ट हेल्थ इन्शुरन्स असल्याने सम इनशूअर्ड जास्तीत जास्त रु 2.5 लाख पर्यंतच मर्यादित आहे.

परवडणारा प्रीमियम: कोरोना प्रतिबंधक हे केवळ अल्पमुदतीचे इन्शुरन्स कवच असल्याने त्यासाठीचा प्रीमियम स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींपेक्षा खूपच परवडणारा आहे.

मर्यादित फायदे: कोविडसाठी कव्हर करण्याव्यतिरिक्त कोरोना रक्षक पॉलिसीचे इतर कोणतेही फायदे नाहीत.

कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स असलेल्यांसाठी योग्य: जर आपण आधीच कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स असलेले व्यक्ती असाल आणि म्हणूनच केवळ कोरोना व्हायरस विशिष्ट कव्हर शोधत असाल तर हे योग्य कव्हर ठरेल.

आपल्याकडे आधीच हेल्थ इन्शुरन्स असल्यास फारसा उपयुक्त नाही: जर आपल्याकडे आधीच चांगली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असेल तर कोरोना व्हायरस उपचार आधीच आपल्या पॉलिसीअंतर्गत समाविष्ट केले जातील आणि अतिरिक्त कोविड-विशिष्ट पॉलिसी घेणे तितकेसे उपयुक्त ठरणार नाही.

कोरोना कवच आणि कोरोना रक्षक यांच्यामधील फरक

कोरोना कवच

कोरोना रक्षक

पॉलिसी प्रकार

कोरोना कवच ही कोविड-19 ची इनडेम्नीटी प्लॅन आहे जो कोविड-19 वर उपचार घेत असताना हॉस्पिटलचे बिल कव्हर करण्यास मदत करते.

कोरोना रक्षक ही कोविड-बेनिफिट पॉलिसी आहे. येथे, विशिष्ट हॉस्पिटलची बिले कव्हर करण्याऐवजी लंपसम फायदा दिला जातो, म्हणजेच इन्शुअर्डला व्हायरसवर उपचार करायचे असल्यास संपूर्ण सम इनशूअर्ड मिळते.

सम इनशूअर्ड

कमीत कमी रु 50,000 आणि जास्तीत जास्त रु 5 लाख मधून निवड करा.

कमीत कमी रु 50,000 ते जास्तीत जास्त रु 2.5 लाख मधून निवड करा.

हॉस्पिटलायझेशन बद्दलच्या अटी

24 तासांपेक्षा जास्त काळ हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज भासल्यास त्यांच्या कोरोना कवच कव्हरद्वारे कलेम करता येईल.

हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याचे प्रमाण 72 तासांपेक्षा जास्त असेल तरच त्यांच्या कोरोना रक्षकाच्या माध्यमातून कलेम करता येतो आणि लंपसम रक्कम मिळवता येते.

उपलब्ध असलेले प्लॅनचे प्रकार

कोरोना कवचमध्ये फॅमिली फ्लोटर आणि पर्सनल प्लॅन यापैकी एकाची निवड करता येते.

कोरोना रक्षक कव्हरमध्ये आपण फक्त पर्सनल प्लॅन निवडू शकता, फॅमिली फ्लोटरचा पर्याय नाही.

अतिरिक्त फायदे

कोरोना कवच पॉलिसीमध्ये, आपण डेली हॉस्पिटल कॅश कव्हर देखील निवडू शकता ज्यामध्ये आपण हॉस्पिटल मध्ये भरती होण्याच्या प्रत्येक दिवसापासून आपल्या सम इनशूअर्डच्या 0.5% प्राप्त करू शकता.

कोरोना रक्षक पॉलिसीमध्ये कोणतेही अतिरिक्त फायदे किंवा कव्हर उपलब्ध नाहीत.

कोरोना रक्षक आणि स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स मधील फरक

कोरोना रक्षक

स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स

कोरोना रक्षक ही एक पॉकेट साइज इन्शुरन्स पॉलिसी आहे जी केवळ कोविड -19 शी संबंधित उपचारांसाठी होणारा खर्च कव्हर करण्यासाठी लंपसम फायदा प्रदान करते.

कोरोना व्हायरसला कव्हर करणारा हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी इतर आजार आणि रोगांसह कोरोना व्हायरससाठी देखील कव्हर करेल. आपल्याला वेगळ्या आजारासाठी वेगळी कव्हर किंवा पॉलिसी खरेदी करण्याची आवश्यकता नाही. हे सर्व आपल्या हेल्थ इन्शुरन्सत कवर्ड आहे.

कोरोना रक्षक ही शॉर्ट टर्म पॉलिसी आहे आणि क्लेम केल्यानंतर किंवा 3.5 ते 9.5 महिन्यांच्या कालावधीनंतर (निवडलेल्या प्लॅनवर आधारित) पॉलिसी यापुढे वैध नाही.

हेल्थ इन्शुरन्स ही एक दीर्घकालीन पॉलिसी आहे (आपण 1 वर्षापासून एकाधिक-वर्षांच्या प्लॅनपर्यंत निवडू शकता) आणि जोपर्यंत आपले एकूण क्लेम्स आपल्या एकूण सम इनशूअर्ड पेक्षा जास्त होत नाहीत तोपर्यंत आपण वर्षातून कितीतरी वेळा क्लेम करू शकता.

कोरोना व्हायरससाठी कव्हर करण्याव्यतिरिक्त, कोरोना व्हायरस इन्शुरन्सचे इतर कोणतेही अतिरिक्त फायदे नाहीत.

कोरोना व्हायरससाठी कव्हर करण्याव्यतिरिक्त, स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये मॅटर्निटी आणि नवजात बाळाचे संरक्षण, ओपीडी, डेकेअर कार्यपद्धती आणि बरेच काही यासारखे इतर फायदे देखील आहेत.

कर बचतीसाठी आपण एकल कव्हर वापरू शकत नाही.

कलम 80डी अंतर्गत, हेल्थ इन्शुरन्स 25,000 पर्यंत कर बचतीस पात्र आहे.

कोरोना व्हायरस इन्शुरन्सचा प्रीमियम कमी असू शकतो कारण ते केवळ एका रोगाचे विशिष्ट कव्हर आहे. येथे प्रीमियम आपले वय, प्लॅनचा कालावधी आणि निवडलेल्या सम इनशूअर्डवर अवलंबून असतो.

स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्सचा प्रिमियम कोरोना रक्षकापेक्षा तुलनेने जास्त असतो. प्रीमियम मुख्यत: आपले वय, स्थान, निवडलेले अॅड-ऑन कव्हर, प्लॅन आणि निवडलेल्या सम इनशूअर्डवर अवलंबून असतो.

कोविड-19 साठी हेल्थ इन्शुरन्स पर्याय

भारतातील कोरोना कवच पॉलिसीविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न