डिजिट इन्शुरन्स करा

भारतीय पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

सौजन्य: अकबर ट्रॅव्हल्स

आपल्याकडे योग्य कागदपत्रांची चेकलिस्ट असल्यास भारतीय पासपोर्ट मिळविणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. अर्जदार पासपोर्ट सेवा पोर्टल द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात, कागदपत्रे अपलोड करू शकतात आणि पासपोर्ट मिळविण्यासाठी पुढील प्रक्रियेचे अनुसरण करू शकतात.

म्हणूनच, आम्ही नवीन, नुतनीकरण, प्रौढ, अल्पवयीन अशा विविध अर्ज निकषांखाली भारतीय पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी केली आहे.

प्रौढ आणि अल्पवयीन मुलांच्या नवीन पासपोर्ट अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

प्रौढ आणि अल्पवयीन मुलांच्या नवीन पासपोर्ट अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याचा तपशील येथे दिला आहे -

आवश्यक कागदपत्रे प्रौढ अल्पवयीन
ओळखीचा पुरावा नमूद केलेली कोणतीही कागदपत्रे - आधार कार्ड, मतदार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड, पालकांच्या पासपोर्टची प्रत त्यांनी स्वतः किंवा पालकांनी व्हेरीफाय केलेली
पत्ता पुरावा नमूद केलेली कोणतीही कागदपत्रे - आधार कार्ड, मतदार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, युटिलिटी बिल, भाडे करार, युटिलिटी बिल, लँडलाइन बिल, मोबाइल बिल, गॅस कनेक्शन पुरावा, चालू बँक खात्याचे पासबुक, कंपनीच्या लेटरहेडवर मालकाचे प्रमाणपत्र (नामांकित कंपनी असावी) चालू बँक खात्याचे पासबुक, वीज बिल, युटिलिटी बिल, भाडे करार, युटिलिटी बिल, लँडलाइन बिल, मोबाइल बिल, गॅस कनेक्शन पुराव्यासह पालकांचा सध्याचा पत्ता पुरावा
वयाचा पुरावा कोणत्याही अनाथाश्रमाने दिलेला जाहीरनामा, शाळा सोडल्याचा दाखला, सार्वजनिक जीवन विमा कंपनीने जारी केलेले पॉलिसी बॉण्ड जिथे पॉलिसीधारकाची जन्मतारीख नमूद आहे. महापालिकेने दिलेला जन्मदाखला, अर्जदाराच्या जन्मतारखेची पुष्टी करणारा अधिकृत लेटरहेडवर कोणत्याही अनाथाश्रमाने दिलेला जाहीरनामा, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक परिक्षेची गुणपत्रिका, सार्वजनिक जीवन विमा कंपनीने जारी केलेले पॉलिसी बॉण्ड जिथे पॉलिसीधारकाची जन्मतारीख नमूद केलेली असते.
इतर कागदपत्रे इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर, शैक्षणिक प्रमाणपत्र, जोडीदार पासपोर्ट प्रत (पासपोर्टचे पहिले आणि शेवटचे पान जिथे अर्जदाराचे पती-पत्नी म्हणून नाव नमूद आहे) लागू नाही
सामान्यत, पासपोर्ट अर्ज किंवा नुतनीकरणासाठी कोणत्याही शैक्षणिक कागदपत्रांची आवश्यकता नसते.

पासपोर्ट नुतनीकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट नुतनीकरण करण्यासाठी अनिवार्य कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत -

  • जुन्या पासपोर्टच्या पहिल्या आणि शेवटच्या दोन पानांची सेल्फ-अटेस्टेड कॉपी
  • इसीआर आणि नॉन-इसीआर पाने
  • वैधता एक्स्टेंशनचे पान
  • निरीक्षणाचे पृष्ठ
  • एनओसी किंवा पूर्वसूचना पत्र
  • मूळ जुना पासपोर्ट.

अल्पवयीन मुलांच्या बाबतीत पासपोर्ट नुतनीकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे प्रौढांसारखीच असतात; मात्र, कागदपत्रे पालकांकडून व्हेरीफाय केली जाऊ शकतात.

पासपोर्ट नुतनीकरण करण्याच्या कागदपत्रांबरोबरच, नुतनीकरण करण्याच्या अर्जाच्या विशिष्ट प्रकरणांसाठी इतर काही कागदपत्रे देखील आवश्यक आहेत. ती पुढीलप्रमाणे -

नुतनीकरण करण्याचे कारण आवश्यक कागदपत्रे
अल्प वैधता असलेल्याची वैधता वाढवणे अल्प वैधता पासपोर्टचे कारण दूर करणारी कागदपत्रे
पासपोर्ट हरवला किंवा चोरीला गेला जन्म तारखेचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट हरविण्या संदर्भातील मूळ पोलिस अहवाल, पासपोर्ट कुठे आणि कसा हरवला किंवा खराब झाला हे सांगणारे प्रतिज्ञापत्र, एनओसी किंवा पूर्वसूचना पत्र
वाचनीय नाव, पासपोर्ट क्रमांक आणि छायाचित्रे असलेला पण खराब झालेला पासपोर्ट जन्म तारखेचा पुरावा, पासपोर्ट कुठे आणि कसा हरवला किंवा खराब झाला हे सांगणारे प्रतिज्ञापत्र
दिसण्यात बदल सध्याचे स्वरूप दाखवणारा अर्जदाराचा नुकताच काढलेला फोटो
नावात बदल नवीन ओळखपत्र आणि नाव बदलाचे प्रमाणपत्र, नाव बदलण्यासंदर्भातील गॅझेट अधिसूचना
जन्म तारखेमधील बदल नवीन जन्म तारखेचा पुरावा
पत्त्यात बदल सध्याच्या पत्त्याचा पुरावा
इसीआर हटवणे कोणत्याही नॉन-इसीआर श्रेणीचा पुरावा
जन्मस्थान बदल (राज्य किंवा देशाचा समावेश) जन्मस्थळाचा पुरावा, जन्मस्थान बदलण्याचे कारण सांगणारे प्रतिज्ञापत्र, जन्म तारीखेत 2 वर्षांहून अधिक बदल असल्यास प्रथम श्रेणी दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून आदेश, किंवा राज्य किंवा देश, एमएचए प्रमाणित नागरिकत्व प्रमाणपत्र.
जन्मस्थान बदल (राज्य किंवा देशाचा समावेश नाही) जन्मस्थळाचा पुरावा, जन्मस्थान बदलण्याचे कारण सांगणारे प्रतिज्ञापत्र
लिंग बदल लिंग बदलाचे प्रतिज्ञापत्र, अर्जदाराने लिंग परिवर्तनासाठी ज्या रुग्णालयात शस्त्रक्रिया केली आहे त्या रुग्णालयाचे लिंग बदल यशस्वी झाल्याचे प्रमाणपत्र
पालकांच्या नावात बदल ज्या पालकांचे नाव समाविष्ट करायचे आहे, त्यांचे पासपोर्ट, सर्व्हिस रेकॉर्ड किंवा पालकांनी नाव बदलल्याचे सिद्ध करणारी मालमत्तेची कागदपत्रे, पालक मृत असल्यास त्यांनी नाव बदलले हे दाखवणारा पुरावा आवश्यक आहे.

पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी किंवा विशिष्ट निकषांखाली नुतनीकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट सेवेच्या वेबसाइट वर नमूद केली जातात. वर नमूद केलेल्या तपशीलांव्यतिरिक्त, अर्जदारांनी पुढे जाऊन नकार टाळण्यासाठी अपलोड करण्यापूर्वी पोर्टल तपासावे.

पासपोर्ट अपॉइंटमेंटसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

पासपोर्ट सेवा केंद्र कार्यालयात जाताना अर्जदारांना पासपोर्ट अपॉइंटमेंटसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची सेल्फ-अटेस्टेड हार्ड कॉपी सोबत ठेवावी. त्यासोबत खालील कागदपत्रे आवश्यक आहेत -

  • अर्जाचा एआरएन नंबर.

  • पासपोर्टसाठी अर्ज आणि अपॉइंटमेंटसाठी पेमेंटची पावती.

  • अपॉइंटमेंट पुष्टीच्या पावतीची प्रिंटआऊट घ्या.

पासपोर्ट कार्यालयात आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास काय करावे?

नवीन पासपोर्ट किंवा नुतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. आवश्यक कागदपत्रांच्या प्रत्येक श्रेणीअंतर्गत अनेक पर्याय आहेत. अर्जदाराला प्रत्येक श्रेणीअंतर्गत किमान एक कागदपत्रे द्यावी लागतात.

अर्ज करताना भारतीय पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्याने संपूर्ण प्रक्रिया सुरळीत होते. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी पासपोर्ट सेवेच्या वेबसाइट वर दिलेल्या सूचना वाचाव्यात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पासपोर्ट अर्जासाठी शैक्षणिक प्रमाणपत्र बंधनकारक आहे का?

नाही, नवीन पासपोर्टसाठी कागदपत्र म्हणून शैक्षणिक प्रमाणपत्र आवश्यक नाही. हे फक्त वयाचा पुरावा म्हणून आवश्यक आहे; मात्र, जन्माचा दाखला, सार्वजनिक जीवन विमा कंपनीने जारी केलेले पॉलिसी बॉण्ड, जिथे पॉलिसीधारकाची जन्मतारीख नमूद आहे, इत्यादी वयाचा पुरावा म्हणून इतर तपशील सादर करू शकता.

पासपोर्ट अर्जासाठी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे का?

पीएसके मध्ये सर्व मूळ कागदपत्रे बाळगणे आवश्यक आहे. मात्र मूळ कागदपत्रे अर्जदाराला परत केली जातात. पासपोर्टसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या यादीनुसार अर्जासोबत सॉफ्ट कॉपी अपलोड करणे आवश्यक असते.

 

अर्जदाराच्या वतीने पासपोर्ट अर्जासाठी पीएसके मध्ये इतर कोणी कागदपत्रे सादर करू शकेल का?

नाही, अर्जदाराला अपॉइंटमेंटसाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे लागेल आणि पासपोर्ट अर्जासाठी कागदपत्रे सादर करावी लागतील. अर्जदाराच्या वतीने अन्य कोणीही ते सादर करू शकत नाही.