मोटर
हेल्थ
मोटर
हेल्थ
More Products
मोटर
हेल्थ
सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
Exclusive
Wellness Benefits
24*7 Claims
Support
Tax Savings
u/s 80D
Try agian later
I agree to the Terms & Conditions
{{abs.isPartnerAvailable ? 'We require some time to check & resolve the issue. If customers policy is expiring soon, please proceed with other insurers to issue the policy.' : 'We require some time to check & resolve the issue.'}}
We wouldn't want to lose a customer but in case your policy is expiring soon, please consider exploring other insurers.
Please wait a moment....
Terms and conditions
Terms and conditions
मानसिक आजार हा एक विषय आहे जो अनेकदा दुर्लक्षित राहतो मेंटल हेल्थ व स्वास्थ्य याविषयी एकाप्रकारचा संकोच अनेकांच्या मनात आहे. सुदैवाने, आता काळ बदलत चालला आहे, लोक मेंटल हेल्थबद्दल बोलण्यास आणि शारीरिक आजाराप्रमाणे गंभीरपणे घेण्यास पुढे सरसावले आहेत हाच बदल इन्शुरन्स क्षेत्रातही करण्यात आला आहे.
16 ऑगस्ट रोजी, भारतीय इन्शुरन्स नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) ने इनशुरन्स कंपन्यांना मानसिक आजार कव्हर करण्यासाठी तरतूद करण्यास सांगितले. हे एक स्वागतार्ह पाऊल होते कारण मेंटल हेल्थला विशेषत: भारतात मोठा वाव आहे. त्यामुळे मेंटल हेल्थ इनशुरन्स आता उपलब्ध आहे आणि यापुढे तुमच्या हेल्थ इनशुरन्स मधून वगळला जाणार नाही.
आर्थिक वर्ष 2016 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेसने आयोजित इंडियन नॅशनल मेंटल हेल्थ सर्वेक्षणानुसार, सुमारे 15% भारतीय प्रौढांना एक किंवा अधिक मेंटल हेल्थ समस्यांसाठी उपचारांची आवश्यकता आहे असे सुचवले.
मेंटल हेल्थ इन्शुरन्समध्ये कोणत्याही मानसिक आजारामुळे रुग्णाला देखरेखीखाली हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यास होणारा कोणताही खर्च कव्हर केला जातो. यामध्ये आजाराचे निदान, औषधोपचार खर्च, रुमचे भाडे, रुग्णवाहिका शुल्क इत्यादींचा समावेश आहे.
मेंटल हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज कौटुंबिक इतिहास किंवा कोणताही आघातजन्य अनुभव असलेल्या प्रत्येकासाठी प्रासंगिक आहे, जेथे व्यक्तीला असा आजार होण्याची शक्यता असते. एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावल्यामुळे, अपघातानंतर, किंवा कोणत्याही स्थितीतीमुळे झालेल्या आघाताने ग्रस्त असलेल्या प्रत्येकासाठी देखील हे उपयुक्त आहे. धकाधकीची जीवनशैली आणि राहणीमानाच्या सध्याच्या परिस्थितीमुळे, प्रत्यक्षात अनेकजण मानसिक आजाराला बळी पडतात.
एखाद्या व्यक्तीने त्यांच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये खर्चाचा क्लेम करण्यासाठी मानसिक आजार असलेल्या रुग्णाला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याचा किमान वेळ 24 तासांचा असावा.
खूप कमी इन्शुरर्स ओपीडी फायद्यानंतर्गत मानसिक आजारासाठी सल्ला आणि समुपदेशन कव्हर करतात. लक्षात ठेवा की, तुम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ओपीडी फायदा आणि मानसिक आजार फायदा या दोन्हींचा पर्याय आहे का हे तुम्ही आधी तपासले पाहिजे.
इतर सर्व पूर्व-अस्तित्वात असलेल्या परिस्थितींप्रमाणे, मानसिक आजाराच्या फायद्यासाठी देखील एक वेटिंग पिरीयड असतो जो इन्शुररला सहन करावा लागतो. बहुतेक इन्शुरर कडे मानसिक आजार कव्हर करणाऱ्या इन्शुरन्सच्या फायद्यासाठी वेटिंग पिरीयड 2 वर्षे आहे. म्हणून, जर तुम्ही आज हेल्थ इन्शुरन्स खरेदी केला असेल, तर तुम्हाला मानसिक आजारामुळे झालेल्या खर्चासाठी क्लेम करण्यापूर्वी 2 वर्षे वाट पाहावी लागेल. म्हणून, लवकरात लवकर इन्शुरन्स घेणे आणि तुमच्या पहिल्या पॉलिसीसह हा फायदा घेणे उचित आहे. त्यामुळे, तुम्हाला गरज असताना वेटिंग पिरीयडसाठी थांबावे लागणार नाही
हे काही ज्ञात आजार आहेत जे मानसिक आजारांच्या यादीत येतात
जेव्हा रुग्णाला हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागते तेव्हाच मेंटल हेल्थ इन्शुरन्स खर्च कव्हर करतो. फारच कमी इन्शुरर समुपदेशनासारख्या काळजीसाठी खर्च कव्हर करतात. अंमली पदार्थ किंवा अल्कोहोलच्या गैरवापरामुळे होणारा कोणताही मानसिक आजार कव्हर केला जाणार नाही.
तसेच, पुन्हा पुन्हा मानसिक त्रासाच्या स्थितीचा इतिहास असल्यास, क्लेम स्वीकारला जाऊ शकत नाही.
मेंटल हेल्थ इन्शुरन्स हा अनादी काळापासून मानसिक आजाराकडे कसे पाहिले जात आहे याचा एक नवीन दृष्टिकोन आहे. तुमचे प्रियजन कोणत्याही मानसिक आजाराने त्रस्त आहेत असे तुम्हाला वाटत असल्यास थोडे सतर्क होण्याची ही वेळ आहे. त्यांना योग्य वेळी मदत मिळेल याची खात्री आपणच करायला हवी
वाचा: COVID 19 हेल्थ इन्शुरन्स मध्ये काय कवर्ड आहे
Please try one more time!
इतर महत्त्वाचे लेख
अस्वीकरण #1: *ग्राहक विम्याचा लाभ घेताना पर्याय निवडू शकतात. प्रीमियमची रक्कम त्यानुसार बदलू शकते. विमाधारकाने प्रस्ताव फॉर्ममध्ये पॉलिसी जारी करण्यापूर्वी कोणतीही पूर्व-अस्तित्वातील स्थिती किंवा उपचार सुरू आहे हे उघड करणे आवश्यक आहे.
अस्वीकरण #2: ही माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने जोडली गेली आहे आणि इंटरनेटवरील विविध स्त्रोतांकडून गोळा केली गेली आहे. डिजिट इन्शुरन्स येथे कशाचीही जाहिरात करत नाही किंवा शिफारस करत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया माहितीची पडताळणी करा.
Get 10+ Exclusive Features only on Digit App
closeCIN: U66010PN2016PLC167410, IRDAI Reg. No. 158.
गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेड (याआधी ओबेन जनरल इन्श्युरन्स लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) – रजिस्टर्ड ऑफीसचा पत्ता – 1 ते 6 फ्लोर्स, अनंत वन (एआर वन), प्राईड हॉटेल लेन, नरवीर तानाजी वाडी, सीटी सर्व्हे नं. 1579, शिवाजी नगर, पुणे – 411005, महाराष्ट्र | कॉरपोरेट ऑफीसचा पत्ता – अटलांटिस, 95, 4th बी क्रॉस रोड, कोरमंगला इंडस्ट्रीयल लेआऊट, 5th ब्लॉक, बैंगलोर – 560095, कर्नाटक | गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडचा वरील ट्रेड लोगो डिजिट इन्फोवर्क्स सर्व्हिसेस प्राईव्हेट लिमिटेड चा आहे आणि लायसन्स अंतर्गत गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडद्वारा वापरण्यात आला आहे.