डिजिट इन्शुरन्स करा

भारतातील विविध प्रकारचे पासपोर्ट

तुमचा पासपोर्ट जलद इमिग्रेशन क्लिअरन्स वैशिष्ट्य किंवा व्हिसा-मुक्त प्रवास सुविधा देतो का, हे तुम्हाला कसे कळेल?

त्यासाठी तुम्हाला भारतीय पासपोर्टचे विविध प्रकार, आणि त्यांचे महत्त्व याबद्दल माहिती जाणून घेणे आवश्यक आहे

पासपोर्टचे अनेक प्रकार आहेत, हे सुद्धा बहुतांश लोकांना माहीत नसते. तथापि, वेगवेगळ्या व्हिसांप्रमाणे, लोकांना त्यांच्या व्यवसायाच्या आधारावर या कागदपत्राचे विविध प्रकार दिले जातात.

चला भारतातील विविध पासपोर्टबद्दल सर्व जाणून घेऊया!

भारतीय पासपोर्टचे विविध प्रकार कोणते आहेत?

निळा पासपोर्ट

निळा पासपोर्ट हा टाईप पी पासपोर्ट म्हणूनही ओळखला जातो, हा भारतातील सामान्य लोकांसाठी जारी केला जातो, जे परदेशात विश्रांतीसाठी किंवा व्यवसायाच्या सहलीसाठी जाऊ इच्छितात. निळा रंग हा अधिकृत स्टेटस दर्शवून इतर पासपोर्टपेक्षा वेगळा ओळखण्यात मदत होते.

उपयोग: सामान्य लोक हा पासपोर्ट विश्रांतीसाठी किंवा व्यावसायिक कारणाने प्रवास करण्यासाठी वापरतात.

फायदे: या प्रकारचा पासपोर्ट परदेशी अधिकाऱ्यांना सामान्य जनता आणि सरकारी अधिकारी यांच्यातील फरक ओळखण्यास मदत करतो.

पांढरा पासपोर्ट

स्रोत: tv9hindi

या प्रकारचे पासपोर्ट केवळ भारत सरकारच्या अधिकार्‍यांना जारी केले जातात, जे अधिकृत कारणांसाठी देशाबाहेर प्रवास करत आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये आयएएस आणि भारतीय पोलीस सेवा विभागात काम करणाऱ्यांचा समावेश आहे.

उपयोग: सरकारी अधिकारी अधिकृत कामासाठी परदेशात जाण्यासाठी या पासपोर्टचा वापर करतात.

फायदे: पांढर्‍या पासपोर्टमुळे इमिग्रेशन अधिकार्‍यांना सरकारी अधिकारी ओळखणे आणि त्यानुसार वागणूक देणे सोपे होते.

डिप्लोमॅटिक पासपोर्ट

स्रोत: tv9hindi

हे पासपोर्ट सरकारी अधिकारी आणि डिप्लोमॅट्स जे कामासाठी परदेशात जात आहेत, यांच्यासाठी असतात. डिप्लोमॅटिक पासपोर्ट हे पांढर्‍या पासपोर्ट व्‍यतिरिक्‍त सरकारच्‍या प्रतिनिधींच्‍या विदेश सहलीचे नियोजन करण्‍यासाठी असतात.

उपयोग: भारतीय डिप्लोमॅट्स आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी या पासपोर्टचा वापर परदेशी दौऱ्यांमध्ये करतात, जेथे ते भारताचे प्रतिनिधित्व करतात.

फायदे: मरून पासपोर्ट धारकांसाठी उपलब्ध असलेल्या भत्त्यांच्या विस्तृत श्रेणीपैकी, व्हिसा-मुक्त प्रवास सुविधा (परदेशात प्रवास करण्यासाठी) सर्वात उपयुक्त आहे. त्यांनी कितीही काळ परदेशात राहण्याचा निर्णय घेतला, तरी त्यांना परदेशी सहलींसाठी व्हिसाची गरज भासणार नाही. पुढे, ते या पासपोर्टसह जलद इमिग्रेशन प्रक्रियेचा आनंद घेऊ शकतात.

याशिवाय, सामान्य पासपोर्ट धारकांपेक्षा या प्रकारचे भारतीय पासपोर्ट असलेल्या लोकांसाठी इमिग्रेशन सोपे आहे.

ऑरेंज पासपोर्ट

स्रोत: tv9marathi

सरकारने 2018 मध्ये केशरी रंगाचे पासपोर्ट लाँच केले, ज्यात पत्त्याचे पेज नसते. या प्रकारचे पासपोर्ट मुख्यत्वे दहावीच्या पुढे शिक्षण न घेतलेल्या लोकांसाठी डिझाइन केलेले आहेत. हे लोक ECR श्रेणीत येतात.

उपयोग: ज्या व्यक्तींनी दहावीच्या पुढे शिक्षण घेतलेले नाही, ते परदेशात जाण्यासाठी हा पासपोर्ट वापरू शकतात.

फायदे: परदेशात प्रवास करताना अशिक्षित नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा वेगळ्या प्रकारचा पासपोर्ट सादर करण्याचा मुख्य उद्देश होता. या प्रणालीमुळे, ECR पडताळणी आणि स्थलांतर प्रक्रिया देखील जलद होते.

लक्षात घ्या की, तुमचा पासपोर्ट तुमचे नागरिकत्व व्हेरिफाय करण्यात मदत करेल आणि त्याचा वापर केवळ आंतरराष्ट्रीय सहलींपुरता मर्यादित नाही. तुम्ही शाळेतील नावनोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यापर्यंत अशा विविध कारणांसाठी या कागदपत्रांचा वापर करू शकता!  

म्हणून, पुढे जाण्यापूर्वी, भारतातील विविध प्रकारचे पासपोर्ट आणि ते मिळविण्यासाठी तुम्हाला कोणत्या पात्रता मापदंडांची आवश्यकता आहे, हे जाणून घेणे योग्य ठरेल.

भारतात विविध प्रकारचे पासपोर्ट मिळविण्यासाठी पात्रता आवश्यकता काय आहेत?

वर नमूद केलेल्या प्रत्येक पासपोर्ट प्रकाराचा उद्देश वेगळा आहे, आणि तो पात्र व्यक्तींना जारी केला जातो. येथे सर्व पात्र व्यक्तींची यादी आहे,

  • निळा पासपोर्ट - सामान्य जनता

  • पांढरा पासपोर्ट - सरकारी अधिकारी

  • डिप्लोमॅटिक पासपोर्ट - भारतीय डिप्लोमॅट्स आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी

  • ऑरेंज पासपोर्ट - ज्या व्यक्तींनी दहावीच्या पुढे शिक्षण घेतलेले नाही.

आता तुम्हाला पात्रता आवश्यकतांची माहिती मिळाली आहे, चला विविध प्रकारच्या पासपोर्टसाठी अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया.

भारतात नवीन पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा?

पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करा -

  • स्टेप 1: पासपोर्ट सेवेच्या ऑनलाइन पोर्टल ला भेट द्या, आणि तुमचा विद्यमान आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करा. प्रथमच साइटला भेट देणाऱ्यांनी प्रथम स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.

  • स्टेप 2: आता, ‘फ्रेश पासपोर्ट/पासपोर्ट रीइश्यू’ निवडा आणि अर्ज भरा.

  • स्टेप 3: पुढे, सबमिट करण्यासाठी ‘अपलोड ई-फॉर्म’ वर क्लिक करा.

  • स्टेप 4: आता, पेमेंट करण्यासाठी आणि भेट निश्चित करण्यासाठी ‘पे आणि शेड्यूल अपॉइंटमेंट’ वर क्लिक करा.

तुम्ही 'प्रिंट अॅप्लिकेशन रिसीप्ट' वर क्लिक करून तुमची अपॉइंटमेंट किंवा संदर्भ क्रमांक असलेली देय पावती देखील प्रिंट करू शकता.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर, पासपोर्ट सेवा केंद्र किंवा प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला भेट द्या, जिथे तुम्ही अपॉइंटमेंट बुक केली आहे. व्हेरीफिकेशनसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत असल्याची खात्री करा.

त्यानंतर, तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन करावे लागेल. इथे ते तुमच्या फॉर्ममध्ये प्रदान केलेल्या सर्व माहितीचे मूल्यांकन करतील आणि नमूद केलेल्या पत्त्यावर भेट देतील.

तुमच्याकडे सर्व कागदपत्रे तयार नसल्यास नवीन पासपोर्ट मिळवणे कठीण आणि वेळखाऊ असू शकते. पासपोर्ट अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा.

भारतात नवीन पासपोर्ट लागू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

अनावश्यक त्रास टाळण्यासाठी, खालील कागदपत्रे जवळ बाळगण्याची खात्री करा -

  • पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, वीज बिल, भाडे करार, टेलिफोन/पोस्ट-पेड मोबाईल बिल, तुमचे बँक अकाउंट पासबुक, जोडीदाराच्या पासपोर्टची प्रत इ.)

  • जन्मतारीख पुरावा (जन्म प्रमाणपत्र, शाळा हस्तांतरण/ सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र इ.)

कागदपत्रांव्यतिरिक्त, व्यक्तींना पासपोर्टची वैधता आणि कालबाह्यता याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. पुढे वाचा!

पासपोर्टची वैधता आणि कालबाह्यता (एक्स्पायरी) काय आहे?

तुमचा प्रत्येक प्रकारचा पासपोर्ट फक्त 10 वर्षांसाठी वैध असेल. म्हणून, आपण त्या कालावधीत त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. इंटरनेट आता सर्वत्र सहज उपलब्ध असल्याने विविध प्रकारच्या भारतीय पासपोर्टचे नूतनीकरण प्रक्रिया ऑनलाइन करता येते.

पासपोर्ट कालबाह्य (एक्सस्पायर) होण्याआधी अर्ज नक्की भरा अन्यथा, तुम्हाला ‘पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी’ अर्ज करावा लागेल, व कालबाह्यता (एक्स्पायरी) 3 वर्षांपेक्षा जास्त असल्यास नवीन पोलीस पडताळणी देखील करावी लागेल.

भारतीय पासपोर्टच्या विविध प्रकारांबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

वेगवेगळ्या प्रकारच्या पासपोर्टसाठी अर्जाची फी वेगवेगळी असते का?

नाही, तुम्ही ज्या प्रकारची पासपोर्ट सेवा निवडत आहात त्यानुसार किंमत बदलते (तुम्ही तत्काळ आणि नियमित सेवा यापैकी निवडल्यास)

अशिक्षित व्यक्तींनी कोणत्या प्रकारच्या पासपोर्टसाठी अर्ज करावा?

केवळ 10 वीपर्यंत शिकलेल्या व्यक्ती केशरी पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात.

पासपोर्टचा सर्वात सामान्य प्रकार कोणता आहे?

निळा पासपोर्ट हा सर्वात सामान्य पासपोर्ट प्रकार आहे. याला "रेग्युलर" किंवा "पर्यटक" पासपोर्ट म्हणून देखील ओळखले जाते.