डिजिटचे भागीदार व्हा
35,000+ भागीदारांनी डिजिटसह 674 कोटी+ कमावले आहेत.

विद्यार्थ्यांना गुंतवणूक न करता ऑनलाइन पैसे कसे कमावता येतील?

विद्यार्थी दशा ही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. अभ्यास ही एक प्रदीर्घ काळाची प्रक्रिया आहे. हे करताना जे विद्यार्थी थोडे पैसे कमवू पाहत आहेत, ते पार्टटाइम नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतात. ज्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत नाही.

मोठी गुंतवणूक न करता ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, किंवा कमीत कमी अनुभवाची आवश्यकता असलेल्या नोकऱ्या कशा मिळवायच्या? हे प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर असतात. 

आता तुमच्यासाठी म्हणूनच एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. विद्यार्थ्यांसाठी अलीकडे अनेक ऑनलाइन पार्टटाइम नोकऱ्यांचे पर्याय आहेत, ज्यात तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकतात.

विद्यार्थी म्हणून ऑनलाइन पैसे कमविण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते आहेत?

1. POSP म्हणून विमा विकणे

POSP किंवा Point of Salesperson बनणे आणि विमा विकणे ही विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर पार्टटाइम नोकरी असू शकते. POSP हा एक विमा एजंट आहे, जो विमा कंपनीसोबत त्यांची विमा उत्पादने ऑनलाइन विकण्यासाठी काम करतो.

  • आवश्यकता काय आहेत? - तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे, आणि तुम्ही 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तुम्हाला IRDAI द्वारे ऑफर केलेले 15 तासांचे अनिवार्य प्रशिक्षण देखील पूर्ण करावे लागेल.
  • आपण किती कमवू शकता? - तुमचे उत्पन्न तुम्ही किती पॉलिसी विकता, यावर अवलंबून असेल. अशा प्रकारे, तुम्ही जितक्या जास्त पॉलिसी विकाल तितके जास्त उत्पन्न तुम्हाला मिळेल.
  • तुम्ही ही नोकरी कायम सुरू ठेवू शकता का? - होय, जर तुमच्याकडे आवश्यक कौशल्य असतील, तर तुम्ही हे काम पूर्ण वेळ नोकरी म्हणून पुढे चालू ठेवू शकता.

POSP एजंट होण्यासाठी च्या आवश्यक स्टेप्स, पात्रता निकष आणि नियमांबद्दल अधिक जाणून घ्या.

2. फ्रीलान्सर व्हा

जर तुम्ही लेखन, प्रोग्रामिंग, एडिटिंग, फोटोग्राफी, डिझायनिंग किंवा इतर कोणत्याही कौशल्यांमध्ये तरबेज असाल, तर तुम्ही फ्रीलांसर म्हणून ऑनलाइन पैसे कमवू शकता. तुम्हाला फक्त Upwork , Fiverr किंवा Truelancer सारख्या पोर्टलवर फ्रीलांसर म्हणून नोंदणी करायची आहे. त्यानंतर तुम्ही तुमची कौशल्ये संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंग करायला हवे 

  • आवश्यकता काय आहेत? - जोपर्यंत तुमच्याकडे विकण्याजोगे किंवा ज्याची बाजारात आवश्यकता आहे, असे कौशल्य आहे, तोपर्यंत तुम्ही फ्रीलांसिंग पोर्टलवर नोंदणी करू शकता. काहीवेळा यासाठी थोडे शुल्क द्यावे लागेल. 
  • आपण किती कमवू शकता? - तुमची मिळकत तुम्ही कोणत्या प्रकारचे काम देऊ करता, आणि तुम्हाला किती काम करायला वेळ आहे, यावर आधारित असेल.
  • तुम्ही ही नोकरी सुरू ठेवू शकता का? - होय, तुम्ही ऑफर करत असलेल्या कामाच्या आधारावर, तुम्ही फ्रीलांसर म्हणून पूर्णवेळ काम करणे सुरू ठेवू शकता.

3. ऑनलाइन शिकवणे सुरू करा

विद्यार्थी सतत नवीन गोष्टी शिकत असतात, त्यामुळे ऑनलाइन पैसे कमवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे यातील काही ज्ञान शेअर करणे. तुम्हाला शालेय मुलांना शिकवायचे असेल, किंवा नवीन काही शिकू इच्छिणार्‍या प्रौढांसाठी अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यायचा असेल, यासाठी तुम्हाला फक्त वेगवान इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे. 

तुम्ही एकतर Udemy, SkillShare किंवा Coursera सारख्या व्हर्च्युअल ट्युटोरिंग प्लॅटफॉर्मवर साइन अप करू शकता, किंवा तुमचे ऑनलाइन ट्युटोरिंग वर्ग स्ट्रीम करण्यासाठी सोशल मीडियावर मित्र आणि नातेवाईक यांच्या माध्यमातून प्रसिद्धी करू शकता.

  • आवश्यकता काय आहेत? - यात फारच कमी आर्थिक गुंतवणूक आहे, तरीही तुम्हाला शिकवण्याची कौशल्ये आत्मसात करावी लागतील.
  • आपण किती कमवू शकता? - तुमच्‍या कौशल्याच्या गुणवत्तेच्या स्‍तरावर आणि विषयावर आधारित, तुम्‍ही प्रति तास ₹200-500 पर्यंत कमवू शकता.
  • तुम्ही ही नोकरी कायम सुरू ठेवू शकता का? - शिकवण्या घेणे हे फुल टाइम नोकरी नसली तरी, तुम्ही एकतर हे काम पार्टटाइम सुरू ठेवू शकता, किंवा तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या क्षेत्रात रीतसर प्रोफेसर म्हणून शिकवण्याच्या नोकऱ्या शोधू शकता.

4. डेटा एंट्री नोकऱ्या शोधा

गुंतवणुकीशिवाय ऑनलाइन पैसे कमवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा पर्याय म्हणजे डेटा एन्ट्री नोकऱ्या. हे काम तुम्ही सोयीने करू शकता. त्यामुळे पार्ट टाइम जॉबला हा उत्तम पर्याय ठरू शकतो. 

तुम्हाला फक्त Freelancer, Data Plus, Axion Data Entry Services किंवा Guru सारख्या विश्वसनीय वेबसाइटवर नोंदणी करायची आहे. यानंतर जगभरातील कंपन्यांकडून डेटा एंट्री नोकऱ्या स्वीकारणे सुरू करा. मात्र तुमच्या अकाउंटचे तपशील हस्तांतरित करण्यापूर्वी त्यांची वैधता तपासण्यास विसरू नका. 

  • आवश्यकता काय आहेत? - तुमच्याकडे संगणक असणे आवश्यक आहे, तसेच एक्सेल आणि इतर मायक्रोसॉफ्ट टूल्सचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • आपण किती कमवू शकता? - डेटा एंट्री जॉबसह, तुम्ही प्रति तास ₹300 ते ₹1,500 कमवू शकता.
  • तुम्ही ही नोकरी कायम सुरू ठेवू शकता का? - डेटा एंट्री नोकऱ्या सहसा पार्ट टाइम केल्या जातात.

5. अॅप्स आणि वेबसाइट्ससाठी बेटा टेस्ट

आजकाल जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्मार्टफोन किंवा संगणक असल्याने, विद्यार्थ्यांसाठी पार्ट टाइम पैसे मिळवण्याचा एक चांगला पर्याय म्हणजे अॅप्स आणि वेबसाइट्सची चाचणी घेणे. जेव्हा कंपन्या आणि अॅप डेव्हलपर नवीन अॅप किंवा वेबसाइट तयार करतात, तेव्हा ते वापरकर्त्यांना 'बेटा टेस्टिंग' चे काम करण्यासाठी नियुक्त करतात. तुम्ही फक्त त्यांच्या साइट्स किंवा अॅप्सची चाचणी घ्या, आणि एक युजर म्हणून अनुभवाचा अहवाल द्यायचा असतो. संबंधित साईट लोकांसाठी लाइव्ह होण्यापूर्वी कोणत्याही बग किंवा समस्या ओळखण्यास तुम्हाला मदत करायची असते. .

तुम्ही BetaTesting, Tester Work, Test.io किंवा TryMyUI.सारख्या साइटवर या नोकर्‍या करण्यासाठी साइन अप करू शकता. 

  • आवश्यकता काय आहेत? - तुम्हाला कोणत्याही विशेष ज्ञानाची आवश्यकता नाही. परंतु तुम्ही चाचणी करत असलेल्या उत्पादनावर आधारित, तुमच्याकडे अद्ययावत Android, iOS किंवा Windows ऑपरेटिंग सिस्टम असणे आवश्यक आहे.
  • आपण किती कमवू शकता? - बेटा चाचणी प्रक्रियेवर आणि प्रक्रियेतील तुमचा अनुभव यावर अवलंबून, तुम्ही सुमारे ₹1000 ते ₹3000 कमवू शकता.
  • तुम्ही ही नोकरी कायम सुरू ठेवू शकता का? - अॅप आणि वेबसाइट चाचणी सहसा पार्टटाइम केली जाते, परंतु तुम्हाला प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा अनुभव असल्यास, तुम्ही तुमच्या भविष्यातील करिअरमध्ये हा अनुभव वापरू शकता.

तर, जे विद्यार्थी ऑनलाइन पैसे कमवू पाहत आहेत, ते त्यांच्या मोकळ्या वेळेतील थोडा वेळ अधिक उत्पादक मार्गाने वापरून सहज कमाई करू शकतात . फक्त बनावट एजन्सी, घोटाळे आणि फसवणूक टाळण्यासाठी खालीलप्रमाणे काळजी घ्या 

  • साइन अप करण्यापूर्वी कोणतीही साइट कसून तपासून घ्या आणि त्यांचे रिव्ह्यू वाचा.
  • तुमची वैयक्तिक माहिती विचारणाऱ्या कोणत्याही साइटपासून सावध रहा.
  • अशा वेबसाइट ज्यात भरपूर काम आहे, परंतु त्या तुम्हाला भरपाई म्हणून अवाजवी किंवा पुरेसे पैसे देणार नाहीत, त्यापासून लांब रहा 
  • स्वाक्षरी करण्यापूर्वी कोणताही करार पूर्णपणे वाचा.

एकदा तुम्ही ही खबरदारी घेतली की, तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीशिवाय पैसे कमवण्याच्या या सोप्या आणि सोयीस्कर मार्गांचा अवलंब करू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पार्टटाइम नोकरी विद्यार्थ्यांना कशी मदत करते?

पार्टटाइम नोकरी ही विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त पॉकेटमनी मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे. फक्त पगारच नव्हे तर पार्टटाइम नोकरी प्रशिक्षण आणि कार्य अनुभव दोन्ही प्रदान करू शकते. विशेषत: तुम्हाला अशी कौशल्ये आत्मसात करता येतात, जी तुम्हाला भविष्यातही कामी येऊ शकतात.

पार्टटाइम नोकरीचा विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो का?

पार्टटाइम नोकरी असणे खूप फायदेशीर ठरू शकते. परंतु काहींसाठी, पार्टटाइम नोकरीसह पूर्णवेळ अभ्यास करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे, जर तुम्हाला तणाव जाणवू लागला, किंवा त्याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असेल, तर तुम्ही काम करण्याचा पुनर्विचार करू शकता.

विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन नोकऱ्या कुठे शोधायच्या?

ऑनलाइन पैसे कमवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही टॉप साईट्स खालीलप्रमाणे आहेत. याशिवाय, तुम्ही Monster किंवा LinkedIn.सारख्या जॉब वेबसाइटवर साइन अप करू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही जॉब लिस्ट पोस्ट करणार्‍या सोशल मीडिया ग्रुप्समध्ये सामील होऊ शकता, आणि इतर सर्व पर्याय अयशस्वी झाल्यास, तुमच्या मित्र किंवा कौटुंबिक नेटवर्कद्वारे जुन्या पद्धतीचा मार्ग स्वीकारून काम मिळवूच शकता.