होम लोनसाठी होम इन्शुरन्स ₹150/वर्षापासून* सुरू
शून्य पेपरवर्क. ऑनलाइन प्रक्रिया

होम लोनसाठी होम इन्शुरन्स

होम लोनसाठी होम इन्शुरन्स म्हणजे काय?

होम लोनसाठी होम इन्शुरन्स ही एक दीर्घकालीन मालमत्ता इन्शुरन्स पॉलिसी आहे, जिथे इन्शुरर घर आणि त्यातील सामग्रीसाठी कव्हरेज ऑफर करतो. डिजिटची होम इन्शुरन्स  पॉलिसी हे सुनिश्चित करते की, आग, पूर, वादळ इत्यादी कारणांमुळे घराचे कोणतेही डॅमेज  झाल्यास घरमालकाला आर्थिक संरक्षण दिले जाते.

होम इन्शुरन्स घेणे का आवश्यक आहे?

घराचा इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. कारण तुमच्या घराचे किंवा त्यातील सामग्रीचे कोणतेही डॅमेज झाल्यास ते उपयोगी पडते. पॉलिसी हे सुनिश्चित करते की, झालेल्या डॅमेजमुळे झालेल्या नुकसानासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या संरक्षित आहात. त्या व्यतिरिक्त, हे होम लोन लेंडरसाठी बुडीत कर्जात बदलणार नाही, याची खात्री करते.

होम लोन घेताना होम इन्शुरन्स घेणे मॅनडेटरी आहे का?

होम इन्शुरन्स पॉलिसी घेणे मॅनडेटरी नाही. तथापि, ती असणे उचित आहे. कारण ती आपल्या आर्थिक हितासाठी आहे. किमान प्रीमियम भरून तुम्ही तुमच्या मालमत्तेचे आणि त्यातील सामग्रीचे कोणत्याही डॅमेजपासून संरक्षण करू शकता. कारण तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी आधीच मोठ्या रकमेची गुंतवणूक केली आहे.

होम लोन घेताना होम इन्शुरन्स घेणे किती फायदेशीर आहे?

होम लोन मिळवणे ही एक मोठी वचनबद्धता आहे. कारण तुमच्या कमाईतील मोठी रक्कम दीर्घ कालावधीसाठी कर्जाची परतफेड करण्यासाठी जाते. हे लक्षात घेता, होम इन्शुरन्स पॉलिसी खालील कारणांसाठी उपयुक्त ठरू शकते - 

  • हे तुमच्या कुटुंबाचे आणि अवलंबितांचे कर्जापासून रक्षण करते, कारण इन्शुरर मालमत्तेचे संरक्षण करेल.
  • तुम्ही अॅड-ऑन कव्हर निवडू शकता, जे कायमचे अपंगत्व, गंभीर आजार किंवा अनपेक्षित नोकरी गमावण्यापासून संरक्षण करतात.

होम लोन आणि होम इन्शुरन्स यातील फरक

जेव्हा आपण होम इन्शुरन्स आणि होम लोन इन्शुरन्सबद्दल बोलतो, तेव्हा दोघांमध्ये काही फरक असणे गरजेचे आहे. चला खालील तक्त्यामध्ये त्यावर एक नजर टाकूया:

होम इन्शुरन्स होम लोन इन्शुरन्स
आग, भूकंप, पूर, चोरी इत्यादी दुर्घटनांमुळे घराचे होणारे नुकसान किंवा डॅमेजची भरपाई होम इन्शुरन्स देते. होम लोन इन्शुरन्स उपयुक्त ठरतो, कारण पॉलिसीहोल्डरला अनपेक्षित परिस्थितीचा सामना करावा लागल्यास इन्शुरर होम लोनच्या थकबाकी रक्कम लेंडरकडे सेटल करेल.
होम इन्शुरन्स पॉलिसीचा फायदा घेण्यासाठी देय प्रीमियम कमी आहे. होम लोन इन्शुरन्ससाठी, देय प्रीमियम जास्त आहे.
तुम्ही होम लोन घेतले असले किंवा नसेल तरीही होम इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केली जाऊ शकते. जर तुम्ही स्वत: होम लोन घेतले असेल तरच होम लोन इन्शुरन्स खरेदी करता येईल.
होम लोन इन्शुरन्समुळे घराचे डाउन पेमेंट कमी होते. होम इन्शुरन्सच्या बाबतीत डाउन पेमेंटवर कोणताही परिणाम होत नाही.

होम लोनसाठी होम इन्शुरन्स खरेदी करताना विचारात घेण्यासारखे घटक

होम इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याची शिफारस केली जात असताना, पुढे जाण्यापूर्वी काही घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. चला त्यांच्याकडे एक नजर टाकूया:

कव्हरेज

होम लोनसाठी होम इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला विमा कंपनीने ऑफर केलेले कव्हरेज आकार पाहणे आवश्यक आहे. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण बहुतेक इन्शुरर कमी होत जाणारे कव्हरेज देतात. चांगले कव्हरेज हे सुनिश्चित करेल की, आपण कोणत्याही प्रसंगापासून संरक्षित आहात.

देय प्रीमियम

तुम्ही जो प्रीमियम भरणार आहात त्याचाही विचार करणे आवश्यक आहे. होम लोनसाठी तुम्ही आधीच ईएमआय म्हणून मोठी रक्कम भरत आहात, आणि काळजी घेण्यासाठी इतर खर्च आहेत हे लक्षात घेता, प्रीमियममुळे तुमच्या खिशात छिद्र पडू नये.

अॅड-ऑन्स

इन्शुरन्स कंपनीने देऊ केलेले अॅड-ऑन कव्हरेज ही आणखी एक गोष्ट आहे, ज्याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. हे सुनिश्चित करेल की, तुम्हाला मालमत्ता इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना अधिक फायदे मिळतील.

भारतात होम लोनसाठी होम इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

होम इन्शुरन्स कसे काम करते?

होम इन्शुरन्स तुम्हाला घर आणि त्यातील सामग्री कोणत्याही डॅमेजपासून संरक्षित करतो.

दीर्घ मुदतीसाठी होम इन्शुरन्सचा तुम्ही कर फायदा घेऊ शकता का?

होय, तुम्ही स्वतःला होम इन्शुरन्स पॉलिसी मिळवण्यासाठी कर फायदा घेऊ शकता. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर फायदे दिले जातात.

आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत क्लेम केला जाऊ शकतो, असा कमाल कर फायदा कोणता आहे?

तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत एका आर्थिक वर्षात ₹ 1.50 लाखांपर्यंत क्लेम करू शकता.

त्याच लेंडरकडून होम लोनसाठी होम इन्शुरन्स खरेदी करणे आवश्यक आहे का?

त्याच बँकेकडून होम इन्शुरन्स पॉलिसी घेणे आवश्यक नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि 'इन्शुरन्स रेगुलेटरी अँड डेवलपमेंट ऑथोरिटी' (आयआरडीए) नुसार लेंडर कर्जदाराला होम इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाहीत.

होम लोनसाठी होम इन्शुरन्स प्रीमियमवर कोणते घटक परिणाम करतात?

स्थान, किंमत आणि घराची वैशिष्ट्ये, सुरक्षा उपाय, डीडक्टीबल्स आणि इन्शुरन्स पॉलिसीचा प्रकार यासारख्या घटकांवर आधारित प्रीमियम जास्त किंवा कमी असू शकतो.