डिजिट पार्टनर व्हा
35,000+ पार्टनरनी डिजिटसह 674 कोटी+ कमावले आहेत.

इन्शुरन्स POSP होण्याचे फायदे

आज जगभरात बरेच लोक जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचे मार्ग शोधत आहेत. इतर करिअरचा पर्याय शोधत असताल किंवा पार्टटाइम नोकऱ्या करायच्या असल्यास, एक उत्तम मार्ग म्हणजे POSP (पॉइंट ऑफ सेल्सपर्सन) म्हणून इन्शुरन्स ऑनलाइन विकणे.

POSP हा एक प्रकारचा इन्शुरन्स एजंट आहे, जो इन्शुरन्स कंपन्या किंवा दलालांसोबत ग्राहकांना थेट इन्शुरन्स पॉलिसी विकण्यासाठी काम करतो.

POSP होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे?

ज्याने मूलभूत निकष पूर्ण केले आहेत (18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असणे आणि इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे), तो विहित प्रशिक्षण कार्यक्रमात (prescribed training program) नावनोंदणी करू शकतो, व ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण करू शकतो. त्यानंतर तो जीवन इन्शुरन्स आणि जनरल अशा दोन्ही पॉलिसी विकण्यासाठी POSP म्हणून प्रमाणित होऊ शकतो. इन्शुरन्स श्रेणी (मोटार इन्शुरन्स, आरोग्य इन्शुरन्स, प्रवास इन्शुरन्स, आणि अधिक समावेश).

इन्शुरन्स POSP बनण्याचे 10 फायदे

1. POSP बनणे सोपे आहे

आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे, जो कोणी विशिष्ट निकष पूर्ण करतो तो POSP होऊ शकतो. याचा अर्थ तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे, आणि तुम्ही इयत्ता 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. तुमच्याकडे वैध आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि तुमच्या नावावर बँक अकाउंट असणे आवश्यक आहे.

तसेच तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन विकू आणि इश्यू करू शकत असल्याने, नोकरीसाठी तुम्हाला फक्त स्मार्टफोन, लॅपटॉप आणि चांगले इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. हे महाविद्यालयीन विद्यार्थी, फ्रेशर्स आणि इतर ज्यांना अद्याप कामाचा जास्त अनुभव नाही, त्यांच्यासाठी योग्य आहे.

2. फिक्स वेळ नाही.

POSP म्हणून, तुमच्या कामाची वेळ खूप लवचिक असू शकते. 9 ते 5 पर्यंत कार्यालयात डेस्कवर बसण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या सोयीनुसार कामाचे तास सहज निवडता, आणि सेट करता. तुम्हाला फुलटाइम किंवा पार्टटाइम काम करायचे आहे की नाही, हे तुम्ही ठरवू शकता. हे विद्यार्थी, गृहिणी आणि अर्धवेळ उत्पन्नाचे स्रोत म्हणून सेवानिवृत्तांसाठी योग्य आहे.

3. तुम्ही घरबसल्या काम करू शकता

POSP पॉलिसी विकण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया वापरू शकत असल्याने, त्यांना इन्शुरन्स विकण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही ग्राहकांशी फोनद्वारे संपर्क साधू शकता, आणि त्यांना इंटरनेटवर पॉलिसी विकू शकता. तुम्ही घरबसल्या किंवा दुसऱ्या कुठल्याही ठिकाणाहून सहजपणे काम करू शकता.    

4. तुम्हीच स्वतःचा बॉस व्हा

एक POSP स्वतः साठी काम करण्यास सक्षम असेल, याचा अर्थ असा की तुम्ही तुमचे स्वतःचे वेळापत्रक, तुमचे स्वतःचे लक्ष्य सेट करू शकता, आणि इन्शुरन्स पॉलिसी विकण्यात तुम्हाला किती वेळ व मेहनत गुंतवायची आहे, हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. अशा प्रकारे, तुम्ही स्वतः बॉस सारखे तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार काम करू शकाल.

5. स्थिर उत्पन्न मिळवा

POSPs नियामक संस्था (IRDAI) द्वारे सेट केलेले कमिशनचे पूर्व-परिभाषित (pre-defined) आणि निश्चित स्तर मिळवतात. किंबहुना, गुड कस्टमर बेस तयार करण्यासाठी काही प्रयत्नांद्वारे तुम्ही पॉलिसी नूतनीकरणाद्वारे कॅश फ्लो ठरवू शकता, जे तुमच्याकडून कमीतकमी सर्व्हिस देऊन राखले जाऊ शकते. त्यामुळे काही कालावधीतच तुम्हाला स्थिर उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. जास्त प्रयत्न केल्यास उत्पन्नात वाढ होईल.

6. जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याची शक्यता

POSP साठी, तुमची कमाई तुम्ही किती तास काम करता, यावर अवलंबून नसून तुम्ही इश्यू केलेल्या पॉलिसींच्या संख्येवर आधारित असेल. कोणतेही निश्चित उत्पन्न किंवा कोणतेही लिमीट नाही. त्यामुळे भरघोस कमाई होऊ शकते. तुमची मिळकत कमिशनच्या आधारावर असेल, आणि तुम्ही किती पॉलिसी विकता व तुम्हाला मिळणारे नूतनीकरण यावर अवलंबून असेल. त्यामुळे, तुम्ही जितक्या जास्त पॉलिसी विकता, तितके तुम्ही POSP म्हणून कमाई करू शकता.

7. शून्य गुंतवणूक आवश्यक आहे

POSP म्हणून काम सुरू करताना कोणतीही आर्थिक गुंतवणूक किंवा पेमेंट करण्याची गरज नाही. तुमचा वेळ आणि मेहनत हिच तुमची गुंतवणूक आहे. त्याशिवाय, तुम्हाला फक्त स्मार्टफोन, कॉम्प्युटर आणि चांगल्या इंटरनेट कनेक्शनची गरज आहे.

तुम्ही व्यवसायात कोणतेही पैसे गुंतवत नसल्यामुळे, जास्तीत जास्त आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

8. तुम्ही उद्योग तज्ज्ञांकडून शिकू शकता

तुम्ही POSP किंवा इन्शुरन्स एजंट म्हणून काम करत असताना, तुम्हाला इंडस्ट्री एक्स्पर्ट च्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे अधिक शिकण्याची आणि तुमची कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळेल. अलिकडच्या वर्षांत इन्शुरन्स असण्याबाबत सामान्य लोकांमध्ये जागरुकता वाढल्यामुळे, अनेक इन्शुरन्स कंपन्या आणि मध्यस्थ ही मागणी पूर्ण करण्यासाठी POSPs कडे वळत आहेत. याचा अर्थ उद्योगातही भरपूर संध्या उपलब्ध आहेत.

9. लोकांना मदत करण्याचा हा एक मार्ग आहे

POSP असल्याने, तुम्ही लोकांच्या जीवनावर चांगला सकारात्मक प्रभाव पाडू शकता. तुम्ही लोकांना त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यास, त्यांच्या मुलांची काळजी घेण्यात, सेवानिवृत्तीची योजना आणि बरेच काही करण्यात मदत करू शकता. याचे कारण असे की, जेव्हा तुम्ही ग्राहकांना त्यांच्यासाठी योग्य असलेल्या इन्शुरन्स पॉलिसी विकता, तेव्हा तुम्ही त्यांना स्वत:साठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अधिक आर्थिक आणि वैद्यकीय सुरक्षा प्रदान करण्यात मदत करता.

जीवन इन्शुरन्स, गृह इन्शुरन्स, मोटार इन्शुरन्स, आरोग्य इन्शुरन्स किंवा इतर कोणतीही पॉलिसी असो, घराला लागलेली आग, कुटुंबातील मृत्यू, आजारी मुलांना वैद्यकीय मदत मिळणे यासारख्या आपत्तींपासून लोकांना संरक्षण मिळेल. हे महत्त्वाचे आणि अर्थपूर्ण काम आहे.

10. पुरस्कार आणि ओळख मिळवण्याची संधी आहे

POSP आणि इन्शुरन्स एजंट म्हणून, तुम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मान्यता मिळवण्याची संधी मिळेल. उदाहरणार्थ, तुम्ही Asia's Trusted Life Insurance Agents आणि Advisors सारख्या पुरस्कारांसाठी पात्र होऊ शकता, आणि असे करून अधिकाधिक संधी मिळवू शकता.

POSP बनण्यासाठी सर्वोत्तम कंपनी कशी निवडावी?

POSP म्हणून इन्शुरन्स विकण्यासाठी तुम्ही इन्शुरन्स कंपनीशी किंवा मध्यस्थांशी सही घेताना तपासून घ्या. लक्ष देण्यासारख्या काही गोष्टी आहेत:

  • कंपनी इन्शुरन्स पॉलिसींची विस्तृत श्रेणी ऑफर करते. उदाहरणार्थ, आरोग्य, मोटर, प्रवास, घर, व्यावसायिक इ.
  • तुम्ही थेट कंपनीसोबत काम कराल, त्यात कोणताही मध्यस्थ सहभागी होणार नाही.
  • तुम्ही ऑनबोर्ड केलेल्या ग्राहकाने त्यांच्या पॉलिसीचे नूतनीकरण केले, तरीही तुम्ही कमिशन मिळवू शकता.
  • कंपनी कोणतीही कागदपत्रे किंवा अडथळ्याशिवाय ऑनलाइन प्रोसेस देते.
  • तुम्ही विकत असलेल्या पॉलिसींसाठी कंपनी तुमचे कमिशन सेटल करते.
  • त्यांच्याकडे एक मजबूत बॅकएंड सपोर्ट टीम आहे, जी तुम्हाला मदत करेल.

डिजिट इन्शुरन्स सह या निकषांशी जुळणाऱ्या अनेक इन्शुरन्स कंपन्या, मध्यस्थ आणि दलाल आहेत. तुम्ही सामील होण्यापूर्वी त्यांना संशोधन करण्यासाठी फक्त वेळ द्यावा लागेल!

सतत विचारले जाणारे प्रश्न

कोण POSP बनू शकतो?

मूलभूत निकष पूर्ण करणारा कोणीही (18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आणि इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेला) POSP होऊ शकतो. त्यामुळे फ्रेशर्ससाठी ही एक उत्तम संधी आहे. तसेच तुम्ही हे काम पार्टटाइम करू शकत असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी, सेवानिवृत्त, आणि ज्यांना आधीच नोकरी आहे, पण तरीही त्यांना आणखी काही गोष्टी करायच्या आहेत, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

तुम्ही POSP म्हणून किती पैसे कमवू शकता?

PSOP म्हणून, तुमची कमाई तुम्ही किती तास काम करता, यावर अवलंबून नसून तुम्ही इश्यू केलेल्या पॉलिसींच्या संख्येवर अवलंबून असेल. कोणतेही फिक्स उत्पन्न नसल्यामुळे तसेच लिमिट नसल्यामुळे भरघोस कमाई करता येते. म्हणजेच, तुम्ही जितक्या अधिक पॉलिसी विकता, आणि तुम्हाला जितके अधिक नूतनीकरण मिळेल, तितके तुम्ही POSP म्हणून कमवू शकता.

POSP म्हणून नोंदणी करण्यासाठी मला कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील?

POSP म्हणून नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल:

  •  तुमच्या इयत्ता 10 (किंवा वरील) उत्तीर्ण प्रमाणपत्राची प्रत
  •  तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डची एक प्रत (front and back)
  •  तुमचे नाव असलेला रद्द केलेला चेक
  •  फोटोग्राफ

POSP कोणती उत्पादने विकू शकते?

तुम्ही ज्या कंपनीसाठी काम करतात त्यावर अवलंबून असते. POSP विम्याच्या अनेक श्रेणींमध्ये इन्शुरन्स योजना विकू शकते. यामध्ये जीवन इन्शुरन्स, मुदत इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स, आरोग्य इन्शुरन्स, प्रवास इन्शुरन्स आणि बरेच काही समाविष्ट आहे.

तुम्ही विम्याची विक्री कधी सुरू करू शकता?

एकदा तुम्ही इन्शुरन्स कंपनी किंवा ब्रोकरकडे नोंदणी केली की, तुम्ही 15 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करू शकता आणि आवश्यक परीक्षा उत्तीर्ण करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक eCertificate मिळेल आणि तुम्ही POSP एजंट म्हणून ऑनलाइन इन्शुरन्स विक्री करू शकता.