Thank you for sharing your details with us!

साइन बोर्ड इन्शुरन्स म्हणजे काय?

साइन बोर्ड इन्शुरन्स असण्याचे फायदे

तुमच्या साइन बोर्डला आग, चोरी किंवा इतर दुर्दैवी घटनांमुळे नुकसान किंवा डॅमेज झाल्यास तुमच्या बिझनेसचे संरक्षण करण्यासाठी साइन बोर्ड विमा आवश्यक आहे. पण तुम्हाला त्याची खरोखर गरज का आहे?

आग, चोरी किंवा तुमचे फलक किंवा होर्डिंग्ज डॅमेज झाल्यास ते दुरुस्त करण्यासाठी किंवा रीप्लेस करण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल.
डॅमेज दुरुस्त करण्यासाठी किंवा तुमचे साइनबोर्ड बदलण्याच्या भरमसाठ खर्चापासून आर्थिक संरक्षण मिळवा.
तुमचा बिझनेस आणि जाहिरातींवर परिणाम होणार नाही यासाठी तुमचे साइनबोर्ड वेळेत लावले आहेत याची खात्री करण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल.

साइन बोर्ड इन्शुरन्स काय कव्हर करते?

जेव्हा तुम्हाला साइन बोर्ड इन्शुरन्स मिळेल, तेव्हा तुम्हाला खालील बाबतीत कव्हर केले जाइल...

अपघाती बाह्य नुकसान किंवा डॅमेज

आग, वीज पडणे, भूकंप, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे साइन बोर्डचे कोणतेही अपघाती नुकसान किंवा डॅमेज.

साइन बोर्डची चोरी

संपूर्ण साइन बोर्ड चोरीला गेल्यास, तो रीप्लेस करण्यासाठी तुम्हाला कव्हर दिले जाईल.

दंगली दरम्यान नुकसान

दंगल किंवा संपादरम्यान तुमचा साइन बोर्ड वाईट हेतूने डॅमेज केला गेला तर आशा वेळी देखील तुम्हाला कव्हर दिले जाइल.

तात्पुरती बोर्डिंग

पॉलिसीमध्ये साइन बोर्ड खराब झाल्यानंतर आवश्यक असलेले कोणतेही तात्पुरते बोर्डिंग किंवा ग्लेझिंग इरेक्शनचा खर्च देखील समाविष्ट आहे.

अलार्म आणि लेटरिंग रीप्लेस करणे

खराब झालेल्या साइनबोर्डवरील अलार्म वायरिंग, लेटरिंग, पेंटिंग किंवा ऑरनामेंटेशन रीप्लेस करण्याची आवश्यकता असल्यास तुम्हाला कव्हर दिले जाइल.

विंडो फ्रेम्स रीप्लेस करणे

कोणतेही डॅमेज झालेले भाग बसवण्याची किंवा संपूर्ण साइनबोर्ड रीप्लेस करण्याची कॉस्ट समाविष्ट केली जाईल, जोपर्यंत तो खर्च निर्दिष्ट केलेल्या मर्यादेच्या आत असेल तरच.

डेब्रिस काढून टाकणे

डॅमेज झालेल्या साइन बोर्डमुळे होणारा कोणताही डेब्रिस काढून टाकण्याच्या खर्चासाठी तुम्हाला (निर्दिष्ट मर्यादेत) कव्हर दिले जाईल.

थर्ड पार्टी बॉडिली इन्जुरी किंवा डेथ

साइन बोर्डचे नुकसान एखाद्या थर्ड पार्टी व्यक्तीला शारीरिक इजा झाल्याचे किंवा मृत्यूचे कारण असल्यास कायदेशीर लायबिलिटीसाठी कव्हर दिले जाते.

थर्ड पार्टी प्रॉपर्टी डॅमेज

साइन बोर्डच्या डॅमेजमुळे कोणत्याही थर्ड पार्टी प्रॉपर्टी डॅमेज झाल्यास, तुम्हाला त्यासाठी कव्हर दिले जाईल.

काय कव्हर केले जात नाही?

आमचा खरोखर पारदर्शकतेवर विश्वास असल्याने, खाली काही परिस्थिती दिलेल्या आहेत ज्या कव्हर केल्या जाणार नाहीत...

बल्ब फ्यूज होणे, शॉर्ट सर्किट होणे किंवा जास्त गरम होणे यासह कोणतेही यांत्रिक किंवा इलेक्ट्रिकल ब्रेकडाउन फेल्युअर.

विकृतीकरण, स्क्रॅचिंग, क्रॅकिंग किंवा चिपिंग आणि अक्षरे तुटणे, या सगळ्यामुळे साइन बोर्डचे नुकसान किंवा डॅमेज झाले तर.

साइन बोर्डला कोणतेही डॅमेज न करता फ्रेम किंवा फ्रेमवर्कचे नुकसान झाल्यास, ते कव्हर केले जाणार नाही.

कोणतेही पूर्व-अस्तित्वात असलेले डॅमेज, किंवा हळूहळू बिघडल्यामुळे होणारे डॅमेज, आणि झीज कव्हर केले जाणार नाहीत, तसेच देखभाल आणि मेंटेनेंसची कॉस्टही कव्हर केली जाणार नाही.

साइन बोर्ड बदलताना, काढताना किंवा दुरुस्त करताना होणारे नुकसान आणि डॅमेज कव्हर केले जात नाही.

सदोष डिझाईन किंवा कारागिरीमुळे होणारे नुकसान किंवा डॅमेज किंवा साइन बोर्ड सुरक्षितपणे न लावल्यास.

कोणतेही कॉनसीक्वेनशियल नुकसान (जसे की नफा तोटा किंवा बिझनेसमधील व्यत्यय) कव्हर केले जात नाही.

युद्ध, दहशतवाद किंवा आण्विक आपत्तीमुळे होणारे नुकसान कव्हर केले जाणार नाही.

कोणत्याही कंत्राटदारांच्या उप-कंत्राटदारांसह, तुमच्या व्यवसायासाठी नियुक्त केलेल्या किंवा करार केलेल्या व्यक्तींचा मृत्यू किंवा शारीरिक इजा.

तुमच्या मालकीच्या कोणत्याही प्रॉपर्टी डॅमेज (इनशूअर्ड व्यक्ती किंवा बिझनेस).

तुम्ही स्वतः, कर्मचारी, कुटुंबातील सदस्य किंवा तुमच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीने जाणूनबुजून केलेले कोणतेही नुकसान किंवा डॅमेज.

कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक प्राधिकरणाद्वारे जप्ती किंवा ताब्यात घेतण्यात आल्यास तुम्हाला कव्हर दिले जाणार नाही.

साइन बोर्ड इन्शुरन्सची कॉस्ट किती आहे?

कव्हरेजचे प्रकार

सर्वांना साइन बोर्ड इन्शुरन्सची गरज आहे?

तुम्ही किंवा तुमच्या बिझनेस आस्थापनांमध्ये साइन बोर्ड किंवा होर्डिंग लावले असल्यास, तुम्हाला साइन बोर्ड इन्शुरन्स महत्त्वाचा वाटायला लागतो. उदाहरणार्थ, जर...

तुमचा बिझनेस ओळखण्यासाठी साइन बोर्ड आहेत (जसे की शोरूम, दुकाने, बुटीक, डीलरशिप आणि बरेच काही)

तुमच्या बिझनेसमध्ये सजावटीसाठी साईन बोर्ड आहेत. (जसे की रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, थिएटर इ.)

तुमचा बिझनेस जाहिरातींसाठी साइनबोर्ड वापरतो (उदाहरणार्थ, जाहिरात एजन्सी, पीआर एजन्सी किंवा इतर व्यवसाय जे त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करतात)

योग्य साइन बोर्ड इन्शुरन्स कसा निवडावा?

  • वेगवेगळ्या पॉलिसींची तुलना करा - त्यामुळे, परवडणाऱ्या किमतीत तुमच्यासाठी योग्य ती पॉलिसी शोधण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसींची वैशिष्ट्ये आणि प्रीमियम यांची तुलना करा. कमी प्रीमियम असलेली पॉलिसी निवडू नका जी तुम्हाला योग्य कव्हरेज देऊ शकत नाही.
  • संपूर्ण कव्हरेज - अशी पॉलिसी शोधा जी तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या साइनबोर्डवरील सर्व जोखमींसाठी जास्तीत जास्त कव्हरेज देते.
  • सम इनशूअर्ड - तुमच्या बिझनेससाठी कोणते सम इनशूअर्ड चांगले आहे हे साइनबोर्डची मार्केट व्हॅल्यू किंवा रीप्लेसमेंट व्हॅल्यू यावर अवलंबून असायला हवे.
  • इझी क्लेम्सची प्रोसेस - क्लेम्स खरोखर महत्वाचे आहेत, म्हणून, क्लेम्स प्रोसेस इझी असलेली इन्शुरन्स कंपनी शोधा; यामुळे तुमचा आणि तुमच्या बिझनेसचा बराच त्रास कमी होऊ शकतो.
  • एक्स्ट्रा सर्व्हिस बेनिफिट्स - इन्शुरन्स कंपन्या इतर सर्व प्रकारचे फायदे देतात, जसे की 24X7 ग्राहक सहाय्य, वापरण्यास सुलभ मोबाइल अॅप्स आणि बरेच काही.

भारतातील साइन बोर्ड इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न