डिजिट इन्शुरन्समध्ये स्विच करा

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि झिरो डिप्रिसिएशन इन्शुरन्समधील फरक

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स + झिरो डिप्रिसिएशन = 100% समाधान

झिरो डिप्रिसिएशन हे 'ॲड ऑन' कव्हर आहे, दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, एक अतिरिक्त लाभ आहे जो कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्ससह खरेदी केला जाऊ शकतो. मुळात झिरो डिप्रिसिएशन हा कॉम्प्रिहेन्सिव्ह   मोटार इन्शुरन्सचा 😊 भाग आहे! तुम्हाला अधिक चांगले समजण्यासाठी सगळं तपशीलवार माहिती जाणून घेऊयात. प्रथम तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्सबद्दल थोडे सांगू या, चला सुरु करू या 😊!

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स म्हणजे काय?

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स ही मोटार वाहनांसाठी 'प्रीमियम इन्शुरन्स' पॉलिसी आहे, कार आणि  बाईक दोन्हीसाठी. तसेच नावाप्रमाणेच, हे 'संपूर्ण पॅकेज' आहे ज्यात कोणत्याही दुर्घटनेच्या बाबतीत तुमचे वाहन आणि वाहनात बसलेली व्यक्ती तसेच थर्ड-पार्टीच्या वाहनाचे कोणतेही नुकसान कव्हर होते. एकंदरीत, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स कव्हरमध्ये पुढील गोष्टी कव्हर होतात:

  • अपघातामुळे तुमच्या वाहनाचे झालेले नुकसान
  • अपघातादरम्यान झालेली वैयक्तिक दुखापत
  • तुमच्या वाहनाची चोरी
  • आगीमुळे तुमच्या वाहनाचे  झालेले नुकसान
  • नैसर्गिक आपत्तींमुळे तुमच्या वाहनाचे झालेले नुकसान
  • अपघातात थर्ड पार्टीच्या वाहनाचे किंवा मालमत्तेचे झालेले नुकसान
  • अपघातादरम्यान थर्ड पार्टीला झालेली दुखापत

आता, इथे झिरो डिप्रिसिएशन तुमच्या मदतीसाठी उपयोगी ठरते !

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स ही प्रीमियम मोटार इन्शुरन्स पॉलिसी असल्याने विविध 'ॲड ऑन' कव्हर्स किंवा 'बेनिफिट्स' मधून निवडण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. ही कव्हर्स बेसिक इन्शुरन्स पॉलिसी खर्चापेक्षा थोड्या प्रीमियमवर मिळू शकतात.

रोडसाइड असिस्टन्स इंजिन संरक्षण कव्हर, कंझ्युमेबल कव्हर इत्यादी भरपूर 'ॲड ऑन' कव्हर्स आहेत. तर, मुळात, झिरो डिप्रिसिएशन हे 'ॲड ऑन' कव्हरपैकी एक आहे जे तुम्ही तुमच्या वाहनासाठी अत्यंत उपयुक्त अशा अतिरिक्त इन्शुरन्स बेनिफिटमध्ये निवडू शकता!

कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी व्हर्सेस(विरुद्ध) झिरो डिप्रिसिएशन पॉलिसीमधील फरक

झिरो डेप कव्हरसह कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी झिरो डेप कव्हरशिवाय कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी
प्रीमियम रक्कम सामान्य कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी पेक्षा थोडी जास्त झिरो डेप ॲडऑनसह असलेल्या पॉलिसीपेक्षा कमी
क्लेम सेटलमेंट रक्कम डिप्रिसिएशन मानले जात नाही म्हणून जास्त गाडीच्या सगळ्या भागांसाठी डिप्रिसिएशन विचारात घेतल्याने कमी
प्लास्टिकच्या भागांची दुरुस्ती शून्य डेप ॲडनसह, अशा भागांसाठी कोणत्याही डिप्रिसिएशनचा विचार केला जात नाही क्लेम सेटल करण्यापूर्वी अशा भागांवरील 50% डिप्रिसिएशन विचारात घेतले जाते
कव्हर्ड कारचे वय झिरो डेप ॲडऑनसह, डिप्रिसिएशन दर झिरो(शून्य) मानला जातो वयोमानानुसार, तुमच्या कारचे डिप्रिसिएशन वाढत राहते आणि क्लेममध्ये कव्हर केले जाणार नाही

झिरो डिप्रिसिएशन कव्हर घेण्याचा फायदा

वाढत्या वयाचे तोटे पण असतात. हीच गोष्ट तुमच्या वाहनालाही लागू होते. ते जितके जुने होईल तितके तुमच्या कारचे किंवा बाईकचे मूल्य कमी होते  किंवा ‘डिप्रिशिएट’ होते. पण, चिंता करु नका, हे 'ॲड ऑन' हे सुनिश्चित करते की तुम्ही ते विकत घेतल्याच्या दिवसाइतकेच तुमच्या वाहनाचे मूल्य राहील!

झिरो डिप्रिसिएशनला नील डिप्रिसिएशन किंवा बंपर टू बंपर कव्हर म्हणूनही ओळखले जाते जे कव्हरेज मधून 'डिप्रिसिएशन' घटक बाजूला काढते.

याचा मुख्य अर्थ असा आहे की, टक्कर झाल्यानंतर जर तुमची कार किंवा बाईक खराब झाली, तर तुमच्या वाहनाच्या कोणत्याही भागांची झीज असे कोणतेही डिप्रिसिएशन कव्हरेजमधून वजा केले जात नाही.

इन्शुरन्स कंपनी तुम्हाला गाडीचे जे भाग दुरुस्त करावे लागतील किंवा बदलावे लागतील त्याच्यासाठीच्या संपूर्ण खर्चाची 100% रक्कम (अर्थातच, डिडक्टिबल्स वजा करून) ऑफर करेल त्यामुळे, आपण पाहतो की आपण खरोखर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स विरुद्ध झिरो डिप्रिसिएशन अशी तुलना करू शकत नाही, कारण झिरो डिप्रिसिएशन हे केवळ एक ॲड-ऑन आहे जे कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरसह घेतले जाऊ शकते, तथापि, यामध्ये तुमच्या कारच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश आहे.

झिरो डिप्रिसिएशनसह तुमचे लाडके वाहन नेहमीच 100% नव्याइतके चांगले राहील याची खात्री बाळगा !