डिजिट इन्शुरन्समध्ये स्विच करा

इन्शुरन्स मधील परिणामी नुकसान काय आहे?

बऱ्याच लोकांना या संकल्पनेविषयी माहिती नसल्यामुळे लोकांचा गोंधळ होतो तसेच एखादे क्लेम करतानाही त्रास होतो. म्हणून येथे आम्ही पुन्हा मूलभूत गोष्टी रिवाइंड करत आहोत आणि यावेळी आम्ही या सगळ्या गुंत्याचा तोडगा शोधण्यावर लक्ष देत आहोत. परिणामी नुकसान किंवा परिणामी लॉस म्हणजे काय?

परिणामी नुकसान म्हणजे, जेव्हा एखादी अनपेक्षित घटना इतर घटनांच्या मालिकेला कारणीभूत ठरते, तसेच जे नुकसान होते त्यात पहिल्या अनपेक्षित घटनेचा परिणाम किंवा परिणाम नसतो. कॉन्फ़्युज झालात ना?

चित्र स्पष्ट होण्यासाठी काही उदाहरणांसह समजून घ्या:

मोबाईलच्या बाबतीतले परिणामी नुकसान

एके दिवशी एका नवीन ग्राहकाचा फोन चोरीला गेल्यामुळे त्याला आमची आठवण आली. पण फोनपेक्षाही त्याला हनिमूनचे फोटो हरवल्याचे दु:ख होते.😞 आहा! आमचा मोबाईल इन्शुरन्स निश्चितपणे फोनच्या चोरीला कव्हर करतो परंतु त्याचा परिणाम म्हणून लोक काय गमावतात, उदाहरणार्थ त्यांचा डेटा, त्यांचे महत्त्वाचे कॉन्टॅक्ट नंबर किंवा मेमरी कार्डमधील इतर कोणतेही महत्त्वाची कागदपत्रे. त्यामुळे तुम्ही तुमच्या सर्व डेटा आणि कॉन्टॅक्ट नंबरचे नियमितपणे बॅकअप घेत असल्याची खात्री करा.

आपल्या सर्वांना माहित आहे की फोन चोरीला जाण्याची शक्यता असल्याने फोन मध्ये पासवर्ड ठेऊ नये, कारण आपल्याला सायबर फसवणूक होण्याचा धोका असू शकतो. परंतु तरीही बरेच लोक त्यांना सहज सापडण्याची कुठेतरी सेव्ह करून ठेवतात. पण आमच्यावर विश्वास ठेवा, चोर खूप हुशार असतात, त्यांचं तुमच्याकडे बारीक लक्ष असत.

त्यामुळे जर दुर्दैवाने, तुमचा फोन चोरीला गेला ( टचवुड) आणि तुमच्या खात्यांशी तडजोड झाली, तर तो परिणामी नुकसान इन्शुरन्स आहे. त्यामुळे, आजच तुम्ही हे तपशील तुमच्या फोनवरून पुसून टाकल्याची खात्री करा.

कारच्या बाबतीतले परिणामी नुकसान

कल्पना करा की तुम्ही मुंबईत आहात. खूप छान वातावरण आहे. तुमच्या गाडीने तुम्ही लवकर आणि सुरक्षित घरी पोहोचाल या ठाम विश्वासाने तुम्ही ऑफिसमधून लवकर निघता. अचानक, तुमच्या कारचा टायर फ्लॅट झाला. तुम्हाला वाटते की तुमच्याकडे स्टेपनी असल्याने काही मिनिटात हा प्रॉब्लेम सुटेल. तुमचं नशीब चांगलं नसेल आणि अचानक धो-धो पाऊस पडायला सुरवात झाली (मुंबईत, तुम्ही सांगू शकत नाही) आणि तुमच्या गाडीच्या इंजिनमध्ये पाणी जाऊन तुमचे नुकसान झाले, तर हे परिणामी नुकसान आहे.

तसेच, लोकांचा हे लक्षात घ्यायला हवे कि, तुमच्या गाडीच्या इंजिनचे नुकसान अपघाताने झाले असेल तरच सर्वसमावेशक कार इन्शुरन्स मध्ये ते समाविष्ट होते. त्यामुळे इंजिन संरक्षण कव्हर आवश्यक आहे.

तुमच्या कारचा अपघात होतो आणि कार जागेवरच थांबते. आता, कारला जवळच्या गॅरेजमध्ये नेले जाणे आवश्यक आहे. कार टोइंग करताना कामगारांच्या रफनेस मुले तुमच्या बोनेटवर परिणाम झाला किंवा ओरखडे पडले.

टोइंगमुळे होणारे नुकसान परिणामी नुकसानीखाली येईल आणि ते तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसी द्वारे कव्हर केले जाणार नाही. त्यामुळे, तुमच्या कारच्या खाली हुक गेल्यावर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

प्रवासाच्या बाबतीतले परिणामी नुकसान

तुम्ही अधिकृत सहलीसाठी बांधील आहात आणि दुर्दैवाने, तुमची फ्लाइट चुकली. तुमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला चुकवलेल्या फ्लाइटसाठी कव्हर करतो. पण समजा, तुमचं फ्लाईट मिस झाल्यामुळे तुमची मीटिंग रद्द झाली आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायाचे नुकसान झाले, तर ते परिणामी नुकसान होईल. आमच्या मते कनेक्टिंग फ्लाइट दरम्यान पुरेसा वेळ आहे जेणेकरून अशी परिस्थिती प्रथमतः उद्भवू नये.

मालमत्तेच्या बाबतीतले परिणामी नुकसान

तुमच्याकडे दुकानासाठी आणि सामग्रीसाठी दुकान इन्शुरन्स आहे. दुर्दैवाने, तुमच्या दुकानात आग लागली आहे (आम्ही आशा करतो की असे कधीही होणार नाही). परंतु तसे झाल्यास, तुमच्या दुकानाचे आणि सामग्रीचे नुकसान भरून काढले जाईल. पण तुमच्या दुकानाच्या नुकसानामुळे तुमच्या व्यवसायात होणाऱ्या तोट्यासाठी इन्शुरन्स कव्हर होत नाही. तुम्ही काय करू शकता ते म्हणजे तुमची पुस्तके क्लाउड ड्राईव्हवर देखील अपडेट करा जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर कृती करू शकता.

हा दिलासा देणारा लेख असू शकत नाही कारण तो तुम्हाला अशा परिस्थिती सांगतो ज्या चुकीच्या होऊ शकतात आणि जिथे कायद्यानुसार आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. परंतु हे नुकसान कमी करण्यासाठी आणि टाळण्यासाठी काय केले जाऊ शकते हे आम्ही तुम्हाला समजावून सांगू शकतो. शेवटी, आमचे जग तुमच्यासाठी गोष्टी पारदर्शक बनवण्याभोवती फिरते.

मी पाच वर्षांचा लहान मुलगा असल्याप्रमाणे समजावून सांगा

परिणामी नुकसान म्हणजे काय?

एक मुलगा आणि त्याची धाकटी बहीण पट्ट्यांच घर बनवायचं असं ठरवतात. ते पत्त्यांचा थर लावून एक सुंदर 2 मजली घर तयार करतात, घर तयार झालेलं बघून त्यांना खूप आनंद होतो. पण दुर्दैवाने, त्यांच्या चार्ली नावाच्या कुत्र्याचा खालच्या थराला धक्का लागतो आणि पूर्ण घर कोसळत!

चुकून एक कार्ड खाली पडल्याचा परिणाम म्हणून, इतर कार्डे देखील पडतात. हे इन्शुरन्स मधील परिणामी नुकसानीसारखे आहे.