होम इन्शुरन्स ऑनलाइन ₹150/वर्ष* पासून प्रारंभ होतो

property-insurance
property-insurance
usp icon

Zero

Documentation

usp icon

Quick Claim

Process

usp icon

Affordable

Premium

,

Zero Paperwork Online Process
Select Property Type
Enter Valid Pincode Sorry, we aren't present in this pincode
+91
Please enter valid mobile number
I agree to the Terms & Conditions
Please accept the T&C
background-illustration
usp icon

Zero

Documentation

usp icon

Quick Claim

Process

usp icon

Affordable

Premium

,

background-illustration

होम इन्शुरन्स म्हणजे काय?

होम इन्शुरन्स ही एक प्रॉपर्टी इन्शुरन्स पॉलिसी आहे जी तुम्हाला घरफोडी, आग, पूर, वादळ आणि स्फोट यांसारख्या अनपेक्षित परिस्थितींपासून घर किंवा भाड्याने घेतलेले अपार्टमेंट आणि त्यातील तुमच्या वैयक्तिक वस्तू कव्हर करण्यात मदत करते.

घर विकत घेणे ही सर्वात महत्वाची गुंतवणूक आहे ज्यासाठी लोक त्यांचे संपूर्ण आयुष्य घालवतात. तरीही, असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या जीवनातील या अत्यंत महत्त्वाच्या गुंतवणुकीचे संरक्षण करणे विसरतात. तुमच्या अत्याधुनिक गॅझेट्स आणि सुंदर इंटीरियरपासून ते तुमचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंपर्यंत; तुमचे घर हे केवळ संपत्तीपेक्षा भावनिक दृष्टीनेदेखील खूप जास्त मौल्यवान आहे.

त्यामुळेच तुमच्या घराच्या चांगल्या भविष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी तुम्ही करू शकता अशा सर्वात आवश्यक गोष्टींपैकी एक म्हणजे किमान एक होम इन्शुरन्स घेणे. ज्यामुळे तुम्हाला घरफोडी, पूर  आग आणि भूकंप इतर संभाव्य, परंतु अनपेक्षित, अनिश्चित आणि दुर्दैवी परिस्थितींमध्ये सुरक्षित राहता येईल.

दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तूंसाठी पर्यायी ॲड-ऑनसह आमचे गो डिजिट, भारत गृह रक्षा पॉलिसी आपल्याला आपले घर आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित करण्यास मदत करेल.

आपले घर देखील घरफोडीपासून सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी, आपण आपल्या  होम इन्शुरन्स पॉलिसीसह डिजिट बर्ग्लरी इन्शुरन्स पॉलिसी (UIN - IRDAN158RP0019V01201920) एकत्र करू शकता. 

Read More

मी होम इन्शुरन्स का घ्यावा?

होम लोनच्या गरजेबाबत तुम्ही अजूनही संभ्रमात असाल तर पुढे वाचा...

1

2022 मध्ये आतापर्यंत 423.2 हजार घरांचे प्रचंड हवामानामुळे नुकसान झाले आहे. (1)

2

ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 नुसार, पूर, भूकंप इत्यादी हवामानाशी संबंधित अत्यंत तीव्र घटनांमुळे 2019 मध्ये भारत सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक फटका बसलेला देश होता (2)

3
सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटने (सी.एस.ई) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 2022 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर महिन्यातील 241 दिवस भारतात हवामानाची अत्यंत तीव्र स्थिती नोंदवली गेली. (3)

डिजिटच्या होम इन्शुरन्समध्ये काय चांगले आहे?

  • गो डिजिट, भारत गृह रक्षा पॉलिसी (UIN: IRDAN: IRDAN158RP0081V01202021) उत्कृष्ट आहे कारण ते खाली नमूद केलेले फायदे प्रदान करते:
  • • व्हॅल्यू फॉर मनी - जेव्हा तुम्ही होम इन्शुरन्सचा विचार करता, तेव्हा तुम्ही त्याचा एक खर्चिक आणि महागडा व्यवहार म्हणून विचार करता. शेवटी, हे तुमच्या सर्वात मौल्यवान मालमत्तेचे संरक्षण करण्याबद्दल आहे! तरीही घाबरू नका, आम्ही केवळ तुमचे घर कव्हर केले आहे याची खात्री करत नाही तर, ते तुमच्या खिशाला परवडणाऱ्या रकमेमध्ये कव्हर केले आहे याची खात्री करतो!

     

  • डिजिटल फ्रेंडली - इन्शुरन्सबाबत लोक ज्या गोष्टींबद्दल नेहमी काळजीत असतात त्यापैकी एक म्हणजे कागदपत्रांचे काम आणि आमच्या ऑनलाइन होम इन्शुरन्सद्वारे आम्ही त्यातून तुमची या कामातून सुटका केली आहे! डिजिटसह, होम इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यापासून क्लेम करण्यापर्यंत सर्व काही सोपे आहे आणि ते ऑनलाइन केले जाऊ शकते! (टीप: आयआयडीएआयनुसार 1 लाखांवरील क्लेम्ससाठी मॅन्युअल तपासणीची आवश्यकता असेल).
  • • भाडेकरूंसाठी योजना - आजकालची तरुणाई जास्त प्रमाणात घर भाड्याने घेऊन रेंटल इकॉनॉमीला आकार देत आहे. या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे. घर तुमच्या मालकीचे आहे की नाही याने काही फरक पडत नाही.आमच्या इन्शुरन्सद्वारे तुमची जागा घर भाडेकरूंसाठी संरक्षित केली जाऊ शकते.
  • • 24x7 कस्टमर सपोर्ट - अडचण कोणत्याही वेळी येऊ शकते त्यामुळे आम्ही नेहमीच फक्त एका फोनवर तुमच्या सेवेसाठी उपस्थित असू.

डिजिट होम इन्शुरन्समध्ये काय कव्हर केलेले आहे ?

Fires

आग

आगीच्या घटनांमध्ये तुमच्या सामानाचे भरपूर नुकसान होऊ शकते. अशा दुर्दैवी परिस्थितीत आमची होम इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या मदतीसाठी उपलब्ध असेल!

Explosion & Aircraft Damage

स्फोट आणि विमान आदळल्याने झालेले नुकसान

स्फोटांमुळे आणि विमान घरावर आदळल्यामुळे झालेले नुकसान किंवा हानीदेखील आमच्या होम इन्शुरन्समध्ये कव्हर केली जाईल.

Storms

वादळे

तुमचे घर आणि तुमच्या सामानाचे वादळांच्या परिस्थितीत संभाव्य नुकसान होऊ शकते, अशावेळी आमची होम इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या मदतीसाठी असेल!

Floods

पूर

पूरजन्य परिस्थितीत तुमच्या घराचे नुकसान आणि हानीपासून संरक्षण करते.

Earthquakes

भूकंप

निसर्गाचा रोष कोणीही टाळू शकत नाही परंतु, तुम्ही काय करू शकता तर हे सुनिश्चित करा की तुमच्यामुळे होणार्‍या कोणत्याही संभाव्य नुकसानीसाठी तुम्ही सुरक्षित आहात. भूकंपामुळे होणारे नुकसान आणि हानीसाठी घराचा इन्शुरन्सदेखील कव्हर करतो.

होम इन्शुरन्सचे प्रकार

पर्याय 1

पर्याय 2

पर्याय 3

तुमच्या घरातील फक्त सामग्री (म्हणजे वैयक्तिक सामान) कव्हर करते.

तुमच्या घराची इमारत आणि सामग्री दोन्ही कव्हर करते

तुमच्या घराची मालमत्ता आणि तुमच्या घरातील सामग्री आणि दागिन्यांचा समावेश होतो.

होम इन्शुरन्सबद्दल जाणून घेण्यासारख्या गोष्टी

  • इमारत/रचना: होम इन्शुरन्समध्ये, इमारत म्हणजे तुमच्या घराच्या भौतिक पैलूचा संदर्भ येतो.  
  • सामग्री: सामग्री तुमच्या घरातील वैयक्तिक वस्तूंचा संदर्भ येतो. त्यामुळे, तुमच्या फर्निचरसारख्या गोष्टी तुमच्या घराच्या इन्शुरन्समध्ये कव्हर केल्या जातील.

होम इन्शुरन्सने तुमच्या घराचे संरक्षण करण्याचे कोणते फायदे आहेत?

अनिश्चिततेतून सुरक्षित

घरफोडीचे प्रकार कुठेही, कधीही घडू शकतात- अगदी सुरक्षित ठिकाणीही. अशा घटनांपासून आपले घर सुरक्षित करण्यासाठी, आपण आपल्या होम इन्शुरन्स पॉलिसीसह डिजिट बर्ग्लरी इन्शुरन्स पॉलिसी एकत्र करू शकता.

संपूर्ण आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा

लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध, होम इन्शुरन्स तुमच्या घराच्या भौतिक मालमत्तेच्या पलीकडे जातो. हे तुमच्या गॅरेजपासून ते तुमच्या घरातील सामग्रीपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश करते. तुमचे घर महाग आहे का! सरासरी 2बीएचके मध्ये किमान 5 लाख रुपये किमतीची सामग्री आहे! तुम्ही दिवसा, कामावर किंवा प्रवासात बाहेर असता तेव्हा तुमच्या घरावर लक्ष ठेवणारे कोणी नसते. म्हणूनच, घराचा इन्शुरन्स असल्‍याने तुम्‍ही घराबाहेर असल्‍यावर तुमचे घर सुरक्षित राहण्‍यास मदत होते.

नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण

पूर, वादळ हे घरमालकाचे सर्वात वाईट स्वप्न असू शकते! आणि तुमच्या घराची पुनर्बांधणी आणि नुकसान भरून काढण्याच्या त्रासातून जाणे केवळ तणावपूर्णच नाही तर भरपूर पैशांचे नुकसान करणारे देखील होऊ शकते! सुदैवाने, होम इन्शुरन्स काढल्याने तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी संरक्षण मिळू शकते!

होम इन्शुरन्स कोणी घ्यायला हवा ?

नवीन घरमालक

तुम्ही नुकतेच घर विकत घेतले असल्यास, घराचा इन्शुरन्स घेणे हे तुमच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत सगळ्यात वर असले पाहिजे. शेवटी, तुम्ही तुमच्या नवीन निवासस्थानावर आधीच इतके पैसे खर्च केले आहेत, आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता ते म्हणजे होम इन्शुरन्स घेणे.

भाडेकरू

जरी तुम्ही तुमचे घर भाड्याने घेतले असले तरी काही फरक पडत नाही! तुमचे घर अजूनही आहे जिथे तुमचे सर्व सामान आहे. आग, पूर किंवा दरोडा यासारख्या घटनांमध्ये तुमच्या गॅझेट्सपासून ते तुमच्या फर्निचरपर्यंत सर्वांना धोका असतो. सर्व इन्शुरन्स कंपन्या भाडेकरूंसाठी होम इन्शुरन्स पॉलिसी ऑफर करत नसले तरी, आम्ही त्यासाठी पॉलिसी ऑफर करतो जेणेकरून प्रत्येकाला कव्हर करता येईल.

कव्हर केलेल्या घरांचे प्रकार

स्वतंत्र मालकीच्या घरांपासून ते भाड्याच्या अपार्टमेंटपर्यंत; डिजिटचा होम इन्शुरन्स सर्व प्रकारच्या घरांसाठी तयार करण्यात आला आहे.

वैयक्तिक अपार्टमेंट

हे त्यांच्यासाठी आहे जे स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहतात जे एकतर हाऊसिंग सोसायटी किंवा स्वतंत्र इमारतींचा भाग आहेत. एकतर तो तुमच्या मालकीचा फ्लॅट असू शकतो किंवा तुम्ही भाड्याने दिलेला असू शकतो. आमच्या ऑफर दोन्हीसाठी उपयुक्त आहेत!

स्वतंत्र इमारत

कदाचित तुम्ही आणि तुमचे विस्तारित कुटुंब एका स्वतंत्र इमारतीत राहता, संपूर्ण इमारतीमध्ये फ्लॅटचे मालक किंवा भाडेकरू राहत असतील अशावेळी, तुम्ही त्या सर्वांसाठी डिजिटच्या होम इन्शुरन्सद्वारे कव्हर करणे निवडू शकता.

स्वतंत्र व्हिला

तुम्ही स्वतंत्र व्हिला किंवा घराचे मालक असल्यास किंवा भाड्याने घेतले असल्यास, घरफोडी, पूर, वादळ आणि इतर अनपेक्षित परिस्थितींसारख्या संभाव्य जोखमींपासून तुमच्या व्हिला आणि त्यातील सामग्रीचे संरक्षण करण्यासाठी होम इन्शुरन्स अत्यावश्यक आहे.

होम इन्शुरन्सबद्दल तुम्हाला माहीत असाव्यात अशा काही गोष्‍टी

भारतातील होम इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न