तुमचे वय: तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितकी जास्त तुमची सम इनशूअर्ड असावी कारण यानुसार बाकी वर्षांसाठी अधिक सुरक्षा मिळू शकते.
तुमचा जीवनाचा टप्पा: तुम्ही जीवनाच्या ज्या टप्प्यावर आहात त्या आधारावर, उदाहरणार्थ, तुम्ही लग्न करणार असाल किंवा कुटुंब सुरू करणार असाल तर, त्याप्रमाणे तुमच्यावर येणाऱ्या किंवा वाढणाऱ्या हेल्थ संबंधी गोष्टींचा विचार करून तुमची सम इनशूअर्ड ठरवावी.
हेल्थ स्थिती: तुमच्या कुटुंबात आजार किंवा तत्सम स्थितीचा इतिहास असल्यास, तुमच्या सम इनशूअर्ड भविष्यात अनपेक्षित हेल्थ स्थितीला सामावून घेणारी असावी
कुटुंबातील अवलंबित सदस्य: जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह फ्लोटर पॉलिसी घेण्याचे प्लॅन करत असाल, तर सम इनशूअर्डने प्रत्येक सदस्याच्या गरजा आणि त्यांच्यासाठी भविष्यातील हेल्थसेवा खर्च विचारात घेतला पाहिजे.
जीवनशैली आणि वैयक्तिक सवयी: नोकरीचा प्रकार, खाण्याच्या सवयी, तणाव पातळी आणि इतर वैयक्तिक सवयी एखाद्या व्यक्तीच्या भविष्यातील हेल्थसेवा गरजांचा अंदाज घेण्यासाठी विचारात घ्यायला हव्यात. सम इनशूअर्ड निवडताना याचाही विचार केला पाहिजे.