डिजीट भागीदार व्हा
35,000+ भागीदारांनी डिजीट सह 674 कोटी+ कमावले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून पैसे कसे कमावता येतील?

ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्तांना अनेकदा घरबसल्या काही तरी करायचे असते, आणि ते हे नक्कीच करू शकतात! याशिवाय घरातून काम करून थोडे जास्त पैसे कमविण्याची संधी मिळवू शकतात. छंद किंवा पूर्वीच्या कामाचा अनुभव तसेच तुमच्याकडे आधीपासून असलेल्या कौशल्यांना तुम्ही नवीन कामांमध्ये नक्कीच वापरू शकता

ज्येष्ठ नागरिकांसाठी घरबसल्या पैसे कमवण्याचे काही मार्ग येथे आहेत

1. इन्शुरन्स POSP व्हा

ज्येष्ठ नागरिकांसाठी पैसे कमवण्याचा एक मार्ग म्हणजे POSP किंवा पॉइंट ऑफ सेल्सपर्सन बनणे. POSP हा एक इन्शुरन्स एजंट आहे, जो इन्शुरन्स कंपनीसाठी इन्शुरन्स पॉलिसी विकतो. तुमच्याकडे फक्त विक्रीसाठी योग्यता, स्मार्टफोन आणि चांगले इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही विमा प्रदात्याकडे साइन अप करू शकता, आणि इन्शुरन्स POSP होऊ शकता.

  • यासाठी काय आवश्यक आहे?- POSP होण्यासाठी,तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे,आणि तुम्ही इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तुम्ही वरील पात्रता पूर्ण करतअसाल, तर तुम्ही IRDAI द्वारे दिलेले 15 तासांचेअनिवार्य प्रशिक्षण पूर्ण करू शकता आणि तुमचा परवाना मिळवू शकता.

  • आपण किती कमवू शकता?- POSP म्हणून तुमचे उत्पन्न तुम्ही किती पॉलिसी विकता, त्यावर मिळणाऱ्या कमिशनवर अवलंबून असेल. त्यामुळे आपण जितक्या जास्त पॉलिसी विकता, तितके अधिक पैसे कमवू शकता.

2. शिकवणी घ्या

जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रात भरपूर ज्ञान असेल किंवा तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यवसायातून निवृत्त झाला असाल, तर तुम्ही या विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक होऊ शकता. तुम्ही इंग्रजी, गणित, विज्ञान आणि इतिहासापासून संगीत किंवा कलाकुसरीपर्यंत काहीही शिकवू शकता.

शिकवणी घेण्यासाठी तुम्ही Udemy किंवा Coursera सारख्या ऑनलाइन ट्युटोरिंग प्लॅटफॉर्मवर साइन अप करू शकता. तसेच शिकवणी वर्गाची गरज असलेल्या लोकांना शोधण्यासाठी Facebook आणि WhatsApp वर मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क साधू शकता

  • यासाठी काय आवश्यक आहे?- शिक्षण म्हणून काम करण्यासाठी,तुम्हाला शिकवण्याची कौशल्ये स्वतःशिकून घेणे गरजेचे आहे. जे विषय तुम्ही शिकवण्याची योजना आखत आहात, त्यांच्या अभ्यासक्रमाची माहिती करून घ्या.

  • आपण किती कमवू शकता?- शिक्षक म्हणून तुमचा तासाचा दर कौशल्यानुसार आणि विषयानुसार बदलू शकतो*. परंतु साधारणपणे तुम्ही प्रति तास ₹200-500पर्यंत कमवू शकता.

3. बिझनेसमॅन आणि कंपन्यांसाठी सल्लागार व्हा

तुमच्याकडे व्यवसाय किंवा इतर क्षेत्रातील कामाचा अनुभव किंवा पार्श्वभूमी असल्यास, तुम्ही तुमचे ज्ञान व्यावसायिकांना आणि कंपन्यांना सल्लागार म्हणून विकू शकता. आरोग्यसेवा, व्यवसाय, आयटी आणि अधिक क्षेत्रात काम करणारे सेवानिवृत्त प्रोफेशनल अपवर्क , लिंक्डइन इत्यादी साइट्स वापरून ऑनलाइन क्लायंट शोधू शकतात.

या प्रकारच्या दूरस्थ सल्लागार नोकर्‍या अर्धवेळ किंवा पूर्णवेळ असू शकतात, किंवा अगदी कराराच्या आधारावर देखील असू शकतात, आणि सहसा खूप सोयीस्कर असतात.

  • यासाठी काय आवश्यक आहे?- सल्लागार म्हणून काम शोधण्यासाठी, तुम्हाला तुमचे कौशल्य आणि अनुभव बाजारातील गरजांनुसार मांडता यायला हवे

  • आपण किती कमवू शकता?- तुमचा अनुभव आणि कामाच्या क्षेत्रानुसार,तुम्ही उच्च पगाराच्या सल्लागाराच्या नोकऱ्या सहज शोधू शकता.

4. फूड डिलिव्हर सेवा सुरू करा

जर तुम्ही स्वयंपाक किंवा बेकिंगचा आनंद घेत असाल, तर ज्येष्ठ नागरिक फूड डिलिव्हरी सर्व्हिस सुरू करून घरबसल्या पैसे कमवू शकतात. तुम्ही दैनंदिन पॅकेज केलेल्या जेवणापासून ते बेक केलेले पदार्थ, पर्सनल डिशेस आणि अगदी पार्टीसाठी तयार केलेल्या जेवणापर्यंत सर्व काही विकू शकता.

तुम्ही एकतर Zomato आणि Swiggy सारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे तुमचे अन्न विकू शकता, किंवा Facebook किंवा WhatsApp वर तुमचे मित्र आणि नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचू शकता, आणि डिलिव्हरी सेवेचा वापर करून त्यांना तुमची उत्पादने थेट विकू शकता.

  • यासाठी काय आवश्यक आहे?- तुम्हाला आवश्यक असलेले स्वयंपाकाचे साहित्य,तसेच एक विश्वासार्ह डिलिव्हरी सेवा तुम्हाला स्वतःला पुरवावी लागेल.

  • आपण किती कमवू शकता?- तुमचे उत्पन्न तुम्ही विकत असलेल्या अन्नाच्या प्रकारावर (उदा: पूर्ण जेवण, स्वीट,स्नॅक्स इ.)आणि तुमच्याकडे असलेल्या ग्राहकांच्या संख्येवर अवलंबून असेल.

5. तुमच्या घरी बनवलेल्या वस्तूंची विक्री करा

ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या सहज पैसे कमावण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे स्टिचिंग, आर्ट आणि क्राफ्टिंगसह त्यांची कौशल्ये वापरून ऑनलाइन विक्रीसाठी उत्पादने बनवणे. यामध्ये पेंटिंग्ज, कार्पेट्स, सुगंधित मेणबत्त्या, भिंतीवरील चित्र, शोभेच्या वस्तू, टेबल मॅट्स आणि सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे.

तुम्ही तुमच्या घरगुती वस्तू विकण्याच्या अधिक संधी मिळवण्यासाठी Etsy, , Facebook , Marketplace, Amazon आणि eBay सारख्या साइट वापरू शकता. तसेच तुमच्या वस्तूंची जाहिरात करण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा Facebook आणि Instagram सारख्या सोशल मीडियाकडे वळू शकता.

  • यासाठी काय आवश्यक आहे?- तुम्हाला फक्त तुमच्या उत्पादनांसाठी कच्चा माल हवा आहे, जसे की पेंट्स,सुया आणि धागा किंवा इतर हस्तकला पुरवठा.

  • आपण किती कमवू शकता?- तुम्ही कोणती उत्पादने विकता आणि तुम्ही किती विकता, यावर तुम्ही किती रक्कम कमवाल, हे अवलंबून असेल. उत्तम वस्तूंसाठी तुम्ही तुमची उत्पादने उच्च किंमतींवर देखील सेट करू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ज्येष्ठांसाठी ऑनलाइन कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत?

सर्व वयोगटातील, पार्श्वभूमी आणि कौशल्य पातळीच्या लोकांसाठी विविध प्रकारच्या नोकऱ्या ऑनलाइन उपलब्ध आहेत. फक्त तुम्हाला ज्या प्रकारची नोकरी हवी आहे, अशा साइट्स पहा किंवा LinkedIn सारख्या जॉब एग्रीगेटर साइट्सकडे जा, जिथे तुम्हाला फ्रीलान्स काम, पार्ट टाइम नोकर्‍या किंवा अगदी पूर्णवेळ नोकर्‍या मिळू शकतात.

ऑनलाइन नोकरी/व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अनुभवाची गरज आहे का?

तुम्ही कोणती नोकरी/व्यवसाय करू इच्छिता, यावर ते अवलंबून आहे. कंपन्या वेबसाइट्स सल्लागार किंवा शिकवण्यासारख्या नोकऱ्यांसाठी अधिक अनुभव असलेल्यांना प्राधान्य देतील, जर तुम्ही घरगुती खाद्यपदार्थ किंवा वस्तू विकण्याचा किंवा POSP बनण्याचा विचार करत असाल, तर नोकरीच्या अनुभवाची फारशी गरज नाही.

घरबसल्या ऑनलाइन काम सुरू करण्यासाठी काही गुंतवणूक आवश्यक आहे का?

यापैकी बर्‍याच नोकऱ्यांसाठी चांगल्या हायस्पीड इंटरनेट कनेक्शन शिवाय इतर कोणत्याही गुंतवणूकीची आवश्यकता नसते. तुम्हाला वस्तूंची विक्री करण्यासाठी पुरवठा किंवा कच्चा माल यासारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्याची आवश्यकता असू शकते, तर फ्रीलान्स नोकऱ्या, शिकवण्या घेणे इ. ऑफर करणार्‍या काही वेबसाइट्सना तुम्हाला थोडे शुल्क भरावे लागेल, किंवा त्यांच्याकडे नोंदणी करावी लागेल.