दुहेरी नागरिकत्व म्हणजे काय आणि ते कसे काम करते?
दुहेरी नागरिकत्व याविषयी कधी ऐकले आहे का? (Ever heard of dual citizenship?) या सुविधेमुळे तुम्ही दोन देशांचे नागरिक बनू शकता आणि एकाच वेळी दोन्ही देशाचे नागरिकत्व मिळवता येते.
मात्र, प्रत्येक देश दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत नाही. देशानुसार नियम बदलू शकतात.
पण, भारताचे काय?
भारतातील दुहेरी नागरिकत्वाचे नियम आणि त्याचे विविध घटक जाणून घेण्यासाठी वाचत रहा.
दुहेरी नागरिकत्व म्हणजे काय?
दुहेरी नागरिकत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त देशांचे राष्ट्रीयत्व असू शकते. यामुळे व्यक्तीला देशातील विशेष अधिकारी आणि फायदे मिळतात. उदाहरणार्थ, तुम्ही दुहेरी किंवा एकाधिक नागरिकत्व असलेल्या दोन्ही देशांमध्ये काम करू शकता, अभ्यास करू शकता आणि राहू शकता.
याशिवाय, तुम्हाला शिक्षण, आरोग्यसेवा, सामाजिक सुरक्षा इत्यादी विशेषाधिकार मिळतात.
दुहेरी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींकडे एकाधिक पासपोर्ट्स असू शकतात, ज्यामुळे त्यांना सहज प्रवास करता येतो. याव्यतिरिक्त, ते बहुतेक देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात.
जर तुम्ही विचार करत असाल की भारतीयांनाही दुहेरी नागरिकत्व मिळू शकते का तर आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर खाली दिले आहे.
भारतात दुहेरी नागरिकत्वाला परवानगी आहे का?
भारतीय संविधानात दुहेरी किंवा अनेक नागरिकत्वाबाबत कोणतीही तरतूद नाही. मात्र भारतीय व्यक्ती एखाद्या निवडक देशाचा दुसरा पासपोर्ट घेऊ शकते. पण यासाठी त्यांना भारतीय नागरिकत्व गमवावे लागते.
1967 च्या पासपोर्ट कायद्यानुसार प्रत्येक भारतीय रहिवाशाला दुसर्या देशाचे राष्ट्रीयत्व प्राप्त केल्यानंतर जवळच्या दूतावासात पासपोर्ट जमा करणे अनिवार्य आहे.
परदेशी नागरिकत्व मिळाल्यानंतर भारतीयांना ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया (ओसीआय) दर्जा मिळवावा लागतो.
दुहेरी नागरिकत्वासाठी खालील काही गोष्टी आवश्यक आहेत-
- अनुच्छेद 5, 6 आणि 8 नुसार स्वेच्छेने परदेशी राज्याचे नागरिकत्व शोधणाऱ्या व्यक्तींचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येईल. 
- या व्यक्तींबाबत त्याने/तिने ज्या देशात नागरिकत्वाची विनंती केली आहे त्या परदेशी राज्याचे राष्ट्रीयत्व गृहीत धरले जाईल. 
- व्यक्तींनी त्यांचा भारतीय पासपोर्ट आणि भारतीय नागरिकत्व प्रस्थापित करणारी इतर कागदपत्रेही जवळच्या भारतीय दूतावासात जमा करणे आवश्यक आहे. 
भारतात दुहेरी नागरिकत्वासाठी कोणत्याही तरतुदी नसल्या तरी, व्यक्ती OCI कार्ड निवडू शकतात. यामुळे अनेक फायदे आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे.
दुहेरी नागरिकत्वाचे फायदे काय आहेत?
दुहेरी नागरिकत्व किंवा OCI असलेल्या व्यक्ती खालील लाभ घेऊ शकतात जसे की-
- भारतामध्ये आणि निवडलेल्या देशात अनिश्चित काळ राहण्यासाठी, काम करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठीचे स्वातंत्र्य 
- मल्टिपल एंट्री लाइफ-लाँग व्हिसाज 
- ते मालमत्ता आणि जमिनीचे मालक बनू शकतात 
- रजिस्टर्ड OCI ना भारतातील वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांना भेट देण्यासाठी देशी भारतीय रहिवाशांप्रमाणेच प्रवेश शुल्क आकारले जाईल 
- ऑल इंडिया प्री-मेडिकल टेस्ट किंवा इतर टेस्ट्सना बसण्यासाठी अनिवासी भारतीयांसारखेच नियम लागू होतील. त्यामुळे, ते संबंधित कायद्यातील तरतुदींनुसारच प्रवेशासाठी पात्र आहेत. 
- व्यक्तींकडे एकाधिक पासपोर्ट असू शकतात. 
- इतर देशाचा पासपोर्ट मूळ देशापेक्षा स्ट्रॉंग असल्यास “आगमनावर व्हिसा” मिळू शकतो. 
- दुसर्या देशामध्ये कोणतीही गोंधळाची परिस्थिती असल्यास दुसर्या पासपोर्टसह, एखाद्या देशाचे नागरिकत्व असलेल्या त्या देशात स्थलांतरित होऊ शकता. 
परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यानंतर व्यक्ती भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. मात्र, हा घटक अद्ययावत अटी आणि नियमांवर अवलंबून असतो.
आता भारतात दुहेरी नागरिकत्व मिळवण्याची पात्रता तपासूया.
दुहेरी नागरिकत्व मिळविण्यासाठी कोण पात्र आहे?
दुहेरी नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी काही निकष तपासायला हवेत. पात्रता निकष देशानुसार बदलू शकतात.
भारतीय नागरिकत्वाच्या बाबतीत, अर्जदारांनी नमूद केलेल्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- साधारणपणे भारतात किमान सात वर्षे वास्तव्यानंतर ती व्यक्ती भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकते. 
- भारतीय नागरिकाशी विवाह केलेली व्यक्ती देखील भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकते. 
- भारतीय नागरिकत्व असलेल्या पालकांसह प्रौढ व्यक्ती भारतीय नागरिकत्वासाठी पात्र आहे. मात्र, त्यांनी भारतात किमान एक वर्ष वास्तव्य केले पाहिजे. 
- अल्पवयीन मुले ज्यांचे पालक दोन्ही भारतीय नागरिक आहेत किंवा त्यांच्यापैकी एक भारतीय नागरिक आहे. 
- पाच वर्षांसाठी भारतात परदेशी नागरिक म्हणून नोंदणी केलेली व्यक्ती. 
- 26.01.1950 रोजी भारतीय रहिवासी होण्यास पात्र असलेले परदेशी नागरिक किंवा 26.01.1950 नंतर किंवा कोणत्याही वेळी भारताचे नागरिक होते किंवा 15.08.1947 नंतर भारताचा भाग बनलेल्या प्रदेशाचे नागरिक असलेली व्यक्ती. 
दुहेरी नागरिकत्वासाठी अर्ज कसा करावा?
दुहेरी नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील देशानुसार बदलते. उदाहरणार्थ, युनायटेड स्टेट्समध्ये दुहेरी नागरिकत्व दाखल करण्यासाठी एक अर्ज उपलब्ध आहे.
यूएस नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देशाच्या दूतावास किंवा एम्बसीशी संपर्क साधण्याची आवश्यकता आहे. सर्वप्रथम दुहेरी नागरिकत्व असलेले देश कोणते हे शोधणे महत्त्वाचे आहे. अर्जात एक किरकोळ चूक झाल्यास तुम्हाला समजणारही नाही पण त्यातून तुम्ही राहत्या देशाचे नागरिकत्व गमावू शकता.
मात्र, तुम्ही OCI कार्ड निवडल्यास त्याचा ऑनलाइन अर्ज करून कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक आहे.
भारतात दुहेरी नागरिकत्वासाठी अर्ज कसा करायचा याचा विचार करत असलेल्या व्यक्ती पर्यायी OCI कार्डसाठी अर्ज कसा करू शकतात हे पाहूया-
- ऑनलाइन OCI सेवांसाठी website भेट द्या आणि स्वतःची नोंदणी करा. 
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक पात्रता आणि कागदपत्रांची यादी पाहूया. 
- फॉर्म भरण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी "ऑनलाइन अर्ज करा" पर्यायावर क्लिक करा. 
ITAR क्रमांकासह भरलेल्या अर्जाच्या दोन प्रिंटआउट्स घ्या. उदाहरणार्थ, हा नंबर यासारखा दिसतो - ITAR00000511
भारतातील दुहेरी नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
OCI कार्डसाठी अर्ज करताना व्यक्तींनी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे -
- सध्याच्या नागरिकत्वाचा पुरावा 
- मूळ पासपोर्टसह रद्द केलेल्या भारतीय पासपोर्टची प्रत. या पासपोर्टवर ड्रिल स्टॅम्प असणे आवश्यक आहे. 
- जर आई-वडील/आजी-आजोबा यांचे मूळ भारतीय असल्याचा दावा ओसीआयसाठी आधार म्हणून केला असेल तर त्या नात्यांचा पुरावा. 
- वास्तव्याचा पुरावा 
- अर्जदाराच्या वर्तमान आणि पूर्वीच्या जॉब प्रोफाइलचे तपशील 
- पीआयओ कार्डधारकांनी त्यांच्या कार्डची प्रत सादर करणे आवश्यक आहे 
- सबमिट केलेल्या फोटोंचा बॅकग्राउंड पांढरा सोडून इतर कुठल्याही हलक्या रंगाचा असणे आवश्यक आहे. 
अल्पवयीन मुलांच्या बाबतीत, पुढील कागदपत्रे अनिवार्य आहेत:
- पालकांच्या पासपोर्टची प्रत किंवा डोमिसाइल प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला. 
- जन्मदाखल्याचे प्रमाणपत्र. 
- जर पालकांचा घटस्फोट झाला असेल, तर विवाह विघटन करण्याचा न्यायालयाचा आदेशावर मुलाची कस्टडी ओसीआय कार्ड असलेल्या पालकांना दिल्याचे नमूद असावे. 
आता अर्जदारांना विना कटकट दुहेरी नागरिकत्वाची परवानगी देणारे देश कोणते हे पाहूया.
कोणत्या देशांनी दुहेरी नागरिकत्वाचे धोरण स्वीकारले आहे?
दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देणार्या काही देशांची यादी-
| देशाचे नाव | देशाचे नाव | देशाचे नाव | 
| अल्बेनिया | द गॅम्बिया | पॅराग्वे | 
| अल्जेरिया | जर्मनी | पेरू | 
| अमेरिकन सामोआ | घाना | फिलीपिन्स | 
| अंगोला | ग्रीस | पोलंड | 
| अँटिग्वा आणि बारबुडा | ग्रेनेडा | पोर्तुगाल | 
| अर्जेंटिना | ग्वाटेमाला | रोमानिया | 
| ऑस्ट्रेलिया | गिनी-बिसाऊ | रशिया | 
| आर्मेनिया | हैती | सेंट किट्स आणि नेव्हस | 
| बार्बाडोस | होंडुरास | सेंट लुसिया | 
| ब्राझील | हाँगकाँग | सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स | 
| बेल्जियम | हंगेरी | सामोआ | 
| बेलीज | आइसलँड | स्कॉटलँड | 
| बेनिन | इराक | सर्बिया | 
| बोलिव्हिया | आयर्लंड | सेशेल्स | 
| बोस्निया आणि हर्जेगोविना | इस्रायल | सिएरा लिओनी | 
| बल्गेरिया | इटली | स्लोव्हेनिया | 
| बुर्किना फासो | जमैका | सोमालिया | 
| बुरुंडी | जॉर्डन | दक्षिण आफ्रिका | 
| कंबोडिया | केनिया | सुदान | 
| चेक रिपब्लिक | दक्षिण कोरिया | दक्षिण सुदान | 
| कॅनडा | कोसोवो | स्पेन | 
| केप वर्दी | किर्गिझस्तान | श्रीलंका | 
| सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक | लाट्विया | स्वीडन | 
| चिली | लेबनॉन | स्वित्झर्लंड | 
| कोलंबिया | लिथुआनिया | सीरिया | 
| कोमोरोस | लक्झेंबर्ग | तैवान | 
| रिपब्लिक ऑफ काँगो | मकाऊ | ताजिकिस्तान | 
| कोस्टा रिका | मॅसेडोनिया | थायलंड | 
| आयव्हरी कोस्ट | माली | तिबेट | 
| क्रोएशिया | माल्टा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | 
| सायप्रस | मॉरिशस | ट्युनिशिया | 
| डेन्मार्क | मेक्सिको | टर्की | 
| जिबूती | मल्दोव्हा | युगांडा | 
| डोमिनिका | मोरोक्को | युनायटेड किंगडम | 
| डोमिनिकन रिपब्लीक | नामिबिया | युनाइटेड स्टेट्स | 
| पूर्व तिमोर | नौरू | उरुग्वे | 
| इक्वेडोर | न्युझीलँड | व्हॅटिकन सिटी | 
| इजिप्त | निकाराग्वा | व्हेनेझुएला | 
| एल सॅल्व्हाडोर | नायजर | व्हिएतनाम | 
| इक्वेटोरियल गिनी | नायजेरिया | ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स | 
| फिजी | पाकिस्तान | येमेन | 
| फिनलंड | पनामा | झांबिया | 
| फ्रान्स | पापुआ न्यू गिनी | झिंबाब्वे | 
दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न
दुहेरी नागरिकत्वाचा तोटा काय?
दुहेरी नागरिकत्व मिळविण्यासाठी तुम्हाला दुहेरी कर भरावा लागेल आणि वेळखाऊ तसेच महागड्या प्रक्रियेतून जावे लागेल.
दुहेरी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींना दोन्ही देशांमध्ये कर भरण्याची गरज आहे का?
होय, दुहेरी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींना त्यांचे उत्पन्न असलेल्या देशाला कर भरावा लागतो. मात्र, काही देश दुहेरी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींना प्रोत्साहनासाठी नागरिकांचे कर दायित्व रद्द करतात.
कोणते देश वंशाच्या आधारावर दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देतात?
बल्गेरिया, क्रोएशिया, कंबोडिया, हाँगकाँग, नेदरलँड आणि दक्षिण कोरिया हे काही देश आहेत जे वंशाच्या आधारावर दुहेरी नागरिकत्वाची परवानगी देतात. त्यामुळे, तुमच्याकडे या देशांतील तुमच्या पूर्वजांच्या नागरिकत्वाचा वैध पुरावा असल्यास, तुम्हाला दुहेरी नागरिकत्व मिळेल.