तुम्ही निरोगी आहात असे तुम्हाला वाटते का? जर हो असे उत्तर असेल तर आम्ही तुमच्यासाठी आनंदी आहोत पण भविष्यातही तुम्ही निरोगी राहाल याची तुम्हाला 100% खात्री आहे का? नाही, आपल्यापैकी कोणालाही अशी खात्री नसावी आपल्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी प्लॅन करणे आणि भविष्यात तणावमुक्त राहणे चांगले आहे.
तुम्हाला कुठून व कशी सुरुवात करावी हे माहित नाही? काळजी करू नका, आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहोत 😊
मेडिकल आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही सर्वोत्तम फायदे मिळवू शकता असे दोन मार्ग आहेत, एक मार्ग म्हणजे मेडिक्लेम आणि दुसरा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन. आम्ही तुम्हाला या दोन्हीबद्दल समजावून सांगू ज्यामुळे तुम्ही गरजेनुसार योग्य निवड करण्यास सक्षम व्हाल.
मेडिक्लेम ही एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे जी तुम्हाला मेडिकल आपत्कालीन परिस्थितीत विशिष्ट आर्थिक संरक्षण देते. हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यावर पुढील सर्व खर्चाची काळजी घेते;
मेडिक्लेमचे दोन प्रकार आहेत- कॅशलेस आणि रिइम्बर्समेंट.
हेल्थ इन्शुरन्स हे एक इन्शुरन्स कवच आहे जे तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया खर्चासाठी संपूर्ण कव्हरेज देते. तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असल्यास, तुम्ही एकतर खिशातून खर्च करता ज्याची नंतर तुमच्या इन्शुरन्स कंपनीद्वारे रीएमबर्समेंट केली जाते किंवा इन्शुरन्स कंपनी थेट हॉस्पिटलमध्ये बिल सेटल करते.
दोन्ही सारखे वाटतात ना? पण दोघांमधील फरक जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
मेडिक्लेम |
हेल्थ इन्शुरन्स |
मेडिक्लेम केवळ हॉस्पिटलायझेशनच्या खर्चावर कव्हरेज देते; म्हणजे तुम्ही केवळ हॉस्पिटल मध्ये दाखल असाल तरच तुम्ही यासाठी क्लेम करू शकता. |
हेल्थ इन्शुरन्स एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर ऑफर करतो जे फक्त हॉस्पिटलायझेशन खर्चापेक्षा अधिक विस्तारित आहे. यापैकी काही खर्चांमध्ये वार्षिक हेल्थ तपासणी, दैनंदिन हॉस्पिटल मध्येील रोख रक्कम, ओपीडी खर्च आणि पर्यायी उपचार आयुष यांचा समावेश आहे. |
मेडिक्लेममध्ये कोणतेही अॅड-ऑन कव्हर नाहीत. |
क्रिटिकल इलनेस कव्हर, मॅटर्निटी फायदे आणि वंध्यत्व कव्हर इत्यादी सारख्या असंख्य अॅड-ऑन कव्हर आहेत. |
मेडिक्लेममध्ये हॉस्पिटलायझेशन कव्हर मर्यादित आहे आणि रु. 5 लाखांपेक्षा जास्त नाही. |
हेल्थ इन्शुरन्स कव्हर व्यापक आहे आणि वय, शहर, एकाच प्लॅन मधील सदस्यांची संख्या इ.च्या आधारे ठरवले जाते. |
मेडिक्लेम लवचिक नाही. |
हेल्थ इन्शुरन्स प्लॅन लवचिक आहेत आणि ते कस्टमाइज देखील केले जाऊ शकतात. |
तुमचा निर्णय अनेक घटकांवर अवलंबून असेल, जसे की:
वर नमूद केलेल्या सर्व बाबी लक्षात घेऊन तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी काय सर्वोत्तम असेल हे तुम्हाला माहीत असेल तर दोघांपैकी एक निवडणे कठीण नाही. आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास संपर्क साधा! आम्ही तुम्हाला मदत करण्यास सदैव तयार आहोत.
महत्त्वाचे: कोरोनाव्हायरस हेल्थ इन्शुरन्स मध्ये फायदा आणि काय कवर्ड आहे याबद्दल अधिक जाणून घ्या