इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा
Instant Policy, No Medical Check-ups

भारतामधून जर्मनी व्हिसा

भारतामधून जर्मनी टूरिस्ट व्हिसा याबद्दल सर्व काही

जर्मनीला जाण्याची असंख्य करणे असू शकतात. तिथले जीवंत आणि कलात्मक शहर ते विलक्षण आणि अद्वितीय ग्रामीण भाग, तुमच्या प्रवासाच्या नकाश्यातील पुढची ट्रीप ठरवण्यासाठी जर्मनी हा एक सुंदर देश ठरू शकतो. ऑक्टोबर फेस्ट आणि बर्लिन फिल्म फेस्टीव्हल यासारख्या इव्हेंट्सचे माहेरघर, आणि त्याचबरोबर हा देश इथल्या कालात्मकतेसाठी देखील प्रसिद्ध आहे. पण पुढे जाण्याआधी आणि तुम्ही तुमची प्रवासाची स्वप्न रंगवण्याआधी- व्हिसा साठी अर्ज करा आणि मग- तुमच्यासाठी आकाश ठेंगणे आहे.

जर्मनीला जाण्यासाठी भारतीयांना व्हिसा लागतो का?

होय, भारतीय पासपोर्ट धारकांकडे जर्मनीसाठी शेंगेन व्हिसा असणे आवश्यक आहे. या व्हिसा सोबत तुम्ही शेंगेन एरिया मधील इतर 25 देशांना देखील भेट देऊ शकता. व्हिसा मिळाल्यानंतर भारतीय नागरिक या देशात जास्तीत जास्त 90 दिवस राहू शकतात. तरी, तुमचा पासपोर्ट तुम्ही जर्मनीला पोहोचण्याच्या तारखेपासून पुढे 3 महीने वैध असेल याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

जर्मनी मध्ये भारतीय नागरिकांसाठी व्हिसा ऑन अराइव्हल असतो का?

नाही, जर्मनी आणि इतर युरोपिअन देश व्हिसा ऑन अराइव्हल ऑफर करत नाही. भारतीय नागरिक, ज्यांना जर्मनीला जाण्याची इच्छा आहे, त्यांच्याकडे पर्याटकांसाठीचा प्री-अप्रूव्हड व्हीसा असणे आवश्यक आहे.

जर्मनी टुरिस्ट व्हिसा साठी लागणारे दस्तऐवज

शेंगेन व्हिसा साठी अर्ज करताना तुम्हाला खालील दस्तऐवज लागतील:

भारतीय नागरिकांसाठी जर्मनी व्हिसा फीस

भारतीय नागरिकांसाठी जर्मनी व्हिसा फी एडल्ट साठी EUR 75 आणि लहान मुलांसाठी कोणत्याही प्रकारच्या व्हिसा साठी 37.50 EUR इतका आहे. परंतु काही नागरिकांना व्हिसा फीस मधून सूट दिलेली आहे, ते आहेत:

जर्मनी टुरिस्ट व्हिसा साठी कसा अर्ज करायचा?

जर्मनी टुरिस्ट व्हिसा साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे अगदी सोपी आहे

जर्मनी टुरिस्ट व्हिसा प्रोसेसिंग टाइम

जर्मनी टुरिस्ट व्हिसा प्रोसेसिंग साठी 15 दिवस लागतात. परंतु काही केसेस मध्ये हा कालावधी 30 दिवस पर्यंत वाढू शकतो.

मी जर्मनी साठी ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करावा का?

शेंगेन व्हिसा रिक्वायरमेंट्स प्रमाणे भारतीय प्रवाशांसाठी जर्मनी साठी ट्रॅव्हल इन्शुरन्समँडेटरी आहे. तरी, तुमच्या इन्शुरन्स घेण्याचे कारण हे एवढे एकंच नसावे. कारण शेवटी कितीही प्लॅन केलं तरी काही तरी गोंधळ होतोच. जर्मनीसाठीचा ट्रॅव्हल इन्शुरन्स अशा परिस्थितीमध्ये तुमची मदत करेल- तुम्हाला अनपेक्षित असलेल्या प्रसंगांपासून सुरक्षा देण्यासाठी. असे प्रसंग कोणतेही असू शकतात म्हणजेच फ्लाइट डीले होण्यापासून ते कोणतीही मोठ्ठी दुर्घटना जसे मेडिकल इमर्जन्सी किंवा ट्रीप रद्द करणे.

खाली काही असे प्रसंग दिले आहेत ज्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते, आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स कशा प्रकारे या प्रसंगांमधून होणाऱ्या नुकसानापासून सुरक्षित ठेवेल, हे देखील खाली नमूद केले आहे.

भारतीय नागरिकांसाठी जर्मनी टुरिस्ट व्हिसा याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

व्हिसा अॅप्लीकेशन प्रोसेसिंग सुरु असताना ट्रॅव्हल इन्शुरन्स साठी अर्ज कारण आवश्यक आहे का?

तुमचा व्हिसा अॅप्लीकेशन आणि त्याची अॅक्सेप्टंस प्रोसेस यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी कायद्यानुसार हे मँडेटेड आहे. ट्रॅव्हल इन्शुरन्स नसल्या कारणाने व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो.

अॅप्लीकेशन प्रोसेस सुरु असताना मी माझी आर्थिक स्थिती स्पष्ट करायला हवी का?

होय, तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे मागच्या 3 महिन्यांचे स्टेटमेंट्स सबमिट करावे लागतात. अधिकारी ते स्टेटमेंट्स बघून तुम्ही व्हिसा साठी पात्र आहात की नाही हे ठरवतील.

जर्मनी मध्ये भारतीय नागरिकांसाठी व्हिसा ऑन अराइव्हल असतो का?

नाही. इतर सर्व युरोपिअन देशांप्रमाणेच जर्मनीमध्ये देखील व्हिसा ऑन अराइव्हल साठी कोणतीही तरतूद नाही. व्हिसा साठी तुम्हाला जर्मन कॉन्सोलेट म्हणजेच वाणिज्य दूतावासामध्ये मध्ये आधीच अर्ज करावा लागतो.

शेंगेन व्हिसा घेऊन मी जर्मनीला जाऊ शकतो का?

होय, जर्मनी हा शेंगेन प्रदेशाचाच भाग आहे. तुम्ही शेंगेन व्हिसा घेऊन जर्मनीला जाऊ शकता. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया वरीलप्रमाणेच आहे.

व्हिसा अर्ज करण्यासाठी आणि प्रेसेसिंगसाठी मला किती खर्च येईल आहे हे मला कसे जाणून घेता येईल?

जर्मनीच्या पर्यटन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन केल्यावर तुम्हाला ही माहिती सहज मिळेल. कधी कधी, जर या दरांमध्ये काही बदल झाला असेल तर लोकांना या बदलांबद्दल माहिती देण्यासाठी वेळोवेळी मोठ्या प्रकाशाकांमार्फात जाहिराती दिल्या जातात.