डिजिट इन्शुरन्स करा

होम लोन टॅक्स बेनिफिट्स

होमे लोन वरील इन्कम टॅक्स रिबेट बद्दल आणखीन जाणून घ्या.

भारतामध्ये हाउसिंग लोन हा सर्वात अधिक प्रमाणात वापरला जाणारा क्रेडीटचा प्रकार आहे, ज्यामुळे लाखो लोक त्यांच्या स्वप्नातील घर खरेदी करू शकतात. तुम्ही देखील भविष्यात होम लोन घेण्याचा प्लॅन करत आहात का?

काही साहजिक बाबी जसे की इंटरेस्ट रेट आणि टेन्यूअर, या बाबी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या होम लोन रीपेमेंट्स मधून होणाऱ्या टॅक्स डिडक्शनचा देखील विचार केला पाहिजे.

इयरली टॅक्स लायबिलिटी वर तुम्ही किती बचत करू शकता?

हे पूर्णपणे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहे. तुमचे वय, टॅक्स इन्कम, प्रिन्सिपल रीपेमेंट आणि असेसमेंट इअरचे इंटरेस्ट अमाऊंट/रक्कम, या काही घटकांवर तुमची बचत अवलंबून आहे. काही इतर घटकही महत्वाचे ठरू शकतात.

जुन्या टॅक्स रिजिम प्रमाणे आपले टॅक्स असेस करणाऱ्या इंडीव्हिजुअल्स साठी होम लोन रीपेमेंट बाबतवेगळे टॅक्स रिबेट आहेत.

अजूनही तुमच्या होम लोन टॅक्स बेनिफिट्स बद्दल तुम्हाला शंका आहेत? हे गाईड तुम्हाला नक्कीच मदत करेल! 

होम लोन वरील इन्कम टॅक्स बेनिफिट्स

इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 तुम्हाला होम लोन वरील रिबेट्स संदर्भात वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स उपलब्ध करून देतो. खाली असे तीन महत्वाचे भाग आहेत जिथे बॉरोअर त्यांचे एक्झ्म्पशन क्लेम करू शकतो.

  • होम लोनच्या प्रिन्सिपल पेमेंटवरती इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 मधील सेक्शन 80C अंतर्गत वर्षाला Rs.1.5 लाखापर्यंतचे टॅक्स डिडक्शन मिळू शकते.
  • होम लोनच्या इंटरेस्ट पेमेंट वरती, इन्कम टॅक्स अॅक्ट मधील सेक्शन 24 अंतर्गत तुम्ही Rs.2 लाखापर्यंतचे टॅक्स डिडक्शन क्लेम करू शकता.
  • घर घेण्याची तुमची पहिलीच वेळ असेल तर तुम्हाला सेक्शन 80EE च्या प्रोव्हिजन्स अंतर्गत Rs.50000चे अतिरिक्त टॅक्स डिडक्शन मिळते. हे डिडक्शन लोनच्या इंटरेस्ट पेमेंटवर मिळते.

इथे ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की टॅक्स डिडक्शन्स हे तुमच्या एकूण इन्कमवर कॅलक्युलेट न करता टॅक्सेबल इन्कम वर कॅलक्युलेट केली जातात.

उदाहरणार्थ, इन्कम टॅक्सच्या जुन्या रिजिमप्रमाणे जे इंडीव्हिजुअल्स एका वर्षातRs.2.5 लाखापेक्षा जास्त रक्कम कमावतात त्यांना टॅक्स लागू होतो.

आता समजा तुमचे वार्षिक इन्कम Rs.4 आहे. या परिस्थितीत होम लोन बेनिफिट्स तुमच्या एकूण इन्कमवर लागू न होता तुमच्या Rs.1.5 लाखाच्या (Rs.4 लाख-Rs.2.5 लाख) टॅक्सेबल इन्कम वर लागू होतील. 

 [स्रोत]

होम लोन टॅक्स बेनिफिट्स साठीचे वेगवेगळे सेक्शन्स आणि अटी

वरील सर्व प्रोव्हिजन्स काही महत्वाच्या सेव्हिंग्स बद्दल सांगतात ज्या एखादी व्यक्ती त्याच्या इन्कम टॅक्स लायबिलिटीज वरती क्लेम करू शकतो.

तरीसुद्धा तुम्ही ज्यांच्या अंतर्गत या सर्व सेव्हिंग्स लागू होतात त्या सर्व अॅप्लीकेबल सेक्शन्ससोबतच इतर अनेक नियम आणि अटींबद्दल जाणून घ्यायला पाहिजे.

1. सेक्शन 80C (होम लोन प्रिन्सिपल रीपेमेंटवरील डीडक्शन)

एका आर्थिक वर्षामध्ये टॅक्सपेअर केवळ एकदाच हे बेनिफिट्स जास्तीत जास्त Rs.1.5 लाखापर्यंतच्या मर्यादित डीडक्शन सोबत क्लेम करु शकतात.

या बेनिफिट कॅलक्युलेशन मध्ये प्रिन्सिपल रीपेमेंट सम व्यतिरिक्त संलग्न खर्च जसे स्टँप ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस यासारखे प्रॉपर्टी खरेदी करताना केले जाणारे खर्च देखील विचारात घेतले जातात. 

2. सेक्शन 24 (होम लोन इंटरेस्ट पेमेंट्सवरील डिडक्शन)

तुमच्या मालकीच्या घराच्या लोनच्या इंटरेस्ट पेमेंच्या आधारे तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स लायबिलिटी वर जास्तीत जास्त Rs.2 लाखापर्यंतचे डीडक्शन्स क्लेम करू शकता. भाड्याने दिलेल्या घरासाठीच्या डीडक्शनची कोणतीही विशेष अशी सीलिंग लिमिट नाही.

तरीसुद्धा, हे क्लेम करण्यासाठी संबंधित प्रॉपर्टीचे बांधकाम 5 वर्षाच्या आत पूर्ण व्हायला हवे. असे न झाल्यास टॅक्सपेअरचे सेव्हिंग्सचे पोटेन्शियल Rs.30000 पर्यंत कमी होईल. 

3. सेक्शन 80EE (पहिल्यांदा घर विकत घेणाऱ्यांसाठी होम लोनच्या इंटरेस्ट वरील टॅक्स डिडक्शन)

जर तुमच्या नावावर दुसरे कोणतेही घर नसेल तरच हा सेक्शन तुम्हाला लागू होतो. हे अतिरिक्त बेनिफिट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या इतर काही अटी देखील पूर्ण झाल्या असाव्यात:

  • होम लोनचे प्रिन्सिपल अमाऊंट Rs.35लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • प्रॉपर्टीची व्हॅल्यु Rs.50पेक्षा जास्त नसावी.
  • 1 एप्रिल 2016 आणि 31 मार्च 2017 या कालावधीतच लोन सँक्शन झालेले असावे.

एक जॉइंट होम लोन टॅक्स लायबिलिटी कशाप्रकारे कमी करू शकते?

तुम्ही जर होमलोन एका को-बॉरोअर बरोबर घेण्यच्या पर्यायाचा विचार करत असाल, जो को-ओनरदेखील असतो, अशा परीस्थिततीत टॅक्स सेव्हिंग क्षमता जवळजवळ दुप्पट होते. सेक्शन 80C आणि 24 अंतर्गत दोन्ही बॉरोअर्स इंटरेस्ट पेमेंटवर प्रत्येकी Rs.2 लाखापर्यंतच्या रिबेट साठी पत्र आहेत आणि प्रिन्सिपल रीपेमेंटवर त्यांना प्रत्येकी Rs.1. लाखापर्यंतचे बेनिफिट मिळते. त्यामुळे प्रत्येक बॉरोअर होम लोनवर Rs.3.5 लाखांचे वार्षिक इन्कम टॅक्स बेनिफिट मिळवू शकतात. 

[स्रोत]

जुन्या आणि नवीन टॅक्स रिजिम प्रमाणे होम लोनटॅक्स डिडक्शन मधील फरक

यनियन बजेट 2020 मध्ये एक प्रस्तावित टॅक्स रिजिमचा प्रस्ताव ठेवण्यात आला ज्यामध्ये सध्याचे टॅक्स स्लॅब रेट्स कमी केले होते. त्याचबरोबर, सध्याच्या टॅक्सेशन मेथड मध्ये असलेले बरेचसे टॅक्स सेव्हिंग प्रोव्हिजन्स आणि एक्झ्म्पशन्स या नवीन रिजिम मध्ये कमी करण्यात आले आहेत.

होम लोन बॉरोअर्स ज्यांनी या नवीन रिजिमकडे वळण्याचा निर्णय घातला आहे त्यांना हे माहित असायला हवे की लोन पेमेंटवर आधारित असलेल्या डिडक्शन्स अधून काय अपेक्षित असावे.

नवीन टॅक्स रिजिम प्रमाणे इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन 24 अंतर्गत स्वतःच्या ताब्यात असलेल्या प्रॉपर्टी साठी होम लोन देणारे टॅक्सपेअर्स आता इंटरेस्ट पेमेंटवर इन्कम टॅक्स बेनिफिट क्लेम नाही करू शकत. त्यामुळे, अशा नियमामुळे टॅक्स सेव्हिंग पोटेन्शियल Rs.2लाख पर्यंत कमी होते. 

तरीसुद्धा, संबंधित प्रॉपर्टी जर तुम्ही भाड्याने दिलेली असेल तर होम लोन इंटरेस्ट वरील टॅक्स रिबेट तुम्हाला लागू होते. खालील काही पद्धतींने तुम्ही अजूनही काही बेनिफिट्स उपलब्ध करून घेऊ शकता:

  • नेट रेंटल इन्कमच्या 30% हे स्टँडर्ड डिडक्शन लागू होते. प्रॉपर्टी मधून मिळणारे तुमचे एकूण रेंटल इन्कम मधून लागू असलेले म्युन्सिपल टॅक्सेस वजा करून तुम्ही तुमचे नेट रेंटल इन्कम कॅल्क्यूलेट करू शकता.
  • स्टँडर्ड डिडक्शन कॅलक्युलेट केल्यानंतर इंडीव्हिजुअल्स इन्कम टॅक्स अॅक्ट मधील सेक्शन 24 अंतर्गत इंटरेस्ट लायबिलिटीवरील होम लोन टॅक्स बेनिफिट्स क्लेम करू शकतात. 

तरी नवीन टॅक्स असेसमेंटच्या या नवीन पद्धतीचा पर्याय निवडणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. 

तुम्ही इतर अनेक प्रोव्हिजन्स सोबतच होम लोन टॅक्स एक्झ्म्पशन्सचा फायदा मिळवण्यासाठी जुन्या रिजिमच्या अंतर्गत असलेले टॅक्स बेनिफिट्स फॉलो करण्याचा पर्याय निवडू शकता. 

होम लोन टॅक्स बेनिफिट कॅलक्युलेटर म्हणजे काय?

होम लोन टॅक्स बेनिफिट कॅलक्युलेटर हे एक ऑनलाइन टूल आहे ज्यामुळे तुम्हाला तुमचे लोन रीपे करताना टॅक्स डिडक्शन असेस करण्यात मदत होते.

वेगवेगळ्या टॅक्स सेव्हिंग अपॉर्चूनिटीजबद्दल माहिती करून घेल्यानंतर देखील नेमके डिडक्शन असेस करणे टॅक्सपेअरला अवघड वाटू शकते. असे केल्याने लेंदी आणि क्लिष्ट कॅलक्युलेशन करावे लागू शकतात.

याउलट टॅक्स बेनिफिट कॅलक्युलेटर तुम्हाला अगदी इन्सटंट रिझल्ट देतो. होम लोन बेनिफिट्स जमा होण्यापूर्वी आणि नंतर तुम्ही नेमक्या टॅक्स लायबिलिटीज जाणून घेण्यासाठी याचा वापर करू शकता.

हे कॅलक्युलेटर टूल तुम्ही कसे वापरू शकता?

होम लोन टॅक्स डीडक्शन कॅलक्युलेशनसाठी कारणीभूत असेलेले घटक

टॅक्स बेनिफिट कॅलक्युलेटर तुम्ही दिलेल्या काही डीटेल्स विचारात घेऊन तुमचे इन्कम टॅक्स ड्यूज फिगर आउट करण्यासाठी मदत करते.

साधारणपणे, हे टूल असेसी कडून खालील काही मुद्द्यांवर माहिती पुरवण्यासाठी सांगू शकते.

  • असेसमेंट इअर - हे ते वर्ष असेल ज्यासाठी तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स ड्यूज माहिती करून घेत आहात.
  • कॅटेगरी - एका असेसीची कॅटेगरी मेल, फीमेल, सिनिअर सिटीझन किंवा सुपर सिनिअर सिटीझन यामधील कोणतीही असू शकते. हे लक्षात ठेवायला हवे की 60 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या इंडीव्हिजुअल्सच्या तुलनेत सिनिअर सिटीझन्स आणि सुपर सिनिअर सिटीझन्स साठी वेगळे टॅक्स स्लॅब्स आहेत. 
  • अॅन्युअल अर्निन्ग्स- वर्षभरात तुम्ही जी रक्कम कमावता ती टॅक्स लायबिलिटी जाणून घेताना विचारात घेण्यात येणारी सर्वात महत्वपूर्ण बाब आहे. तम्ही जुन्या रिजिम प्रमाणे टॅक्स असेस करत असाल किंवा नवीन असेसमेंट पद्धत निवडली असेल तरी Rs.2.5 लाखाची वार्षिक इन्कम टॅक्स फ्रीच राहते. या अमाऊंट पेक्षा जास्त रक्कमवरच फक्त लागू असलेल्या रेट्स प्रमाणे टॅक्स लावला जातो. 
  • पे केलेले इंटरेस्ट अमाउंट- त्यानंतर तुम्हला त्या असेसमेंट इअरमध्ये पेएबल असलेले होम लोन इंटरेस्ट अमाउंट भरावे लागते. ही माहिती सेक्शन 24 अंतर्गत असलेले तुमचे डीडक्शन्स कॅलक्युलेट करण्यसाठी उपयुक्त ठरते. 
  • प्रिन्सिपल रीपेमेंटची अमाउंट- यापुढच्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही या असेसमेंट इअरमध्ये भरलेल्या एकूण होम लोन प्रिन्सिपलची अमाउंट भरावी लागते. ही माहिती सेक्शन 80C अंतर्गत असलेले तुमचे टॅक्स बेनिफिट्स कॅलक्युलेट करण्यासाठी महत्वपूर्ण ठरते.

तुम्ही कॅलक्युलेटर मध्ये या सर्व डीटेल्स भरल्यानंतर, ते तुम्हाला महत्वाचे तीन मुद्दे दाखवेल.

सर्वात पहिले ते तुम्हाला पेएबल टॅक्सची अमाउंट दाखवेल, ज्यामध्ये होम लोन बेनिफिट्स समाविष्ट नसतील.

त्यानंतर, टॅक्सपेअर्सना होम लोन बॉरोअर्ससाठीच्या टॅक्स सेव्हिंग प्रोव्हिजन्स विचारात घेतल्यानंतरच्या त्यांच्या लायबिलिटीज बद्दल माहिती मिळते.

सर्वात शेवटी एक वेगळे सेक्शन दिसेल ज्यामध्ये तुम्ही केलेल्या होम लोन रीपेमेंटमुळे तुम्ही सेव्ह करू शकलेले टॅक्स अमाउंट दिसेल.

हाऊसिंग लोन टॅक्स बेनिफिट कॅलक्युलेटर वापरण्याचे फायदे

आता जेव्हा तुम्हाला असे कॅलक्युलेटर वापरण्याची माहिती मिळाली आहे, तुम्ही हा विचार करायला हवा की तुम्ही हे का वापरावे?

  • कॅलक्युलेशन्स फास्ट होतात - होम लोन रीपेमेंट मधून टॅक्स डिडक्शन्स मॅन्युअली कॅलक्युलेट करणे तुमच्यासाठी लेंदी काम ठरू शकते. अनेकांसाठी हे खूपच वेळ लागणारे आणि आव्हानात्मक काम ठरू शकते. टॅक्स बेनिफिट कॅलक्युलेटरच्या मदतीने टॅक्सपेअर त्यांच्या लायबिलिटीज जास्त योग्य रितीने समजू शकतात. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या सध्याच्या होम लोन ड्यूजमुळे टॅक्स पेमेंट मध्ये सेव्ह होणारे अमाउंट असेस करता येते.
  • रिझल्ट्स नेहमीच अचूक असतात - या कॅलक्युलेशन मधील एक चूक तुम्हाला तुमच्या टॅक्स पेमेंट प्लॅनमध्ये तडजोड करायला लावू शकते. आणि मग ड्यूज क्लीअर करायच्या वेळेस तुम्ही कल्पना केलेल्या लायबिलिटीज पेक्षा जास्त लायबिलिटीज तुम्हाला दिसून येऊ शकतात. त्यामुळे अशा समस्या उद्भवणे टाळण्यासाठी तुम्ही होम लोन टॅक्स बेनिफिट कॅलक्युलेटर वापरू शकता. याच्या सहाय्याने लागू असलेले टॅक्स रिबेट्स अप्लाय केल्यानंतरच्या तुमच्या वास्तविक टॅक्स लायबिलिटीज बद्दलची माहिती मिळते आणि तसेच कोणत्याही प्रकारच्या चुका होण्याची शक्यता दूर करता येते.
  • वापरायला अत्यंत सुलभ इंटरफेस - हे कॅलक्युलेटर याच्या सुरळीत आणि सुटसुटीत इंटरफेस मुळे वापरायला अतिशय सोपे आहे. ज्या लोकांनी पूर्वी असे कोणतेही ऑनलाइन टूल वापरलेले नाही त्यांच्यासाठीसुद्धा पहिल्यांदा वापरत असले तरी अतिशय सोपे आहे. त्यामुळे असे कॅलक्युलेटर असेसीला कमीतकमी गुंतागुंतींसह त्याच्या लायबिलिटी चेक करण्यास मदत करतात.

तुमचे टॅक्सेस फाईल करण्याआधी हे कॅलक्युलेटर टूल वापरण्याचा विचार करायला लावण्यासाठीची ही काही महत्वाची करणे आहेत.

इथे हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की टॅक्स लायबिलिटीजच्या असेसमेंटमध्ये हाउसिंग लोन बेनिफिट्स व्यतिरिक्त देखील इतर काही डिडक्शन्स आणि एक्झ्म्पशन्सचा समावेश असतो.

जरी हे कॅलक्युलेटर तुमच्या होम लोन टर्म्स वरती आधारित सेव्हिंग्स काढू शकत असले, तरी हे इतर माध्यमांतून मिळणाऱ्या अतिरिक्त टॅक्स सेव्हिंग्सचे आकलन करू शकत नाही.

होम लोन तुम्हाला तुमच्या आवडीची प्रॉपर्टी घेण्यात मदत करण्यासोबतच तुमच्या इन्कम टॅक्स पेमेंट्स देखील कमी करते.

असे असले तरी, एक बॉरोअर म्हणून तुम्ही तुमच्या पात्रतेवर अवलंबून असलेल्या प्रिन्सिपल रीपेमेंट आणि इंटरेस्ट ड्यूजच्या आधारे होम लोनच्या अचूक टॅक्स रिबेट्सबद्दल जाणून घ्यायला हवे. 

होम लोन टॅक्स बेनिफिट्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

एका बांधकाम सुरु सलेल्या प्रॉपर्टीसाठी होम लोन घेताना कोणकोणते टॅक्स बेनिफिट्स लागू होतात?

एका बांधकाम सुरु सलेल्या प्रॉपर्टीसाठी घेतलेल्या होम लोनच्या प्रिन्सिपल रीपेमेंटवरील टॅक्स बेनिफिट, राहण्यासाठी तयार असेलेल्या घराइतकेच असतात. त्यामुळे अशा केस मध्ये तुम्ही सेक्शन 80C अंतर्गत Rs.1.5 लाखापर्यंत क्लेम करू शकता.

[स्रोत]

तरी, जर बांधकाम पूर्ण झालेले नसेल तर Rs.2 लाखापर्यंतचे इंटरेस्ट पेमेंट वरील टॅक्स डिडक्शन क्लेम करण्यासाठी उपलब्ध नसेल.

या केस मध्ये डिडक्शन, बांधकाम पूर्ण होईपर्यंत जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंत जमा केले जाऊ शकते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच्या वर्षापासून घरमालक हे डिडक्शन पंचवार्षिक हप्त्यांद्वारे क्लेम करू शकतात. 

[स्रोत]

होम इम्प्रूव्हमेंट लोन घेताना बॉरोअर्स साठी कोणकोणते टॅक्स सेव्हिंग पर्याय उपलब्ध आहेत?

जर तुम्ही तुमचे घर इम्प्रूव्ह करण्यासाठी लोन घेत असाल तर सेक्शन 24 अंतर्गत अशा लोनचे इंटरेस्ट पेमेंट्स टॅक्स डिडक्शन साठी पात्र ठरतात. बॉरोअर त्याच्या इंटरेस्ट लायबिलिटीज प्रमाणे दर वर्षी Rs.30000 पर्यंतचे डिडक्शन क्लेम करू शकतो. 

[स्रोत]

तरी, हे लक्षात असावे की असे लोन्स प्रिन्सिपल रीपेमेंटवर आधारित असलेले टॅक्स ड्यूज कमी करत नाहीत. 

[स्रोत]

जर कोणी होम टॉप-अप लोन घेतले असेल तर ती व्यक्ती टॅक्स रिबेटसाठी पात्र ठरते का?

घर रिपेअर किंवा रिनोव्हेट करण्यासाठी हाऊसिंग लोन वरती टॉप-अप लोन घेतलेले बॉरोअर्स सेक्शन 24 अंतर्गत टॅक्स बेनिफिट्स क्लेम करण्यासाठी पात्र आहेत. त्यांना Rs.30000 पर्यंतचे वार्षिक टॅक्स डिडक्शन मिळू शकते.

तरी, जर तुम्ही प्रिन्सिपल अमाउंट घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी वापरले असेल तर या लोनच्या प्रिन्सिपल रीपेमेंटवर आणि इंटरेस्ट पेमेंट पोर्शन्सवर अनुक्रमे Rs.1.5 लाख आणि Rs.2 लाखापर्यंतचे टॅक्स बेनिफिट्स उपलब्ध आहेत. [स्रोत 1] [स्रोत2]

दुसऱ्या प्रॉपर्टीवरील तुमचे टॅक्स रिबेट कसे कॅलक्युलेट केले जाते?

जर दोन्ही प्रॉपर्टीज पैकी एक स्वतःच्या मालकीची आणि दुसरी रिकामी असेल तर ते इडीव्हिजुअल्स त्यांच्या दुसऱ्या प्रॉपर्टी साठीच्या होम लोनवरील टॅक्स बेनिफिट्स पहिल्या प्रॉपर्टी प्रमाणेच क्लेम करू शकतात

त्याउलट भाड्याने दिलेल्या प्रॉपर्टीवर बॉरोअर्स 30%चे स्टँडर्ड डिडक्शन आणि संपूर्ण इंटरेस्ट पेमेंट्स क्लेम करू शकतात. इंटरेस्ट पेमेंट डिडक्शन साठी कोणतीही सर्वोच्च मर्यादा नाही.

ताबा घेतल्याच्या 5 वर्षाच्या आत जर घर विकले गेले तर याचा इंटरेस्ट पेमेंट्स वरील होम लोन टॅक्स सेव्हिंग्सवर काय परिणाम होतो?

सबंधित प्रॉपर्टी जर तुम्हाला विकत घेतल्याच्या 5 वर्षाच्या आत विकावी लागणार असेल तर इंटरेस्ट पेमेंट्स वरील डिडक्टेड टॅक्सेस तुमच्या टॅक्सेबल इन्कम मध्ये जोडले जातात.

त्यामुळे असेसी जेव्हा त्यांच्या मालकीची प्रॉपर्टी विकण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते सेक्शन 80C अंतर्गत असलेले होम लोन्स वरील त्यांचे सर्व बेनिफिट्स सरेंडर करतात. 

[स्रोत]