डिजिट इन्शुरन्स करा

पासपोर्ट स्थिती कशी तपासायची: ऑनलाइन आणि ऑफलाइन

(स्रोत: Financialexpress)

तुम्ही नवीन पासपोर्टसाठी अर्ज केला आहे का? 

असल्यास, तुम्ही तुमच्या पासपोर्ट अर्जाची स्थिती ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तपासू शकता. शिवाय, तुम्ही mPassport Seva अॅप देखील डाउनलोड करून वेबसाइटवर लॉग इन न करता पासपोर्ट स्थिती तपासू शकता. आपण ते कसे करू शकता, हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा

पासपोर्ट अर्जाची स्थिती कशी तपासायची?

तुम्हाला आवश्यक असलेला पासपोर्ट अर्ज क्रमांक तपासा -  

  • तुमच्या पासपोर्टचा फाइल क्रमांक (हा 15-अंकी क्रमांक आहे, जो तुम्हाला पासपोर्ट अर्ज सबमिट केल्यानंतर मिळतो).

  • तुमची जन्मतारीख.

आता, तुम्ही पासपोर्ट अर्जाची स्थिती ऑनलाइन आणि ऑफलाइन कशी तपासू शकता? यावर एक नजर टाका:

पासपोर्ट स्टेटसचा ऑनलाइन मागोवा कसा घ्यावा?

"पासपोर्टची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची?" हे तुम्ही इंटरनेटवर शोधताय? मग तुमचा शोध संपवा, आणि या सोप्या स्टेप्स फॉलो करा:

  • स्टेप 1: "पासपोर्ट सेवा" च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, आणि "ट्रॅक अॅप्लिकेशन स्टेटस" टॅबवर क्लिक करा.

  • स्टेप 2: पेज "ट्रॅक अॅप्लिकेशन स्थिती" वर रिडिरेक्ट करते.

  • स्टेप 3: येथे, तुमचा अर्ज प्रकार निवडा.  तसेच, तुमची जन्मतारीख आणि 15-अंकी फाइल क्रमांक टाका. "ट्रॅक स्टेटस" वर क्लिक करा.

पुढील पेज तुमची वर्तमान पासपोर्ट अर्ज स्थिती दाखवेल

पासपोर्ट स्टेटस ऑफलाइन कसा ट्रॅक करावा?

खालील पद्धतींनी पासपोर्ट अर्जाची स्थिती ऑफलाइन ट्रॅक करा:

  • SMS: तुम्ही तुमच्या फोनवरच तुमच्या पासपोर्ट अर्जाच्या स्थितीबद्दल अपडेट मिळवू शकता.  तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9704100100 वर "STATUS FILE NUMBER" पाठवा.  तुम्ही तुमचा अर्ज भरतानाच या सशुल्क एसएमएस सेवेची निवड करू शकता.

  • नॅशनल कॉल सेंटर: तुम्ही नॅशनल कॉल सेंटरच्या टोल-फ्री नंबर 1800-258-1800 वर कॉल करू शकता.  इथे नागरिक सेवा एक्झिक्युटिव्ह सकाळी 8:00 ते रात्री 10:00 पर्यंत उपलब्ध असतात.  ऑटोमेटेड इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स देखील 24/7 उपलब्ध आहे.  त्यामुळे, तुम्ही तुमच्या पासपोर्ट अर्जाच्या स्थितीशी संबंधित माहितीवर केव्हाही माहिती मिळवू शकता.

कृपया लक्षात ठेवा: जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्य राज्यांतील रहिवासी खालील संपर्क ठिकाणी संपर्क करू  शकतात. 

J&K - 040-66720567 (सशुल्क)

ईशान्य राज्ये - 040-66720581 (सशुल्क)

  • हेल्पडेस्क: पासपोर्ट सेवा केंद्राला भेट द्या, किंवा तुमच्या पासपोर्टच्या अर्जाच्या स्थितीबद्दल अपडेट मिळवण्यासाठी ईमेल पाठवा.

पासपोर्ट सेवा अॅप वापरून पासपोर्ट अर्जाची स्थिती कशी ट्रॅक करावी?

mPassport Seva अॅप एक मोबाइल अॅप्लिकेशन आहे, ज्यावर अर्जदार सहजपणे पासपोर्ट अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतो. याशिवाय, तुम्ही इतर सेवांमध्ये प्रवेश करू शकता. जसे की, नोंदणी आणि भेटीचे वेळापत्रक. हे मोबाइल अॅप्लिकेशन Android आणि iOS दोन्ही मोबाइलमध्ये उपलब्ध आहे.

या अर्जावर पासपोर्ट स्थिती कशी तपासावी? हे जाणून घेऊया:

  • स्टेप 1: Google Play Store किंवा Apple App Store वरून mPassport सेवा अॅप्लिकेशन  डाउनलोड करा.

  • स्टेप 2: आपले नाव, ईमेल पत्ता आणि जन्मतारीख भरून नोंदणी करा.

  • स्टेप 3: "स्टेटस ट्रॅकर" निवडा.  पासपोर्ट अर्जाची स्थिती तपासण्यासाठी 15-अंकी फाइल क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.  

पासपोर्ट डिस्पॅच आणि डिलिव्हरीचा ट्रॅक कसा ठेवावा?

एकदा तुम्हाला पासपोर्ट स्थितीचा मागोवा कसा घ्यायचा? हे कळल्यानंतर, त्याची डिलिव्हरी स्थिती कशी ट्रॅक करायची, ते देखील शिका.

भारतीय स्पीड पोस्ट सहसा अर्जदाराचा पासपोर्ट वर्तमान पत्त्यावर पाठवते (पासपोर्ट अर्जात नमूद केल्याप्रमाणे). स्पीड पोस्ट-ट्रॅकिंग युटिलिटी वापरून तुमच्या पासपोर्ट डिलिव्हरी स्थितीचा ट्रॅक ठेवा.

बर्‍याचदा, ऑनलाइन डिलिव्हरी स्थिती वास्तविक डिलिव्हरी स्थितीपेक्षा भिन्न असते. त्यामुळे, याबाबत तुमच्या जवळच्या स्पीड पोस्ट केंद्राशी संपर्क साधणे योग्य आहे. स्पीड पोस्ट सेंटरचा कर्मचारी तुमचा पत्ता शोधू शकत नसल्यास, तो पार्सल सेंडरला परत पाठवतो. अशा परिस्थितीत, पुढील मदतीसाठी कृपया तुमच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाशी संपर्क साधा.

तुमच्या पासपोर्टची डिस्पॅच आणि डिलिव्हरीची स्थिती तपासण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा -

  • स्टेप 1: पासपोर्ट सेवे च्या अधिकृत वेबसाइटवरून ट्रॅकिंग अर्जाच्या स्थितीवरून 13-अंकी ट्रॅकिंग क्रमांक मिळवा.

  • स्टेप 2: इंडिया पोस्ट च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • स्टेप 3: वेबसाइटवर उपलब्ध साधनांवर क्लिक करा आणि "ट्रॅक कन्साइनमेंट" वर नेव्हिगेट करा.  "कन्साइनमेंट नंबर" विभागात 13-अंकी ट्रॅकिंग क्रमांक प्रविष्ट करा.  त्यानंतर, "सर्च" वर क्लिक करा.

तुम्हाला कोणताही डिलिव्हरी ट्रॅकिंग डेटा दिसत नसल्यास, याचा अर्थ तुमचा पासपोर्ट पाठवला गेला नाही.

इंडिया पोस्ट SMS सेवा

तुम्ही भारतीय पोस्टच्या SMS सेवेद्वारे तुमच्या पासपोर्टची डिलिव्हरी स्थिती देखील ट्रॅक करू शकता. तुमचा 13-अंकी ट्रॅकिंग नंबर POST TRACK <तुमचा 13-अंकी ट्रॅकिंग नंबर> या फॉरमॅटमध्ये 166 किंवा 51969 वर पाठवा

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातून पासपोर्ट मिळवा

आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातून पासपोर्ट मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुम्ही पासपोर्ट तातडीने मिळवण्यासाठी त्याबाबत कारण देणारा अर्ज भरला पाहिजे. प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी त्यांच्या कार्यालयातून वैयक्तिकरित्या पासपोर्ट देण्यासाठी तुमचा अर्ज स्वीकारू किंवा नाकारू शकतात.

पासपोर्ट हे ओळख आणि वयाचा पुरावा म्हणून काम करणारा एक आवश्यक दस्तऐवज आहे. त्यामुळे त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करणे महत्त्वाचे आहे. शिवाय, तुम्ही पासपोर्ट अर्जाची स्थिती ऑनलाइन देखील ट्रॅक करू शकता. तुम्ही त्रासमुक्त अनुभवासाठी पासपोर्ट स्थिती तपासता, तेव्हा हे पॉइंटर्स लक्षात ठेवा.

पासपोर्ट स्थिती तपासण्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुम्ही प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातून वैयक्तिकरित्या पासपोर्ट घेऊ शकता का?

नाही, तुम्हाला प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातून पासपोर्ट घेण्यासाठी परवानगी नाही.

पासपोर्ट अर्जाची स्थिती तपासण्यासाठी नॅशनल कॉल सेंटरशी संपर्क साधताना तुम्हाला कोणती माहिती द्यावी लागेल?

पासपोर्ट अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला फाईल क्रमांक आणि जन्मतारीख नॅशनल कॉल सेंटरशी संपर्क केल्यानंतर एक्झिक्युटिव्हला देणे आवश्यक आहे.

माझ्या पासपोर्टची स्थिती तपासण्यासाठी मी माझा मोबाइल नंबर कसा वापरू शकतो?

तुमच्या पासपोर्टची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर 9704100100 वर SMS पाठवण्यासाठी वापरू शकता. SMS पाठवताना, तुम्ही 15-अंकी अल्फान्यूमेरिक फाइल क्रमांक समाविष्ट केला पाहिजे, जो पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पासपोर्ट कॅम्पमध्ये पासपोर्ट अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर तयार होतो.

नॅशनल कॉल सेंटर 24 तास ग्राहकांना मदत करते का?

वापरकर्त्यांना आठवड्याच्या प्रत्येक दिवशी सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत या सेवेचा वापर करता येतो. ग्राहक काहीवेळा त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी स्वयंचलित आयव्हीआरएस (IVRS) वापरू शकतात.