डिजिट इन्शुरन्स करा

पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव कसे जोडायचे?

स्रोत: siasat

ऑनलाइन फॉर्म सबमिशन सुविधा सुरू केल्यामुळे, पासपोर्टसाठी अर्ज करण्याची किंवा पुन्हा जारी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे.

पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव कसे जोडायचे, या संबंधी सविस्तर माहिती मिळवा.

लक्षात ठेवा, तुम्हाला अर्ज करण्यासाठी संबंधित कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे.

पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव जोडण्याची किंवा बदलण्याची प्रक्रिया

तुम्हाला पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव जोडण्यासाठी किंवा बदलण्यासाठी,तसेच पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज करावा लागेल.

तुम्ही दोन मार्गाने ही प्रक्रिया करू शकता-

  • ऑनलाइन फॉर्म सबमिशन

  • ई-फॉर्म सबमिशन.

ऑनलाइन फॉर्म सबमिशन करण्याची प्रक्रिया

लग्नानंतर पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव जोडण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिशनची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे -

1. पासपोर्ट सेवेला भेट द्या ऑनलाइन पोर्टल आणि स्वतःचे नाव नोंदवा.

2. आता, तुमचा लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करा, आणि जोडीदाराचे नाव जोडण्यासाठी पासपोर्टच्या “अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट/री-इश्यू” वर क्लिक करा.

3. सर्व संबंधित तपशील सादर करून 'सबमिट' वर क्लिक करा.

4. नंतर, अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी “पे आणि शेड्यूल अपॉइंटमेंट” वर क्लिक करा.

5. पेमेंट पेजवरील एसबीआय चलन, इंटरनेट बँकिंग आणि डेबिट/क्रेडिट कार्ड या पर्यायांमधून पेमेंट मोड निवडा आणि फी भरा. PO/POPSK/PSK मधील अपॉइंटमेंटसाठी आधीचे ऑनलाइन चार्जेस भरणे अनिवार्य आहे.

6. “प्रिंट अ‍ॅप्लिकेशन रिसिप्ट” वर क्लिक करा.  या पावतीमध्ये खालील तपशीलांचा समावेश आहे:

  • अपॉइंटमेंट नंबर

  • अ‍ॅप्लिकेशन रेफरंस नंबर 

ऑफलाइन फॉर्म सबमिशनची प्रक्रिया

पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव जोडण्यासाठी लागणारी ई-फॉर्म सबमिशन प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे - 

1. पासपोर्ट सेवा केंद्राच्या  वेबसाईट वरून XML स्वरूपात ई-फॉर्म डाउनलोड करा, आणि आवश्यक तपशीलांसह भरा.

2. पोर्टलवर लॉग इन करा, आणि ही XML फाईल अपलोड करा.

3. ऑनलाइन प्रक्रियेमध्ये सांगितल्याप्रमाणे पेमेंट पेजवरून पूर्ण पेमेंट करा. तसेच, वर नमूद केलेल्या पद्धतीने तुमची पेमेंट पावती डाउनलोड करा.

तुमच्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन सबमिशननंतर तुम्हाला अपॉइंटमेंट तपशीलांसह एक SMS प्राप्त होईल. अंतिम प्रक्रियेसाठी, तुम्हाला ओरिजिनल कागदपत्रांसह तुमच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला भेट द्यावी लागेल.

म्हणून, पासपोर्टमध्ये आपल्या पतीचे नाव जोडण्यासाठी वरील सूचना लक्षात ठेवा.

तुमच्या पासपोर्टमध्ये पत्नीचे नाव जोडण्यासाठीसुद्धा त्याच स्टेप कराव्या लागतात.

पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव जोडण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव जोडण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत -

  • ओरिजिनल पासपोर्ट.

  • तुमच्या पासपोर्टच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची प्रत.

  • निरीक्षण पृष्ठ.

  • ECR किंवा Non-ECR पेज.

  • कमी वैधता पासपोर्टसाठी, तुम्हाला वैधता संबंधित पेज देखील सबमिट करावे लागेल.

पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव बदलण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया सारखीच आहे.

पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव जोडण्यासाठी लागणारी फी:

 

पासपोर्टमध्‍ये जोडीदाराचे नाव बदलण्‍यासाठी घेण्यात येणाऱ्या फी बद्दल ची माहिती पुढीलप्रमाणे -

 

घटक उप-घटक फी
कॉन्सुलर फी पासपोर्ट फी प्रौढ लागू श्रेणीनुसार
कॉन्सुलर फी भारतीय समुदाय कल्याण निधी 221 रुपये
CKGS फी CKGS सेवा फी प्रति अर्ज ₹ 1470
CKGS फी पर्यायी शुल्क (फी) कुरिअर सेवा आणि मजकूर संदेश
एकूण - ₹ 1691

भारतीय पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव जोडण्याच्या प्रक्रियेसाठी तत्काळ सेवा उपलब्ध आहे. त्यासाठी अतिरिक्त फी लागते.

प्रत्येक अर्जदारासाठी स्वतंत्र फी भरणे बंधनकारक आहे. व्यक्तींनी रोख किंवा चेक पेमेंट करू नये. क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी अतिरिक्त चार्जेस लागू आहे.

 

पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव अपडेट करण्यासाठी किती वेळ लागतो?

नूतनीकरण केलेला पासपोर्ट मिळविण्यासाठी जास्तीत जास्त तीन कामकाजाचे दिवस लागतात. किंबहुना, पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव जोडण्यासाठी लागणारा वेळ जास्तीत जास्त 2 तासांचा आहे.

म्हणून, आपण पाहू शकता, पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव बदलण्याची प्रक्रिया अत्यंत अचूक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी अनेक थर्ड पार्टी वेबसाइट आणि संस्था आहेत.

किंबहुना, पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव कसे जोडायचे, याबद्दल विचार करत असताना थेट सरकारी पोर्टलला भेट देण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला अर्जात नमूद केलेले सर्व तपशील सादर करणे किंवा फॉर्म पुन्हा जारी करणे, तसेच अखंड अंमलबजावणीसाठी पेमेंट करणे आवश्यक आहे.

सतत विचारले जाणारे प्रश्न

पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव जोडण्यासाठी विवाह प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?

नाही, तुम्ही दोघे भारतीय असल्यास तुमच्या पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव जोडण्यासाठी विवाह प्रमाणपत्र देणे बंधनकारक नाही.

पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव जोडण्यासाठी पोलीस पडताळणी आवश्यक आहे का?

नाही, तुमच्या पासपोर्टमध्ये तुमच्या जोडीदाराचे नाव जोडण्यासाठी पोलीस पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

पासपोर्टमध्ये माझ्या जोडीदाराचे राष्ट्रीयत्व दर्शविण्यासाठी मला कोणताही प्रत्यय/उपसर्ग जोडण्याची आवश्यकता आहे का?

नाही, फक्त जोडीदाराचे नाव आवश्यक आहे. राष्ट्रीयत्व दर्शविण्यासाठी कोणताही प्रत्यय किंवा उपसर्ग आवश्यक नाही.