अॅम्ब्युलन्स इन्शुरन्स कव्हर इन्शुअर्ड इंडिविजुअलसह मेडिकल आणीबाणीदरम्यान झालेल्या अॅम्ब्युलन्सच्या खर्चापोटी आर्थिक भरपाई प्रदान करते.
आजकाल, बहुतेक हेल्थ इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या नियमित हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये अॅम्ब्युलन्स कव्हरेज प्रदान करतात, वरच्या मर्यादेसह. ही वरची मर्यादा बहुधा सम इनशूअर्डची ठराविक टक्केवारी असते.
अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया:
समजा आपल्याकडे 5 लाखांच्या सम इनशूअर्डचा हेल्थ इन्शुरन्स आहे. यात सम इनशूअर्डच्या 1% म्हणजेच रु. 5000 चे अॅम्ब्युलन्स कव्हर दिले जाते. आता एका दुर्दैवी घटनेत आपल्याला रु. 6000 किमतीची अॅम्ब्युलन्स बुक करावी लागली. अशा परिस्थितीत, इन्शुरन्स प्रदाता आपल्या अॅम्ब्युलन्सच्या खर्चात रु. 5000 कव्हर करेल आणि उर्वरित रु.1000 आपल्याला स्वताला भरावे लागतील.
काही इन्शुरन्स प्रदाते त्यांच्या पॉलिसीचा भाग म्हणून अॅम्ब्युलन्स कव्हर प्रदान करत नाहीत परंतु ते अॅड-ऑन अंतर्गत कव्हर करतात जे स्वतंत्रपणे खरेदी केले जाऊ शकते आणि त्यानुसार पैसे दिले जाऊ शकतात.
डिजिटमध्ये, आम्ही आमच्या हेल्थ प्लॅन्सअंतर्गत पॉलिसी वैशिष्ट्य म्हणून रोड अॅम्ब्युलन्स खर्च कव्हर करतो. कव्हरेज सामान्यत: आपल्या पॉलिसीवर अवलंबून वरच्या मर्यादेसह इन्शुरन्स रकमेच्या 1% असते.