डिजिट भागीदार व्हा
35,000+ भागीदारांनी डिजिटसह 674 कोटी+ कमावले आहेत.

गुंतवणुकीशिवाय ऑनलाइन पैसे कसे कमवायचे?

आजकाल बरेच लोक घरातील कामांमध्ये अडकले आहेत. बरेच लोक कोणत्याही गुंतवणुकीशिवाय घरबसल्या पैसे कमवण्याचे मार्ग शोधत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी, सेवानिवृत्त यांच्यासह एकाहून अधिक मार्गाने कमाई करू इच्छिणारे बिझनेस मॅन /वुमन सुद्धा.

खरं तर, एक रुपयाची गुंतवणूक न करता तुम्ही ऑनलाइन पैसे कमवू शकता, असे अनेक मार्ग आहेत. तसेच हे करताना, तुमचा पैसा धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही घटनांची तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

गुंतवणुकीशिवाय ऑनलाइन पैसे कमविण्याचे काही सर्वोत्तम मार्ग येथे आहेत

1. इन्शुरन्स POSP व्हा

ऑनलाइन पैसे कमवण्याचा एक प्रमुख मार्ग, शुन्य गुंतवणुकीसह, वेळेचे बंधन नाही, आणि घरून काम करणे म्हणजे POSP (पॉइंट ऑफ सेल्सपर्सन) बनणे.

POSP हा एक इन्शुरन्स एजंट आहे, जो विशिष्ट इन्शुरन्स उत्पादने ऑनलाइन विकण्यासाठी इन्शुरन्स कंपनीसोबत काम करतो. POSP एजंट म्हणून, तुम्ही ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार त्यांच्यासाठी योग्य विमा पॉलिसी निवडण्यात मदत करू शकाल.

  • यासाठी काय आवश्यक आहे? - विमा एजंट होण्यासाठी एकमेव अट म्हणजे तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे, आणि इयत्ता 10 वी उत्तीर्ण केलेली असावी.  तसेच, सामान्य/जीवन विमा परवाना मिळविण्यासाठी तुम्हाला फक्त IRDAI द्वारे दिलेले 15 तासांचे अनिवार्य प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे.
     

  • आपण किती कमवू शकता? विविध प्रकारच्या पॉलिसी विकण्यास भरपूर वाव आहे, आणि तुमचे उत्पन्न तुम्ही किती पॉलिसी विकता यावर अवलंबून असेल. तुम्ही जितक्या अधिक पॉलिसी विकता, तितक्या लवकर तुम्ही जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकता.

त्यामुळे, जोपर्यंत तुमच्याकडे स्मार्टफोन आणि चांगले इंटरनेट कनेक्शन आहे, तोपर्यंत कोणीही POSP एजंट बनू शकतो. POSP एजंट होण्यासाठी च्या स्टेप्स, आवश्यकता आणि नियमांबद्दल तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता.

2. फ्रीलान्सिंगद्वारे

फ्रीलान्स काम हे ऑनलाइन पैसे कमवण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे, आणि हे काम सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गुंतवणुकीची गरज नाही. तुम्हाला फक्त काही प्रमुख पोर्टल ओळखण्याची आणि फ्रीलांसर म्हणून स्वतःची नोंदणी करायची आहे. मग तुम्हाला काही कामाचे नमुने शेअर करून संभाव्य क्लायंटला तुमची कौशल्ये पटवून देणे आवश्यक आहे.

  • काही आवश्यकता आहेत का? - जर तुम्ही लेखन, प्रोग्रामिंग, एडिटिंग, डिझायनिंग किंवा इतर अनेक कौशल्यांमध्ये चांगले असाल, तर तुम्ही फ्रीलांसर बनून ऑनलाइन पैसे कमवू शकता. आजकाल, बरेच व्यवसाय फ्रीलांसरना लहान कामे सोपवत आहेत.

  • आपण किती कमवू शकता? - तुम्ही ऑफर करत असलेल्या कामाच्या आधारावर, तुम्ही फ्रीलांसर म्हणून जास्त पगार देणारे काम सहज शोधू शकता.

काही टॉप फ्रीलान्सिंग साइट्समध्ये हे समाविष्ट आहे जे उत्तम कामे देतात:

3. घरगुती वस्तू विकणे

कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीशिवाय घरबसल्या सहज पैसे कमावण्याचा हा दुसरा महत्त्वाचा मार्ग आहे. तुम्हाला फक्त तुमच्या उत्पादनांसाठी कच्चा माल हवा आहे, जसे की स्वयंपाकाचे साहित्य किंवा हस्तकलेचे सामान. यामध्ये बेक केलेले पदार्थ, स्नॅक्स, सुगंधित मेणबत्त्या, वॉल हँगिंग्ज, टेबल मॅट्स आणि सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे.

  •  काही गोष्टींची आवश्यकता आहे का? - जर तुमच्याकडे कला आणि हस्तकला किंवा स्वयंपाक या क्षेत्रातील कौशल्ये असतील, तर तुमची घरगुती उत्पादने ऑनलाइन विकणे अगदी सोपे आहे.

  • आपण किती कमवू शकता? - तुम्ही विकत असलेली उत्पादने, तुमची मार्केटिंग कौशल्ये आणि तुम्ही निवडलेल्या विक्री भागीदार साइटवर तुमचे उत्पन्न अवलंबून आहे. तुम्ही तुमची उत्पादने उच्च किंमतींला सुद्धा विकू शकता

तुम्हाला काय बनवायचे आहे, आणि काय विकायचे आहे? हे कळल्यावर, तुम्हाला फक्त स्वतःला विक्रेते म्हणून खालील साइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे, जसे की:

या साइट्स तुमच्या उत्पादनांची ओळख वाढवतील, आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचतील याची खात्री करतील. दुसरीकडे, तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक किंवा WhatsApp सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना थेट विक्री करू शकता, आणि सेकंडरी वितरण सेवा वापरू शकता.

4. डेटा एंट्री जॉब निवडा

जे लोक गुंतवणूक न करता ऑनलाइन नोकरी शोधत आहेत, त्यांच्यासाठी डेटा एंट्री हा पर्याय आहे. जर तुम्ही घरून काम करू इच्छित असाल, किंवा शिक्षणासह आपल्या सोयीनुसार पार्ट टाइम नोकरी शोधत असाल, तर हा एक चांगला पर्याय असू शकतो.

  • यासाठी काय आवश्यक आहे? - अशा नोकर्‍यांसाठी तुम्हाला फक्त संगणक, एक्सेल आणि इतर मायक्रोसॉफ्ट टूल्सचे ज्ञान, तपशिलांकडे लक्ष देण्याची क्षमता आणि दिलेल्या वेळेत काम करता येणे आवश्यक आहे

  • आपण किती कमवू शकता? - डेटा एंट्री नोकर्‍या सहसा जलद किंवा सोप्या असतात, आणि तुम्ही प्रति तास ₹300 ते ₹1,500 कमवू शकता.

विश्वासार्ह वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर, तुम्ही जगभरातील विविध कंपन्यांकडून डेटा एंट्रीच्या नोकऱ्या स्वीकारू शकता (तुमचे अकाउंट तपशील हस्तांतरित करण्यापूर्वी त्यांची वैधता तपासण्याची खात्री करा). त्यानंतर तुम्हाला ईमेल किंवा डेटा स्रोताची लिंक पाठवली जाईल, आणि काय करावे? याबद्दल सूचना दिल्या जातील.

येथे काही विश्वसनीय वेबसाइट्स आहेत जिथे तुम्ही डेटा एंट्री नोकऱ्या शोधू शकता:

5. अॅप्स आणि वेबसाइट्स लाइव्ह होण्यापूर्वी त्यांची चाचणी घ्या

कोणत्याही गुंतवणुकीशिवाय ऑनलाइन पैसे कमविण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे अॅप्स आणि वेबसाइट्सची चाचणी घेणे. कंपन्या आणि अॅप डेव्हलपर त्यांच्या वापरकर्त्यांसाठी उत्तम अॅप्स आणि साइट्स बनवून गोंधळ टाळू इच्छित असतात, यासाठी ते वापरकर्त्यांना ‘बेटा टेस्टिंग’ साठी काम करण्यासाठी नियुक्त करतात. यात तुम्हाला त्यांच्या साइट्स किंवा अॅप्सची चाचणी घेऊन वापरकर्ता म्हणून अनुभवाचा अहवाल द्यायचा असतो. थेट लोकांपर्यंत पोहोचण्याआधी यात कोणत्याही बग आणि समस्या नाहीत, याची खात्री करायची असते.

  •  यासाठी काय आवश्यक आहे? - हे करण्यासाठी, तुम्हाला कोणत्याही विशेष ज्ञानाची आवश्यकता नाही, म्हणून जे घरून काम करू पाहत आहेत, त्यांच्यासाठी किंवा पार्टटाइम कामासाठी हे चांगले आहे.

  • आपण किती कमवू शकता? - बेटा टेस्टिंग प्रक्रिया किती लांब आणि किती गुंतागुंतीची आहे, व बेटा टेस्टिंगचा तुमचा अनुभव, यावर कमाई अवलंबून असते. तुम्ही सुमारे ₹1000 ते ₹3000 कमवू शकता.

अॅप आणि वेबसाइट टेस्टिंग जॉब ऑफर करणार्‍या काही साइट:

तुम्ही ऑनलाइन नोकऱ्या शोधण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

इंटरनेटवर बनावट एजन्सी, घोटाळे आणि फसवणूक होत असल्यामुळे ऑनलाइन पैसे कमवण्याचे मार्ग शोधणे कठीण होऊ शकते.

  • काम देण्याआधी तुम्हाला नोंदणी शुल्क मागणाऱ्या किंवा तुमची वैयक्तिक माहिती विचारणाऱ्या कोणत्याही साइटपासून सावध रहा.

  • तुमच्या कामाच्या कौशल्याचा फायदा घेणाऱ्या, पण तुम्हाला भरपाई म्हणून पुरेशी रक्कम देत नाहीत, अशा वेबसाइट्स ओळखून त्यापासून लांब रहा.

  • अशा फसव्या वेबसाइट्स आणि कंपन्यांपासून लांब राहण्याचा मार्ग म्हणजे कोणत्याही साइट नीट पडताळून पाहणे, आणि इतरांनी त्याबद्दल दिलेले रिव्ह्यू व कमेंट वाचा.

  • सही करण्यापूर्वी ते तुम्हाला ऑफर करत असलेला करार वाचण्याचे नेहमी लक्षात ठेवा.

तुमच्या वेळेचा अधिक चांगला उपयोग करून तुम्ही अधिक उत्पादनक्षम बनू शकता. तुम्ही घरी बसून आणि कोणतीही गुंतवणूक न करता थोडेसे अतिरिक्त पैसे कमवू शकता.

घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवण्याचे हे मार्ग तुमच्या वेळेनुसार वापरता येतात. त्यामुळे ते विद्यार्थी, गृहिणी, सेवानिवृत्त अशा मंडळींसाठी चांगले पर्याय आहेत. जर तुम्ही आधीच नोकरी करत असाल, तरीही आर्थिक मिळकतीसाठी अन्य पर्याय म्हणून कमाईचे हे उत्तम मार्ग आहेत. मग, अधिक पैसे कमविण्यासाठी या संधींचा फायदा का घेऊ नये?