डिजिट पार्टनर व्हा
35,000+ पार्टनरनी डिजिटसह 674 कोटी+ कमावले आहेत.

तुम्ही इन्शुरन्स ऑनलाईन कसा विकू शकता?

सध्याच्या काळात, बरेच लोक जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी इतर करिअर पर्याय आणि पार्टटाइम नोकरी शोधत आहेत. या साठीचा एक उत्तम मार्ग म्हणजे इन्शुरन्स ऑनलाइन विकणे.

भारतात, इन्शुरन्स विकण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत:

1. इन्शुरन्स सल्लागार

इन्शुरन्स सल्लागार अशी व्यक्ती असते, जी एखाद्या विशिष्ट इन्शुरन्स कंपनीमध्ये नोंदणीकृत असते, आणि ग्राहकांना इन्शुरन्स पॉलिसी विकण्यास, दावे करण्यासाठी आणि यासंबंधी इतर विविध कामे करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधते. IRDAI ने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुमचा इन्शुरन्स परवाना मिळविण्यासाठी आणि सल्लागार होण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावे लागेल, आणि परीक्षा द्यावी लागेल.

2. अपॉईन्ट ऑफ सेल्स पर्सन (POSP)

POSP  हा IRDAI द्वारे 2015 मध्ये तयार केलेला इन्शुरन्स सल्लागारांसाठी एक नवीन प्रकारचा परवाना आहे. त्यासाठी तुम्हाला आतापर्यंत विहित प्रशिक्षण कार्यक्रमातून (prescribed training program) जाण्याची आणि ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही जीवन इन्शुरन्स आणि सामान्य इन्शुरन्स या दोन्ही श्रेणींमध्ये (मोटर इन्शुरन्स, आरोग्य इन्शुरन्स, प्रवास इन्शुरन्स आणि बरेच काही समाविष्ट करून) एकाधिक इन्शुरन्स कंपन्यांच्या पॉलिसी विकण्यास सक्षम असाल.

अशा प्रकारे, तुम्ही ग्राहकांना अनेक पर्यायांची विस्तृत श्रेणी आणि अनेक कंपन्यांकडून विविध इन्शुरन्स योजना देऊ शकता, जेणेकरून ते त्यांच्यासाठी सर्वोत्तम प्रोडक्ट निवडू शकतील. तुम्ही अनेक कंपन्यांची पॉलिसी विकण्यासाठी इन्शुरन्स मध्यस्थ (insurance intermediary) किंवा ब्रोकरसोबत काम करू शकता, किंवा एकाच कंपनीसोबत काम करू शकता. अशा प्रकारे पारंपारिक इन्शुरन्स सल्लागारापेक्षा अधिक पर्याय आहेत.

इन्शुरन्स POSP कसे बनाल?

आपण पाहिल्याप्रमाणे, POSP (पॉइंट ऑफ सेल्स पर्सन) ही अशी व्यक्ती आहे, जी जीवन इन्शुरन्स, मोटार इन्शुरन्स, आरोग्य इन्शुरन्स आणि यासारख्या विविध श्रेणींमध्ये अनेक कंपन्यांकडून इन्शुरन्स उत्पादने विकण्यासाठी प्रमाणित आहे.

POSP होण्यासाठी, तुम्हाला फक्त IRDAI द्वारे दिलेल्या किमान शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आणि अनिवार्य प्रशिक्षण कोर्स करणे आवश्यक आहे.

  • POSP होण्यासाठी आवश्यक पात्रता: इन्शुरन्स एजंट होण्यासाठी काही मूलभूत आवश्यकता आहेत. तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे, आणि तुमचे किमान दहावीपर्यंत शिक्षण झाले असावे. तुमच्याकडे वैध आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमच्या नावावर बँकेत अकाउंट असणे आवश्यक आहे.
  • POSP बनण्याची प्रक्रिया: POSP म्हणून सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला विशिष्ट कंपनी किंवा इन्शुरन्स मध्यस्थांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर IRDAI द्वारे दिले जाणारे 15 तासांचे अनिवार्य प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. एकदा तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केले आणि परीक्षा पास केली की, तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी विकण्याचा परवाना मिळेल (POSP मार्गदर्शक तत्त्वांनुसार).

म्हणून, जो कोणी या मूलभूत निकषांची पूर्तता करतो, तो POSP होण्यासाठी नोंदणी करू शकतो. तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन विकण्यास आणि जारी करण्यास सक्षम असल्याने, नोकरीसाठी तुम्हाला फक्त स्मार्टफोन किंवा लॅपटॉप आणि चांगले इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.

ऑनलाइन चॅनेल सेट करणे, जसे की Google सूची, वेबसाइट तयार करणे. इतर ऑनलाइन चॅनेल जसे की, Google, Facebook पेज, जाहिराती, ईमेल, SMS, WhatsApp इत्यादी सेट करणे आणि बरेच काही. या सगळ्यासाठी शॉर्ट डिटेल्स उपयुक्त असतील.

सतत विचारले जाणारे प्रश्न

POSP आणि सामान्य इन्शुरन्स विक्रेत्यामध्ये काय फरक आहे?

दोघांमधील मुख्य फरक असा आहे की, इन्शुरन्स एजंट ज्या कंपनीशी संबंधित आहेत त्या कंपनीच्या इन्शुरन्स योजना विकू शकतात. तसेच त्यांना लाइफ इन्शुरन्स विकण्याचा परवाना, जनरल इन्शुरन्स विकण्याचा परवाना किंवा दोन्ही विकण्याचा परवाना मिळू शकतो.

दुसरीकडे, POSP एजंट वरील सर्व इन्शुरन्स श्रेणींमध्ये आणि विविध इन्शुरन्स कंपन्यांकडून इन्शुरन्स योजना विकू शकतो, परंतु असे करण्यासाठी त्यांना इन्शुरन्स मध्यस्थ किंवा ब्रोकरशी संबंधित असणे आवश्यक आहे.

कोण POSP बनू शकतो?

मूलभूत निकष पूर्ण करणारा कोणीही (18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आणि इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेला) POSP होऊ शकतो. त्यामुळे फ्रेशर्ससाठी ही एक उत्तम संधी आहे. आणि, तुम्ही हे काम पार्टटाइम करू शकत असल्यामुळे, महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी, सेवानिवृत्त आणि ज्यांच्याकडे आधीच नोकरी आहे, पण तरीही त्यांना आणखी काही गोष्टी करायच्या आहेत, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

तुम्ही POSP म्हणून किती पैसे कमवू शकता?

PSOP म्हणून, तुमची कमाई तुम्ही किती तास काम करता, यावर अवलंबून नसून तुम्ही इश्यू केलेल्या पॉलिसींच्या संख्येवर अवलंबून असेल. कोणतेही फिक्स उत्पन्न नसल्यामुळे तसेच लिमिट नसल्यामुळे भरघोस कमाई करता येते. म्हणजेच, तुम्ही जितक्या अधिक पॉलिसी विकता, आणि तुम्हाला जितके अधिक नूतनीकरण मिळेल, तितके तुम्ही POSP म्हणून कमवू शकता.

POSP म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील?

POSP म्हणून नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल:

  • तुमच्या इयत्ता 10 (किंवा वरील) उत्तीर्ण प्रमाणपत्राची प्रत
  • तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डची एक प्रत (front and back)
  • तुमचे नाव असलेला रद्द केलेला चेक
  • फोटोग्राफ

POSP कोणती उत्पादने विकू शकते?

तुम्ही ज्या कंपनीसाठी काम करतात त्यावर अवलंबून असते. POSP विम्याच्या अनेक श्रेणींमध्ये इन्शुरन्स योजना विकू शकते. यामध्ये जीवन इन्शुरन्स, मुदत इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स, आरोग्य इन्शुरन्स, प्रवास इन्शुरन्स आणि बरेच काही समाविष्ट आहे.

तुम्ही विम्याची विक्री कधी सुरू करू शकता?

एकदा तुम्ही इन्शुरन्स कंपनी किंवा ब्रोकरकडे नोंदणी केली की, तुम्ही 15 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करू शकता आणि आवश्यक परीक्षा उत्तीर्ण करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक eCertificate मिळेल आणि तुम्ही POSP एजंट म्हणून इन्शुरन्स ऑनलाइन विकण्यास सुरुवात करू शकता.

POSP असण्याचे काय फायदे आहेत?

POSP म्हणून ऑनलाइन इन्शुरन्स विकण्याचे अनेक फायदे आहेत:

  • कोणतीही निश्चित वेळ नाही - तुम्ही तुमचे स्वतःचे कामाचे तास सहजपणे निवडू शकता किंवा सेट करू शकता, आणि तुम्हाला पूर्णवेळ किंवा पार्टटाइम काम करायचे आहे की नाही, हे ठरवू शकता.
  •  तुम्ही स्वतः बॉस बनू शकता - तुमच्या सोयीने तुम्ही काम करू शकाल. पण तुम्हाला किती काम करायचे आहे, ते ठरवा..
  • घरून काम करणे शक्य आहे - POSP पॉलिसी विकण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया वापरू शकत असल्याने, तुम्ही सहजपणे घरून किंवा इतर कोठेही काम करू शकतात.
  • सेट कमिशन आहेत - POSPs कमिशन मिळवतात, जे नियामक संस्था (IRDAI) द्वारे सेट केले जातात. त्यामुळे, तुम्हाला स्टेबल उत्पन्न मिळण्याची शक्यता असते, तसेच उत्पन्नाची रक्कम तुम्ही इश्यू केलेल्या पॉलिसींच्या संख्येवर अवलंबून असते.
  • शून्य गुंतवणूक आवश्यक आहे - जेव्हा तुम्ही POSP म्हणून सामील होता तेव्हा कोणतीही गुंतवणूक किंवा पेमेंट आवश्यक नसते. सगळ्यांना स्मार्टफोन, कॉम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शनची गरज आहे!